हे बंध रेशमाचे - भाग 34

Love story

हे बंध रेशमाचे -भाग 34


रात्री आनंद आणि नेहा उशिरा घरी परतले.. संध्याकाळी बर्फाचा गोळा , मग पाव भाजी....त्यानंतर थेटरला जावुन त्यांनी मुव्ही बघितली....आणि मग आनंदच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये ते डिनरला गेले..आणि जेवुन घरी आले. दोघेही खूप दमले होते...पण आजची संध्याकाळ खूप आल्हाददायक होती..!!!! दोघांसाठीही....!!! नेहा वरती रूममध्ये आली. सहजच तिचं लक्ष वोर्डरोबच्या वरती गेलं. एवढ्या दिवसात आपलं तिकडे लक्ष कसं गेलं नाही असं तिला वाटलं. तिथे काहीतरी गुंडाळून ठेवलेलं तिला दिसलं. तिच्या पाठोपाठ आनंदही खोलीत आला.

" हे काय आहे...? " तिने वोर्डरोबच्या वरच्या दिशेने बोट करत विचारलं. 

" काही नाही ग...माझ्या वस्तू आहेत जुन्या.." तो टाळत म्हणाला.

" मला दाखवा ना.....मला आवडेल बघायला...तुमच्या लहानपणीच्या आहेत का...?" ती भडाभडा त्याला विचारत होती.

" नको ग प्लिज......आणि मला नावाने हाक मारलीस तरच मी यापुढे ओ देणार नाहीतर नाही...." आनंद

" हमम मला सवय व्हायला वेळ जाईल..... तुम्ही विषय बदलू नका बरं... सांगा ना काय आहेत त्यात..??" ती उत्सुकतेने म्हणाली

" नको ना....एवढं काही नाही...असंच जुनी खेळणी वगरे आहेत...जुन्या घरातल्या काही फ्रेम्स वगरे बाकी काही नाही.. ." तो म्हणाला.

" आनंद प्लिज प्लिज.....मला बघायचंय ते...प्लिज ना.." ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली.

शेवटी नाईलाजाने तो उठला. सोफ्यावर चढून त्याने वरती ठेवलेल्या वस्तू काढल्या. त्यात एक बॉक्स होता आणि एक मोठी गुंडाळलेली वस्तू होती. त्याने मग तिला एकेक करून बॉक्स मधल्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. त्यात त्याची काही लहानपणीची खेळणी, तुटलेली किचन्स, मातीची फळं.... त्याचे नि आई बाबांचे जुने फोटोस....त्याच्या खूप साऱ्या आठवणी होत्या त्यात.....!!!! तो मग तिला त्या वस्तूंच्या आठवणी सांगण्यात गुंतला. थोड्या वेळाने तीच लक्ष त्या गुंडाळलेल्या मोठ्या वस्तू कडे गेलं. त्यात काय असेल याची तिला उत्सुकता होती.

" यात काय आहे...?" ती त्या वस्तू कडे बोट दाखवत म्हणाली. 

" यात बाबांची आठवण आहे खूप मोठी...." असं म्हणून तो त्या वस्तूजवळ गेला आणि त्यावरच कापड बाजूला केलं. त्यात एक छानशी गिटार होती..

"Waw...... भारीच....तुम्ही......तुम्ही गिटार वाजवता ? " ती आनंदनाने म्हणाली...

" ही मला बाबांनी गिफ्ट दिली होती. माझी बारावी झाल्यानंतर....,त्यांना खूप आवडायची गिटार ऐकायला..." आनंद

" मग मलाही दाखवा ना गिटार वाजवुन.... मला पण ऐकायला आवडेल...." ती खुश होत म्हणाली.

" नाही ग......खूप दिवसात वाजवली नाही....प्रॅक्टिस मोडलेय...." तो म्हणाला

" प्लिज माझ्यासाठी.....मला पण ऐकायचेय...आणि छान गाणं पण म्हणा..." नेहा

" तुला काय मी सिंगर वाटलो का...? जात होतो मी गिटार शिकायला तेव्हा म्हणायचो तिथे एखाद गाणं...पण आता नाहीच...." तो हसून म्हणाला

" प्लिज प्लिज ......एकदा माझ्यासाठी .....प्लिज .." ती त्याला विनवत म्हणाली. 

" Ok.... I will try....."  तो काहीशा नाईलाजाने म्हणाला. 


त्याने गिटार वाजवायला सुरवात केली... आणि त्या चालीवर तो तिच्यासाठी गाणं सुद्धा म्हणू लागला.

तुझी हलकी एक पाऊल बोली
देई एक चाहुल ओली..... 
आणि......जुळुनी आले.....
हे बंध रेशमाचे..... हे बंध रेशमाचे....

ध्यानीमनी नसताना......रस्ता मिळे नवा....
जादु जशी व्हावी अलगद....
हाती ये चांदवा..........
मन हलके बघ होवून गेले.....
सुख हे तळहाती आले...
सारे सांगून गेले.......
हे बंध रेशमाचे.... हे बंध रेशमाचे.... हे बंध रेशमाचे....!!!!

त्याचं गाणं ऐकता ऐकता तिला कधी झोप लागली कळलंच नाही.....मग त्याने गिटार बाजूला ठेवली आणि तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला व्यवस्थित बेड वर नेवुन झोपवलं...ती झोपेतही हसल्यासारखी दिसत होती... तिच्याकडे पाहत तो देखील झोपी गेला.....!!!!!

...........................

नेहाचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू झालं तसा तिचा वेळ घरकुल आणि अभ्यासातच जाऊ लागला. आनंदच देखील हॉस्पिटल , घर आणि अभ्यास हेच रुटीन चालू असायचं. हॉस्पिटलच्या सगळ्या डिपार्टमेंट्स कडे लक्ष देणं त्याला शक्य नव्हतं त्यामुळे तो बाकीच्या डॉक्टर्स कडून सगळी माहिती घ्यायचा. त्याच्या बाबांसोबत असणारे डॉ. परांजपे...डॉ. देसाई त्याला मदत करत. त्याचा त्यांच्यावर विश्वास होता आणि त्याला बाकीच्या मॅनेजमेंटच्या गोष्टी काही कळत नव्हत्या त्यामुळे तो त्यांच्या सल्ल्यानेच काम करायचा... एकदा एक गरोदर बाई संजीवनी हॉस्पिटलला आली...तिची ट्रीटमेंट त्यांच्याच हॉस्पिटलच्या डॉ. देसाईंकडे सुरू होती. तिला प्रसव कळा यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे तिला आल्या आल्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. काही वेळानंतर तिची डिलिव्हरी झाली. तिच्या शरीरीरातील पाणी कमी झालंय त्यामुळे तातडीने ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरनी सांगितलं होतं..त्यामुळे नातेवाईकांनी लगेचच तीच ऑपरेशन करायला परवानगी दिली..बाळ छान गुटगुटीत होतं..!! दोन दिवसांनीं आनंद जनरल वोर्डमध्ये चेकिंग साठी आला. एक एक पेशंट चेक करत तो त्या बाईजवळ आला.

" छान आहे हा बाळ तुमचं...." आनंद त्या बाईंना चेक करता करता म्हणाला. तिला खूप बरं वाटलं..

मग आनंदने त्या बाईंचे रिपोर्ट्स पाहिले. त्याप्रमाणे त्याने त्या बाईंना औषध लिहून देवुन पुढचे पेशंट चेक करण्यासाठी गेला. त्याचं रेग्युलर चेकअप पुर्ण झालं आणि तो आपल्या केबिन मध्ये आला. त्याने फोन करून नर्सला बोलवून घेतलं. 

" May I come in sir...." नर्सने विचारलं.

" yes come..." आनंद 

" त्या जनरल वोर्ड मधल्या बाई आहेत ना...ज्याची परवा डिलिव्हरी झाली...त्यांची केस कोणाकडे आहे ...?? " त्याने कपाळाला आठ्या आणत तिला विचारलं.

" सर डॉ. देसाई ती केस हँडल करतायत...." नर्स घाबरत म्हणाली. 

" ok.... Then call him urgently....You may go now...." आनंद म्हणाला...तशी ती पटकन बाहेर आली. तो काहीसा विचारात पडला होता. थोड्या वेळाने डॉ. देसाई त्याच्या केबिन मध्ये आले. 

" May I come in sir....? "  डॉ. देसाईंनी दारातूनच त्याला विचारलं.

" काका....या की... Don't be so formal...बसा ना " त्याने खुर्चीकडे हात करत त्यांना बसायला सांगितलं.

" काही काम होतं का....? " डॉक्टर खुर्चीत बसत म्हणाले.

" नाही फार नाही....सहजच...आत्ता रुटीन चेकअपला गेलो होतो जनरल वोर्डला....त्या परवा डिलिव्हरी झालेल्या एक बाई आहेत तिथे...ती केस तुमच्याकडेच आहे ना..." त्याने काहीसं बोटांची चाळवाचाळव करत विचारलं.

" हो....Any problem Anand....Everything will be okay...? " डॉ. देसाई.

" yeah.... Absolutely....मी त्यांचे रिपोर्ट्स चेक केले. I think...She have a normal delivery...but why should you getting her sizer....??? I thik you have too wait...." आनंद 

आनंदने असं विचारल्यावर डॉ. देसाई काहीसे अस्वस्थ झालेत असं त्याला वाटलं.


" अरे....त्या बाईचं बीपी लो झालेलं आयत्या वेळी...She can't push the baby...So we decided to do operation..."  डॉ. देसाई म्हणाले.

" ok.... मला सहजच वाटलं सो मी म्हटलं....खरंतर ही लोकं आपल्यावर विश्वास ठेवून इथे येतात..त्यामुळे त्यांना चांगली आणि योग्यचं ट्रिटमेंट मिळायला हवी नाही का...?  बाकीची महागडी हॉस्पिटल खुप आहेत इकडे....त्यांना तिकडे जाणं शक्य नाही म्हणून ते आपल्याकडे येतात..सो आपणच त्यांची काळजी घ्यायला हवी ना...? " तो म्हणाला.


" हो खरच....चल मी येवु का...माझी ओपीडी चालू आहे...येतो.." असं म्हणून डॉ. देसाई तिथून सटकले. 


.............................

त्यानंतर कामाच्या गडबडीत तो ही गोष्ट विसरूनही गेला. रात्री अपरात्री होणारी धावपळ...अभ्यासाचा ताण यामुळे त्याची फार दगदग व्हायची. पण आता काळजी घ्यायला नेहा त्याच्या सोबत असे..त्यामुळे त्याला बरं वाटायचं..मध्यंतरीच्या काळात नेहाची त्याच्या बाकी मित्र मैत्रिणींशी देखील गट्टी जमली होती. त्यामुळे आनंद आणि नेहा वेळ मिळेल तेव्हा ग्रुप सोबत बाहेर जायचे. त्यांच्यासोबत कधीकधी मिताली देखील असायची. वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या प्रकारापासून आनंद तिच्याशी बोलणं टाळायचा. जमेल तेवढ आणि कामापुरतच तो बोलत असे. मितालीसाठी तर आनंद तिच्या जवळची व्यक्ती होता त्यामुळे त्याच्या अशा तुटक वागण्याचा तिला त्रास व्हायचा. शेवटी असाच एकदा त्यांचा ग्रुप एकत्र आला होता. आनंद दूर जावुन समोर दिसणारा सी व्यु आणि सनसेट बघत उभा होता. मितालीही त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. तसा तो तिथून जायला निघाला.... तेव्हा तिने त्याला थांबवलं.

" तू माझ्याशी बोलायचंच नाही असं ठरवलंयस का...? " तिनं अगतिक होवून विचारलं


" असं काही नाही...पण मला इथे sence create नाही करायचाय..." तो दुसरीकडे बघत म्हणाला.

" म्हणजे मी मुद्दाम हे सगळं करतेय असं वाटतंय का तुला...?? ...Anand you are always being special for me....You are my bestiee....आणि तूच असा वागलास माझ्याशी तर काय करू मी..." मिताली

" तू कशी वागतेस ते बघ आधी....नशीब समज मी अजून तरी बोलतोय तुझ्याशी....दुसरं कोण असत तर मी त्या व्यक्तीचं तोंडही पाहिलं नसतं कधी.." तो काहीसं रागावून म्हणाला.

" ए यार....प्लिज तू असं नको ना बोलू....तू बेस्ट फ्रेंड आहेस माझा...प्लिज एकदा माफ कर मला,....सॉरी खरंच सॉरी....पण तू बोल माझ्याशी आधीसारखा..." ती म्हणाली.

" हमम....." तो काहीच न बोलता शांतपणे उभा राहिला.

" बोल ना रे.....सॉरी खरंच सॉरी....मी नेहबद्दल यापुढे काहीही बोलणार नाही...I promise..." मिताली

" तशी हिम्मत ही करू नकोस पुन्हा....." आनंद

" नाही करणार..... पण तू प्लिज बोल माझ्याशी....प्लिज प्लिज.....तुला आपल्या मैत्रीची शपथ...." ती म्हणाली.

" हमम ok..... फक्त एक चान्स देतो तुला....तुझं वागणं बदल....मी बोलेन तुझ्याशी..तू भी क्या याद रखेगी ...चल " तो तिच्या खांद्यावर थोपटत हसून म्हणाला.

" Thank you....Thank you so much dear...." मिताली.

त्यावर त्याने खुणेनेच 'चलता है' अशी ऍक्शन केली....आणि तो बाकीच्या ग्रुपमध्ये जावुन मिसळला. त्याची पाठमोरी आकृती बघत ती उभी होती. काहीतरी जिंकल्याच्या अविर्भावात ती स्वतःशीच गूढ हसत होती....


क्रमशः.......

कथेत काही इंग्लिशच्या चुका झाल्या असतील तर त्या समजून घ्याव्यात ही विनंती... तसेच कथेचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी त्यातून मांडण्याचा प्रयन्त केला आहे. तो निव्वळ कथेचा भाग समजूनच वाचावे... सर्व वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार...!!! आणि लाडक्या ईराचे देखील...!!! कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यामुळे कथा अवडल्यास नावसाहित शेअर करावी. 

🎭 Series Post

View all