Login

हे प्रेम आहे की काय?... भाग 27

विचार करून वागा, अजून पिंकीच लग्न बाकी आहे, बरेच नातेवाईक आहेत आपले त्यांना उत्तर द्याव लागेल, तुम्हाला नाही कोणाचा विचार पण मला करावा लागतो,


हे प्रेम आहे की काय?... भाग 27

©️®️शिल्पा सुतार
........

रिया राधा नुसत्या बसलेल्या होत्या, करणार तरी काय? बाजूच्या आजी येवून बसल्या जरा वेळ, त्यांच्याशी ही काय बोलणार, नको उगीच काही सांगितल गेल तर रोहित चिडेल, रिस्क नको, त्या पेक्षा गप्प बसलेल बर, बाजूच्या ताई आल्या,.. " तुम्हाला चहा नाश्ता हवा आहे का काही? ",..

"नाही.. झाला आमचा चहा ",.. राधा

"काही लागलं तर सांगा",..

हो...

पिंकी आली,.. "काय चाललय वहिनी?" ,

"काही नाही पिंकी बोर होतय, तू काय करतेस " ,... रिया

"काही नाही आई आहे तर सारख येता येत नाही इकडे, मी जरा वेळाने जेवण घेवून येते " ,... पिंकी

"आजी कश्या आहेत पिंकी? , खूप आठवण येते त्यांची",.. रिया

"ती ही आठवण काढत होती तुझी वहिनी, पण तिला नाही येवू दिल मी" ,... पिंकी

"पेपर आणला असता आतून पिंकी, वाचला असता",.. रिया

" घेवून येते जरा वेळाने, माझा दोन तीन दिवसात रिजल्ट आहे वहिनी, तुझा ही लागेल रिजल्ट, दादा आला की फोन करून बघ, मी येते जरा वेळाने वहिनी, इथे गरम होतय खूप, फॅन वाढव",... पिंकी गेली,

रोहित कुठे करू देणार आहे मला फोन, अजून आई बाबांशी बोलली नाही मी, माझ्या वर विश्वास नाही रोहितचा अजून की आई बाबांना माझ्याशी बोलायच नाही माझ्याशी काय माहीती? , मामा नाही बोलला असेल, काय माहिती? ते लोक माझ्याशी संबंध ठेवतील की नाही, एक एक प्रॉब्लेम एवढा आहे ना, आता त्यांना राग आला असेल तर कशी समजूत काढणार आहे मी त्यांची , सगळे खूप चिडले माझ्या वर, काय होणार आहे पुढे काय माहिती? , टिना बोलेल माझ्याशी पण, खूप आठवण येते आहे आज सगळ्यांची,

कुठे आहेत हे लोक.. मामा कडे की गेले घरी? , विशाल कुठे असेल?, त्याला येत असेल का माझी आठवण? , रोहित सोबत ठीक आहे मी, काही त्या विशालची आठवण काढून उपयोग नाही, शांत रहायला हव आता, रोहित म्हणेन तेच करेन मी, तोच माझ आयुष्य आहे, इथे रहायच आहे आता, बोलू दिल फोन वर तर ठीक नाही तर काही प्रॉब्लेम नाही, भेट होण शक्य नाही,

त्याच्या घरचे सगळे आले इथे तो भेटतो सगळ्यांना, माझ्या घरचे आले की प्रॉब्लेम आहे का? की माझ्या घरच्यांवर कोणी नजर ठेवून असेल? , काही सांगता येत नाही, आता हट्टी पणा नको करायला, अजून आता रोहितच्या आई काय म्हणताय काय माहिती? , कधी नीट होईल सगळ?

दुपारी घरून जेवण आल, पाणी आल, एक बाई घेवून आल्या जेवण, पिंकी कुठे आहे काय माहिती? , ती का नाही आली? , रोहितच्या आईने नसेल पाठवल, त्यांच सगळे ऐकतात,

बोर होत आहे, काहीही काम नाही, जरा वेळाने जेवते मी

राधा बाजूच्या लोकांशी बोलत होती, रिया आत मध्ये नुसती बसली होती, अण्णा आले, रिया उठून उभी राहिली,.. "या ना आत अण्णा",

अण्णा आत आले,.. "जेवण आल ना आतुन",..

"हो अण्णा",.. रिया

"जेवून घे",.. अण्णा

हो..

"ठीक आहे ना तू",.. अण्णा

हो..

"रोहित येईल लवकर घरी, काही लागल तर सांग" ,..अण्णा

हो अण्णा..

"घरी ये संध्याकाळी रोहित सोबत" ,.. अण्णा

अण्णा थँक्यू,

"काळजी नाही करायची मी आहे ",.. अण्णा गेले

रियाला तिच्या बाबांची आठवण येत होती, तिच्या डोळ्यात पाणी होत

राधा आणि तिने जेवून घेतल

जरा वेळ आराम केला, पिंकी आली पेपर घेवून,.." वहिनी विसरून गेली होती पेपरच, जेवली का तू? , मी आई सोबत काम करत होती",

" काय काम होत ",.. रिया

" पुर्ण घर आवरल आज, नेहमी इकडे आलो की एकदा काम असत, आई अस सोडत नाही",.. पिंकी

अच्छा..

"कंटाळा आला का तुला वहिनी?",.. पिंकी

"हो ग काय करणार इथे",... रिया

" वहिनी आई शांत आहे, आता दादा आल्यावर ती बोलणार आहे दादाशी",... पिंकी

रिया गप्प होती तिला समजत नव्हतं काय होणार नंतर? मी घरात कस वागणार आहे?, खूप भीती मनात बसली होती तिच्या

रोहित आज लवकर घरी आला, रिया बसलेली होती,.. "काय झाल रियु एकदम गप्प आहेस",..

"काही नाही ",.. रियाने उठून पाणी दिल

" जेवण केल का दुपारी?, काय केल दिवसभर",.. रोहित

"अशी बसली आहे सकाळ पासून, काय करणार काही काम नाही मला, कुठे जायच नाही, ना टीव्ही, ना पुस्तक वाचायला, काय करणार",.. रिया

रोहित तिच्या जवळ गेला,.." सॉरी रियु मला माहिती आहे अस कंटाळा येतो, आता मी आलो ना आपण मस्त गप्पा मारत बसू",

रिया काही बोलली नाही

रोहित तिच्या कडे बघत होता खुप कंटाळली आहे ही, काय करणार पण आता,

अण्णांचा फोन आला,.." रोहित जरा वेळाने ये घरी, रिया ला घेवून ये, तुझी आई बोलवते आहे",

" हो ठीक आहे अण्णा ",..

" चल रियु आत बोलावलं आहे आपल्याला",.. रोहित

रिया घाबरली होती, परत भांडण झालं तर? , रोहितच्या आई मला काही करणार नाही ना, रोहित आहे सोबत बघू काय होत ते, रियाने ड्रेस नीट केला, केस नीट केले, टिकली नाही की पावडर नाही, वेणी नाही घातली नीट, कशी दिसते मी काय माहिती? , बोलणी बसतील मला बहुतेक,

"काय झालं रियु",.. रोहित

"मी ठीक दिसते ना",... रिया

"खूप सुंदर नेहमी प्रमाणे",.. रोहित

"अस नाही नीट सांगा, इथे कंगवा नाही पावडर टिकली नाही",.. रिया

"तुला काय गरज आहे या गोष्टींची" ,... रोहित ने तिचे केस नीट करून दिली,

"आरसा ही नाही",.. रिया

"माझ्या डोळ्यात बघ",.. रोहित

"काहीही सुरू आहे रोहित",.. रिया खूप हसत होती,

"चला आता मॅडम, नाहीतर आई येईल बाहेर ",... रोहित

" रोहित एक बोलायच होत, तुम्ही माझ्या सोबत रहा प्लीज, मला एक मिनिट एकट सोडु नका, मला गरज आहे तुमच्या सोबतीची",... रिया

"जायच ना, की थांबायचा इथे ",.. रोहित

" रोहित प्लीज मी सिरियस आहे",.. रिया

"काय झालं रियु? मला माहिती आहे तुझ्या मनात भीती बसली आहे, छान आहे अग आई, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत, तुला नाही सोडणार एकट, ठीक आहे का आता",... रोहित

हो..

रोहित रिया जवळ आला, इकडे ये रियु.. त्याने तिला मिठीत घेतल

" ठीक आहे का आता",..रोहित

हो

जायचं आत

हो

दोघ आत गेले, समोर अण्णा शारदा ताई बसलेल्या होत्या आजी बाजूला बसल्या होत्या, पिंकी उभी होती, रोहित आत आला, रिया त्याच्या मागे उभी होती,

पिंकी पट्कन पुढे गेली.. वहिनी ये आत,

रोहित जावून शारदा ताईं जवळ बसला, रिया पिंकी जवळ उभी होती, ती आजीं कडे बघत होती,

"ये रिया इकडे माझ्या जवळ बस",.. पिंकी रिया आजी जवळ बसल्या

शारदा ताई गप्प होत्या, त्या रोहित कडे बघत होत्या

"आई मला माफ कर, मी व्यवस्थित नाही वागलो, तुझ्या पासून सगळ्या गोष्टी लपुन ठेवल्या, उलट उत्तर दिले तुला, या पुढे अस होणार नाही, राग सोड ना प्लीज",... रोहित

शारदा ताई काही बोलल्या नाही

"आई तू ओरड आम्हाला, पण अस गप्प नको राहू" ,.. रोहित

"तू तुझ्या मना प्रमाणे करायच ठरवल आहे, ठीक आहे , तुम्ही दोघ सुखात रहा ",.. शारदा ताई

आतून बाई चहा घेवून आल्या, समोर टेबल वर चहा ठेवला, त्या आत गेल्या, रिया उठली तिने सगळ्यांना चहा दिला, आजी अण्णा झाले, रोहित ने घेतला, शारदा ताईं नी चहा घेतला, पिंकी ने घेतला, तिने स्वतः चहा घेतला

हुशार वाटते मुलगी, काम सांगायची गरज पडली नाही, सुंदर आहे खूप, गप्प आहे पण, उलट बोलत नाही, जे बोलाल ते ऐकुन घेते, घाबरली वाटत ही,... शारदा ताई विचार करत होत्या

चहा झाला..

" रोहित रिया, मला काही प्रॉब्लेम नाही, नीट रहा सोबत तुम्ही , या पुढे कुठलीही चूक व्हायला नको, विचार करून वागा, अजून पिंकीच लग्न बाकी आहे, बरेच नातेवाईक आहेत आपले त्यांना उत्तर द्याव लागेल, तुम्हाला नाही कोणाचा विचार पण मला करावा लागतो, पिंकी च नुकसान होता कामा नये, कोणत स्थळ मिळत तिला काय माहिती ",... शारदा ताई

हो आई,... रोहित विचार करत होता आई बरोबर बोलते आहे, मी पिंकी चा विचार केला नाही, तिच्या लग्नाला काही अडचण येणार नाही ना, म्हणून आई चिडली होती तर, बरोबर आहे तीच,

" शारदा काळजी करू नकोस होईल नीट, काही अडचण येणार नाही ",.. अण्णा

रिया गप्प होती, दोघांनी मिळून पाया पडल्या, शारदा ताई अण्णा यांनी आशीर्वाद दिला,

रिया आत मध्ये रूम मध्ये गेली, रोहित बाहेर बसला होता अजून आई जवळ

बापरे खूप लाडका दिसतोय हा आईचा, किती प्रेमाने बोलतो त्यांच्याशी, खूप बर वाटतय आपल्या रूम मध्ये,

राधा त्या रूम मधल सामान घेवून आली

"ही कोण आहे" ,.. शारदा ताई

"ती रिया ची बॉडी गार्ड",... रोहित

"कशाला हवी घरात बॉडी गार्ड",.. शारदा ताई

रोहित काही बोलला नाही

"काय सांगणार आई ला आता, आज एवढी शांत तिची सून दिसते आहे, आधी किती त्रास दिला मला तिने , सळो की पळो करून सोडल होत मला रियु ने, राधा मुळे बर झालं,

" कुठे रहाते ही",.. शारदा ताई

" खाली आहे तिची रूम, मी ऑफिस ला गेलो की रियु एकटी असते बरी आहे ही ",.. रोहित

हा रिया ला रियु बोलतो वाटत, खूप गुंतला हा तिच्यात, छान आहे मुलगी पण,

अण्णा रोहित ऑफिस बद्दल बोलत बसले होते,

आजी पिंकी कुठे गेल्या, रूम मध्ये गेल्या का, शारदा ताईंनी रूम मध्ये जावुन बघितल, दोघी नव्हत्या, कुठे गेल्या या?

रोहित आजी पिंकी कुठे गेल्या

"त्या आत असतिल माझ्या रूम मध्ये रियु सोबत",... रोहित

बापरे याच्या रियु चे खूप फॅन दिसताय सगळे, जो दिसेल तो हिच्या कडे आकर्षित होतो, त्या पुढच्या खोलीत बसल्या आत गेल्या नाहीत

