हे बंध रेशमाचे भाग ३३
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
उमाला पुन्हा दिवस गेले आहेत. आता पुढे...
यावेळी उमाच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी होती. काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे हे स्वतःचे स्वतःला समजत होते. घरकाम, नोकरी, मृणालचा सांभाळ या सगळ्या गोष्टी तिने लीलया पेलल्या होत्या.
तिला दिवस गेले आणि पारूबाईत बदल झाला. पारूबाई पुन्हा एकदा तिची काळजी घेऊ लागली. तिला हवं नको पाहू लागली. तिला निरखू लागली. मृणालशी त्या थोडं फटकून वागतात हे उमाच्या लक्षात आले होते. आत्याबाई असे का करतात याचे तिला कोडे पडले होते.
उमाच्या उपस्थितीत मृणालने कितीही रडून गोंधळ घातला तरीही त्या चुकूनही तिला जवळ घेत नसत. उलट तिला रागवत असत, "थोबाड बंद कर की. का म्हनून टाळा वासलाय?" असे म्हणत तिला दटावत. अण्णा घरात असले तर मृणालला उचलून बाहेर घेऊन जात असत. मग छोटी मृणाल रडणे विसरून इकडे तिकडे टुकूटुकू पाहत बसे. तिला अशावेळी मामंजींचा खूप आधार वाटत असे.
आता दुसऱ्या बाळंतपणाला इथेच राहावे लागणार होते. त्यामुळे तिने गावातल्या सरकारी दवाखान्यात नाव नोंदवले. तिथेच ती ट्रीटमेंट घेत होती. बघता बघता सहा महिने झाले. आता उमा जरा थकू लागली. जास्त कामाचा लोड तिला सोसवेना. थोडे बसत उठत ती कामं करू लागली. पूर्ण नऊ महिने तिने शाळेत जाणे सुरूच ठेवले.
पारूबाई येता जाता तिला न्याहाळत.
"या खेपंला तुला पोरगाच हुनार बघ. प्वाटच सांगतंया. या खेपेस समदं प्वाट फुडंच आलंया." आता मुलगा झाला नाही तर पारूबाईचा हिरमोड होईल. दुसरीही मुलगीच झाली तर पारूबाई तिचा राग राग करतील अशी भीती उमाच्या मनात दाटुन आली.
तिने महेशरावांजवळ ही भीती बोलून दाखवली.
"या खेपंला तुला पोरगाच हुनार बघ. प्वाटच सांगतंया. या खेपेस समदं प्वाट फुडंच आलंया." आता मुलगा झाला नाही तर पारूबाईचा हिरमोड होईल. दुसरीही मुलगीच झाली तर पारूबाई तिचा राग राग करतील अशी भीती उमाच्या मनात दाटुन आली.
तिने महेशरावांजवळ ही भीती बोलून दाखवली.
आईबाबत तक्रार ऐकून महेशराव नेहमीप्रमाणे चिडले. तिच्यावरच तोंड टाकून तिला बडबड करू लागले. आपण गप्प बसायला हवे होते हे तिला समजले व त्यानंतर तिने ओठांना कुलूप घालून घेतले. नंतरचे नंतर बघता येईल असा विचार तिने केला, पण राहून राहून तिच्या नजरेसमोर वंदू उभी राहत होती.
तिला सासरच्या माणसांनी नांदायला परत नेलेच नाही. तिला हायस्कूल मध्ये शिक्षिकेची नोकरी लागली. आईकडे राहून ती स्वतःच्या दोन्ही मुलींचा सांभाळ करत होती. आपल्यावर अशी वेळ येणार नाही असे उमाला वाटत होते, पण येणारा काळच सगळे ठरवेल असा विचार करून ती आला दिवस पुढे ढकलत होती.
ती जेव्हा जेव्हा माहेरी जायची तेव्हा तेव्हा ती वंदूला भेटायला जायची. जाताना हमखास तिच्या मुलीसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जायची. वंदू तिच्याजवळ आपले मन मोकळे करायची. तुला काहीही मदत लागली तर कधीही मला हाक मार. मी लगेच येईन असे तिने वंदूला सांगितले होते.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा