हे बंध रेशमाचे भाग ३१
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
सासू सुनेचे हितगुज सुरू आहे हे आपण मागील भागात पाहिले, आता पुढे...
उमाने आत्याबाईंच्या बोलण्यावर विचार केला तेव्हा तिला इतक्या लवकर सासरी आणण्याचा त्यांचा निर्णय पटला. माहेरी राहणे कुठल्याही मुलीला हवेसेच असते पण भविष्याचा विचार करून आखणी केली तर भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करता येते. आत्याबाई अडाणी असल्या तरी त्यांनी केलेला विचार योग्यच होता. आणखी महिनाभर माहेरी राहिलो असतो तर समाधान मिळाले असते, पण इथे आल्यावर नोकरीचा, बाळाचा प्रश्न आ वासून समोर उभा राहिला असता.
त्यामुळे तिने मनातील किल्मिष दूर करून आत्याबाई जे सांगतात तेच अंगिकारण्याचे ठरवले. आपल्याला कष्ट करावे लागणार आहेत याची तिने मनाशी खूणगाठ बांधली.
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके मग मिळते भाकर
आधी हाताला चटके मग मिळते भाकर
हे ती शिकली होती. कष्टाला तिची ना नव्हतीच. तिने बाळंतपणाला जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने कामे उरकत असे तसा कामाचा धडाका लावला. बाळाला बघत बघत कामे उरकणे तिला जमू लागले. सकाळी जरा आणखी लवकर उठायला तिने सुरवात केली. आपण लवकर परत आलो हेच बरे झाले असे तिला वाटू लागले.
बाळंतपणामुळे अंगात भरलेला जडपणा रोजच्या कामांसाठीच्या हालचालींमुळे निघून गेला. त्यामुळे थोडीफार जाडी वाढली होती ती कमी झाली. बायका म्हणू लागल्या,
"आगं, बाळातीन हायस असं वाटनां बी झालंया तुज्याकडं बगून. " हे ऐकून तिला अजून स्फुरण चढत असे. बाळाने पण चांगले बाळसे धरले. तिची दिवसभर चाललेली धावपळ आणि बाळात रमणे पाहून महेशराव तिच्याकडे गोड तक्रार करत,
"परी आल्यापासून या बाळाकडे दुर्लक्षच केले आहे सगळ्यांनी."
यावर ती गालातल्या गालात हसत असे. तिची रवानगी बाळंतीणीच्या खोलीत केली होती. स्वतः आत्याबाई तिच्यासोबत झोपत. त्यामुळे महेशरावांचा सहवास लाभत नव्हता. बाळ लीला पाहण्यात दोघेही रंगून गेले होते. आपल्या दोघांचा अंश असणारे ते बाळ पाहून दोघांच्या मनामध्ये आनंदाचे तरंग उठत असत.
यावर ती गालातल्या गालात हसत असे. तिची रवानगी बाळंतीणीच्या खोलीत केली होती. स्वतः आत्याबाई तिच्यासोबत झोपत. त्यामुळे महेशरावांचा सहवास लाभत नव्हता. बाळ लीला पाहण्यात दोघेही रंगून गेले होते. आपल्या दोघांचा अंश असणारे ते बाळ पाहून दोघांच्या मनामध्ये आनंदाचे तरंग उठत असत.
बघता बघता शाळेत रूजू होण्याचा दिवस उजाडला. तिने चार चारदा आत्याबाईंना सुचना दिल्या. बाळाचे सामान कुठे आहे, पाणी कुठे आहे सगळे पुन्हा पुन्हा दाखवले आणि मधल्या सुट्टीत घरी येईन असे सांगून मृणालला अंगावर पाजून ती शाळेत गेली.
ती जरी शाळेत गेलेली असली तरी तिचे सगळे लक्ष बाळाकडेच लागले होते. मधली सुट्टी व्हायच्या आधीच ती बेचैन झाली. बाळ रडत असेल का अशी शंका तिच्या मनात डोकावू लागली. तिचा अस्वस्थपणा हेडमास्तरांनी हेरला. त्यांनी उमाला ऑफीसमध्ये बोलावले. उमा आधीच अस्वस्थ झाली होती. कधी एकदा बाळाकडे पळतेय असे तिला झाले होते. आता हेडमास्तर काय काम सांगतात याची तिला काळजी वाटली.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा