हे बंध रेशमाचे - भाग 21

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 21

दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद नेहाला उठवायला आला. ती छान झोपली होती. खिडकीतून येणारी कोवळी किरणं तिच्या चेहऱ्याला तजेला देत होती. तो तिच्याजवळ येऊन बसला.हलकेच तिच्या गालावर आलेली बट त्याने मागे केली.तशी तिची झोप चाळवली आणि तिनं डोळे उघडले. त्याच्याकडे पाहून ती गोड हसली. 

"Good Morning...!!!" त्यानं छान हसून तिला विश केलं.तशी ती आळस देत उठली.

"Good morning..." तिनंही छान स्माईल दिली.

"काय मॅडम आज उठायचं नाही वाटतं..." त्यानं विचारलं

" मस्त झोप लागली होती....छान स्वप्न बघत होते ..." नेहा

" हो का. ते नंतर बघा आता. मी चहा आणलाय राणीसाहेबांसाठी तो घ्या आणि सांगा बघू कसा झालाय..?" असं म्हणून त्यानं तिच्या हातात चहाचा कप दिला.

"ओ हो....भारीच.. तू केलास चहा ? " 

"कोई शक ..." त्यानं असं म्हटल्यावर दोघेही हसायला लागले. मग तिनं चहा घेतला.

"जमलाय बरं का चहा...पण तू कशाला केलास मला उठवायचं ना मी केला असता..." 

"तू इतकी छान झोपली होतीस की मला तुला उठवावसच वाटत नव्हतं...." तो तिच्या जवळ येत म्हणाला.

"हो का..चला मला कामं आहेत आता..." असं म्हणत ती उठत होती.

"कसली सारखी कामं बस ना इथे माझ्याजवळ..." तो म्हणाला.

ती उठत असतानाच त्यानं तिला आपल्या जवळ ओढलं. तो तिला आणखी जवळ ओढून मिठीत घेणार इतक्यात अलार्म वाजला आणि नेहाला जाग आली.आपण स्वप्न पाहिलं तर...आपल्याच डोक्यात मारून ती स्वतःशीच हसली तिनं पाहिलं तर बाजूच्या सोफ्यावर आनंद झोपला होता. ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली 'किती गोड दिसतोय हा झोपेत..' पण तो जागा होईल या भीतीनं ती उठून आवरायला गेली.


...............................


त्यांच्या लग्नाला जवळ जवळ महिना होत आला होता. आनंद आणि नेहाच्या लग्नाला सगळ्यांनाच यायला जमलं नव्हतं. विशेषतः हॉस्पिटल मधला सगळा स्टाफ, त्याचे कॉलेज फ़्रेंडस यापैकी कोण येऊ शकले नव्हते. त्यामुळे सगळेचजण त्याच्याकडे लग्नाची पार्टी मागत होते. खरतर आनंदला नेहाची आपली बायको म्हणून ओळख करून देण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. पण सगळ्यांच्या आग्रहाखातर त्याने पार्टी द्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्याने आई आणि नेहाला तसं सांगितलं. पुढच्या शनिवारी त्यांच्याच घरी लॉन वर पार्टी करायचं ठरलं. त्यामुळे डेकोरेशन , केटरिंग , मेनू , अरेंजमेंट या सगळ्याच गोष्टी बघाव्या लागणार होत्या. त्यासाठी त्याने मितालीची मदत घ्यायची ठरवलं. लग्न झाल्यापासून तो मितालीशी जेवढयास तेवढं बोलत होता. मिताली आनंदशी पहिल्या सारखीच हसून खेळून बोलत होती. पण आनंदने केलेला तिचा अपमान ती अजूनही विसरली नव्हती. पार्टीच्या अरेंजमेंट साठी आनंदने मितालीला फोन केला.


आनंद   -   "हाय मितु.. बिझी आहेस का ? " 

 मिताली  -  "नाही यार बोल की ....काय म्हणतोस ? " 

आनंद   -  "अग जरा काम होतं ...."

मिताली - "मग बोल ना बिनधास्त ...आता काय परमिशन         हवीय का माझी...." ती किंचित हसली.

आनंद  - "अरे यार हॉस्पिटलचा स्टाफ आणि सगळे फ्रेंड्स वगरे पार्टी मागतायत लग्नाची..

मिताली  - "मग दे की त्यात काय " 

आनंद  - " अग पार्टी द्यायला काही नाही पण नेहाची बायको म्हणून ओळख कशी करून देऊ ते कळत नाहीये.." 

मिताली  - "त्यात काय she is your wife. You have to introduce her..."    आनंदच बोलणं ऐकून खरतर तिला आनंद होतं होता पण तिनं तसं भासवलं नाही. 
 
आनंद  -  " हम्मम ...No option. पण मला पार्टीच्या अरेंजमेंट साठी तुझी मदत हवीय. तुझ्या माहितीत कोण असलं तर सांग..." 

मिताली  - "अरे त्यात काय ....मी बघते सगळं फक्त मला व्हेन्यू आणि मेनू सांग....फिकर नॉट..."

आनंद - "thanx mitu , thank u so much... पार्टी आमच्याच बंगल्यावर होईल. मेनु तू ठरव...पंजाबी, चायनीज , इटालियन काहीही चालेल.." तो तिच्या अशा बोलण्याने खूप खुश झाला. 


मिताली - ok मी बघते...कधी आहे पार्टी..?"

आनंद   - next Saturday. सगळ्यांना विकली ऑफ असतो ना सो तसं ठरवलंय....Thank u once again.... तू आहेस सो मला कसलंच टेन्शन नाही.." 


 मिताली  - "अरे ये भी कोई कहने की बात हुई...Don't worry I will be manage everything.." 

 आनंद  - ok मला कळव मग. Thank u .Bye.

मिताली - yes bye .

दोन दिवसांनी पार्टीच्या अरेंजमेंट साठी आनंद आणि मिताली दोघेही भेटले. मिताली सोबत येताना एका इव्हेंट मॅनेजरला घेऊन आली होती. आनंदने त्याला सर्व नीट समजावून सांगितलं. किती माणसं असतील, डेकोरेशन आणि बाकीच्या गोष्टी त्याने क्लिअर केल्या. मेनु कार्ड बघून मिताली आणि त्याने मेनू ठरवले. सगळ्या गोष्टी ठरवून ते तिघे बाहेर पडले. 

...........................

पार्टीच्या कामासाठी मितालीच वारंवार आनंदच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. आनंदही हॉस्पिटल मधुन लवकर घरी यायचा. त्यामुळे दोघेही बराच वेळ एकत्र असायचे. वृषालीताईंना याची सवय होती. पण नेहाला मात्र ते आवडत नव्हतं. दोघे एकत्र असले की त्यांचं हसणं , बोलणं कानावर येई. नेहाला वाईट वाटायचं 'हा फक्त आपल्याशीच का असं तिरसटा सारखं का वागतो ' हा तिला प्रश्न पडे. 'कधी कधी तसा बोलतो नीट...पण मनमोकळं कधीच नाही...' असे तिच्या मनात विचार चालू असत. पण ती सगळ्याकडे दुर्लक्ष करत होती. पण त्याचं असं वागणं बघून तिला राहवलं नाही आणि तिनं ही गोष्ट वृषालीताईंना सांगायचं ठरवलं. एक दिवस त्या बाहेर हॉल मध्ये टीव्ही बघत बसल्या होत्या. नेहा त्यांच्याजवळ आली. 


" आई तुमच्याशी थोडं बोलायचं होतं..." नेहा बोलली तसं त्यांनी टीव्ही बंद केला आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागल्या..

क्रमशः....

🎭 Series Post

View all