Login

हे घर माझ ही आहे..... भाग 5

"शु....... सौरभ समोर नको, तो अभ्यास करतो आहे, आणि माहीत नाही मला , काय झाल पुढे? आणी आपल काय ठरलंय जास्त मनाला लावून घ्यायच नाही, तु शांत रहा सचिन, कारण काय रडायच सांगायच असेल तर सांगितल त्या, तू टेंशन घेवू नको, आपण नको बोलायला या विषयावर वर, जा आवरुन घे, मस्त जेवायला बसू ",....... निशा

हे घर माझ ही आहे..... तुमच्या घरात..... मला ही थोड्या प्रेमाची गरज आहे......थोडा विश्वास ठेवा...... मलाही आपलंसं करा

घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,

एका सुनेची व्यथा....

कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही

©️®️शिल्पा सुतार
........

दुपारी जेवणाच्या सुट्टीत सचिन चा मेसेज आला,...."जेवली का तू निशा",

सचिन शी सुद्धा बोलू वाटत नव्हतं निशा ला, उगीच त्याच्या फोन आला असता तर रडू आल असत तिला ,......." नाही झाल जेवण",..... तिने मेसेज पाठवून दिला

"थोड्यावेळाने परत मेसेज आला रागवली आहेस का तु",....... सचिन

निशाने फोन बघितला, रीप्लाय केला,....." महत्त्वाच्या मिटिंग मध्ये बिझी आहे, जेवण झालं",

" संध्याकाळी येतो मी तुला घ्यायला, मला थोडसं बोलायचं आहे ",..... सचिन

" ठीक आहे",..... निशा

सचिन ला आता खूप वाईट वाटत होत, मी थोडा कंट्रोल ठेवायला हवा होता, उगीच बोललो निशा ला, एक तर तिला आई बोलत असते नेहमी, त्यात मी ही नीट नाही वागलो, निशा चांगली रागावली आहे, एवढ छान ठरत होत आमच फिरायला जायच, छान मूड होता निशा चा, आता आज परत निशा नाराज आहे

"संध्याकाळी साडेपाचला सचिन निशाच्या ऑफिस जवळ आला,..... "चल आपण कॉफी घेऊया",

निशाचा मूडच नव्हता हे सचिनला समजत होत, काय करणार आपण, उगीच चिडलो तिच्यावर, आईचा त्रास द्यायचा स्वभावच आहे, पण निशा ही आता उगाच स्वतःला त्रास करुन घेते, दुर्लक्ष करायला पाहिजे थोडसं, तिचा लगेच मूड ऑफ होतो म्हणून मी बोललो की तू कशाला रुसून बसते कशाला एवढं मनाला लावून घेते, बहुतेक मी बोलण्याचा टोन सांभाळायला हवा होता, आणि सगळ्यात जास्त आमच नात सांभाळायला हव, निशा शी सगळे असे वागले तर ती कोलमडून जाईल, एकटी कुठे पर्यंत तग धरेल

दोघं कॉफी शॉप मध्ये पोहोचले सचिन ने निशाच आवडत सँडविच आणि कॉफीची ऑर्डर दिली निशा शांतच होती

"मला माहिती आहे निशा तुला राग आला आहे, आणि तुझ बरोबर ही आहे मी तुझ्यावर चिडायला नको होत, I am sorry",..... सचिन

"नाही रे सचिन मला राग आलेला नाही, मला समजत नाही मी कशी वागू आता, मी काहीही केल की आवडत नाही कोणाला, सवय झाली आता, मी एक विचार केलेला आहे, मी ती स्वयंपाक वाली मीना ला काढून टाकते उगाच गोंधळ होतो स्वयंपाकाचा, आपल वेगळ आईंचा वेगळा, करत जाईन मी सगळं जसं होईल तसं, उगीच कटकट नको आहे आणि त्यांच्यामुळे तर आपल्या दोघांमध्ये भांडण मुळीच नको, तू मला काही बोललेलं मला सहन होत नाही, त्यापेक्षा स्वयंपाक वाल्या बाईला काढून टाकू मी करत जाईन सगळं ",...... निशा

" एक काम कर ना निशा बाईला राहू दे, तू फक्त आई काही बोलली तर तिकडे लक्ष देत जाऊ नको, एवढच मला बोलायचं होतं, पण माझी पण चिडचिड झाली जरा, रोज सकाळी संध्याकाळी तीच कटकट त्यामुळे तुझ्यावर राग निघाला येवढच, आय एम सॉरी",...... सचिन

" नाही रे तुझ ही बरोबर आहे मी एवढ मनाला लावून घ्यायला नको होतं, आईंचा स्वभावच खराब आहे त्याकडे आता मी दुर्लक्ष करत जाईल, आपण ना काही झाल तरी त्रास करून घ्यायचा नाही आता ",....... निशा

" हो तेच बरं राहील कारण तुझी तब्येत या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे, बाई राहू दे कामाला आणि आई जेव्हा किचन मध्ये काम करत असली तर अजिबात फिरकु नको तिकडे, प्रॅक्टिकल रहावं ग, अजिबात इमोशनल होऊ नकोस, आई भांडेल ना त्या मिनाशी भांडू दे, काहीही करू दे, पुढे पुढे जाऊच नकोस तू, आणि राहू दे स्वयंपाकाची बाई, आणि आई शी जास्त बोलू नकोस ",...... सचिन

" अरे मी काही काम करत असली किचन मध्ये की त्या लगेच येतात आणि मला काहीतरी बोलतात त्यावरूनच सुरू होता आमचं भांडण",..... निशा

"आई आली तर तू सरळ उत्तर न देता आपल्या रूममध्ये निघून ये, असं केलं तरच तिची थोडी सवय जाईल, करून बघायला काय हरकत आहे, हो बरोबर बोलतो आहेस तू आपण आपल नात जपायला हव ",........ निशा

" आता मला किती बरं वाटत आहे",..... सचिन

"तुला माहिती आहे सचिन आज माझा दिवस खूप खराब गेला, अजिबात कामात लक्ष लागत नव्हतं, मला समजतच नव्हतं की तू का एवढा चिडला आहेस ",...... निशा

" मला वाटलंच होतं म्हणून मी तुला भेटायला तिकडे आलो, कारण आपल्याला घरात बोलायला काही चान्स नाही ",..... सचिन

" या संसाराच्या खटपटीत आपल्याला दोघांना एकमेकांसाठी वेळच नाही, आपण दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे, कुठलीच गोष्ट आपल्या मध्ये नाही आली पाहिजे, एवढ आपल नात घट्ट हव, घरात कोणी किती जरी भांडले तरी आपण दोघांनी गोडच राहायचं",......... निशा

बऱ्याच वेळी ते दोघं बोलत होते, आता निशा छान हसरी झाली होती, ते बघून सचिनला बरं वाटत होतं

"बर आपल्या पिकनिक च काय? तू बघितल का हॉटेल रूम रिसॉर्ट वगैरे ",....... सचिन

" नाही आज वेळ नव्हता रात्री जेवण झाल की बघु आपण",...... निशा

" Ok, मी ऑफिसला जातो आहे, मी येईन रात्री घरी, चल मी तुला घरी सोडून देतो",...... सचिन

" नाही मी जाईल सचिन आणि तू लवकर घरी ये",....... निशा

सचिन ऑफिसला निघून गेला, निशा घरी यायला निघाली, तिने विचार केला कि यापुढे कुठलीही कटकट सचिनला सांगायची नाही, आपण स्वता तोंड द्यायचं येईल त्या प्रसंगाला, आईंना काही बोलणं झालं तरी चालेल, आपणच आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे, कणखर व्हायला हवं, आपल्या स्वभावात बसत नाही ते पण थोडं तरी उत्तर द्यायला हवे, नाहीतर मला गृहीतच धरलं आहे त्यांनी एकदम, हे चुकीचा आहे त्यांची ही घाण सवय मोडायलाच पाहिजे, त्या कशा करतात सचिन समोर वेगळ वागतात माझ्याशी आणि प्रत्यक्षात वेगळ वागतात माझ्याशी तसेच मी करेन, आता म्हणजे त्यांना समजेल असं केलं की कसं वाटतं,

आणि आज सकाळी त्यांनी मुद्दाम मीना ला त्रास दिला, म्हणजे मी ही चिडेल, आणि झाल तस काल नाश्ता रेडी असून खाल्ला नाही, सकाळी फक्त घाई केली पोहे करायची, मीना घाबरली असेल, येते की नाही काय माहिती कामाला , तिला ही जरा दोन शब्द सांगावे लागतील

निशाने मीना ला फोन केला

"बोला मॅडम येवू का आता, काय बोलल्या सकाळी आजी? आहो त्या उगीच माझ नाव घेतात ",...... मीना

" हो मला माहिती आहे मीना, मी त्या साठी फोन केला की तू सासुबाईन कडे लक्ष देवू नकोस, त्यांनी किती लुडबुड केली, काही बोलल्या तरी लक्ष देवू नको, त्या मुद्दाम करता आहेत",...... निशा

" हो मॅडम, तुम्ही कश्या राहतात तिथे, पण मी तुम्ही घरी असल्या तर मी येत जाईल, उगीच त्यांनी काही वाढवून सांगितल माझ्या बद्दल तर, मला भिती वाटते ",..... मीना

" हो चालेल ",..... निशा

आता जरा निशाला हुशारी वाटत होती कुठल्याही गोष्टीला तोंड देण्याची ताकद तिच्यात आली होती,

भाजी घेवून निशा घरी आली, ती तिच्या रुममध्ये चालली होती, सासुबाई सासरे फिरायला निघणार होते

" निशा एक मिनिट, आज मावशी चा फोन आला होता, उद्या सुट्टी आहे ना निशा? मावशी ला बोलावते मी, तू आहेस ना घरी ",....... मालती ताई

" नाही मी नाहिये घरी, उद्या आम्ही तिघे आई कडे चाललो आहोत",...... निशा

"पुढच्या आठवड्यात जा की तू आई कडे",...... मालती ताई

"नाही तेव्हा आम्हाला फिरायला जायच आहे ",..... निशा

" म्हणजे आमच्या साठी वेळ नाही तर ",...... मालती ताई

" तस समजा तुम्ही आणि तुम्हाला वेळ देवून करणार काय नुसत भांडण ना, नीट बोलतात का माझ्याशी, प्लीज मी आता ऑफिस हून आली आहे लगेच कटकट नकोय ",...... निशा

"मी कटकट करते का? काय असत ग सारख तुझ आई कडे"?,....... मालती ताई

" हे बघा आई मला हे अस तुमच्याशी बोलायला आवडत नाही, माझा मूड ठीक नाही तुम्ही प्लीज जा इथून ",....... निशा

" जा म्हणजे काय हे घर माझ आहे ",...... मालती ताई

" हो मला माहिती आहे, मी उगीच बोलेल तुम्हाला काही आई प्लीज ",...... निशा

" बोल ना मग आज होवुन जाउ दे ",...... मालती ताई

" तुमच्या बहिणीच सारख काय काम असत मग आपल्या कडे? नेहमी येतात त्या इकडे, आम्ही तरुण आहोत तरी तुम्ही आम्हाला म्हणतात माहेरी नको जाऊ आणि तुम्ही म्हातारे झाले तरी तुम्हाला अजून माहेरचे माणस लागतात, मला ही मन आहे मला ही माझे आई वडिल हवेत, मी उद्या जाणार आहे आई कडे, आणि तुम्ही हो नाही बोलायचा प्रश्न नाही",....... निशा

" हो का, बरच बोलतेस ग तू, सकाळी सचिन कडून मिळालेला ओरडा कमी झाला वाटत, येवू दे सचिन ला बघते मी आज ",..... मालती ताई

" अच्छा म्हणजे मला त्रास व्हावा म्हणून तुम्ही हे अस करताय का ",.......निशा

सुरेश राव आले खाली

निशा रूम मध्ये निघून गेली

दोघ फिरायला बाहेर आले

" काय सूरु असत ग मालती तुझ निशा सोबत नेहमी, कश्याला बोलते तू एवढ",........ सुरेश राव

"अहो बघा ना आता उद्या माझी बहिण येईल ही निशा जाते आहे तिच्या आई कडे ",...... मालती ताई

"तुझी बहीण तुला भेटायला येते ना, मग निशा घरी असली काय नसली काय त्याचा काय संबंध, तुला अजूनही लक्ष्यात येत नाही मालती घरात कस वागायच ते, कमी बोलत जा, मोकळ सोड मुलांना, तुझ आयुष्य तुझे नातेवाईक यांच मुल करतील अस नाही, अपेक्षा ठेवू नको, काळासोबत चाल, जुने विचार बदल ",....... सुरेश राव

" हो मी करेन प्रयत्न ",...... मालती ताई

" तू दर वेळी असच बोलतेस आणि घरी गेली की सुरू तुझ भांडण, असा स्वभाव काय कामाचा, काही त्रास होतो का तुला, डॉक्टर कडे जाऊ या का",...... सुरेश राव

" तुम्हाला अस म्हणायचा आहे का की मी वेडी वगैरे आहे का",..... मालती ताई

" नाही ग, सहज बोललो मी",..... सुरेश राव

" मी ठीक आहे",..... मालती ताई

" नाही तू ठीक नाहीस तू अजिबात शांत रहात नाहीस आणि घरातल्यांना ही शांतीत राहू देत नाहीस, तूच विचार कर यावर",...... सुरेश राव

कसल काय पण, मालती ताई कुठे ऐकतात......

सासुबाई हॉल मध्ये बसुन होत्या सचिनची वाट बघत

सचिन आला तश्या त्या रडायला लागल्या, त्यांना वाटलं आज सकाळी सचिन रागवला आहे निशाला आता आपण थोडा रडून गोंधळ घातला म्हणजे अजून बोलणे बसतील निशाला, मला तोंड वर करून बोलली का बघतेच आता.....

"काय झाल आई? का रडतेस? काय झाल अग सांग",....... सचिन

बाबा बाहेर आले

"काय झालं आहे बाबा आईला",..... सचिन

" मला माहित नाही व बुवा, आता तर ठीक होती",...... सुरेश राव

"का रडते आहे आई, बाबा काही झाल का भांडण? कोणाचा फोन वगैरे", ?...... सचिन

"मी सांगितलं ना मला माहिती नाही",....... सुरेश राव

"ठीक आहे बाबा, काय झाल आई नीट सांग आणि काय ग तुझ मी ऑफिस हून आलो कि एक एक सुरू असत? मला शांती हवी आहे घरी, बाबा तुम्ही समजवा ना आई ला रोज काही ना काही होत घरी ",....... सचिन

" मी सांगून सांगून दमलो, काय करायचं ते करा, मालती मला जेवायला वाढ",....... सुरेश राव बर्‍या पैकी चिडले होते

रागाने सचिन आवरायला निघून गेला, निशा रूम मध्ये सौरभ चा अभ्यास घेत होती

" काय झालं आहे आईला तुला काही माहिती आहे का निशा ",...... सचिन

"शु....... सौरभ समोर नको, तो अभ्यास करतो आहे, आणि माहीत नाही मला , काय झाल पुढे? आणी आपल काय ठरलंय जास्त मनाला लावून घ्यायच नाही, तु शांत रहा सचिन, कारण काय रडायच सांगायच असेल तर सांगितल त्या, तू टेंशन घेवू नको, आपण नको बोलायला या विषयावर वर, जा आवरुन घे, मस्त जेवायला बसू ",....... निशा

हो.....

" काही समजल का कधी आहे इंटरव्ह्यू वगैरे ",..... निशा

" हो जेवल्यावर बघु नवीन कंपनी ची माहिती, छान आहे पोस्ट वगैरे",........ सचिन

" हो का आता तू तुझ लक्ष अभ्यासावर ठेव, बाकी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही ",..... निशा

" हो तेच कराव लागेल आता, हे घरा पासून जरा लक्ष् काढाव लागेल, आपल काम महत्त्वाच आहे जर हे काम झाल ना तर खूप छान होईल ",...... सचिन

सगळे जेवायला बसले.....

"सचिन उद्या मावशी येते आहे तू आहेस ना घरी",...... मालती ताई

"हो, आहे मी, मी सकाळी निशा सौरभला सोडून येईल तिच्या आई कडे नंतर आहे मी घरी",...... सचिन

"निशा चालली आहे का माहेरी",..... मालती ताईंना या विषयावर बोलतच होत खर

"आई मला या विषयावर काही बोलायच नाही ",...... सचिन

" निशा मी तुला सौरभला सोडून घरी येईन, रविवारी येईन घ्यायला, म्हणजे मावशी बरोबर मला राहता येईल ",......सचिन

" हो चालेल मी आवरते",....... निशा

आज सासुबाईंनी वेगळा स्वैपाक केला नव्हता, खाल्ल त्यांनी ही जे केल ते

जेवण झाल काहीही न बोलता निशाने पटापट आवरल ती रूम मध्ये येवून बसली, सचिन रूम मध्ये निघून गेला, सुरेश राव टीव्ही बघत होते सौरभ सोबत, मालती ताई उठून बाहेर चक्कर मारत होत्या

सचिन ही आला लॅपटॉप वर तो आणि निशा नवीन कंपनी ची माहिती बघत होते

"हॉटेल बघू या का आता" ,....... एक छान home stay सारखं हॉटेल आवडला त्यांना ते बूक केल पुढच्या वीकेंड साठी

"मी उद्याची बॅग भरते",...... निशा

पुढचे दोन दिवस निशाने स्वैपाक वाली बाई ला नाही सांगितल, म्हणजे मीना च नाही बोलली यायला, हे सासुबाईंना माहिती नव्हत...

.....
पुढे बघू काय होत ते.....

कथा लिहिण्याचा उद्देश हाच आहे की आपण कोणालाही एवढा त्रास देवू नये की त्याच जिणं मुश्किल होईल, नेहमी हसत प्रेमाने रहाव.....

ही कथा फ्री मध्ये आहे याला subscription chi गरज नाही
0

🎭 Series Post

View all