हे प्रेम आहे की काय?... भाग 22
©️®️शिल्पा सुतार
........
........
पिंकी फोन वर बोलत होती.. "दादा आई बोलते आहे ये लवकर",..
"काय करतोस रोहित आज उशीर झाला घरी यायला तुला ",.. शारदा ताई
"हो आई मीटिंग होती टेंडर साठी",.. रोहित
"झाली का मग मीटिंग? ",.. शारदा ताई
"हो छान झाली आपल्याला मिळेल टेंडर, तू कशी आहेस आई? अण्णा कसे आहेत? ",.. रोहित
"मजेत तू घरी कधी येतोस?, ठीक आहेस ना तू? ",.. शारदा ताई
"हो येईन मी",.. रोहित
" पिंकी आई येतील त्यांच्या सोबत ये थोडे दिवस, मला काळजी वाटते तुझी ",.. शारदा ताई
" हो बघतो मी आई ठेवतो फोन ",.. रोहित
हो..
आजी येवून बसली होती,.." काय म्हटली शारदा?",.
" काही नाही अस बोलत होती आई ",.. रोहित
" तू सांगितल का नाही रियाच? , सांगायला हव त्यांना ",.. आजी
"नाही आजी हिम्मत होत नाही काय करू, आई चिडली तर, रियाला काही बोलली तर, आधी कसतरी रियाला मनवतो आहे मी ",.. रोहित
" निघेल काही मार्ग, सांगून दे ना पण तू घरी, आणि काय करतोस तू? तुला एवढ समजवल तरी तेच तुझ, एवढ चिडू नकोस रिया वर, हे सगळं नवीन आहे तिच्यासाठी, थोडा वेळ दे तिला, प्रेमाने वाग ",.. आजी
हो..
तेच करत होतो, प्रेमाने वागत होतो, आता ते ही नको रियु ला, हात धरला तरी रडते, पुढे कस होईल? , नाजूक आहे ती, नुसता हात सोडवून घेता येत नाही तिला, मोकळ बोलत नाही... रोहित विचार करत होता
" घाबरते ती एक तर, कोणी नाही घरचे तिच्या इथे, बरेच दिवसा पासुन एकटी आहे ती, जरा समजुतीने घे, काहीही चुकीच केल ते रियाने असा विचार सोड, शांत असते ती दिवस भर",.. आजी
"आजी अग आता तुझ्या समोर शांत आहे ती, काय काय केल तिने माहिती का? पळून गेली होती इथून, बॉडी गार्ड ने शोधल तिला, स्विमिंग पूल मध्ये उडी टाकली, बाहेर पत्र पाठवायचा प्रयत्न केला, किती भांडते ती माझ्याशी",... रोहित
"अरे मग तेव्हा तिला नसेल राहायच तुझ्या सोबत, येतो राग ",... आजी
"आता ही नाही राहायच तिला माझ्या सोबत, आता बोल तिला घरी जाते का निघून जाईल ती, आजी मी काय करू? ",... रोहित
"नाही आता शांत आहे रिया, ती विचार करेल तुझा, होईल नीट, तू नीट वागत रहा",... रोहित
" हो मी रोज नीट वागणार रियु शी, काळजी घेईन तिची",.. रोहित
ते जेवायला बसले..
"वहिनी काय झालं तू रडली का? ",.. पिंकी रिया कडे बघत होती
नाही..
आजी रिया कडे बघत होत्या
"दादा काय झालं वाहिनीला? ,तू बोलला असशील तिला, मी टेरेस वरून आल्यावर तूच होता तिच्या जवळ",..पिंकी
"नाही मी नाही बोललो, मला काय माहिती का रडते रियु",.. रोहित
"मला काहीही झाल नाही पिंकी, मी ठीक आहे",.. रिया
"नक्की ना वहिनी, मला नाही वाटत अस, नक्की काही तरी झाल आहे " ,.. पिंकी
" पिंकी मी ठीक आहे ",.. रिया
"दादा तू उगीच चीड चीड करतोस, संध्याकाळी ही आम्हाला दोघींना ओरडला होता हा, नक्की हाच बोलला असेल हिला ",.. पिंकी
" काय अस करताय तुम्ही दोघी? माझ्या कडे का बघताय मी काहीही बोललो नाही रियुला, रियु बोल ",.. रोहित
" रियू बोल काय?.. रियु बोल? काय बोलणार वहिनी अस ओरडून विचारल तर",.. पिंकी
" नाही ते काहीच बोलले नाही, मला घरच्यांची आठवण आली होती ",.. रिया
आजी पिंकी रोहित कडे रागाने बघत होत्या,
जेवण झाल..
रिया आजी जवळ बसलेली होती, आजीने तिला प्रेमाने जवळ घेतल, रिया रिलॅक्स होती आजी जवळ
माझे सगळे नातेवाईक रियु ने स्वतः कडे वळवुन घेतले, हिला काही झाल की सगळे मला ओरडतात, आहेच गोड रियु
" आजी तू माझी आजी आहेस, मी बसणार इथे उठ रियु",.. रोहित
रिया उठत होती..
"बस रिया इथे माझ्या जवळ, रोहित तू बाजूला बस",.. आजी
"आजी काय अस? मला ही प्रेमाची गरज आहे, कोणी ऐकत नाही माझ",.. रोहित
रिया लाजली होती, आजी ला समजल, आजी हसत होत्या,
पिंकी आली, ती रोहित जवळ बसली, दादा आई विचारत असते तुझ्या बद्दल, काय करणार पुढे? ,
रोहितला टेंशन आल, आईच काय पण ? तीच राहिली तिच्याशी बोलायची हिम्मत होत नाही, सांगाव लागेल पण
फोन आला रोहित आत निघून गेला, रिया पिंकी बोलत बसल्या,
रिया रूम मध्ये आली, रोहित खाली गादीवर बसुन लॅपटॉप वर काहीतरी करत होता,
रिया पुस्तक वाचत होती
"ठीक आहे का रियु?",.. रोहित
हो..
"जास्त काळजी करायची नाही रियु, घरच्यांची आठवण येते का? , बाहेर प्रॉब्लेम नसता तर मी तुला कशाला अस घरात कोंडून ठेवल असत, मला ही नाही आवडत अस रियु, हे तुझ्या सुरक्षा साठी सुरू आहे" ,... रोहित
"का अस करतो विशाल, मला धोका जास्त आहे का? खरच मला समजल पाहिजे",..
" रोहित मला बोलायच आहे थोड ",.. रिया
बोल रियु...
रिया गप्प..
बोल..
नाही जावू द्या..
" काय झालं रियु?",.. रोहित वरती रिया जवळ येवून बसला, काही प्रॉब्लेम आहे का बोल",.. रोहित
" तुम्ही चिडणार नाही ना? ",.. रिया
" तुझ्या वर चिडेल का मी, ते ही तू एवढ गोड असतांना, तुला किती बॉडी गार्ड आहेत, राधा, पिंकी, आजी, माझी कुठे हिम्मत चिडायची, सगळे बोलतात मला तू रडली तरी, काय झालं रियु मोकळ सांग",... रोहित
नक्की ना.. रिया हसत होती
हो..
"ते मला थोड विचारायच होत, सौदा म्हणजे काय? ",.. रिया
"कोणी सांगितल तुला हे वाक्य ",.. रोहित
" माझे बाबा बोलत होते की माझा सौदा होणार होता, विशाल सौदा करणार होता, म्हणजे काय? ",.. रिया
" घाण गोष्ट आहे ती, एखादी गोष्ट विकणे म्हणजे सौदा" ,... रोहित
"विकणे म्हणजे? माणस कुठे विकतात? ",.. रिया
" विकतात या जगात खूप खराब लोक आहेत",... रोहित
"काय करणार पण विकून? ",.. रिया
" मुलींना काय करतात विकून, स्वतः साठी घेतात काही लोक ",.. रोहित
का?..
"रियु तुझ वय काय? ",.. रोहित
वीस..
" तुला महिती नाही का काय करतात",.. रोहित
" नाही काय झालं ",.. रिया
" कठिण आहे, चांगल वागत नाही एवढ लक्ष्यात ठेव तू सध्या ",.. रोहित
म्हणजे?..
" कोणी तुझ्या जवळ आलेल आवडत नाही ना तुला, तस रोज वेगवेगळे लोक जवळ आले असते, रात्र भर राहिले असते, काहीही केल असत",... रोहित
रिया बघत राहिली रोहित कडे.. खर का?
हो..
" का पण अस करत होता तो विशाल ",.. रिया
पैशा साठी..
" पण त्याने एखाद्याच लाइफ खराब होत, असू करू नये ",.. रिया
"त्याला काय फरक पडतो, त्याने अश्या आधी बर्याच मुलीना फसवल आहे , पोलिसात रेकॉर्ड आहे त्याच, वॉन्टेड आहे तो विशाल ",.. रोहित ने फोन मध्ये दाखवल, पोलिस स्टेशनमध्ये त्याने फोटो घेतला होता, विशालच्या रेकॉर्डचा,.. " किती गुन्हे केले ते बघ रीया, मोठा डीलर आहे हा ",..
रिया बघत बसली बापरे,
" म्हणून तो तुला हात लावत नव्हता, लांब रहात होता बरोबर ना ",.. रोहित
" हो तो लांब होता माझ्या पासून" ,.. रिया
रिया ला धक्का बसला, काय आहे हे? जगात अस ही करतात लोक, मला आधी का नाही समजल, जर खरच मी विशाल सोबत निघून गेले असते तर काय झाल असत माझ? , रोहित ने वाचवल त्याला चुकीच समजत होते मी,
" माझी चुकी झाली रोहित, मला नव्हत माहिती हे अस असत, सगळ्यांना दुःख दिल मी आई बाबा तुम्हाला" ,... रिया
"तुला हे वेळेत समजल खूप आहे माझ्या साठी, काळजी करू नकोस" ,.. रोहित
रोहित खाली जावून झोपला, चला बर झालं रियुला समजल, खूप मोठ काम झाल, वागेल हळू हळू नीट, अजूनही होकार दिला नाही तिने, आपण लगेच घाई नको करायला होईल नीट, देईल होकार स्वतःहून, येईल माझ्या जवळ, मी वाट बघतो रियु लव यू,
रिया घाबरून गेली होती, काय करणार होता विशाल मला, कोणाला विकणार होता, तिकडे काय झालं असत, मी काय केल असत, बापरे, काय आहे हे? मी मुव्ही मध्ये बघितल होत एकदा की एका मुलीला पळवतात तिला एक माणूस नेतो सोबत आणि मग जबरदस्ती करतो तिच्यावर, अस काही असेल का हे, काय करता जबरदस्ती म्हणजे? , काय माहिती, पण भीती दायक आहे,
रोहित चांगला आहे मी याच्या सोबत राहील,
"रोहित मग त्या मुली कुठे जातात नंतर ज्याना अस विकतात तर , जबरदस्ती म्हणजे काय होत ",.. रिया
काय सांगणार हिला आता,.. "तू जास्त विचार नको करू रियु, झोप तू मी तुला काही होवु देणार नाही" ,
रिया झोपली.. काय मला कोणी काही सांगत नाही
ती बघत होती, रोहित झोपला होता
" आज भीती नाही वाटत होती याची छान वाटत आहे आज रोहित सोबत ",..
सकाळी रिया उठली, रोहित तयार होता आज लवकर जाणार आहे का तुम्ही?
" हो आज टेंडर रिजल्ट आहे",.. रोहित
रिया आवरून आली, रोहित बसुन काहीतरी काम करत होता,.. "रिया मला चहा दे",..
रिया बाहेर आली चहा नाश्ता रेडी होता
" आजी पिंकी कुठे आहेत? ",.. रोहित
" मी बोलवते",.. रिया
" मी करतो नाश्ता मला उशीर होतो आहे",.. रोहित
रिया आजी पिंकीला घेऊन आली
" दादा आज लवकर नाष्टा करतो आहेस",.. पिंकी
" हो मला लगेच जायचं आहे ऑफिसला आज टेंडर चा रिझल्ट आहे, जरा काम आहेत",.. रोहित
" आपण पाच मिनिटांनी बसू ग मग वहिनी माझा थोडा आवरायचं आहे मी येते पाच मिनिटात",.. पिंकी आत चालले गेली आजी समोर बसल्या होत्या
रोहित चा नाश्ता झाला तो रूम मध्ये गेला,.. "रियु इकडे ये",
रिया आत गेली..
" माझी बॅग कुठे आहे रिया? तिने सगळे सामान दिल",.. रोहित तिच्याकडे बघत होता, रीया खाली बघत होती
" मी जातो ऑफिसला, इकडे ये",... रोहित ने तिला मिठी मारली, रिया लाजली
"ठीक आहेस ना तू , अस थोड थोड आपण प्रेम वाढवु",.. रोहित
रिया ला काय बोलाव समजेना, रोहित खूप हसत होता
" कशी वाटली आयडिया?, रिया सांग ना?",.. रोहित
रियु पुरे आता लाजण, मी निघतो, निघू का,
हो
" टेंडर चा रिझल्ट काय लागला ते सांगा फोन करून",.. रिया
" ठीक आहे, अजून काय करू रियु",.. रोहित
" लवकर या घरी ",.. रिया
" ठीक आहे तू म्हणशील तसं ",.. रोहित
रोहित बाहेर आला, आजीला भेटला, पिंकी मी निघत आहे, रोहित गेला, तो आज गाडीत तो खूप खुश होता, रियु आज खूप शांत वाटत होती, मी जबरदस्ती तिच्याजवळ जाणार नाही, हळू हळू होते ठीक ती, जोपर्यंत ती व्यवस्थित होकार देत नाही, तो पर्यंत अस ठीक आहे, समजेल तिला,
रिया ही खुप आनंदात होती, रोहित चांगलं आहे वागायला, पण अजूनही माझं मन त्याच्यासोबत राहायचं होत नाही, मी प्रयत्न करते आहे, तो थोडा जरी जवळ आला तरी घाबरायला होत,
रिया बाहेर आली, आजी पिंकी रियाने नाश्ता केला, त्या बराच वेळ बोलत बसल्या होत्या, पिंकी तिच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत होती, खूप हसल्या त्या, राधा त्यांच्यात सामील झाली होती, आजी तिची काळजी घेत होत्या,
"खूप छान आहेत मैत्रिणी तुझ्या पिंकी",.. रिया
आजींना आज बरं वाटत होतं आज रिया हसरी छान दिसते आहे, अशीच राहा ग बाई..
........
........
मंगेश विशालला भेटायला पोलीस स्टेशनला आला ,विशाल आत मध्ये बसलेला होता, त्याच्या शरीरावर मारल्याच्या खुणा होत्या ,मंगेश आला तसं विशाल उठून उभा राहिला, ते भेटायच्या ठिकाणी गेले,
"एक काम ही तुझ्याकडुन धड होत नाही का विशाल, मला काहीही झाल तरी रिया हवी आहे",.. मंगेश
"तिकडे पोलीसांची गस्त इतकी डेंजर होती, काय करणार मी भाई, मला लवकर मदतही मिळाली नाही, त्यामुळे रिया हातची निघून गेली",... विशाल
" भेटेल ना मग ती परत आपण करू प्रयत्न",.. मंगेश
" मला इथून बाहेर काढा आधी, रिया आपल्या बाजूने आहे, मी बघतो काय करता येईल",.. विशाल
" हो मी करतो आहे प्रयत्न तुला बाहेर काढायचा, कारण आता खूपच उशीर होतो आहे, आत्तापर्यंत मी रियाला घेऊन परदेशात हवं होतो, काहीही झालं तरी मला रिया हवी आहे",.. मंगेश
"पुढे काय प्लॅन आहे भाई? ",.. विशाल
" रिया कुठे आहे ",.. मंगेश
" तिचं लग्न जमलं त्या पोराशी तो घेऊन गेला तिला ",.. विशाल
" कोण आहे तो ",.. मंगेश
" रोहित त्याच गावात रहातो ",.. विशाल
" तो इंडस्ट्रियलीस्ट ",.. मंगेश
हो तोच
" मोठा माणूस आहे, खूप बॉडी गार्ड आहेत त्याच्या कडे, टफ फाईट आहे, तो सोडणार नाही अस आपल्याला, चांगला प्लॅन करावा लागेल या वेळी, मी लक्ष देणार आहे, रिया साठी काहीही करेन मी ",.. मंगेश
" काय झालं भाई रिया तुमच्या साठी हवी का",.. विशाल ला वाटल मंगेश प्रेमात पडला आहे रिया च्या, सारख रिया रिया करतो
" मी काहीही करेन माझ्या जवळ ठेवेन नाही तर कोणाला ही देईन, तू केवढी चूक केली वेळ वाया गेला ",.. मंगेश भाई अजून चिडला होता,
" ठीक आहे मी त्याची माहिती काढतो काही विकनेस असेल त्याचा बरोबर धरू आपण त्याला, रियाला सोडवून घेऊन त्याच्याकडून, पण मला इथून कधी बाहेर काढत आहात भाई, तर करेन ना मी काम, रिया हवी ना तुम्हाला ",.. विशाल
" दोन-तीन दिवसात बाहेर काढतो, वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, त्यात तू वॉन्टेड आहेस",.. मंगेश निघून गेला
भाई पागल झाला आहे? कोण समजवले त्याला, काय रिया रिया करतो तो, रोहित डेंजर आहे, त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी किती मारल मला, काहीही करू शकत नाही आपण रोहित मागे लागला तर, संपवून टाकेल तो आपल्याला, तिकडे त्या गावाला मी नुसत घराबाहेर पडू शकत नव्हतो, एवढा बंदोबस्त होता, मंगेश भाई ला जेव्हा रोहित भेटेन तेव्हा समजेल त्याला,
अकरा वाजता रोहित अभिजीत ऑफिस मध्ये बसलेले होते, तिकडून फोन आला की तुम्हाला टेंडर मिळालं आहे, रोहित खूपच खुश होता, या फॅक्टरी साठी सगळ्यात मोठी ऑर्डर आहे ही, खूपच छान झाल, आता आपण खूप छान काम करू, तो खूप आनंदात होता, तेवढ्यात घरून फोन आला, शारदा ताई बोलत होत्या,
"काय झालं रोहित टेंडरच, अण्णा विचारता आहेत",.. शारदा ताई
"आपण टेंडर जिंकलो आई ही आपल्या कंपनीची सगळ्यात मोठी ऑर्डर आहे, आता मी खूप मेहनत करीन" ,... रोहित
"मी खूप खुश आहे तुझ्यासाठी रोहित, घे अण्णांशी बोल",.. शारदा ताई
अण्णा बराच वेळ रोहितशी बोलत होते, खूप खुश होते ते, तुझी खूप मेहनत आहे यामागे रोहित, तू छान काम करतो आहेस या फॅक्टरी साठी, कुठल्या कुठे नेऊन ठेवली तुही फॅक्टरी, जिवंत केल तू या कंपनीला
रोहित हि खूप खुश होता
" कधी घरी येत आहेस तू रोहित ",.. अण्णा
"येईन मी अण्णा, मी ठेवतो फोन थोडं काम आहे",.. रोहित
अण्णा शारदाताईंना हाक मारत होते,.." इकडे ये शारदा, तयारी कर, आपण निघत आहोत लगेच",..
" कुठे जातो आहोत काही सांगाल का?",.. शारदा ताई
"फार्म हाऊस वर",..अण्णा
शारदा ताई खूप खुश होत्या, काय घेवू काय नको रोहित ला काय काय आवडत सगळ घेतल, मस्त राहू तिकडे माझ्या हाताने स्वयंपाक करेन मी रोहित साठी, कधीचा नाराज आहे तो....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा