Login

हे प्रेम आहे की काय?... भाग 24

सांगा ना?.. त्यांनी आधीच नकार दिला होता ना, माझ्याशी लग्न करायला, का चिडल्या त्या इतक्या



हे प्रेम आहे की काय?... भाग 24

©️®️शिल्पा सुतार
........

रोहित घरी यायला निघाला, खूप टेंशन मध्ये होता तो, एक तर काल पासुन रियु थोड बोलत होती, मी तिला मनवणार होतो, मग गेलो असतो घरी, आज प्रॉब्लेम झाला परत, कस काय समजवणार आहे मी आता परत रियुला, आई ही जास्त करते, मला हे थोड माझ्या पद्धतीने हॅण्डल करायच होत,

आपण कधी काहीच चूक केली नाही का? नाही समजल तेव्हा रियूला ते लोक कसे आहेत ते, तिला काहीही माहिती नाही, कायम आई बाबा सोबत राहिलेली साधी मुलगी आहे ती, आईला रियु वर राग काढायची गरज नव्हती, रियु ने नाही मी तिच्याशी जबरदस्ती लग्न केल आहे, ती तयार नव्हती, अजून तयार नाही, मी तिला इकडे घेवून आलो, तिने इथून बाहेर पडायचा किती प्रयत्न केला होता, आता शी ती बोलत होती माझ्याशी, ते पण पिंकी आजी नीट वागल्या रियू शी म्हणून थोडी कंफर्टेबल होती ती आणि आईने अस केल तिला, घाबरली असेल ती, आई कितपत चिडली आहे काय माहिती, कस बोलणार मी या दोघींशी

आधी मी पण चिडलो होतो रियुवर, लग्नाच्या दिवशी उगीच मारल होत तिला, चुकीच वागलो होतो मी, रियुवर चिडून उपयोग नाही, प्रेमाने बोलल की लगेच ऐकते ती, आईने आधी माझ्याशी बोलायला हव होत, रियु आता काय रियाक्ट करेल काय माहिती?

रोहित घरी आला, त्याने गेट बाहेरच गाडी लावली तो मागच्या कॉटर कडे आला,.. "रिया कुठे आहे?",

सिक्युरिटी गार्डने रूम दाखवली,... अण्णा बाहेर बसले होते

अण्णा रोहित कडे बघत होते, रोहित गप्प होता, अण्णा घराकडे जात होते,.. अण्णा सॉरी,

"ठीक आहे रोहित, आधी पोरी कडे बघ, घरात तुझी आई चिडली आहे ते बघ आधी, मला काही प्रॉब्लेम नाही" ,.. अण्णा

रोहित आत गेला, रिया समोर बसलेली होती, ती रडत होती, राधा उठून उभी राहिली, ती बाहेर निघून गेली,

रोहित तिच्या जवळ येवून बसला,.. "रिया गप्प हो" ,

रोहितने बघितलं रियाचा गाल खूप लाल झाला होता, जोरात मारल वाटत हिला आईने , बापरे, आईला कशी करते असं? ,...

सॉरी रियु,..

रिया काही बोलली नाही, याने ही मारल होत मला लग्नाच्या दिवशी, तेव्हा तो रागात होता, आता त्याची आई रागात आहे, काढा सगळ्यांनी माझ्यावर राग, आता मी ऐकणार नाही, मी इथे नाही रहाणार

"रिया चल घरी",.. रोहित

नाही... रिया मानेने सांगितल

"काय झाल मी आहे ना",... रोहित

"नको मला भिती वाटते तुमच्या घरी , मला माझ्या घरी जायच आहे माझ्या आईकडे",.. रिया

"आपण सोबत रहाणार आहोत ना, आपल ठरलं ना तस, काय करतेस अस रियु",... रोहित

"नाही मी घरी जाणार आहे, मला नाही रहायच इथे",.. रिया

"नाही रियु तुला माहिती आहे ते शक्य नाही, तुला जाता येणार नाही इथून ",... रोहित

" प्लीज.. मी जाणार आहे",.. रिया

" नाही... असा विचार सोड, शांत हो, मी आहे ना, आपण छान राहणार ना सोबत ",... रोहित

"मी जाणार इथून .. माझ्या घरच्यांना भेटायला मला तुमच्या परवानगीची गरज नाही , मी ऐकणार नाही , मी इथे नाही रहाणार",... रिया उठली ती दारा कडे जात होती, रोहितने तिला अडवल,

" मला जावू द्या",.. रिया

" तुला बाहेर धोका आहे ",.. रोहित

" इथे ही कुठे मी नीट आहे, किती कंटाळा आला आहे इथे, त्यात सगळे माझ्यावर राग काढतात",.. रिया

" अस नाही रियु",.. रोहित

" अस आहे.. तुम्ही लोक माझ्याशी कसे ही वागतात, मला नको नको झाल आहे हे, मला जायच आहे इथून माझ्या आई कडे, सरका बाजूला " ,.. रिया

"रियु तू कुठेही जाणार नाही इथून, मी बोलतो आत जावून",.. रोहित

" नका बोलू त्या पेक्षा मला जावू द्या इथून, तुम्ही तुमच्या घरचे नीट रहा",.. रिया

" काहीही झाल तरी तुला इथून जाता येणार नाही रियु, डोक्यातून हा विचार काढून टाक, का बोलतेस अस, मला तुझ्या सोबत राहायच आहे ",.. रोहित

" मग काय करू मी? मला शांतता हवी आहे, काय सुरु आहे कधी पासून माझ्या सोबत, कंटाळा आला आहे मला त्या पेक्षा इथून बाहेर गेल्यावर जे व्हायचं ते होवुन जावू द्या माझ , मला जावू द्या",.. रिया

" नाही रियु इथून निघायचा विचार सोड",... रोहित

रिया ने रोहितचे पाय धरले.. "प्लीज मला जावू द्या, अस नका करू, मी नाही राहणार इथे, मला आई बाबांकडे जायच आहे, एवढ ऐका माझ ",..रिया अजून रडत होती

" रियु काय सुरु आहे हे, शांत हो , काय अस? सोड माझे पाय",.. रोहित ओरडला,

रिया खूप घाबरली होती..

"गप्प बस इथे, अजिबात गोंधळ नको",... रोहित

रिया रडत होती, रोहित तिच्या जवळ गेला,.." अस करतात का रियु? शांततेत घे ",

" मला जायच इथून, तुम्ही हो बोला, मला घरी सोडून या, नाहीतर बाबांना फोन करा ते येतील मला घ्यायला",.. रिया

"आपण जावू दोघ तुझ्या आई कडे, नाही तर मी त्यांना इथे बोलवेन, प्रॉमीस... पण आता प्लीज शांत हो, आई आधी चिडली आहे, तिला समजवू दे, ठीक आहे का ",.. रोहित

" तुमच्या साठी मी योग्य नाही, मी चांगली मुलगी नाही, इथे राहिली तरी आयुष्य भर हेच ऐकाव लागेल, माझी तयारी नाही त्या साठी मला जावू द्या ",.. रिया

" रियु प्लीज आता नको ना हे सगळ बोलू, मला थोडा वेळ दे, कुठे ही जाणार नाहीस तू, आपण सगळे आनंदात रहाणार आहोत, मी घेवून येईन तुझ्या घरच्यांना, अस बोलू नको आणि, तू खूप छान आहेस माझी आहेस, लव यु",.. रोहित

रिया शांत झाली

" तू थांब इथे रिया मी आत जाऊन बघतो",.. रोहित

रिया पुढे आली, तिने येऊन रोहितला मिठी मारली, रोहित तिला समजवत होता,... " शांत हो रिया मी करतो आहे काहीतरी, नको रडू",..

" नका ना जाऊ प्लीज माझ्यासोबत थांबा मला भीती वाटते आहे ",.. रिया

"असं करतात का रिया? , जर आईशी बोललं नाही तर हा प्रॉब्लेम कसा ठीक होईल, तू चहा घेतला आहे का, मी तुला चहा आणि पाणी आत पाठवतो" ,.... रोहित

"मला काही नको मला तुमच्या सोबत राहायचं आहे",.. रिया अजून रोहितला धरून होती

" रिया सोड मला, मी येतो आत जाऊन, काय झालं आहे ते बघावं लागेल",.. रोहित

" तुम्ही मला प्रॉमिस करा मला सोडून कुठे जाणार नाही",.. रिया

" काय बोलते आहेस तु रिया? तुला कशाला सोडून जाईन मी? माझं प्रेम आहे ना तुझ्यावर तू माझी बायको आहे काळजी करू नको होईल सगळं नीट",... रोहित

रिया कॉटवर जावून बसली

"शांत हो रिया, आराम कर थोडा, इथे थांब जरा वेळ मी येतो ",.. रोहित

रिया त्याच्या कडे बघत होती, काल पर्यंत याच्या पासून आपल्याला सुटका हवी होती आज हाच मला आधार वाटतो आहे, चांगला आहे हा, पण तरी ही मला माझ्या घरी जायच आहे, आई कडे..

राधा.... रोहित ने हाक मारली, राधा आत आली, रिया कडे लक्ष दे, मी येतो थोड्या वेळात, चहा पाणी पाठवतो, दोघींनी चहा घ्या दरवाजा लावून घ्या,

हो साहेब...

रोहित गेला, रिया परत रडत होती

रोहित गेट वर आला ,.. "तिकडे रूम वर चहा पाणी नेवून द्या, एकाला उभ करा तिथे, रूम बाहेरून लॉक करा, रिया रूम बाहेर गेली तर बघा" ,.. काळजी वाटते रियु ची

रोहित आत आला, शारदा ताई खाली आल्या होत्या, रोहित आला समजल्यावर सगळे जमले, त्या बघत होती रिया दिसली नाही त्याच्या सोबत

रोहित आजी पिंकी त्याच्याकडे बघत होत्या, अण्णा आले, रोहित उभा होता, शारदा ताई सोफ्यावर येऊन बसल्या,... " रोहित इकडे ये समोर बस",..

रोहित बसला.. कधी आले आई अण्णा तुम्ही?

"दुपारी आलो",.. अण्णा

"आई काय झालं बोल ना माझ्याशी, बोल ओरड मला, मी चूक केली आहे आई, अशी गप्प राहू नको",.. रोहित त्यांच्या जवळ जावून बसला

"तुला माझ ऐकायच आहे का रोहित",.. शारदा ताई

"आई काय म्हणतेस सांग, मी नेहेमी ऐकतो ना तुझ, तुला माहिती आहे ते",.. रोहित

"मला हे जे तू त्या मुली सोबत रहाते ते मान्य नाही, त्या मुलीला तिच्या घरी सोडून ये ",.. शारदा ताई

" आई मी लग्न केल तिच्याशी, रिया माझी बायको आहे" ,.. रोहित

"काय आहे हे रोहित, हे चालणार नाही, ती मुलगी इथे नको मला ",.. शारदा ताई

" आई नको ना अस करु",.. रोहित

" कधी झाल तुझ लग्न? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, आमच्या पासून लपवून ठेवल तू, का अस केल",... शारदा ताई

" आई शांत हो",.. रोहित

" नक्की त्या मुलीने सांगितल असेल तुला अस करायला, कधी झाल हे लग्न, बोल पटापट ",.. रोहित

" आई गैरसमज झाला आहे, रिया काही बोलली नाही मला अस, मीच लग्न केल तिच्याशी, ती तयार नव्हती",.. रोहित

" तयार नव्हती म्हणजे काय? एवढं काय आहे तिच्यात? , भारी भरते ती, तू लग्न करून उपकार केले तिच्यावर, कोणी केल असत अस पळून गेलेल्या मुलीशी लग्न, का केल तू अस, स्थळ मिळाले नसते का तुला ",... शारदा ताई

" आई काय अस बोलते आहेस तू , पिंकी आजी आत जा तुम्ही",... रोहित

त्या आत गेल्या आई अण्णा रोहित होते तिथे आता,

" आई मी आधी बोललो होतो मी करणार आहे रिया शी लग्न, अण्णा तुम्हाला बोललो होतो ना मी ",.. रोहित

" लग्न झालं हे का लपवून ठेवल ",.. शारदा ताई

" मी येणार होतो घरी रियाला घेवून, तीने अजून होकार नाही मला, एकदा आमच नीट झाल की येणार होतो मी",...रोहित

"होकार दिला नाही म्हणजे काय? माझ्या मुलाने उपकार केले तिच्यावर लग्न करून आणि ती काय भारी भरते",... शारदा ताई

" आई अग उपकार काय? माझ प्रेम आहे तिच्यावर, माझी बायको आहे ती आणि तू तिला का मारल? किती घाबरली ती माहिती का, अस करु नको, मी रियाला घरात घेवून येतो आहे" ,... रोहित

" नाही ते जमणार नाही, मला हे लग्न मान्य नाही या घरात ती येवू शकत नाही, हे फायनल आहे ",.. शारदा ताई

"आई मी तिला घेवून इथून बाहेर नाही जावू शकत, धोका आहे, तस काही नाही रियाच, विश्‍वास ठेव, अण्णा तुम्ही सांगा रिया चांगली आहे",... रोहित

" गेली होती ना ती निघून लग्ना आधी, तू पोलिस लावून शोधल ना तिला, खर बोल, तिथे मित्रा सोबत सापडली होतो ना ती, अजून तो मुलगा हिच्या मागे आहे, अशी मुलगी ती ",.. शारदा ताई

" आई बेशुद्ध होती ती तेव्हा, तिला नाही माहिती चांगले वाईट लोक ",.. रोहित

" एवढी लहान आहे का ती? तुझ्या सोबत राहते ना तुझ्या बेडरूम मधे, पुढच्या वर्षी मुल होईल तिला अस सोबत राहिल तर, म्हणे लहान आहे, तुझ्या बेडरूम मधून बाहेर आली ती, मी बघितल, तिचे कपडे कपाटात आहेत तुझ्या , हे एवढं सुरू आहे तुला आम्हाला सांगावसं वाटलं नाही, मला बोलायच नाही तुझ्याशी रोहित",... शारदा ताई

" आई रियाचा काही प्रॉब्लेम नाही, ती बेशुद्ध होती तेव्हा डॉक्टर आले होते, त्यांनी तपासल तिला",.. रोहित

" उपकार केले आपल्यावर तिने काही नाही केल तिकडे तर ",.. शारदा ताई

" आई प्लीज अस काय बोलते आहेस, माझी बायको आहे ती मला तिच्या सोबत राहायच आहे ",.. रोहित

" रहा मग, आम्ही काय करतोय इथे चला हो इथून सरप्राईज द्यायच होत ना तुम्हाला मुलांना, आपल्या मिळाल सरप्राईज",... शारदा ताई

शारदा ताई आत निघून गेल्या..

अण्णा तिथे बसले होते,..

" अण्णा माफ करा मला, या साठी सांगत नव्हतो मी, माहिती होत आई चिडेल, आधी रियाला समजावत होतो मी, ती ही नाराज होती, मग येणार होतो घरी",.. रोहित

" ठीक आहे रोहित, धक्का बसला शारदाला, होईल ठीक सगळ , पण तू सांगायला हव होत आम्हाला, कुठे आहे रिया?",.. अण्णा

"मागे क्वार्टर मध्ये ",.. रोहित

" आत घेवून ये तिला आत ",.. अण्णा

" आई नाही आणु देणार तिला, परत काही झाल तर? रिया घाबरली आहे, खूप रडते आहे, मी समजवतो आईला, मग रिया ला घेवून येतो, थोडे दिवस या दोघी दूर बर्‍या ",... रोहित

" ठीक आहे लक्ष दे रिया कडे ",.. रोहित

अण्णा आत गेले,

पिंकी आजी येवून बसल्या,

" पिंकी रियाला चहा दिला का बघ , कोपर्‍यातली रूम, आणि रूम उघडी ठेवू नको ",.. रोहित

हो दादा...

पिंकी बाहेर गेली

आजी काळजीत होती,.." काय झाल हे रोहित? तू रिया सोबत रहा, कशी आहे ती? ",..

" रडते आहे, म्हणते आहे नाही राहणार इथे, घरी सोडा बोलते आहे, कसतरी समजवल तिला ",.. रोहित

" बापरे लक्ष दे तिच्या कडे",.. आजी

" आई खूप बोलली का तिला, घाबरली आहे ती ",.. रोहित

" हो, होईल पण ठीक शारदा काळजी करू नकोस",..आजी

"हो फ्रेश होतो मग जातो रिया जवळ ",... रोहित

रिया बसलेली होती, राधा होती सोबत, पिंकीला बघून रिया परत रडत होती

" पुरे वहिनी नको रडू, सॉरी वहिनी आईने अस नव्हत करायला पाहिजे, मी बोलणार आहे आई शी, दादा बोलतो आहे, होईल काही तरी तू चहा घेतला का ",... पिंकी

हो दिला.. राधा

पिंकी बसली जरा वेळ, रिया गप्प होती,

"वहिनी मी जाते दादा येईल, बघते आई काय म्हणते ते",... पिंकी

रिया मानेने हो बोलली..

