हे बंध रेशमाचे भाग २६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
बारशाची तयारी सुरू आहे. तिच्या सासरची माणसं डेरेदाखल झाली आहेत. आता पुढे...
उमाने पुढे होऊन सगळ्यांना नमस्कार केला. आईने पाण्याचा तांब्या आणून ठेवला. मामीने चुलीवर चहा ठेवला होता. ती चहा घेऊन आली. आत्याबाईंनी विचारले,
"बाळ झोपलंया व्हय?"
हो. आंघोळ घातली की झोपलीय." तोपर्यंत नणंदेची पोरं पळत आतल्या खोलीकडे गेली. " ऐ चल, मामीचं बाळ बघायला" म्हणत. त्यांच्यामागून सारजाताई गेल्या,
"ऐ पोरांनो, बाळ झोपलंय. चला बाहेर. दंगा करू नका." तरीही मुलांनी जाऊन बाळाच्या भोवताली कडे केले व ती बाळाकडे उत्सुकतेने पाहू लागली. सारजाही झोपलेल्या बाळाकडे निरखून पाहू लागली.
"चला, बघितलं ना बाळ? चला आता बाहेर. " असे म्हणत सारजाने पोरांना बाहेर पिटाळले व तिने उमाला विचारले,
"रात्रीचं रडत नाही ना बाळ?"
"नाही रडत. दिवसा पण रडत नाही. भूक लागली की तेवढ्यापुरतं. एकदा पोट भरलं की परत अजिबात काही त्रास नसतो परीचा."
"बरंय. नाही तर लै त्रास होतो. त्यात तुझी नोकरी."
"हे आले नाहीत बारशाला?"
"दादा? बारशाला पुरूष जात नाहीत, मग दादा कसा येणार?"
" त्याला काय होत़ंय तेव्हा बाळाचे बाबा बारशाला आले म्हणून?"
यावर सारजा काहीही न बोलता बाहेर आली. तिच्या मनात उरलीसुरली आशा होती की, महेशराव मागून येणार असतील तिचाही चक्काचूर झाला. तिचा चेहरा उतरला. मामीने त्या दोघींचे संभाषण ऐकले होते, त्यामुळे तिने उमाची समजूत घातली.
"सगळा कार्यक्रम बायकांचा, मग पुरूष येऊन काय करणार? बायकांत पुरूष लांबोडा! अशी गत होते. कुठंच बारशाला पुरूष जात नाहीत. त्यामुळे महेशराव आले नाहीत म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस." तिला मात्र वाटत होते, आपल्या नवऱ्याने यायला हवे होते. आपल्या बाळाचे बारसे आहे. बाळाच्या आयुष्यातील पहिला महत्वाचा समारंभ! त्याला वडील हजर नकोत?
"सगळा कार्यक्रम बायकांचा, मग पुरूष येऊन काय करणार? बायकांत पुरूष लांबोडा! अशी गत होते. कुठंच बारशाला पुरूष जात नाहीत. त्यामुळे महेशराव आले नाहीत म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस." तिला मात्र वाटत होते, आपल्या नवऱ्याने यायला हवे होते. आपल्या बाळाचे बारसे आहे. बाळाच्या आयुष्यातील पहिला महत्वाचा समारंभ! त्याला वडील हजर नकोत?
पाळणा मधोमध मांडण्यात आला. उमाला पाळण्याखाली बाळाला मांडीवर घेऊन बसवण्यात आले. सासरची मानाची पहिली ओटी आत्याबाईंनी भरली. तिच्या मांडीवरच्या बाळाच्या तोंडावरचे कापड दूर सारून बाळ पहावे असे काही त्यांना वाटले नाही. त्यांनी बाळासाठी कानातले डूल आणले होते. बाळाला कपडे, तिला साडी, ब्लाऊज पीस. ते सगळे तिच्या ओटीत त्यांनी घातले व त्या तिथून बाजूला झाल्या. जणू आपले काम संपले अशा आविर्भावात.
पाच ओट्या भरून झाल्यावर बाळाला पाळण्यात घालण्याची तयारी सुरू झाली. आईने आधीच वरवंट्याला कपडा गुंडाळून वरवंटा आणून ठेवला होता. तो आधी पाळण्यात घालून मग बाळाला पाळण्यात घालण्यात आले.
आत्यांनी बाळाचे नावरस नाव म वरून होते म्हणून मीरा ठेवले. उमाच्या मनात बाळाचे नाव मृणाल ठेवावे असे होते. तिने धाकट्या नणंदेच्या कानात सांगितले, तिने बाळाच्या कानात वाकून " मूठ मूठ घुगऱ्या घ्या आमच्या मृणालला खेळायला न्या, कुर्र." असे मृणाल नाव ठेवले आणि उमाला आनंद झाला.
"पहिल्या महिन्यात झाला आनंद, पोटी नांदतो देवकी नंदन
सोहळा सुखाचा मनी दाटतो जो बाळा जो जो रे जो "
सोहळा सुखाचा मनी दाटतो जो बाळा जो जो रे जो "
बाळाला पाळण्यात घालून हलवण्यात आले. ती बाजूला उभी राहून पाहत होती. आतापर्यंत टोपणनावाने बोलवणाऱ्या परीला तिचे स्वतःचे हक्काचे नाव आज मिळाले होते.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा