हे बंध रेशमाचे... भाग ८
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
उमा माहेरी आलेली आहे. तिला बाळंतपणासाठी माहेरी पाठवतील की नाही याबाबत काकी साशंक आहे. आता पुढे...
"मग मी आता परत जातच नाही बाळंतपण होईपर्यंत. मग काय करतील आत्याबाई?" उमा म्हणाली.
"असं वेड्यासारखं का बोलतेस? त्यांनी दोन दिवस तुला बरं वाटावं म्हणून पाठवलंय ना. तू जर हट्टीपणा करून परत गेली नाहीस तर महेशरावांना ते आवडणार नाही याचा विचार केला आहेस का?" बाबांनी आपले म्हणणे सांगितले.
रात्री भिंतीकडे तोंड फिरवून झोपलेल्या नवऱ्याचा चेहरा तिच्या नजरेसमोर आला. आपण एक वाक्य बोललो तर त्यांना इतका राग आला, मग असे वागलो तर कायमची माहेरीच रहा असे म्हणायला ते कमी करणार नाहीत असे तिला वाटले. तिचा चेहरा झर्रकन उतरला. आईच्या लक्षात ही गोष्ट आली, पण सगळ्यांसमोर ती काहीच बोलली नाही.
जेवणे आटोपून मागची आवराआवर झाली की आई तिच्या खाटेजवळ आली.
"झोपली न्हाईस पोरी अजून? काय झोप लागंना का?" या आईने विचारलेल्या प्रश्नावर तिने फक्त नकारार्थी मान हलवली.
"कसला यवडा इचार करतीयास? आल्यापासून बगतीया मी. तिकडं समदं ठीक हाय ना? जावयबापू काळजी घेतेती ना?" आईने विचारले.
तिच्या डोळ्यात दिसणारी काळजी पाहून उमा चपापली. आपल्या गप्प बसण्याचा वेगळाच अर्थ निघू शकतो हे तिच्या ध्यानात आले नव्हते.

"सगळं ठीक आहे गं. दोन दिवस जरा धावपळ झाली ना, त्यामुळे थकवा आलाय जरासा. जावईबापू अगदी व्यवस्थित काळजी घेतात." हे ऐकून आईने निःश्वास सोडला.
आईपाशी मन मोकळे करावे तर तिला काळजी लागून राहील म्हणून तिने या विषयावर आईशी बोलणे टाळले, पण तो प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता. त्याचे उत्तर कुणाकडून मिळेल याचे कोडे तिला पडले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी दारात फटफटीचा आवाज आला तशी आई म्हणाली,
"मामा आन् मामी आली वाटतं." हे ऐकून उमाला आनंद झाला. ती बाहेर आली तेव्हा मामी गाडीवरून उतरत होती.
"मामी, तुम्ही? तुम्हाला कसं कळलं मी आलेय ते?" हे ऐकून मामी गाल्यातल्या गालात हसल्या.
"कळलं असंच. वाऱ्यानं बातमी पोहोचवली." यावर उमा हसली. जवळ आलेल्या अनघा मामींनी तिला आपल्या मिठीत घेतले. ती ही प्रेमाने त्यांच्या बाहुपाशात शिरली.

आत गेल्यावर दोघींचा चिवचिवाट सुरू झाला. मामाचे लग्न झाले तेव्हापासूनच तिच्यात अन् मामीत सख्य जुळले होते. तिच्या लग्नाची सगळी खरेदी करायला तिला मामी सोबत लागायची. मामीचा सल्ला घेऊनच तिने आपल्या लग्नाच्या साड्या खरेदी केल्या होत्या. तिच्यासोबत पाठराखीण म्हणून मामीच राहिली होती. त्यामुळे सर्वांपेक्षा मामीच तिच्या सासरच्या माणसांना ओळखायची.
बोलता बोलता मामीने पिशवीतून लाटी वडी, अळूची वडी, चपात्या काढल्या. एका डिश मध्ये काढून उमाच्या समोर ठेवले.
"अय्या, मामी अळूची वडी?" असे म्हणत उमाने त्यातील एक वडी उचलून पटकन तोंडात टाकली. त्यातील वाटलेल्या हिरव्या मिरचीची चव तिच्या जीभेवर पसरली. न राहवून तिने अजून दोन वड्या उचलल्या आणि तोंडात टाकल्या.
"अय्या, मामी अळूची वडी?" असे म्हणत उमाने त्यातील एक वडी उचलून पटकन तोंडात टाकली. त्यातील वाटलेल्या हिरव्या मिरचीची चव तिच्या जीभेवर पसरली. न राहवून तिने अजून दोन वड्या उचलल्या आणि तोंडात टाकल्या.
"मामी, मस्त झाली आहे वडी." हे ऐकून मामीही सुखावली.
"मामा, मामीला राहूंदे आजचा दिवस." तिने फर्मान सोडले. मामाने हसतच बायकोकडे पाहिले.
मामा म्हणाला,
"तुझी मामी कापडं घेऊनच आलीया संगट. तिला बी राह्याचं हुतं."
दोघीही हसल्या. मामी नणंदेला स्वयंपाकात मदत करायला आत शिरली. उमा बाहेर मोगऱ्याच्या वेलापाशी आली. मोगऱ्याची फुले तोडत असताना तिला दोन पानांमधून हळूच डोकावत असलेली एक नाजूक कळी दिसली. फुले तोडता तोडता ती थबकली.

ती कळी वाऱ्यावर हळूवारपणे डोलत होती. तिला फूल म्हणून या जगात जन्म घ्यायला अजून वेळ होता, पण कळीच्या रूपात ती जिवंत होती. तिने अलगद आपल्या पोटावर हात फिरवला. पोटातील बाळाची जाणीव होऊन तिचे अंग शहारले. 'काय असेल पोटात? मुलगा की मुलगी?' असा प्रश्न मनात येताच ती चमकली.
असा प्रश्न तिच्या मनात का आला असावा? तिच्या मनाची चाललेली घालमेल आणि तो प्रश्न याचा काही संबंध आहे का? हे पाहूया पुढील भागात...
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."