हे बंध रेशमाचे पर्व 2 भाग 1
न्यूयॉर्क मधल्या एका हॉस्पिटलमध्ये आज तणावपूर्ण वातावरण होतं. एका बारा वर्षाच्या मुलाचा अक्सिडेंट होऊन त्याच्या मेंदूला जबरदस्त मार बसला होता. हातापायांना खरचटलं होतं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले त्यानंतर त्या मुलाला बरं वाटू लागलं. प्राथमिक तपासणी मध्ये मेंदूला लागलेला मार डिटेक्ट झाला नव्हता. पण त्याला ऍडमिट केल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासातच त्याची शुध्द हरपली. डॉक्टरांनी तातडीने त्याचे सगळे रिपोर्ट्स करायला सांगितले. तेव्हा जे समोर आलं ते हादरवून सोडणारं होतं. त्याच्या मेंदूच्या आतील भागात बऱ्याच प्रमाणात रक्तस्राव होऊन मेंदूच्या आता गाठी तयार होऊ लागल्या होत्या. ताबडतोब ऑपरेशन करणे गरजेचे होते. पण त्यासाठी नातेवाईकांची परवानगी आवश्यक होती. त्यांनी बाहेर बसलेल्या त्या मुलाच्या आईला आत बोलावुन घेतलं. रडत रडतच त्या आत आल्या.
" हे पहा त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. लवकरात लवकर ऑपरेशन करून त्या काढाव्या लागतील. " डॉ. फर्नांडिस त्यांना सांगत होते.
" डॉक्टर काहीही करा. पण माझ्या मुलाला वाचवा. त्याच्याशिवाय मला या जगात दुसरं कोणीच नाही. Please save my child..." ती रडत म्हणाली.
" yes . We try our best. Please fill this form and sign it.. " तिने मग डॉक्टरांच्या समोरच तो फॉर्म भरून साइन करून दिला त्यांनी मग तिला बाहेर थांबायला सांगितलं. त्यांनी एका डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं आणि तातडीने ऑपरेशनची तयारी करायला सांगितली.
थोड्याच वेळात फर्नांडिस डॉक्टरांनी बोलावलेले डॉक्टर आले. ते एक न्यूरॉसर्जन होते. खरंतर त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच केसेस हँडल केल्या होत्या. पण ही केस जास्त जोखमीची होती. ऑपरेशन थेटर बाहेर बसलेल्या त्या मुलाच्या आई जवळ ते गेले आणि त्यांनी हलकेच तिच्या खांद्यावर थोपटलं.
" Don't worry dear. Your child will be fine soon. We try our best. And god is great...!!! Please trust on him..." एवढंच बोलून ते आत गेले.
मेंदू मध्ये होणारा रक्तस्राव थांबवण्यात डॉक्टरांना यश आलं. त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होणं थांबलं. तयार झालेल्या गाठी काढून टाकून अशुद्ध रक्त त्यांनी एका पाईप द्वारे बाहेर काढलं. त्याच्या जीवाचा धोका टळला होता. तरीही डॉक्टरांनी थोडा वेळ वाट पाहायचं ठरवलं. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गाठ तयार झाली नव्हती. मग डॉक्टरांनी ऑपरेशन पूर्ण करून पेशंटला ICU मध्ये शिफ्ट केलं. डॉक्टर बाहेर आले. त्यांनी तो मुलगा ठीक असल्याचं त्याच्या आईला सांगितलं. ती कितीतरी वेळ डॉक्टरांचे आभार मानत होती तर दुसरीकडे आपला एकुलता एक मुलगा वाचल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद कोणत्या तरी कॅमेरामध्ये कैद करावासा डॉक्टरना वाटला. ते मग डॉक्टर फर्नांडिसांच्या केबिन मध्ये आले. त्या मुलासाठी पुढची ट्रिटमेंट ठरवून ते निघून गेले.
................................................
डॉक्टर घरी आले तेव्हा संध्याकाळ झाली होती. काहीशा दबक्या पावलांनी त्यांनी घरात पाऊल टाकलं. सगळीकडे शांतता होती. याचा अर्थ बायको घरात नाही असा त्यांनी अंदाज लावला. आत आल्यावर त्यांनी लाईट्स ऑन केले तर समोरच्या सोफ्यावर त्यांची बेटरहाफ बसलेली त्यांना दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळल्याचे संमिश्र भाव पसरले.
" Welcome dear......." तिने पुढे होऊन त्याच्या हातातून बॅग घेतली आणि ती आत गेली. तिचं असं शांत वागणं त्याला अजुनच गोंधळात टाकत होतं.
" तू रागावली आहेस का माझ्यावर... ?? " त्याने कसतरी धीर करून विचारलं.
" No. Not at all . " ती हसुन म्हणाली.
" मग आज मला उशीर होऊनही तू रागावली कशी नाहीस....?? " अजूनही कोणत्याही क्षणी अंगावर बॉम्ब पडेल याची त्याला भीती वाटत होती.
" काय करू रागावून...?? तुझं कामंच असं आहे ना की इमर्जन्सी कधीही येऊ शकते. आणि रागवल्यावर मी तुला काही करूही शकत नाही. नाहीतर इथे पोलीस येऊन मलाच पकडून न्यायचे.... " ती हसली. त्याला काही कळेचना ती अशी काय बोलतेय. त्याने जाऊन तिचं कपाळ चेक केलं. ताप तर नव्हता. तरीही ही अशी काय बरळतेय असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
" काय आहे ना. इथे मी तुला नुसतं सहज म्हणून मारलं ना तरी या परदेशातले पोलीस मला लगेच उचलून घेऊन जातील.. त्यामुळे आपण घरी गेल्यानंतर मी जरा माझे हात साफ करेन म्हणते.... " तिने हातातलं ब्रेसलेट मागे सरकवत त्याला एक रागीट लूक दिला. तिच्या बोलण्याचा रोख समजून तो किंचित मागे सरकला आणि त्याने आपले कान पकडुन सॉरी म्हटलं.
" अगं आज खरंच खूप मोठी केस होती. एका लहान मुलाच्या जीवनमरणाचा प्रश्न होता..." असं म्हणून त्याने मग तिला हॉस्पिटलमध्ये काय काय घडलं ते सगळं सांगितलं. तिनेही ते शांतपणे ऐकून घेतलं. तो डॉक्टर असल्यामुळे रोज त्याला किती गोष्टी फेस कराव्या लागतात याची तिला जाणीव होती.
तिने मग त्याला फ्रेश व्हायला सांगितलं आणि ती जेवण गरम करायला आत गेली. त्याने हुश्शह... म्हणून सुटकेचा निश्वास टाकला आणि फ्रेश व्हायला गेला. नाहीतर हिचा राग जाईपर्यंत त्याचं काही खरं नव्हतं...!!!
पंधरा मिनिटात सगळं जेवण टेबलवरती आलं. आलं कसलं तिने आणून ठेवलं. त्याने टेबलच्या बाजूची खुर्ची ओढली आणि तो जेवायला बसला.
" वा... मस्त वास येतोय जेवणाचा... काय आज स्पेशल...?? " त्याने एकेका भांड्यावरचं झाकण उघडून पाहिलं. त्याच्या आवडीची छान बदाम , काजू घालून केलेली खीर ,पुरी , छोले जिरा राईस आणि दाल तडका. सगळं त्याच्या आवडीचं केलं होतं तिने. शर्टची बाही मागे सारून त्याने लगेच जेवायला सुरवात केली. पण ती मात्र अजूनही हिरमुसली होती. त्याने पुरीचा एक तुकडा मोडून खिरीत घोळवला आणि तिला भरवायला घास पुढे केला पण तिने हातानेच नको म्हटलं.
तिने शांतपणे आपल्या जेवण ताटात वाढून घेतलं आणि ती जेवू लागली. खरंतर त्याच्यावर रागवायच एकच कारण नव्हतं. त्याहीपेक्षा तिला तिथल्या त्या रुटीन लाईफचा कंटाळा आला होता. तिचं मन घरी धाव घेत होतं. ताटात घास फिरत होता पण तिच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. इटक्यात तिच्या हाताजवळ तिला एक इनवोल्व्हप ठेवलेलं दिसलं. तिने ते फोडून वाचलं आणि ती जवळजवळ ओरडलीच...!!!
क्रमशः......
नमस्कार वाचकहो ,
खूप दिवसांनी नवीन भाग पोस्ट करत आहे. खरंतर या कथेचं दुसरं पर्व यावं यासाठी खूप जणांनी कंमेंट केली होती. पण काही कारणामुळे शक्य झालं नाही. आधीच्या पर्वाप्रमाणे या पर्वाला देखील तितकाच प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. आजच्या पहिल्या भागात असणारी ही दोन पात्र तुम्ही ओळखली आहेत काय ?? ... असेल तर मला नक्की कळवा. नवीन भाग 25 जानेवारीला रात्री पोस्ट होईल. आधीचे पर्व तुम्ही माझ्या fb अकाउंट वरही वाचू शकता. सर्च ऑप्शन मध्ये सायली विवेक नाव टाकून तुम्ही पोस्ट वाचू शकता.