घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,
एका सुनेची व्यथा....
कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही
©️®️शिल्पा सुतार
........
........
दुसर्या दिवशी सकाळी मीना आली कामाला, निशा तीच आवारत होती, जरा गप्प वाटत होती ती, सचिनला ते समजल
"निशा एक खूप सुंदर दिवस आहे तुझ्या पुढे तू तो आनंदात घालवणार की टेंशन मध्ये सांग बघू",....... सचिन चहा घेवून आत आला
"आनंदात",....... निशा
"मग मूड चेंज कर, बर चल आपण छान नाश्ता करू",........ सचिन
सचिन निशा सौरभ नाश्त्याला आले,..... "चला आई बाबा",
"मी पूजा झाल्यावर खाईन तुम्ही खावून घ्या",....... सुरेश राव
मीनाने पोहे पुढे आणून ठेवले......
"आई चला ना" ,....... निशा
" आम्ही बसू नंतर",....... मालती ताई
सौरभची शाळेची रिक्षा आली, त्याचा लंच बॉक्स निशा ने पॅक केला तो शाळेत गेला.......
" निशा काय आहे आज तुझा प्लॅन? दुपारी जाऊ या का लंच ला? मी टेबल बूक करतो",........ सचिन
निशा च्या चेहर्यावर छोटस हसू होत,...... "अरे पण ऑफिस "?,......
"लंच टाइम मध्ये जाऊ ग मस्त एक तास, प्लीज.... प्लीज",........ सचिन
"बर तू ये मला घ्यायला" ,.......... निशा
ठीक आहे........
निशा चा मूड ठीक झाला, सचिन खुशीत होता, पण हे अस तात्पुरतं समाधान नको होत सचिन ला, कायम अश्या टेंशन मध्ये कस राहू शकत कोणी, मी आईशी बोलूनच बघणार आहे, घरात शांती महत्त्वाची आहे....
मीना स्वैपाक करून गेली, निशा ने तीच आवरल, ती ऑफिस ला निघून गेली...
सासुबाई बघत होत्या , सचिन बोलला नाही त्यांच्या शी, त्या दोन तीनदा मुद्दाम पुढून गेल्या
"चहा करू का तुला थोडा सचिन",...... मालती ताई
"नको आई मी निघतो ऑफिस ला जायला ",...... सचिन
सचिन ही ऑफिस ला गेला, सासुबाई सासरे नाश्त्याला बसले
"अहो सचिन बोलला नाही आज माझ्याशी नीट ",...... मालती ताई
"अग कामात असेल तो, तू ना काहीही विचार करत बसते ",...... सुरेख राव
"नाही हो बायकोच्या मागे पुढे तर करत होता, मस्त गप्पा मारत होता तिच्याशी",...... मालती ताई
" तू काय त्यांचं बोलणं ऐकत बसली होती का"?,...... सुरेश राव
"नाही हो एक-दोनदा किचन मध्ये गेली होती मी तर त्यांच् बोलण ऐकू आलं, तुम्ही पण ना ",....... मालती ताई
"मग तू निशा ला बोललीस तर राग आला असेल त्याला",...... सुरेश राव
" म्हणजे आता त्यांना आपण काहीच बोलायचं नाही का ",..... मालती ताई
" बोल ना पण सदोदित नको, सारख बोलून आपण आपली किम्मत कमी करून घेतो ",....... सुरेश राव
मालती ताई विचारात होत्या, काय करू मी आता समजत नाही, खूपच कौतुक सुरू आहे त्या निशा च आणि स्वयंपाका वाल्या बाईच ही, आणि माझा राग च येतो त्यांना ...
निशा ऑफिस मध्ये पोहोचली तिचा उतरलेला चेहरा बघून सारिका जवळ आली,....." काय झालं आहे आज निशा? एकदम गप्प वाटते आहे", ...
"काय होणार आहे ग सारिका? आमच्या घरी अजिबात शांतता नाहीये",..... निशा
" काही झालं का ग परत",.... सारिका
"हो अगं विनाकारणच सासुबाई मला तर बोलतातच, पण माझ्या आई-वडिलांनाही बोलत राहतात, मला वाईटच वाटलं ग जरा",..... निशा
" वाटणारच, मग सचिन काही बोलला की नाही त्यांना ",...... सारिका
"माहिती नाही तो सासूबाईंना काही बोलला की नाही, पण त्याने मला बरंच समजावलं आणि आज दुपारी आम्ही दोघं लंच ला बाहेर जाणार आहोत ",...... निशा
"अरे वा मजा आहे बाबा",...... सारिका
निशा खुश होती....
दुपारी लंच टाईम ला सचिन निशाला घ्यायला आला, दोघेजण छान जेवायला बाहेर आल आले, निशा तर अगदी खूप खुश होती, दोघांनीही खूप गप्पा मारल्या, नाहीतरी त्या दोघांचं पटायचं आधीपासून खूप,
"निशा तू मला प्रॉमिस कर की तु कुठलीही गोष्ट मनाला लावून घेणार नाहीस, आता हल्ली खूप त्रास करून घेते तू",........ सचिन
" नाही लावून घेणार मनाला",..... निशा
"मला माहिती आहे आपल्या घरचं वातावरण हेल्दी नाही, पण त्याने आपल्या नात्यावर फरक पडायला नको पडायला, शक्यतोवर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न कर, आपल्या घरच्या वातावरणाचा सौरभ वर परिणाम नको व्हायला आणि तुझी पण तब्येत आता हल्ली खराब होते लगेच, काळजी घेत जा ग",...... सचिन
निशा ला खूप बरं वाटत होतं सचिन सोबत
" हो मी नक्की काळजी घेईल तुझी माझी सौरभची",...... निशा
घरी दुपारी सासुबाईंना अॅसीडीटी झाली,....... बाई च्या हातचा स्वैपाक मुळे त्रास होतो, असा त्यांनी समज करून घेतला, त्यांना हा त्रास नेहमीच होत होता,
"अहो कसतरी होतय मला, बाई फार तेलकट भाज्या करते",...... मालती ताई
"अग आपण दोन दिवसा पासुन वॉक ला गेलो नाही ना त्या मुळे असेल, भाजी छान होती की आजची",....... सुरेश राव
"मला नाही आवडली",...... मालती ताई
संध्याकाळी बाई आली
"आज नाही ग काम तुला आम्ही करून घेवू ",........ मालती ताई
" का काय झाल? दुपारी नाही जेवला का तुम्ही",.... मीना
" जेवलो ना आणि त्रास ही झाल हो ",..... मालती ताई
" काय झाल आजी",..... मीना
"नुसती भाजी तेलकट ना त्याला चव ना धव, काही येत नाही का ग तुला ",...... मालती ताई
" तस नाही आजी तुम्ही कश्या भाज्या खाता सांगून द्या एकदा दाखवून द्या, मग तसच करेन मी",...... मीना
" काही गरज नाहिये तू जा",....... मालती ताई
" निशा मॅडम येई पर्यंत थांबते मी",...... मीना
" नको जा सांगितल ना, परत कामाला विचारल तर वेळ नाही अस सांग आणि परत येवु नकोस",...... मालती ताई
निशा ऑफिस हून आली, आज जरा काम ही आहे ऑफिस च कॉफी घेवून करू सुरुवात , बघते तर घरात काही काम झाल नव्हत, किचन मधे जावुन बघीतल स्वैपाक झाला नव्हता, काय कटकट आहे, एक दिवस ही नीट जात नाही इथे....
" आज स्वैपाक वाली बाई आली नाही का? , का अश्या सुट्ट्या करते ती, फोन करून बघते तिला ",...... निशा
" आली होती ग, पण आम्हाला तिच्या हातचा स्वैपाक आवडत नाही, तर तिला परत पाठवले, आणि आता नको लावू परत बाई, काय एवढं पंचवीस लोकांच काम नाही आहे घरी",...... मालती ताई
" आई अहो मला नाही जमत आहे संध्याकाळी स्वैपाक, मला ऑफिस च काम असत, म्हणून लावला ना तिला आणि छान होती की आजची भाजी, बाई चांगल काम करते ",....... निशा
" मला नाही आवडली भाजी , आटोप लवकर , भूक लागली आहे दुपारी नीट जेवली नाही मी ",......मालती ताई
निशा चिडली होती, ती फ्रेश होऊन आली, आधीच खूप थकली होती ती, तेवढ्यात एका क्लायंट चा फोन आला दुसर्या दिवशी प्रेझेंटेशन होत, निशा ची मीटिंग एक तास चालली, सचिन आलाच तेवढ्यात ऑफिस हून, मालती ताई पुढे बसल्या होत्या
" आज अगदी निवांत आई ",..... सचिन
"अरे सचिन बघितल का आठ वाजुन गेले अजून स्वैपाक झाला नाही आपला",......मालती ताई
"का? स्वयंपाक वाली बाई कुठे गेली ",......सचिन
"तिला नाही सांगितल मी, एवढ ही काम होत नाही का आज काल च्या मुलींना, आणि मला अॅसिडीटी होते तिच्या हातच्या स्वैपाक मुळे",....... मालती ताई
" बर झालं बंद केली बाई, निशा ला त्रास द्यायची एक ही संधी तू वाया घालवू नकोस आई, आणि तुला अॅसिडीटीचा त्रास आधी पासून आहे ना, उगीच का त्या बाईला नाव ठेवते, ",..... सचिन
" एवढ्यात त्या बाई मुळे वाढला रे त्रास माझा, आणि तू मला असा का बोलतो, म्हणजे जे होत त्यात माझी एकटीची चूक आहे का ",...... मालती ताई
" तू स्वतःला विचार, मला आता अजून काही बोलयच नाही, निशा कुठे आहे",...... सचिन
" बसली आहे खोलीत, मी बोलली होती तिला स्वैपाक लवकर करून घे, पण कशाच काय, मी लागते स्वैपाकाला",...... मालती ताई
" नाही आई राहू दे तू, मी करतो काही तरी ",..... सचिन
सचिन रूम मध्ये आला....
निशा चा कॉल सुरू होता, तिने बोटाने सांगितल गप्प बस, सौरभ बाजूला बसुन चित्र काढत होता....
सचिन ने आवरल, बाहेरून जेवण मागवल....
रात्रीचे जेवण झालं...
सचिन निशा टेरेस वर फेर्या मारत होते सौरभ खाली टीव्ही बघत होता, सचिन निशा ला त्याच्या ऑफिस च्या नवीन प्रोजेक्ट बद्दल सांगायला सुरुवात केली..
"छान प्रोजेक्ट सुरू झाला आहे सचिन तुझा, मस्त मन लावून काम कर , माझ्याही ऑफिसमध्ये सध्या खूपच काम वाढलं आहे",....... निशा
"निशा मला एक दोन ठिकाणांच्या ऑफिस मध्ये इंटरव्यू साठी चा कॉल आला आहे, काय करू? घेऊ का मी ती ऑफर ?",..... सचिन
" कुठली पोस्ट आहे? काय आहे कामाचे स्वरूप?",...... निशा
ते दोघे बोलत होते तेवढ्यात मालती ताईने आवाज दिला,........ " सचिन बाहेरच्या जेवणाने आम्हाला त्रास होतो, अॅसिडीटी होते आहे, गोळी आहे का एखादी ",..... सासुबाई
"काय चाललय आई हे, आम्हाला काम असतात, तूच बंद केली ना बाई, वेळ नाही होत स्वयंपाकाला, येतो खाली थांब ",...... , सचिन ने गोळी दिली
निशा सचिन खाली आले सचिन ने आईला औषध दिलं निशा किचन उद्याची तयारी करत होती, सासुबाई तिला खूप बोलल्या बाहेर गोळी घेता घेता..
" काय ग किती काम तुला ऑफिस च स्वैपाकाला वेळ नाही तर मला सांगायच ना मी केल असत",....... मालती ताई
" काय झाल आई अश्या का बोलतात तुम्ही मला ",...... निशा
"काही चुकीच बोलली का मी, आज किती वेळा सांगितल तुला की लवकर स्वैपाक कर, केला का तू? ",........ मालती ताई
" आई तुम्हाला माहिती नाही आम्हाला काय काम असतात ऑफिस मध्ये ते, जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही",........ निशा
निशा चिडचिड करत आत आली,
" मी या घरात राहणार नाही सचिन, मी सौरभ ला घेऊन सकाळी माझ्या आईकडे जाते आहे, दिवस रात्र नुसती डोक्याला भुणभुण, जरा म्हणुन शांतता नाही ",....... निशा
" काय झालं निशा आता नीट सांगशील का",....... सचिन
" हे घर माझं नाही आहे का? मी कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही का ईथे, सगळ आई ठरवतात मी काहीही डिसीजन घेतला किंवा घरात काही बदल केला की त्या बदलून टाकतात, मला आता हे सहन होत नाही आहे, रोज खूप बोलतात त्या मला, स्वयंपाकाची बाई ही बंद केली, सकाळचा ठीक आहे संध्याकाळी माझ्या कडून स्वैपाक होणार नाही, त्या पेक्षा मी राहत नाही इथे, मी जाते आई कडे डोक्याला शांती तेवढी मला",....... निशा खूप चिडली होती
" मी सकाळी काय बोललो होतो तुला, असा ताण करून घेवू नकोस, मला माहिती आहे तुला काम असतात ",...... सचिन
" मला तुझ्याशी काहीही प्रॉब्लेम नाही सचिन, पण आता हा त्रास वाढत चालला आहे आईंचा, त्यांना मी आवडत नाही, मला उद्या लवकर जायच आहे माझ्या कडून स्वैपाक होणार नाही, परत आई बोलतील, त्या पेक्षा मी इथे रहात नाही, माझा निर्णय झाला आहे, मी जाते आहे उद्या आई कडे, ताण घेत नाही मी, त्यासाठी मी माझ लाइफ ठीक करते आहे इथून जावून, आणि माझ फिक्स झाल आहे मला थांबवू नको ",....... निशा
" असं नको करुस निशा आपण व्यवस्थित बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व करू, मी बोलून बघतो आईशी",....... सचिन
" बघ त्या काही ऐकतात का?, कठीण आहे सगळ",..... निशा
सचिन आई-बाबांच्या रूममध्ये आला,......" काय झालाय आई निशा का चिडली आहे एवढी",..
" काय झाल मालती ",...... सुरेश राव
" काही नाही हो ती सकाळी बाई येते ना कामाला मी एवढंच म्हटलं निशाला की मला तिचं काम आवडत नाही, मी असतेच ना मदतीला तर त्या बाईला आपण काढून टाकू, म्हणून आज मी त्या बाईला सांगितल येवू नकोस तू कामाला ",.....मालती ताई
"तू अस कस ठरवल एकटीने, निशा ला विचारल का",...... सुरेश राव
" तिला काय विचारायचे त्यात ",........ मालती ताई
" अगं पण आई, निशाला खूप काम पुरतं, आता पूर्वीसारखं राहिलं नाही आहे बायकांचा आयुष्य, ऑफिस मध्ये खूप काम असतं तिला, घरी येऊन परत स्वयंपाक करणार, ऑफिस मध्ये लक्ष लागत नाही तसं तिचं, घरच स्वयंपाकाचे टेन्शन परत आल्यावर , आणि सौरभ ला ही वेळ द्यावा लागतो ",....... सचिन
" हो बरोबर आहे एवढ दमायची गरज नाही, असू द्या मदतनीस ",...... सुरेश राव
" म्हणजे सचिन तुला असं म्हणायचं आहे की निशा एकटी थकते, मी घरात काहीच करत नाही",........ मालती ताई
" आई तुला दुसरं टोक गाठायचा आहे का ",...... सचिन
"ते काही नाही ती बाई उद्यापासून कामाला येणार नाही किती घाण काम आहे तिचं तिने केलेल्या पोळ्या मला खावेसे वाटत नाही, भाजी ला ही चव नाही काही",..... मालती ताई
"ठीक आहे मग तू तुझा स्वयंपाक उद्यापासून करून घे आमच्या कामासाठी राहते ती बाई",...... सचिन
"ठीक आहे तसं करू या, तुझ्या बायको ला नाही करायचा काही तर काय करणार ",..... मालती ताई
"काय रे अस, मालती ऐक ग जरा ",.... सुरेश राव
"मग काय तुम्ही दोघी ऐकत नाहीत खरच आहे आई निशा बिझी असते खूप",..... सचिन
"अग मालती काय हरकत आहे बाई लावली तर, तुला जो पूर्वी त्रास झाला तोच त्रास आता निशाने सहन करायचा का",...... सुरेश राव
"माझी बाजू नाही घेतली नाही तुम्ही कधी, आता बर बोलता आहेत़",...... मालती ताई
"बाबा मी जातो आणि आता तुम्ही भांडू नका" ,...... सचिन
सचिन रूममध्ये आला त्याने निशाला आई बरोबर काय झालं ते सांगितलं......
राग सोड आता निशा, बाईला आपण आपल्या तिघांच्या कामासाठी राहू देऊ या, आई बाबांना नको आहे तिच्या हातचा काम, तो त्यांचा डिसिजन आहे, ते करून घेतील त्यांच त्यांच काम आणि आपण या विकेंडला आपण तुझ्या मम्मी कडे जाऊ, उद्या तू जाऊ नको सौरभ ला घेऊन....
निशा आता शांत झाली होती, हे बघून सचिन ला बरं वाटलं.....
.........
