हे बंध रेशमाचे भाग ३७
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
उमा आईसोबत माहेरी निघाली आहे. लेकीला तिने जवळ घेतलेय. डोळ्यात नवनवीन स्वप्नं पाहत तिचा प्रवास सुरू होता. आईकडे गेल्यावर तिला बरे वाटले. आत्याबाई पाठवतील याची शाश्वती नव्हती, त्यामुळे माहेरी यायला मिळण्यातील आनंद द्विगुणित झाला. आईलाही लेक माहेरी आली याचा आनंद झाला.
ती आल्याचे समजल्यावर वंदू तिला भेटायला आली. ती आली तेव्हा उगीचच उमाला अवघडल्यासारखे झाले. खरं तर आपल्या नशिबी मुलाचे दान पडले म्हणून, नाही तर वंदू आणि आपण एकाच मार्गावरच्या पादचारी असले असतो का? हा प्रश्न तिच्या मनात आला. नाही म्हटले तरी उमाला थोडे वाईट वाटले. केवळ मुलगा झाला नाही म्हणून वंदूला भरल्या संसारातून बेदखल केले गेले होते.
आपण काळ बदलला, माणसे सुशिक्षित झाली असे म्हणतो तेव्हाच अशी उदाहरणे डोळ्यासमोर आली की हतबुद्ध होतो.
उमाला मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलेली बातमी आठवली.
आमदारांच्या घरातील सुनेला मुलगा झाला नाही म्हणून तिचा होत असलेला छळ! देशाचे राज्यकर्ते असणारेच असे वागतात मग आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय अशी जनतेमध्ये अवस्था. बाकीचे विचार दूर सारून तिने बाळाला वंदूच्या मांडीवर दिले.
उमाला मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलेली बातमी आठवली.
आमदारांच्या घरातील सुनेला मुलगा झाला नाही म्हणून तिचा होत असलेला छळ! देशाचे राज्यकर्ते असणारेच असे वागतात मग आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय अशी जनतेमध्ये अवस्था. बाकीचे विचार दूर सारून तिने बाळाला वंदूच्या मांडीवर दिले.
बाळ मांडीवर घेतल्यावर वंदू थोडी भावनावश झाली,
"बरं झालं बाई तुला मुलगा झाला. एक विचारू, मुलगा आणि मुलगी पोटात असताना काही वेगळं जाणवतं का?"
"नाही गं. तसं काहीच जाणवलं नाही. घराण्याला वारस किंवा वंशाचा दिवा हवा ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. ही मानसिकता इतकी खोलवर रूजली आहे की आज आपण मुली इतक्या सक्षम झालोत, नोकरी करतोय तरीही मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही."
"मला वाटतं यामागे मुली सासरी नांदायला जातात हे मोठे कारण असावे. मुलगी कितीही शिकली, उच्चपदस्थ असली तरीही ती एक ना एक दिवस सासरी जाणार आहे. ती थोडीच आपल्याजवळ रहाणार आहे? या मानसिकतेतून आजचा समाज बाहेर पडत नाहीय. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आपण बदलू शकतो हे समजून घेत नाही कुणी. राजा राममोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा त्यांना विरोध झालाच ना! तरीही त्यांनी आपले प्रयत्न थांबवले नाहीत."
वंदू म्हणाली.
वंदू म्हणाली.
"ते म्हणतात ना, शिवाजी पुन्हा जन्मावा, पण शेजारच्या घरी. आपल्या घरी नको. आपले आयुष्य ठराविक चाकोरीतून गेले पाहिजे. यासाठी मुलगा हवा. मग तो कसा का असेना, पण घराण्याला वारस हवा." उमा विषण्णपणे म्हणाली.
"खरं आहे तुझं. ती धुर्पदा काकी आहे ना खालच्या आळीची, तिचा मुलगा येसू रोज दारू पिऊन येतो आणि रोज नवा तमाशा करतो. आई बापाकडे लक्ष तर देत नाहीच, पण दारूला पैसे दिले नाहीत तर आईच्या अंगावर धावून जातो. काय चाटायचंय असल्या मुलांना? त्यापेक्षा नसलेला बरा." वंदू म्हणाली.
"अगं, पण तरीही त्याला घराबाहेर हाकलून द्यावे असे काकीला वाटते का? ती सकाळी त्याची दारू उतरल्यावर त्याच्यावर माझ्या बाबा, माझ्या राजा करत प्रेमाचा वर्षाव करत असेल. ते पाहून तो आणखी निर्ढावला असेल. मला विचारून घे." उमा म्हणाली.
यावर वंदू आणि ती दोघीही हसल्या.
"खरंच आहे गं. वंशाच्या दिव्याला सगळं माफ आणि पणती आपल्या मिणमिणत्या उजेडात आसपासचे वातावरण उजळवून टाकते, पण तिच्याकडे मात्र दुर्लक्ष! हाच जगाचा न्याय आहे. आपण मात्र असे करायचे नाही. तूही तुझ्या मुलींना या जगात निर्धाराने वाटचाल करण्यासाठी सर्वांगाने सक्षम बनव. इतके की मुलगा मुलगी भेद त्यांच्या खिजगणतीतही नसावा. मीही माझ्या मुलीला व मुलाला ही या पध्दतीनेच वाढवणार आहे." उमा म्हणाली.
तेवढ्यात आई आत आली व म्हणाली,
"लैच गप्पा रंगल्या हायत्या, पर कडुसं पडलंया."
" हो हो काकी. निघालेच आहे मी पण. चल गं उमा. भेटू परत." असे म्हणत तिने बाळाला उमाकडे दिले.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा