घरातल्या सुनेला अजूनही सासरचे लोक स्विकारत नाहीत, तिला प्रेम सम्मान मिळत नाही, छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, समजून घ्या तिला,
एका सुनेची व्यथा....
कथा पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही कोणाचेही मन दुखवण्याचा प्रश्नच नाही
©️®️शिल्पा सुतार
........
........
सचिन निशा दोघ फिरून निशा च्या आईकडे आले, जातांना आईस्क्रीम घेवून गेले, सौरभच जेवण झाल होत, निशा ने सगळ्यांना आईस्क्रीम दिलं
"चला आम्हाला निघावं लागेल उद्या ऑफिस आहे",..... निशा
"ठीक आहे काळजी घे निशा आणि घरी पोहोचले की फोन कर",.... आई
"हो आई",... निशा
आईने बरच खायच सामान दिल, तिघे घरी आले, दोन तीनदा बेल वाजवली , आत फोन केला तेव्हा बाबांनी येवून दार उघडले
"आई कुठे आहे बाबा ",..... सचिन
" आहे रूम मध्ये ",..... सुरेश राव
"खूप उशीर झाला का आम्हाला? , झोपले होते का तुम्ही? , मावशी गेली का? , जेवण झाल का", ?...... सचिन
"आजोबा खूप मजा केली मी, हे बघा आपली नवीन बॅट बॉल",....... सौरभ
"वा मग उद्या मॅच होवुन जाऊ दे ",....... सुरेश राव
"Yes आजोबा, तुम्ही का नाही आले त्या आजोबांकडे, आम्ही खूप खेळलो तिकडे ", ........ सौरभ
आजोबा नातू यांची छान मैत्री होती, दोघ रमले प्लॅनिंग मध्ये
सचिन निशा रूम मध्ये आले.....
सुरेश राव त्यांच्या रूम मध्ये गेले
"आली का जोडी फिरून? विचारल का आपल्याला की तुम्ही जेवले की नाही ते",...... मालती ताई
"हो मला विचारल, तूच पुढे आली नाहीस आणि आता ते आले तर हे बघ मालती तू पुन्हा तेच सुरू करू नकोस, जरा समजुतीने घे ग घरात ",...... सुरेख राव
" तुम्ही सगळे सध्या एका ग्रुप मध्ये झाले आहेत आणि मी विलन का ",...... मालती ताई
" तू ही ये की मग आमच्या ग्रुप मध्ये आणि उगीच उद्या निशा च्या घरच्या सामानाला... फराळाच्या पदार्थांना नाव ठेवू नकोस, नाही खायच ऑप्शन तू निवडू शकते",...... सुरेश राव
"ते लोक आले तर तुमच ही वागण लगेच बदलत माझ्या सोबत, अजिबात नीट वागत नाही तुम्ही",...... मालती ताई
सकाळी मीना आली कामाला लागली
मालती ताई किचन मधे आल्या
" दोन दिवस का नाही आलीस ग कामाला? किती धावपळ झाली माझी, बर सांगून ही गेली नाहीस तू, मी आपली वाट बघते तुझी ",...... मालती ताई
मीना काही बोलली नाही....
" मी तुला विचारते आहे मीना",...... मालती ताई
"आजी तुम्हाला जे विचारायच ते निशा मॅडम ला विचारा, मला काम करू द्या ",....... मीना
निशा सचिन बाहेर आले, निशा ने सगळ्यांना चहा दिला, मालती ताई गप्प होत्या
सचिन मेल चेक करत होता
"निशा दोन दिवसानी माझा interview आहे ",...... सचिन
निशा सचिन जवळ बसली दोघ मेल वाचनात होते
" तुला तयारी करावी लागेल सचिन, आता लक्ष फक्त अभ्यासावर ठेव ",...... निशा
"हो हे काही पॉईंट्स आहेत बघ इन्फॉर्मेशन मिळते का" ,....... सचिन
Ok....... निशा ने नोट्स घेतले......" सापडला तर मेल करते मी तुला लगेच",......
मालती ताई सगळ ऐकत होत्या, काय ते कौतुक सुरू आहे हुशार असल्या सारख,सगळ यांनाच समजत, माझ्याशी कोणी बोलत नाही, सगळ्यांना त्यांच्या बाजूने करून घेतल आहे त्यांनी
सौरभ च आवरला होत
"मजा आली का आजीकडे सौरभ ",..... मालती ताई
"आजी मी खूप खेळलो तिकडे, मला इकडे यायच नव्हत पण शाळेमुळे आलो आम्ही, परत जाणार आहोत आजी कडे" ,...... सौरभ
"तिकडे थांबायच ना मग तू सौरभ",...... मालती ताई
"हो पप्पा बोलले होते मम्मी ला इकडे रहा, मम्मी नाही बोलली ",...... सौरभ
सौरभ ची रिक्षा आली तो शाळेत गेला...., तयारी करून निशा सचिन ऑफिस ला निघून गेले
" अहो बघितल का सौरभ काय सांगत होता म्हणे त्याला तिकडे आवडत ",..... मालती ताई
" अग लहान आहे तो, आवडत त्याला तिकडे, मग काय झाल? ते ही आजी आजोबा छान आहेत, लाड होतात त्याचे तिथे" ,........ सुरेश राव
"सौरभ ला अस म्हणायच होत की ते आजी आजोबा आपल्यापेक्षा छान आहेत" ,........ मालती ताईंनी अजून तोच विषय सुरू ठेवला
" असू दे छान तर छान, तू आता तेच तेच बोलू नकोस",...... सुरेश राव
मीना गेली..... मालती ताई सुरेश राव यांचा नाश्ता झाला, सुरेश राव बाहेर पेपर वाचत बसले
मालती ताई निशा सचिन च्या रूम मध्ये गेल्या, एक बॅगेत खाऊ रूम मध्ये ठेवला होता, त्यांनी बघितल बरेच पदार्थ होते चिवडा लाडू
" अहो या वेळी किचन मधे नाही ठेवल निशाने आणलेल्या वस्तू",...... मालती ताई
"तुला नसेल द्यायच काही, तू नाव ठेवते ना म्हणुन त्यांच्या रूम मध्ये ठेवला असेल फराळ, तू नको हात लावू त्यांच्या सामनाला, कशाला गेली होती त्यांच्या रूम मध्ये ",....... सुरेश राव
आता मालती ताई चिडल्या होत्या,...." आता खूपच अति होत आहे हो सचिन आणि निशा च" , .....
" अगं पण तूच आधी त्यांना बोललीस ना म्हणून ते आता अस करतात आता",.... सुरेश राव
" नका देवू मला पण अस त्यांच्या रूम मध्ये सामान, तुम्हाला तरी द्यायला बाहेर ठेवायचा ना",....... मालती ताई
" देतील मला, तू काळजी करू नकोस, सुरुवात तूच केली ना पदार्थांना नाव ठेवून, मग आता तुला त्यांना काही बोलायचं हक्क नाही",...... सुरेश राव
निशाला सचिनच्या इंटरव्यू साठी बरच काही इन्फॉर्मेशन सापडली होती त्याने तिने सचिन ला पाठवून दिली
" परवा सुट्टी घेऊ का मी ऑफिसला म्हणजे नीट इंटरव्यू ला जाता येईल ",..... सचिन
" हो चालेल ऑफिस होऊन मध्येच निघायला अडचण येईल ",..... निशा
निशा संध्याकाळी घरी आली, तिला माहिती होतं सासूबाईंच्या दौरा आपल्या रूम मध्ये झालाच असेल आणि खाण्याचे पदार्थ त्यांनी बघितले असतील पण यावेळी मी त्यांना एकही खाण्याचा पदार्थ देणार नाही त्यातले काही पदार्थ आईने केलेले असतात काही विकतचे असतात, तरी त्या मुद्दाम आईला चान्स काढून बोलतात, आता मला कुठलेच कॉम्प्लिकेशन नको आहे, त्या माझ्यासाठी या घरात अस्तित्वात आहे की नाही अशाच आहेत, तो सगळा खाऊ मी एकटी आरामशीर खाणार आहे, निशाने खाऊ ची पिशवी लाकडाच्या कपाटात ठेवून दिली, तिने चहा केला आईने दिलेला चिवडा प्लेट मध्ये घेऊन मस्त चहा घेत बसली
सासूबाई सासरे खाली आले
"अरे वा चिवडा दिसतो आहे निशा",..... सुरेश राव
" तुम्हाला हवा का बाबा",..... निशा
" हो दे चालेल",..... सुरेश राव
निशाने त्यांच्या रूम मध्ये एक वाटीभर चिवडा आणून सुरेश रावांना दिला
" आहाहा काय छान झाला आहे चिवडा, थोडा चहा पण मिळेल तर बरं होईल",..... सुरेश राव
"केला आहे बाबा तुमचा चहा मी",..... निशा
निशाने बाबांना चहा दिला
"तू घेते का ग मालती थोडा चिवडा ",..... सुरेश राव
" नको तो तिखट असतो तुम्ही खा",.... मालती ताई
खरंतर मालती ताईंना हवा होता थोडा चिवडा, छान असतो निशाच्या कडचा, पण इगो आड आला होता, नाव ठेवतो दरवेळी आपण आता कसा खाणार..
जरा वेळाने मीना आली कामाला स्वयंपाक करून गेली, निशा सचिन साठी नोट्स काढत होती, दोन-तीन दिवसापासून मिनाने केलेला स्वैपाक सासुबाई खात होत्या त्यामुळे आज मीनाने सगळ्यांचा स्वयंपाक केला
मालती ताई बाहेरून फिरून आल्या, त्यांनी परत त्यांचा वेगळा स्वयंपाक करायला घेतला, सचिन घरी आला त्याने बघितल आई किचनमध्ये स्वयंपाक करते आहे तो रूम मध्ये आवरायला निघून गेला
" झाल्या का निशा नोट्स काढून",...... सचिन
"हो झाल्या आहे, हे बघ",..... निशा
सचिन ने नोट्स बघितल्या,...... "खूप छान मला हेच पॉईंट हवे होते, आता जेवण झालं की बसतोस मी अभ्यासाला",....
रात्री जेवायला खूप मोठा स्वयंपाक होता, मीनाने केलेल्या दोन भाज्या, सासूबाईंनी केलेली एक भाजी, वरण-भात दोन्ही बाजूच्या पोळ्या वेगळ्या सगळे जेवायला बसले
" बापरे आज खूपच पदार्थ आहेत जेवायला",..... सुरेश राव
" तुम्हाला काय वाढु बाबा ",..... निशा
" सगळं दे थोडं थोडं",..... सुरेश राव
निशा सचिन सौरभ बाबांनी सगळं खाल्लं, मालती ताईंनी त्यांनी केलेले भाजी पोळी खाल्ली, खूप जेवण झालं उरलं, दोन-तीन माणसांचं जेवण उरलं होतं
" निशा हे जेवण मला पॅक करून दे समोर कंस्ट्रक्शन साइट आहे तिथे बघतो मी विचारून ते घेत आहेत का",...... सचिन
तशा सासुबाई खूप चिडल्या,..... "मला जेवण वाया गेलेल्या आवडत नाही फ्रीजमध्ये ठेवून द्या ते आणि उद्या तेच खा आणि मीनाला नाही सांगा",..
"अगं आई पण ते जेवण वाया जात नाहिये, आम्ही गरजू लोकांना देत आहोत ना ते, आपण पण एवढा स्वयंपाक करायचा कशाला ? काय झाल आहे निशा? स्वयंपाकाचा अंदाज चुकला का" ?,...... सचिन
"आई आता चार पाच दिवसापासून मीना ने केलेला स्वयंपाक खात होत्या, त्यामुळे आज त्यांचा पण स्वयंपाक मीनाने केला, पण नेमका आज त्यांनी स्वतःचा स्वयंपाक स्वतःच्या हातून करून घेतला, त्यामुळे त्यांचा स्वयंपाक उरला, त्यात आईंनी बाबांचा स्वयंपाक त्यांच्यात पकडला त्यामुळे दोन माणसांच जेवण उरल आहे ",....... निशा
" त्या मीना ने मला विचारायला हवं होतं ना? मी काय खाणार आहे की नाही",...... मालती ताई
" तुम्ही बाहेर फिरायला गेल्या होत्या तर ती कशी विचारणार? तुम्हाला परवा काही केलं नव्हतं तर तुम्ही आमच्यात जेवल्या, मग जेवण पुरलं नाही, नंतर उठून खिचडी लावावी लागली, म्हणून आज तुमचाही स्वयंपाक केला होता, आई पुरे झाल ना आता हे वेगळा स्वैपाक वगैरे, उद्या पासून नका करू तुम्ही, छान करते मीना तिच्या हातचा खात जा ",...... निशा
" मी ठरवेन माझ, तू नको सांगू काही मला, एक तर खरं तू करायला हव हे काम तू काही करत नाही परत एवढ बोलतेस, आणि काही चव नसते मीना च्या जेवणाला काहीच्या काही स्वैपाक करते ती",...... मालती ताई
" म्हणजे काय आई? तू अशी का करतेस? किती टाइम जातोय माझा, काय करायचं ते कर आई तू, आणि कधी कोणी संगत तर ऐकत का नाही तू, आरामात रहात जा ग, खरच पुरे आता हे हाताने करण",....... सचिन
" मी ठरवेन माझ, तुम्ही दोघ असे मला बोलू नका सारख, ते काही नाही आता हे जेवण द्यायचं नाही कोणाला, उद्या तेच खा ",...... मालती ताई
" असं कसं तेच खा काय? , आम्ही ही नाही ऐकणार तुझ, माझा एक दोन दिवसात महत्त्वाचा इंटरव्यू आहे मला अभ्यास आहे निशा झालं का जेवण पॅक ",...... सचिन
निशाने जेवण पॅक केलं, सचिन जाऊन ते समोर देऊन आला, निशा तिच्या रूम मध्ये चालली गेली, तिने आतून दार लावून घेतलं, बाहेर सासूबाई प्रचंड बडबड करत होत्या, सगळ्या गोष्टी फुकटात मिळतात का? केवढं वाया चालला आहे, घरात मी बरोबरच करते आहे, ह्या लोकांबरोबर, यांच्याशी नीट वागून उपयोगच नाही,
सचिन आलास तेवढ्यात जेवण देऊन,..... "आई तू जरा शांत राहणार का? एवढंस जेवण दुसऱ्याला दिल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही, उलट ते लोक खुश झाले, जरा मोठं मन ठेव आणि तू कशाला स्वयंपाक रेडी असताना डबल स्वयंपाक केला मुद्दामच करते आहेस तू",
निशा बाहेर ये.........
निशा बाहेर आली
"उद्यापासून मीना ला सांग की आईचा स्वयंपाक करायचा नाही, आई तू पण अजिबात मीनाच्या हातच काही खायचं नाही, आई आणि आता पुरे झालं, मला अभ्यास आहे, मी आत जात आहे, तू झोपायला जा आणि आता जरा किचनमधले लक्ष कमी कर, निशा करते आहे हॅण्डल, तिला करू दे, तुला नाही खायचं मीनाच्या हातचं तुझं तुझं करून घेत जा आणि आता हे फिक्स आहे उगीच भांडणाचे कारण शोधत बसू नको रोज ",....... सचिन
निशा आणि सचिन रूम मध्ये निघून गेले मालती ताई रूम मध्ये आल्या
" काय मग? बरं वाटत आहे का तुला? दोन दिवस झाले तुझी सून नव्हती घरी, आज सुन आली जरा छान तोंडाचा व्यायाम झाला तुझा मालती, काय चाललय तुझ ",...... सुरेश राव
" तुम्ही पण मलाच बोला",......... म्हणून मालती ताई तोंड फुगवून बसल्या
" बरोबर आहे का तुला नक्की मीनाच्या हातचं खायचं आहे आहे की तुझं तुला करायचा आहे तू नक्की ठरव आणि त्या सचिन चा इंटरव्यू आहे जरा घरात शांतता ठेव",....... सुरेश राव
"मी या पुढे काही बोलणार नाही, काहीही करा",....... मालती ताई
"तेच योग्य राहील, तेच म्हटलं मी आजचा दिवस कसा सुना गेला ",...... सुरेश राव
सचिन रूम मध्ये आला, बुक्स घेवून बसला, त्याच मन लागत नव्हत,....." निशा मला अस वाटतय माझा इथे अभ्यास होणार नाही, परवा इंटरव्यू आहे, मी उद्या एखाद्या हॉटेल मध्ये रूम घेवून राहतो तिथे वाचेन मी सगळ",
" त्या पेक्षा तू माझ्या आई कडे का राहात नाही उद्या",...... निशा
"छान आहे आयडिया तू येशील का",...... सचिन
"मी आली असती पण सौरभ खूप गोंधळ घालतो तिकडे, त्या पेक्षा मी आणि सौरभ इथे राहतो तू उद्या ऑफिस हून तिकडे जा डायरेक्ट परवा इंटरव्यू ला जा मग घरी ये",...... निशा
" चालेल तस, माझा 5-6 तास अभ्यास होईल तिकडे संध्याकाळी ",....... सचिन
" मी सकाळी तुझी बॅग भरते आई ला ही सांगते सगळ, आता सगळे विचार डोक्यातून काढून टाक बर आणि अभ्यास कर ",...... निशा
सचिन ला आता जरा बर वाटत होत.....
.........
बघू पुढच्या भागात काय होतय ते.......
कधीकधी काय होतं ना घरात आपल्याला पटत नाही त्या गोष्टी सुद्धा होतात, पण आपण त्या विरुद्ध काहीही बोलत नाही, तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो कितपत सहन करायला पाहिजे सगळं, विचार करा....
ही कथा free मध्ये आहे, subscription ची गरज नाही
