हे बंध रेशमाचे... भाग ५
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, ओटीभरणासाठी पारूबाईंना सुनेच्या माहेराहून पदार्थांचे दहा- बारा करंडे हवे होते. आता पुढे...
सकाळी उठल्यापासून घरात तारांबळ उडाली होती. उमाच्या तिन्ही नणंदा आदल्या दिवशीच आल्या होत्या. तिच्या नवऱ्याच्या दोन्ही आत्या व त्यांच्या सुना-लेकी, सासूच्या दोघी सख्ख्या बहिणी, चार चुलत बहिणी, सासूची आई एकेक करून डेरेदाखल झाल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती स्वयंपाकघरातच होती. येणाऱ्या पाहुण्यांचे हवे- नको पाहत होती.
संध्याकाळी उमाची काकी व भाऊ डोहाळे जेवण घेऊन आले. उमाच्या मनात धास्ती होती, आता आत्याबाई काय तमाशा करतात याची. काकी स्वयंपाकघरात आली. उमाला तिने जवळ घेऊन विचारले,
"कशी हायस बाळा. तब्येत बरी हाय ना? काय त्रास व्हत नाय ना?"
उमाने तिच्या मिठीत शिरत नाही असे सांगितले. माहेरच्या माणसाची जवळीक तिला हवीहवीशी वाटली.
"कशी हायस बाळा. तब्येत बरी हाय ना? काय त्रास व्हत नाय ना?"
उमाने तिच्या मिठीत शिरत नाही असे सांगितले. माहेरच्या माणसाची जवळीक तिला हवीहवीशी वाटली.
तिने काकीला चहा दिला व भावासाठी भरलेला चहा घेऊन ती बाहेर आली. भावाला डोळे भरून पाहिले. तो ही आपल्या बहिणीकडे तसाच प्रेमाने पाहत होता. घर पाहुण्यांनी भरले होते, त्यामुळे तिथे जास्त वेळ न थांबता ती परत आत निघून गेली.
आपल्या माहेराहून किती करंडे आलेत हे तिला माहीत नव्हते. पारू बाईची भावकीतील बायकांना कुरड्या सोडायला बोलवायची गडबड चालली होती. आत्याबाई ना अपेक्षाभंग झाला तर सगळ्या बियकांसमोर त्या बडबड करायला कमी करणार नाहीत अशी भीती उमाला वाटली व तिच्या पायांना सूक्ष्म थरथर होऊ लागली. तिचा चेहरा कसनुसा झाला. मानसिक ताणामुळे अचानक तिला चक्कर आली. तिच्या नणंदेने तिला पटकन धरले म्हणून बरे झाले, ती पडता पडता वाचली.
काकीने आणि दोघींनी मिळून तिला खाली बसवले. पाण्याचा ग्लास हातात दिला. तोपर्यंत घरात जमलेल्या सगळ्या पाहुण्या बायका तिच्याभोवती काय झालं? काय झालं? करत कालवा करू लागल्या. बाहेर बसलेल्या पारूबाईने स्वयंपाकघराकडे धाव घेतली.
"ए बायांनो, सरा बाजूला. जरा वारं लागू द्या की. काय चक्कर आली व्हय?" असे म्हणत आपल्या पदराने सुनेला वारा घालू लागली.
"ए बायांनो, सरा बाजूला. जरा वारं लागू द्या की. काय चक्कर आली व्हय?" असे म्हणत आपल्या पदराने सुनेला वारा घालू लागली.
बाजूला व्हा असे सांगून ही एकही बाई बाजूला झाली नाही, उलट खाली वाकून तिच्याकडे निरखून पाहू लागल्या.
"आक्के, तुजी सून लयच नाजूक हाय. चार मानसं वाढली की तिला कामानं चक्कर आली. माजी सून बाळातीण हुस्तवर घरातलं आन् रानातलं समदं काम वढीत हुती. अशी चार भाकरी थापून तिला चक्कर आली न्हाई कंदी." हे ऐकून आता आत्याबाई त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू करतायत का काय असे वाटून उमाच्या काळजात अजूनच कालवाकालव व्हायला लागली. तिचा चेहरा कसनुसा झाला.

क्रमशः
काय होते पुढे? सासुबाई तिच्यावर रागावतात का? माहेरावर तोंडसुख घेतात का? हे पाहूया पुढील भागात...
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."