Login

हे प्रेम आहे की काय?... भाग 13

माहिती नाही, आता मेहंदी काढत होती इथे, बाथरूम मधे जाते सांगितल, मागच्या दाराने गेली बहुतेक निघून",.. सुरेखा ताई रडत होत्या


हे प्रेम आहे की काय?... भाग 13

©️®️शिल्पा सुतार
........

पाहुणे गेले, सगळे आत आले, खूप खुश होते सगळे, मामा येवून रियाला भेटले,.." रिया मला माहिती आहे तुला राग आला असेल माझा, खूप सक्ती केली मी तुझ्यावर, पण तू चांगल वागलीस, खूप खुश आहे मी, मला माफ कर बेटा",.

"मामा नको अस बोलू",.. रिया त्याला भेटली

शरद राव खुश होते, ते सुरेखा ताई कडे बघत होते,.. "रिया वर लक्ष ठेव, एक मिनिट ही तिला एकट सोडू नको ",

हो....

रोहित गाडीत त्याच्या विचारता होता, हो तर बोललो मी लग्नाला पण वाटत नाही रियु तयार होईल एवढ्या लवकर, पण तिचे वडील खूप त्रासात होते, कोण गुंड आहे तो त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका होण्यासाठी ते मला रिक्वेस्ट करत होते, मला नाही बोलता आल नाही, मी रियुच मन वळवेन, तसही मला रिया हवी होती, मी माझाही स्वार्थ साधला आहे, मला तिच्याशी लग्न करायच आहे, काहीही झाल तरी मी ऐकणार नाही

"दादा काय विचार करतो आहेस वहिनी चा का? ",.. पिंकी

"तू गप्प बस पिंकी",.. रोहित

"अरे आता हे काय? इतक्या वेळ माझी गरज होती ना, आता मला काही महत्व नाही का दादा, मीच कामात येणार आहे तुझ्या, जायच ना घरी दादा की गाडी वळवायची तिकडे वहिनीच्या घरी, तिला ला घेवून जावू सोबत ",...पिंकी

रोहित मागे हात करून पिंकीला मारण्याचा प्रयत्न करत होता, गाडीत गोंधळ झाला, आई आजी हसत होत्या

" सारख नका भांडू तुम्ही दोघं, शांततेत घेत जा जरा ",.. आजी रागवली

ते घरी आले, रोहित रूम मध्ये निघून गेला

रिया तिच्या रूम मध्ये बसलेली होती, तिने कपडे बदलले, सगळे खूप खुशीत होते ,सुरेखा ताई टिना आजुबाजूला होत्या

काय करू मी समजत नाही, पण त्या रोहित सोबत राहायच माझ्या अंगावर काटा येतो आहे, का मागे लागला तो माझ्या? , तो मला सोडणार नाही, सारख मागे मागे करतो तो, कसा बघतो तो माझ्याकडे,

एवढ विशालच सांगितल मी त्याला तरी त्याने होकार दिला लग्नाला ,काय कारण असेल? , खर प्रेम आहे की का त्याच माझ्यावर, आम्ही तर आज भेटलो, मग कस काय अस होईल?, काय होईल जर आमच लग्न झालं तर? , हा त्रास देईल का मला लग्ना नंतर की प्रेमाने राहील, याच्याशी लग्न झालं तरी याला सगळ माहिती आहे माझ्या बद्दल, काही खर नाही, त्याच्या मनात कायम राहील माझ प्रेम प्रकरण, आणि कोणत्या हक्काने तो माझा हात धरत होता , त्याची पकड किती घट्ट होती , किती दुखतो आहे माझा हात , तो हात का लावतो मला, मला नाही राहायच इथे, एक एक लोक ही,

विशालचा काय प्रॉब्लेम आहे समजत नाही, कुठे आहे हा काय करू मी? जेल मध्ये असल्या सारख लक्ष ठेवता आहे हे लोक माझ्यावर,

रोहित कामात बिझी होता, एक दोन फोन केले त्याने कामाचे , खूप छान वाटत होत आज त्याला, खुश होता तो जेवतांना ही, रियु किती छान आहे आठ दिवस फक्त मग रियु माझ्या सोबत असेल, मी तिच मन जिंकेल,

रोहित रूम मध्ये आला, तो रियाचा विचार करत होता, बळजबरीने लग्न केल तरी मला नाही वाटत रिया लगेच होकार देईल, तिच्या वडीलांना वचन दिल आहे मी, ठीक आहे आता बघु काय होतय ते, रिया खूप छान आहे, पण त्या मुलावर ती प्रेम करते हे मला अजिबात आवडल नाही, कोण आहे तो गुंड, बंदोबस्त करायला हवा त्याच्या, तो रियाच्या आसपास ही नको आहे मला, माझी आहे रियु, रोहितने इंस्पेक्टर साहेबांना फोन लावला,

"बोला रोहित साहेब",..

"थोड काम होत तुमच्या कडे",.. रोहित

सांगा ना..

" उद्या या ऑफिस मध्ये भेटून बोलू",..

ठीक आहे..

रात्र झाली, जेवण झाल, कोणी रियाला ओरडल नाही, रिया तिच्या खोलीत बसलेली होती, टिना बाजूला येवून झोपली,.. "ताई मी खुश आहे तुझ्या साठी" ,

" टिना मला नाही करायच हे लग्न, मला भिती वाटते त्या रोहितची, तो नक्की बदला घेईल, त्याला माहिती आहे विशाल बद्दल",.. रिया

"कोणी सांगितल त्यांना हे सगळ",.. टिना

"मी सांगितल",.. रिया

कधी??

आज..

"तरी त्यांनी होकार दिला?",.. टिना

हो ना..

का पण?... टिना

"तेच समजत नाही मला टिना, हे लग्न झाल तरी माझ काही खर नाही",.. रिया परत रडत होती

रोहितचा फोन येत होता तिच्या नंबर वर

"ताई फोन बघ",.. टिना

"आता हा का फोन करतोय? कटकट नुसती",. रिया

रिया ने फोन कट केला

परत आला रोहितचा फोन

रियाने परत कट केला

"बापरे खूप मेहनत घ्यावी लागेल, काही खर नाही, या रियु ला खूप समजवाव लागेल अस दिसतय",... रोहित

रोहितने मेसेज केला

"रियु बोल ना माझ्याशी, काय करते आहेस? जेवण झाल का? हे बघ आपण अस बोललो तर ओळख होईल आपली लग्नापर्यंत",.. रोहित

रिया ने मेसेज बघितला तिने उत्तर दिल नाही,

" रियु मी फोन करू का तुला, काय झालं?, उत्तर दे नाहितर उद्या मी तिकडे येईन तुला भेटायला",.. रोहित

रिया ने मेसेज वाचला,.." काय आहे याच? , समजत नाही का याला मला नाही बोलायच त्याच्याशी",

तिने फोन बाजूला ठेवला,

टीना बघत होती,.." जिजुंचा मेसेज आहे का ताई? ",

" जिजु काय जिजु टीना, मला नाही आवडत तो रोहित ",..रिया

" छान आहे जिजू आणि तुझी खूप काळजी करतात ते ताई, विचार कर चांगला मुलगा आहे ",.. टिना

" हो का तुला कस समजल? ",.. रिया

"डोळ्यात दिसत त्यांच्या वागायला जेंटलमॅन वाटले ",.. टिना

जेंटलमॅन म्हणे, माझा हात कसा धरला हे काय माहिती या टिनाला

"टिना तु झोप बर अजिबात त्यांची बाजू घेवू नको",.. रिया

"ताई तुला काही ऐकुन घ्यायच नाही का ",.. टिना

" टिना माझ खूप डोक दुखतय ",.. रिया

टिनाने झोपून घेतल

रिया याच विचारात होती की पुढे काय करता येईल, विशालचा फोन का लागत नाही, काही गडबड आहे का? दुसऱ्यांना फोन लागतो, फक्त विशाल तुला फोन लागत नाही आणि हे लोक मला इतके सक्ती करतात यांनी अजून माझा फोन काढून घेतला नाही, काय गडबड आहे ही?

तिने फोन मध्ये एकदा विशालचा नंबर नीट बघितला, अरे हा नंबर चुकीचा आहे, मला विशालचा नंबर पाठ आहे, आता ही गडबड कोणी केली, या लोकांनी विशालचा नंबर बदलून ठेवला आहे, तरीच मी म्हणते आहे दोन-तीन दिवसापासून फोन का नाही लागत, मला काहीही करून विशालला फोन करायला पाहिजे, एकदा जर समजलं या लोकांना की मला समजलं आहे नंबर चुकीचा आहे तर हे लोक माझा फोनही काढून घेतील, पण कस करणार फोन? हे सगळे माझ्या जवळ असतात, आता चान्स आहे, तिने तिच्या फोन मध्ये विशालचा नंबर दुसऱ्या नावाने सेव्ह केला, अनब्लॉक केला, जरा वेळाने त्याला मेसेज पाठवून दिला लोकेशन पाठवून दिलं

विशाल ने बघितल रियाचा मेसेज आला आहे त्याने पटकन तिला फोन केला, रिया ने फोन कट केला

"कोणाचा फोन आहे ताई?",.. टिना

रोहित चा...

रियाने विशाल ला मेसेज केला.. "उद्या मला घ्यायला ये",

जरा वेळाने विशाल चा मेसेज आला,.. "कुठे आहेस तू मी तुला खूप शोधतो आहे",..

"तू माझ्याशी लग्न करणार आहे का विशाल?" ,... रिया

"हो रिया हा प्रश्न का आला तुझ्या मनात? ",.. विशाल

" काही नाही सहज",.. रिया

"मी तुला घ्यायला येतो माझ्याबरोबर येणार का? ",.. विशाल

" हो मी येणार आहे तुझ्या बरोबर, पण इथे माझ्यावर खूप पहारा आहे, उद्या सकाळी मी घरा बाहेर निघते, तू कुठे आहेस ",.. रिया

"मी याच गावत आहे",.. विशाल

" तुला कस माहिती मी इकडे होती ते",.. रिया

"तुमच्या शेजारच्यांना विचारल ",...विशाल

विशाल रात्रीच दिलेल्या लोकेशनवर एक दोन दा येऊन गेला, सगळ लॉक होत, रिया झोपली

घरात लग्नाची तयारी जोरात सुरु होती, अगदी चार-पाच दिवसावर लग्न होतं, साध्या पद्धतीने लग्न होणार होतं, रोहित एक मोठं हॉटेल ते बुक करणार होता, त्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडेच लग्न होईल, त्यामुळे इकडे फक्त मेहंदी आणि हळद होती, लग्नाच्या दिवशी हॉल वर जायचं होत, तिथे सगळे कार्यक्रम होणार होते

सकाळी रियाला घराबाहेर निघता आलं नाही आणि फोनही वापरता आला नाही, ती खुश असल्या सारख दाखवत होती, तिने फोन नीट लपवून ठेवला होता, कोणी तरी हात लावत आहे फोन ला,

रोहित ऑफिस मध्ये आला लग्नाला दोन तीन दिवस बाकी आहेत, त्याच कामात लक्ष लागत नव्हत, इंस्पेक्टर भेटायला आले, रोहित ने त्यांना विशाल ची माहिती पत्ता दिला,.. "शक्य असेल तर या मूलाला अटक करा" ,

ठीक आहे साहेब,

विशालच्या गॅरेज वर जरा वेळाने पोलिस गेले, विशाल नव्हता तिथे रॉकी होता, पोलिसांनी रोहितला रीपोर्ट केला, विशाल नाही इकडे, गावाला गेला आहे

"ठीक आहे कोणाला तरी लक्ष ठेवायला सांगा",.. रोहित विचार करत होता, गावाला म्हणजे नक्की कुठे आहे तो विशाल, रियाच्या गावाला तर नसेल, ओह माय गॉड, त्याने इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला,.. "रियाच्या मामाच्या घरा जवळ पोलीस बसवा",

"ठीक आहे साहेब",.इंस्पेक्टर

जरा वेळाने मेहंदी काढणाऱ्या बायका आल्या, रिया शांत होती, त्यामुळे घरचे जरा सगळे खूष होते, आधी छोटीशी पूजा झाली, सुरेखा ताईंनी रियाला ओवाळलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होत, रिया इमोशनल झाली होती,

नंतर लगेच मेहंदी काढायला सुरुवात झाली, खूप हसी मजाक चिडवाचिडवी सुरू होती, सुरेख अशी मेहंदी मध्ये रोहित बारीक नाव रियाच्या हातावर काढलं गेल

रिया याच विचारात होती की इथून बाहेर पडायचं कसं?, उद्या हळद आहे, एकदा हळद लागली की काही जाता येणार नाही, आजच्या दिवसात काहीतरी करायलाच पाहिजे

सगळ्यात आधी तिचीच मेहंदी काढून झाली, सगळ्यांची मेहंदी काढणं सुरू होतं, सगळ्या बायका बिझी होत्या, रिया बायकांमध्ये आहे असं समजून शरद राव मामा पुढच्या खोलीत आरामशीर बसले होते,

"आई मला बाथरूमला जायचं आहे",.. रिया

सुरेखाताई उठत होत्या, त्यांच्या हाताला मेहंदी होती, मेहंदी काढणारी एक ताई बोलली.. मी घेऊन जाते यांना

दोघी मागच्या दारी गेल्या काम करणार्‍या मावशी आल्या होत्या म्हणून मागचं दार उघडलं होतं, रिया बाथरूम मध्ये गेली,.. "तुम्ही जाऊन बसा ताई मला थोडा वेळ लागेल",.. तिने मेहंदी वाल्या ताईंना सांगितलं, ती ताई तिकडेच बाजूला उभे राहून फोनवर बोलत होते,

रिया पटकन बाथरूम मधनं निघुन मागच्या दाराने बाहेर पडली, लगेच गल्ली ओलांडून दोन घरा आड जरा वेळ उभी राहिली, तिथून तिने विशालला फोन केला, विशालने तिला लोकेशन दिलं, दोन-तीन गल्ली सोडल्यानंतर एका घराचे लोकेशन होतं, तिने हळूच मागे बघितले तर कोणीही नव्हतं, घरात कोणाला समजलंच नव्हतं

" रीया फोन स्विच ऑफ कर आधी आणि पटकन ये",.. विशाल

रियाने फोन बंद केला ती निघाली, पटकन दिलेल्या लोकेशन वर पोहचली, तिथे विशाल होता, ती जाऊन विशालला भेटली, खूप रडत होती ती, विशाल इथून चल पटकन मला नाही राहायच इथे, मला खूप भीती वाटते, तो मुलगा येवून घेवून जाईल मला, तो खूप डेंजर आहे,

" गप्प हो रिया रडू नको, अस काहीही होणार नाही, कोणी तुला इथून नेणार नाही, आता काळजी करायची नाही रिया मी आलो आहे ना",.. विशाल

"कुठे जायचं आहे आता पटकन सांग",.. रिया

"आता लगेच कुठेच निघायचं नाही आपण इथेच राहू एक दोन दिवस",.. विशाल

"पण ते लोक शोधायला आले तर?",.. रिया

" त्यांच्या बाजूच्या गल्लीत कशाला शोधतील ते, मेन रोड वर जातील आपण एक-दोन दिवसांनी मागच्या रस्त्याने शहरात जाऊ, फोन स्विच ऑफ आहे ना तुझा",... विशाल

" हो आपण लग्न केव्हा करणार विशाल? , लवकर लग्न करू या नाहीतर तो रोहित मला घेवून जाईल ",.. रिया

" का घाबरलीस एवढी रिया? काही केल का त्या मुलाने तुला? काय झाल?",.. विशाल

" काही केल नाही पण माझ लग्न ठरलं त्याच्या शी, तो डेंजर आहे, मामा बाबा त्याच ऐकतात, सगळ्यांना तोच आवडतो, जर आपण लवकर लग्न केल तर तो काही करू शकणार नाही",.. रिया

" इथे कुठे सोय आहे रिया, करू आपण लग्न दोन तीन दिवसात ",.. विशाल

" लवकरात लवकर लग्न करू या",.. रिया

" हो तू म्हणशील तस करू ",.. विशाल

विशाल ने त्याच्या नंबर स्विच ऑफ ठेवला होता, दुसर्‍या नंबर वरून मंगेश भाई ला मेसेज केला,.." रिया सापडली आहे, येतो एक दोन दिवसात येतो तिकडे, थोडे पैसे अकाऊंट वर ट्रान्सफर करा",..

मंगेश भाई खुश होता,.." पाठवतो पन्नास हजार आता, रिया ला सांभाळ ",..

हो ..

"तिला काहीही होता कामा नये ",..मंगेश

बराच वेळ झाला रिया बाथरूम मधून का आली नाही, त्या मेहंदी वाल्या ताई पण आत मध्ये येऊन दुसर्‍याची मेहेंदी काढत होत्या

सुरेखाताईंना आता लक्षात आलं की रिया कुठे आहे? त्या पटकन उठल्या, रिया कुठे आहे ग?

त्या बाथरूम मध्ये आहेत

सुरेखाताई पटकन मागे गेल्या, रिया कुठेच नव्हती, त्या घाबरून गेल्या, त्यांनी पुढे जाऊन मामांना पटकन आत बोलावलं,... "रिया दिसत नाही घरात" ,

"म्हणजे? कुठे गेली ती? ",... मामा

"माहिती नाही, आता समोर बसली होती" ,... सुरेखा ताई

मामा खूप चिडला होता,..." काय करता तुम्ही? तिच्या कडे लक्ष का नाही दिल? ",.

शरद राव आत आले.... काय झालं

" काही नाही तुम्ही बसा",... सुरेखा ताई

" काय झालं नीट सांग सुरेखा, रिया कुठे आहे? ",... शरद राव

" अहो तुम्ही ठीक आहात ना",.. सुरेखा ताई

"हो मी एकदम ठीक आहे, रिया कुठे आहे? काय झालं आहे आता इथे? ",... शरद राव

" रिया सापडत नाही",.. सुरेखा ताई

"कुठे गेली",.. शरद राव

" माहिती नाही, आता मेहंदी काढत होती इथे, बाथरूम मधे जाते सांगितल, मागच्या दाराने गेली बहुतेक निघून",.. सुरेखा ताई रडत होत्या

" मागच दार कोणी उघडल? ",.. मामा

"बाई आली होती कामाला",.. मामी

सगळे शोधत होते, टिना फोन लाव तिला

"स्विच ऑफ येतो आहे",.. टिना

चला पोलिस स्टेशन ला, ते दोघ गेले पोलिस कंप्लेंट केली, फोटो दिला, विशाल विरुद्ध कंप्लेंट केली,

काय कराव समजत नव्हत? आता एका तासात कुठे पळणार आहे ही, काय आगावू मुलगी आहे, आपण इतक लक्ष दिल तरी ही खूप जास्त निघाली, चांगल वाईट समजत नाही का हिला, सापडू दे अस बघणार आहे मी रिया कडे... मामा चिडले होते....