पिंकी गेली, रोहित त्याचा लॅपटॉप घेवून रियाच्या रूम मध्ये आला, राधा बाहेर जात होती, राधा थांब

सिक्युरिटी गार्डला दुसर्‍या रूमची चावी आणायला सांगितली,.. "राधा इथे बस तू, नाही तर जा घरी ",

" नको साहेब मी थांबते मॅडम जवळ",.. राधा

राधा त्या रूम मध्ये गेली, रोहित रिया जवळ येवून बसला, दुसरीकडे बसायला जागा नव्हती, रिया खूप गप्प झाली होती, रोहित ऑफिसच काम करत होता,

"रिया पुरे झाल आता किती त्रास करून घेणार, हस थोडी ",.. रोहित

"मला घरी जायच",.. रिया

"मी सांगितल ना तुला हो म्हणून",.. रोहित

"कधी पण",.. रिया

"एक एक प्रॉब्लेम नीट होवू दे आधी, इथे नाही आवडत का? घरात चालते का तू आपल्या रूम मध्ये बस",.. रोहित

"नको मला भिती वाटते तिकडे, मी इथे रहाते ",.. रिया

रिया बसली होती

" रोहित तुम्ही घरी नव्हत सांगितल का आपल लग्न झालं ते",.. रिया

नाही..

का?

रोहित काही बोलला नाही

" सांगा ना?.. त्यांनी आधीच नकार दिला होता ना, माझ्याशी लग्न करायला, का चिडल्या त्या इतक्या ",... रिया

" अस काही नाही रियू तू शांत हो झोपते का तू जरा वेळ",..रोहित

" नाही मला आई कडे जायच",.. रिया

" परत तेच नको ना रियु, मी हो बोललो आहे, आता जेव आणि झोप",.. रिया

जेवण कुठे आहे?

"येईल घरून, भूक लागली का? ",.. रोहित

हो..

" मग कशाला एवढ रडावं ",.. रोहित

" मी बघून येतो इकडे आधी जेवण द्यायला सांगतो ",.. रोहित

हो..

रोहित सांगून आला

" रोहित तुम्ही जा घरात वापस मी राहीन इथे काही प्रॉब्लेम नाही ",.. रिया

" नाही रियु मी इथे रहातो",.. रोहित

"घरचे ओरडतील",.. रिया

" नाही ओरडणार ",.. रोहित

" तुला भीती वाटते का माझ्या सोबत ",..

"नाही मला चांगल वाटत तुमच्या सोबत, आज मला आधार वाटतो आहे तुमचा ",.. रिया

"मी इथे राहणार तू जिथे तिथे मी",.. रोहित

रूम लहान आहे ही, रिया विचार करत होती, हा झोपेल कुठे? जागा आहे का? एक बेड, तिला हसू आल...

" काय झालं रियु? तू का हसली? , तुला वाटल असेल हा झोपेल कुठे ",.. रोहित

" नाही तस नाही ",.. रिया

" हो अस वाटल असेल ",.. रोहित

नाही...

रिया अजून हसत होती,

" तुझ्या मनात काय असत ना मला लगेच समजत रियु, मी तुझ्या जवळ झोपणार, तेवढाच चान्स मिळाला मला",.. रोहित

"नाही रोहित",.. रिया लाजली होती

"हो मी आज इथेच झोपणार आहे ",.. रोहित

नाही..

" हो माझी गोड बायको, आता काय करशील" ,... रोहित

रिया हसत होती...

"नाही तुम्ही घरी जा, मी राधा सोबत राहीन",.. रिया

" कोण आहे तुला प्रिय.. मी का राधा? ",.. रोहित

राधा..

" बघु का जरा रियु,.. जरा वेळाने बघतो",.. रोहित

रियु खूप हसत होती..

चला थोड तरी हसली ही, केव्हाची रडते आहे... रोहित ला बर वाटत होत....

0

🎭 Series Post

View all