घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,
एका सुनेची व्यथा....
कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही
©️®️शिल्पा सुतार
........
........
निशा ने स्वैपाक वाल्या बाई मीना ला फोन लावला
"काय झाल मीना आज? , तुला काही बोलल्या का आई? तू आज माझ्या साठी थांबायला हवं होतं, मी बघितल असत काय झाल ते ",...... निशा
"मला नाही जमणार ताई तुमच्या कडे काम, आजी खूप कटकट करतात ताई, मला आज खूप बोलल्या त्या, भीती वाटते त्यांची ",...... मीना
"अग मी घरी असतांना ये, तू अस करु नकोस, मी ऑफिस हून आली की करेन रोज तुला फोन मग येत जा तू आणि तेव्हा सासुबाई फिरायला गेल्या असतात तेव्हा होईल तुझ काम ",........ निशा
" नको ताई तुम्ही दुसरी कोणी बाई बघून घ्या ",...... मीना
" अग मीना अशी काय करतेस? मी बोलली आहे का तुला कधी काही ",...... निशा
" नाही ताई माझी तुमच्या विषयी काही तक्रार नाही, ठीक आहे मी येईन, पण जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा येईल",....... मीना
चालेल......
ती तयार झाली एक प्रश्न मिटला ......
" निशा मला बोलायच आहे तुझ्याशी काय करू मी नवीन ऑफर च, घेऊ का" ?,...... सचिन
"तू मला उद्या त्याचे डिटेल्स पाठव, मी जरा एकदा वाचते ते सगळं मग आपण ठरवू ",........ निशा
"चालेल, मला थोडा स्टडी करावा लागेल आता, आणि नंतर मला दोन दिवस सुट्टी आहे एक दिवस सुट्टी टाकली की आपल्याला तीन दिवस मिळतील कुठेतरी फिरून यायचं का आपण ",...... सचिन
"अरे वा चालेल तू उद्या चौकशी कर जर आपलं काही ठरलं तर मग सुट्टी घ्यावी लागेल ",...... निशा
"कुठे जाऊया या हिल स्टेशनला जाऊया का मस्त शांत वातावरण असेल ",...... सचिन
" चालेल फॅमिली रूमस बुक कर आई-बाबा एका रूम मध्ये आपण एका रूम मध्ये",...... निशा
" आई बाबांना नको न्यायला आपण त्यांना घरी राहू दे ",...... सचिन
"अरे पण सचिन असं चांगलं वाटत नाही ",...... निशा
"आपण लग्न झाल्यापासून कधीच दोघजण असं बाहेर गेलेलो नाही यावेळी जाऊ या ना, राहतील आई-बाबा दोन दिवस घरी नाहीतरी स्वयंपाकाला बाई आहेच",..... सचिन
" तू आधी घरी बोलून बघ त्यांच्या शी नाहीतर आपण सगळ ठरवायचं आणि आई कॅन्सल करतील, नाही तरी आपण या विकेंडला आईकडे जाणार होतो त्या ऐवजी फिरायला जाऊ ",...... निशा
" या वीकेंडला नाही पुढच्या आठवड्यात ठरेल फिरायला जायच या विकेंडला जाऊ तुझ्या घरी",..... सचिन
सकाळी बाई आली कामाला, मस्त तिघां साठी आलु पराठे केले, निशा सचिन सौरभने खाल्ले उरलेले डब्यात घेवून गेले ऑफिस ला, सौरभ साठी खिचडी रेडी होती, सचिनने विचारल आईला घेते का पराठा
" नाही खूप जड असतात ते पचायला नको आम्हाला " ,....... मालती ताई
" मी घेतो मला द्या अर्धा पराठा, आणि तुमच्या स्वैपाकात माझा ही थोडा स्वैपाक करत जा, मी खाईन थोड",...... सुरेश राव
"हो चालेल बाबा ",...... निशा
निशा सचिन ऑफिस ला गेले
जरा वेळाने सासुबाईंनी त्या नवरा बायको साठी स्वैपाक केला, अहो बसायचा का जेवायला.....
" आज अशी काय झाली भाजी",...... जेवताना सुरेश राव बोलत होते
" म्हणजे काय झालंय नक्की भाजी ला",...... मालती ताई
" कोणी केली आहे, ही आपली भाजी आहे का की मीना ने केली आहे ",...... सुरेश राव
"अहो मी केली भाजी",...... मालती ताई
" तू खावून बघितली का? असू दे चिंता नको करू मला खिचडी दे",....... सुरेश राव
"पण ती खिचडी बाई ने केली आहे",...... मालती ताई
" असू दे छान दिसते आहे",..... सुरेश राव
"हो आजोबा छान आहे खिचडी",..... सौरभ
बाबानी सौरभने खिचडी खाल्ली.....
स्वैपाकाची सवय नसल्याने भाजी नीट झाली नव्हती सासुबाईंची......
संध्याकाळी पण तसंच झालं आज निशा लवकर आली होती तिने स्वयंपाक या वाल्या बाईला लवकर बोलून घेतलं ती त्यांचा स्वयंपाक करून निघून गेली मग निशा आणि सौरभ छान तयारी करून सौरभच्या मित्राच्या वाढदिवसाला निघून गेले
सासूबाई सासरे फिरून आले सचिन ऑफिस हून आलेला होता
"आई चहा कर ग थोडा",...... सचिन
सासुबाई आवरून किचन मध्ये आल्या, बघितलं तर भांड्यात पनीरची भाजी केलेली होती, छान दिसत होती, आता त्यांना चहाही करायचा होता आणि त्यांच्यासाठी स्वयंपाकही करायचं होता, उगाच हे स्वयंपाकाचं लचांड मागे लावून घेतलं, फ्रीजमधलं फ्लॉवर काढला, दोघांसाठी फ्लावर ची भाजी आणि पोळी केली
निशा आणि सौरभ आले वाढदिवसा हुन, सौरभ खूप खुश होता,
"आम्ही तिकडे खूप खाऊ खाल्ला, मला भूक नाही जास्त ",....... सौरभ
सगळे जेवायला बसले, फ्लावर च्या भाजी चा खूप कसातरी वास येत होता, सासूबाईंनी सासऱ्यांना भाजी वाढली त्यांनी कसातरी तोंड केलं
"मलाही पनीर ची भाजी दे",........ सुरेश राव
बाबांनीही आज पनीरची भाजी खाल्ली, फक्त सासुबाईंनी हट्टाने फ्लावरची भाजी खाल्ली, सगळे बोलत होते त्यांना की घेते का थोडी भाजी तरी त्यांनी ऐकले नाही, निशा ने तर दुर्लक्ष करायचं ठरवलं जेवढ आपण जास्त विचारा त्यांना तेवढ जास्त करतात त्या
"आई-बाबा आम्ही पुढच्या आठवड्यात थोड फिरायला जायचं विचार करतो आहोत, तुम्ही दोघं येणार का आमच्यासोबत",...... सचिन ने फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं
" नाही तुम्ही जाऊन या दोघेजण",...... सुरेश राव
" अहो गेलो असतो आपणही त्यांच्यासोबत",....... मालती ताई
" नको ते हिल स्टेशनला जायचं म्हणताय, प्रवासही झेपत नाही आपल्याला आणि तिथे फिरण होत नाही, तिथे पॉईंट्स बघायचे म्हणजे आपली परत उचलबांगडी, त्यापेक्षा जाऊ दे त्यांना, नंतर आपण येथे गावातल्या गावात एखादी पिकनिक काढु रिसॉर्ट ला तिथे आपण जाऊ त्यांच्यासोबत",....... सुरेश राव
" चालेल आई बाबा ",....... सचिन
सचिन निशा रूम मध्ये आले
" निशा तू हॉटेल शोधून ठेव एखाद छान ",....... सचिन
" हो, तारीख सांग",...... निशा खुशीत होती
सासुबाई ना आता खूपच राग येत होता सगळं कसं नीट चालला आहे यांचं, नवरा पण लगेच ती म्हटलं की ते ऐकतो, मला मात्र स्वयंपाकाचे काम अंगावर आल आहे, काहीतरी करायला पाहिजे.......
दुसऱ्या दिवशी स्वयंपाका वाली बाई आली कामाला, तिने या तिघांचा स्वयंपाक केला, ती स्वयंपाक करत असतानाच सासूबाईंनी एका बाजूला पोहे करायला घेतले
"आजी तुम्ही थांबा दोन मिनिट, माझा स्वयंपाक झालाच आहे, मग मी गेली की तुम्ही करा, उगीच लागून जाईल काही",....... मीना
सासूबाईंनी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली तशी मीना खूप घाबरली
निशा सचिन दोघ बाहेर आले
"ताई मी काही बोलली नाही आजींना, त्यांना मी म्हटलं दोन मिनिट थांबा माझा स्वयंपाक झाला आहे मग तुम्ही पोहे करा ",....... मीना
" अग ही तुझी स्वयंपाकाची बाई मला कुठल्याच गोष्टीला हात लावू देत नाही ",........ मालती ताई
"ठीक आहे आई मी बघते,.. मीना तुझं काम झालं असेल तर तु जा मी करते तुला नंतर फोन ",...... निशा
मीना गेली सचिनही आत आवरायला निघून गेला
" काय झालं आहे आई मी करू का पोहे",...... निशा
" तू जर एवढ आमचं केलं असतं तर ही वेळ आली असती का माझ्यावर, तुम्ही तुमची स्वैपाक वाली बाई बघीतली ना, छान आहे, आता का येते मदतीला",....... मालती ताई
" तुम्ही का बर असं का बोलत आहात आई",....... निशा
"तू मुद्दाम न आवडणार्या गोष्टी करतेस, साध्या दोन पोळ्या होत नाही तुझ्या कडून ",....... मालती ताई
" मी कधीच काहीच केल नाही का या 7-8 वर्षात तुमच ",..... निशा
" केल ना असच रडत पडत एक धड नाही, ना चव ना चोथा, बाजूला हो, काही हात लावू नको पोह्यांना मी करेन माझे माझे पोहे",..... मालती ताई
निशा आत आली तिथेच तोंड उतरवून बसली, डोळ्यात पाणी होत तिच्या
" काय झालं निशा आता",...... सचिन
" काही नाही रे, मी आईंना म्हटलं मी पोहे करू का आत्ता तर मला ओरडल्या बोलल्या मी कधीच काहीच करत नाही",........ निशा
" बोलू दे, त्याने काय फरक पडतो, तू हुशार आहे हुशार राहणार",...... सचिन
" बोलू दे काय रे, किती त्रास होतो अश्या वागण्याच्या",....... निशा
"मग हे समजत ना? तू दुर्लक्ष करत का नाही, का तू सारखं सारखं काय तोंड फुगवून बसलेली असतेस निशा, म्हणजे आता तुला कोणीच काहीच बोलायचं नाही का?, सोडून द्यायला कधी शिकणार तू, का त्रास करून घेते, मी कधी पासून समजावतो आहे तुला ",....... सचिन खूप चिडला होता
"सचिन अरे तू गैरसमज करून घेतो आहेस, तुला माहिती नाही त्या माझ्याशी कसं बोलतात ",........ निशा
" अग तिला भूक लागली असेल म्हणून ती पोहे करत असेल",........ सचिन
" हो त्यावर माझ ऑब्जेक्शन नाहिये, मी बोलली होती ना त्यांना की मी करून देऊ का पोहे",........ निशा
" हे बघ निशा मला या विषयावर काहीही बोलायचं नाही पण आता हल्ली तुला सारखाच राग येतो, त्रास करून घ्यायची काही गरजच नाही ना, सकाळी सकाळी कटकट नकोय ",......... रागारागाने सचिन बाहेर जाऊन बसला
निशाला तर विश्वासच बसत नव्हता, एवढा चांगला सचिन आज माझ्यावर चक्क रागवला, हेच हवं होतं सासूबाईंना, मुद्दाम सचिन ऑफिसला जाण्याच्या आधी पोहे करायची घाई केली त्यांनी, म्हणजे त्यांना बाईच्या हातच खायचं नाही आणि परत मला बोलत राहतात
हेच सचिन बघतो, घरचे बघतात, मी काही करत नाही हा शिक्का माझ्या वर मारून मोकळ्या होतात सासुबाई, नुसता सकाळी मूड जातो सगळा, काय करावा? पण जाऊदे, आपण शांत राहू, आपल आवरुन ऑफिसला जाऊ, नंतर सचिन शांत झाला की समजून सांगू त्याला
सासुबाईंनी ऐकलं सचिन चिडला आहे निशा वर, त्या एकदम आनंदात होत्या, त्यालाही नसेल आवडलं, माझी धावपळ होते आता हल्ली, ते बरं झालं पण निशाला ओरडला, असच पाहिजे फारच जास्त झाल होत तिला, मी नाही बोलली तरी बाई लावते का स्वयंपाकाला, मी आता त्या बाईची कशी सुट्टी करते......
निशा ऑफिसला गेली तिचं कामात मन नव्हतं, काय करावं हा बाई प्रॉब्लेम फार मोठा झाला आहे, त्यापेक्षा कामाला बाई लावलेली काढूनच टाकते मी, होउदे माझं जे व्हायचं असेल ते, यातच समाधान आहे ना सगळ्यांना, कोणालाच बघवत नाही मी शांत आराम केलेला, अगदी वीट आला आहे सगळ्यांचा........ निशा उठून कॅन्टीन मध्ये येवून बसली
निशा ने आई ला फोन केला, तिला एकदम रडायला यायला लागल
"काय झाल ग निशा",...... आई
"काही नाही ग आई , कंटाळली आहे मी",........ निशा
"काही झाल का? कोणी काही बोलल का तुला ?, नीट सांग बर",........ आई
"ते तर नेहमीच आहे ग, मला सुचत नाही काही काय करू मी",....... निशा
"काय झाल नक्की नीट सांग",...... आई
निशाने आईला सगळ सांगितल......
" हा प्रॉब्लेम काही मोठा नाही निशा हा इगो चा प्रॉब्लेम आहे, तुझ्या सासूबाईंना नको होत मीनाच्या हातच जेवण म्हणून त्या अशा करत आहेत, त्यांनी पूर्वी खूप काम केली असतील त्यामुळे त्यांना असे वाटते की तू पण तसंच करायला पाहिजे, तुला कशाला एवढ्या सुख सुविधा मिळत आहेत अस वाटत असेल त्यांना ",..... आई
"पण मग आता मी काय करू काढून टाकू का बाईला",...... निशा
" नसेल आवडत घरात कोणाला तर काढून टाक आणि सकाळी जास्तीचा स्वयंपाक करून ठेव काहीतरी ऍडजेस्ट कराव लागेल घरच्यांना आणि तू प्रत्येकाशी तुझं नातं वेगळं ठेव, तू एकच गोष्ट सगळ्यांशी बोलायला जाशील तर मग भांडण होतील, आता तुझे आणि सासूबाईंचे वाद होतात ते तू प्रत्येक वेळी सचिन ला सांगू नको, सचिन शी तू नीटच वाग, तुमच्या दोघांच्या नात्यात सासूबाईंना मध्ये आणू नकोस आणि सचिन बरोबरच बोलतो आहे तू एवढं सगळं तब्येतीला लावून घेऊ नकोस, सासूबाईंचा विचार करू नको, मनाला लावून घेऊ नको जास्त",......... आई
" अस काय ग पण आई त्या नीट नाही का वागू शकत माझ्याशी",...... निशा
"घरातले सगळे सांगत असतिल ना त्यांना त्या ऐकता का? नाही ना, त्यांना जेव्हा समजेल हे अस बर नाही तेव्हाच त्या नीट वागतील इतरांनी सांगून उपयोग नाही ",...... आई
" ठीक आहे आई मी ठेवते फोन" ,.... निशा जागेवर येवून बसली
" काय झाल ग निशा तू रडलीस का तू",...... सारिका
" हो ग अग परत माझा आणि सासुबाईंचे भांडण झालं",......निशा
" कशावरून ",..... सारिका
"आता एक कारण पुरतं का आम्हाला सदोदित काही ना काही सुरूच असतात आमच्या घरी, रहाण्या बोलण्यावरून सुशिक्षित वाटतो आम्ही जेव्हा सुनेशी नीट वागण्याची वेळ येते तेव्हा कोणी नीट वागतच नाहीत आणि आज तर त्यांच्यामुळे सचिनही माझ्यावर नाराज झाला ",..... निशा
"काय ग काय बोलतेस तू हे",.... सारिका
" हो ग खर आहे, खर तर सचिन वैतागला आहे ग घरच्या वातावरणामुळे",...... निशा
"मग आता काय",..... सारिका
" काही नाही ग स्वयंपाक वाली बाई काढून टाकणार आहे मी, तेच हवा आहे सासुबाईंना, त्यावरूनच भांडण झाल आज",...... निशा
"आणि सचिन का चिडला",..... सारिका
" त्याचं म्हणणं आहे की मी भांडण झाले की खूप सगळ्या गोष्टी मनाला लावून घेते, दुर्लक्ष करायचं असं म्हणत होता तो, अगं पण कसं दुर्लक्ष करणार खुप त्रास होतो मला ",..... निशा
"मग आता पुढे तू काय ठरवलं आहेस",..... सारिका
" आताच आईशी बोलले मी, आई बोलते सगळ घरातल सचिनला सांगायचं नाही, तो टेंशन मध्ये असतो ग, खूप काम आहे त्याला ऑफिस मध्ये, एकतर सासूबाईंनी कडे लक्ष देणार नाही मी आणि या पुढे कोणालाही तिथल्या तिथे बोलून मोकळं व्हायचं, पुढे न्यायच नाही हा प्रॉब्लेम",...... निशा
" हो ग, चांगला विचार केला आहेस तू, हा प्रॉब्लेम असा आहे ना कोणाला सांगता येत नाही सहनही होत नाही, हे सगळ ऐकुन मला लग्न करावंस वाटत नाही ",..... सारिका
.......
बघु पुढे काय होतय ते......
ही कथा फ्री मध्ये आहे.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा