Login

हे बंध रेशमाचे पर्व 2 - भाग 2

Love story

हे बंध रे - पर्व 2 भाग 2 

तिने शांतपणे आपल्या जेवण ताटात वाढून घेतलं आणि ती जेवू लागली. खरंतर त्याच्यावर रागवायच एकच कारण नव्हतं. त्याहीपेक्षा तिला तिथल्या त्या रुटीन लाईफचा कंटाळा आला होता. तिचं मन घरी धाव घेत होतं. ताटात घास फिरत होता पण तिच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. इटक्यात तिच्या हाताजवळ तिला एक इनवोल्व्हप ठेवलेलं दिसलं. तिने ते फोडून वाचलं आणि ती जवळजवळ ओरडलीच...!!! 

आता पुढे... 

" खरंच आनंद ....??? " तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता.  तिने त्याला मिठी मारली. 

" हो अगदी खरं.... कसं वाटलं सरप्राईज...?? " त्याने तिला हळुवार थोपटत विचारलं. 

" खूप मस्त...." ती अजुनही खुशीत होती. 

" मग त्या बदल्यात मला काय मिळेल....? " त्याने तिच्या ओठांवरून हलकेच बोट फिरवत विचारलं.  त्यावर ती लाजली. 

" सध्या तरी बासुंदी पुरी गोड मानुन घे...." असं म्हणून तिने समोरच्या ताटातून बासुंदी पुरीचा घास जवळजवळ त्याच्या तोंडात कोंबलाच .. " काय ग हे..." आनंद म्हणाला पण तोपर्यंत ती त्याच्या पासून दूर पळाली होती. 

.................................

तीन वर्षांपूर्वी आनंदने संजीवनी हॉस्पिटलची जबाबदारी डॉ. परांजपें वर सोपवुन तो आणि नेहा न्यूयॉर्कला आले. आनंदच पुढचं शिक्षण अमेरिकेला व्हावं अशी त्याच्या बाबांची फार इच्छा होती. त्यासाठी देखील आणि संजीवनी हॉस्पिटलमध्ये झालेल्या काही गोष्टींमुळे त्याला थोड्या दिवसांसाठी का होईना पण ब्रेक हवा होता म्हणून तो आणि नेहा घाईने अमेरिकेला आले. वृषालीताई गावी नवीन घर बांधलं होतं तिथे राहायला गेल्या होत्या. नेहा आणि आनंदने त्यांना अमेरिकेला येण्यासाठी खूप विनवल पण त्या काहीच ऐकायला तयार नव्हत्या. हा हा म्हणता तीन वर्ष सरली. आनंद न्यूयॉर्क मधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यूरॉसर्जन म्हणून काम करायचा. पेशंटची काळजी घेणं , त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीनं बोलणं या सगळ्यांमुळे त्याची एक वेगळीच छाप समोरच्या व्यक्तीवर पडायची. त्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याला असिस्टंट म्हणून एक जेनी नावाची महिला काम करायची. नेहाला तिचा फार राग यायचा. ती उगीचच आनंदच्या सारखं मागे पुढे करते असं तिला वाटायचं. आनंद आणि नेहा दोघेही आता त्यांच्या परदेशातील रुटीनला कंटाळले होते. सर्वात जास्त तर नेहा...!! त्यामुळे कधी एकदा भारतात परत जातो असं तिला झालं होतं. आनंद कधी लवकर घरी यायचा तर कधी उशिरा. त्यामुळे ती वैतागायची. आज देखील त्याला यायला उशीर झाला. ती चांगलीच चिडली होती त्याच्यावर. पण त्याने त्या छोट्या मुलाच्या ऑपरेशन बद्दल तिला सांगिल्यावर ती शांत झाली. जेवताना देखील तिचा मुड नव्हता. ते आनंदने ओळखले. म्हणून मग एक एनवलप त्याने हळूच तिच्या हाताखाली सरकवले. त्यात त्या दोघांची भारतात जाण्याची तिकिटे होती. आजपासून पंधरा दिवसांनी त्यांची फ्लाईट होती. नेहा तर जाम खुश झाली. जेवणं झाली आणि ती रूम मध्ये आली ती गाणं गुणगुणतच...!! आनंद टेबलजवळ काहीतरी काम करत बसला होता. 

" काय मग आज कोणीतरी खुश आहे खुप..." आनंद 

" हो मग.मी आता घरी जाणार आहे माझ्या...." तिने मागून येऊन त्याच्या गळ्यात हात टाकले. 

" हो का...? आणि मी..? माझं काय...!! राहू का मी इकडेच....." त्याने विचारलं

" राहा ना. नाहीतरी तुझी जेनी आहेच की तुझी काळजी घ्यायला...." तिच्या नाकाच्या शेंड्यावर हळूहळू राग जमा होऊ लागला. त्याला तिच्याकडे पाहून हसू आलं. 


" हो तेच ना... मी राहतो मस्तपैकी इकडे. तू जा आपली इंडिया मध्ये..." तो जरा खुर्चीवर मागे रेलून बसला. 


" मग काय त्या जेनीला रानचं मोकळं मिळेल...  अजिबात नाही. आपण दोघेही जाणार आहोत. " तिच्या अशा बोलण्यानं त्याला खूप हसू यायला लागलं. 


" तू.... तू हसतोयस आनंद.... जा मी बोलणारच नाही. " तिने गाल फुगवले. 

" चालेल मज्जा.. मी करतो आपला जेनीला फोन...." त्याने फोन हातात घेतला. 


" यु......ssss........ थांब बघतेच मी तुला " ती त्याला मारायला आली तसा तो लांब पळाला. मध्येच तिने उशी फेकून मारली ते चुकवत आनंद पळत होता मागून नेहा...!! तेवढ्यात आनंद जोरात ओरडला....

" आई....... गं...." त्याच्या पायाला टेबल लागलं. 

" काय झालं बघु....." एव्हाना नेहाचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता. त्याला लागलंय म्हटल्यावर ती काळजीने पुढे आली.


" बघु कुठे लागलंय....? " 


" इथे लागलंय खूप........" त्याने त्याच्या हृदयावर हात ठेवत म्हटलं.

" गप रे... जास्त नाही ना लागलं...." तिने एक चापट मारली त्याला पाठीवर.

" खरंच इथे दुखतंय खुप.... माझी बायको माझ्यापासून लांब असली की असं होतं मला...." त्याने तिला डोळा मारला. 

" शशशशश....... किती नौटंकी...!! " ती लाजत म्हणाली. 

त्याने तिच्या पाठीमागून हात नेत हलकेच तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. ती ही हळूहळू शांत होत होती. त्याच्या मिठीत तिचा सगळा राग विरघळला. त्याचंही काही वेगळं नव्हतं.त्याचा दिवसभराचा कामाचा थकवा तिच्या नुसत्या जवळ असण्याने लांब पळुन जायचा. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले आणि कधी झोपले त्यांना कळलं देखील नाही. 

.......................................


दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा लवकरच उठली. सगळं आवरून ती आनंद सोबतच बाहेर पडायचं तिनं ठरवलं. 


" आनंद आज आपण शॉपिंगला जाऊयात. मला सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट्स घ्यायची आहेत... " तिने हातात घड्याळ चढवत म्हटलं. 


" ओके बॉस. नक्की येतो. अजुन काही आज्ञा मॅडमची...?? " आनंद 

" नको.. वेळेवर आलात तरी खूप झालं.... " ती म्हणाली. दोघेही मग बाहेर पडले.

रात्रीचे दहा वाजत आले तरी आनंदचा पत्ता नव्हता. जिन्यात त्याची पावलं वाजली तशी नेहा सावध झाली. आज काहीही झालं तरी त्याच्याशी बोलायचं नाही असं तिनं मनाशी पक्कं ठरवलं. आनंद चालत दरवाज्यापाशी आला. दरवाजा वाजवणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की आज नेहाने त्याला शॉपिंग साठी लवकर यायला सांगितलं होतं आणि हे साहेब आत्ता उगवले होते. 

" मेलो.....आता माझं काही खरं नाही.. देवा तूच वाचव रे मला.... " त्याने मनातूनच देवाचा धावा करत दार वाजवलं.

नेहाने दार उघडलं आणि ती आत गेली तिच्या मागोमाग आनंद पण आत आला. 

" या साहेब... आलात...? कशाला एवढ्या लवकर घरी उगवलात आपण.. थोडा वेळ अजून थांबला असतास तर सकाळच झाली असती ना मग..." नेहाचे डोळे आग ओकत होते. आनंदला आता कुठे लपू ते कळत नव्हतं. 

" मी...... मी ते.. मी हॉस्पिटल मधुन वेळेतच निघालो पण... पण... " तो अडखळत सांगू लागला. 


" मग काय... तू आणि जेनी कॉफी प्यायला बाहेर गेला होतात... असंच ना....." नेहा

" हो... म्हणजे नाही..... मी ते तिच्या घरी....." 

" छान..... आता मॅडमच्या घरी पण जाऊन आलात का आपण.... मस्त.... काय म्हणाल्या मग जेनी मॅडम....?? " नेहाच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता. इथून कुठेतरी अदृश्य व्हावं अस त्याला वाटलं. 

रागाने ती आत रूम मध्ये जायला वळली. तोच आनंदने तिला आपल्या जवळ ओढलं... पण त्याला ढकलुन ती आत गेली आणि तिने रूमचा दरवाजा लावुन घेतला. 

" तू आज रूम मध्ये यायचं नाहीस.... " ती आतून म्हणाली. 

बिचारा आनंद तिथेच बाहेर बसून ती दार कधी उघडते त्याची वाट पाहत बसला आणि बसल्या बसल्याच त्याला झोप लागली. सकाळी त्याला जाग आली तेव्हा रुमच दार उघडलं होतं. तो डोळे चोळतच आत पळाला. पण नेहा रुम मध्ये नव्हतीच. त्याने जाऊन किचन मध्ये बघितलं तिथेही ती नव्हती. मग त्याने बाकीच्या खोल्या चेक केल्या. पण नेहाचा कुठेच पत्ता नव्हता. त्याला काहीच सुचत नव्हतं. तो पुन्हा रूम मध्ये आला तर त्याला बेडवर एक चिठ्ठी ठेवलेली दिसली.