आजी पिंकी रिया जवळ बसल्या होत्या, केस कसे केले रिया, आण मी वेणी घालून देते,

"बर झालं आई शांत झाली ना आजी ",.. पिंकी

"हो चांगली आहे शारदा, तू काळजी करू नकोस रिया" ,.. आजी

"पिंकी टिकली आहे का तुझ्या कडे मला दे ना",.. रिया

"आहे वहिनी, पण लाल नाहीत रंगीत आहेत" ,... पिंकी

"आजी रंगीत लावू का टिकली",.. रिया

"तुला जे हव ते लाव" ,... आजी

पिंकी गेली टिकली आणायला

"आजी तुम्ही माझ्या सोबत थांबल का हॉल मध्ये" ,.. रिया

"काय झालं रिया? ",.. आजी

" मला एकट वाटत, काही चुकलं तर सांगाल का ",... रिया

" हो मी आहे तुझ्या सोबत, कशाला काही चुकेल तुझ, हुशार आहेस तू",.. आजी

रात्री जेवायची वेळ झाली, अजूनही रोहित रूम मध्ये आला नव्हता, हा जसा मला विसरून गेला आहे, काय बोलताय एवढ काय माहिती? , नुसत आई जवळ बसुन आहे, याला आई हवी मला नको का? , किती दिवस झाले आई ला भेटून, काय करणार पण, जस रोहित बोलेल तस होईल, किती जरी आठवण आली घरच्यांची तरी उपयोग नाही,

काय करू, मी जावू का बाहेर, नको इथे ठीक आहे मी, आजी पिंकी रूम मध्ये गेल्या होत्या , रिया डायरी लिहीत बसली, बाई आल्या सांगायला स्वयंपाक झाला आहे, रिया बाहेर गेली, रोहित अण्णा शारदा ताईंशी बोलत होता अजून,

रियाने ताट करायला घेतले, शारदा ताई लांबून बघत होत्या, रिया त्या बाई च्या मदतीने व्यवस्थित काम करत होती, आजी पिंकी आल्या, पिंकी मदत करत होती, ताट तयार झाले, रिया आतून पाणी घेवून आली, तिने रोहित कडे बघितल,

आई अण्णा चला जेवायला,

सगळे येवून बसले, रिया उभी होती, सगळे जेवायला बसले, रिया पिंकी जवळ जेवायला बसली, आतल्या बाई जे हवं ते आणून देत होत्या

जेवण झालं रिया पिंकी आवरत होत्या, अजून एकदाही शारदाताई रिया शी बोलल्या नव्हत्या, रिया गप्प होती, काय करावं तिला सुचत नव्हतं, अजुन किती दिवस या माझ्याशी बोलणार नाहीत काय माहिती? , म्हणजे त्यांनी रोहित साठी घरात घेतल मला, पण काही बोलत नाही त्या माझ्याशी, काय अस?, माझ्या कडे बघत ही नाहीत त्या ,

रोहितला काय सांगणार आता, म्हणजे यांना मी पसंत नाही, नुसती अॅडजेस्टमेंट आहे ही, कठिण आहे, अजून परीक्षा आहेच माझी, मला जर यांच्या घरी जावं लागलं तर काय होईल, मोकळ बोलल छान राहिल तर काही वाटत नाही, पण हे असं टेन्शन सुचत नाही काही, या आता माझ्याशी बोलतील का.. की कधीच बोलणार नाही, काय माहिती?

"रियु इकडे ये",.. रोहित ने आवाज दिला

" बापरे काय करू आता",.. रिया जाऊन रोहित जवळ बसली

"रिया आम्ही उद्या निघतो आहे घरी जायला",.. अण्णा

" थांबा ना एक दोन दिवस",.. रिया

"हो अण्णा आई उद्या नका जावू परवा जा ",.. रोहित

"ठीक आहे.. तू ये आता रोहित सोबत तिकडे घरी ",.. अण्णा

" ठीक आहे",.. रिया

शारदा ताई अजूनही गप्पा होत्या, रिया काही बोलली नाही त्यांच्याशी, कधी इथून उठून आत जाऊ असं तिला झालं होतं, अण्णा खूप बोलत होते, ती तिथे बसली गप्पा ऐकत,

पिंकी बोलवायला आली, रिया आजीच्या रूम मध्ये गेली,

त्या तिघी बोलत होत्या, पिंकी हसवत होती त्यांना, शारदा ताई आत आल्या, रिया गप्प बसली,

"पिंकी किती वाजले? झोप आता" ,.. शारदा ताई

रिया उठून उभी राहिली,

"बस शारदा",.. आजी

"नाही आई झोपते मी, इकडे लाइट चालु दिसला म्हणून आली होती मी" ,... शारदा ताई गेल्या

"आजी पिंकी मी जाते",.. रिया रूम मध्ये आली, अजूनही रोहित आला नव्हता, आता रिया चिडली होती, बोलणार नाही मी याच्याशी, तिकडे त्या रूम मध्ये बोलत होता मी तुझ्या सोबत राहीन, इकडे आल्यावर नुसत माझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे हा, एवढ काय बोलताय ते?, काय सुरु आहे याच? , तिकडे बसुन आहे हा, मी सकाळ पासून एकटी आहे, मलाही कंटाळा येतो ",..

पाच मिनिटात रोहित आला, रिया गप्प बसली होती, तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होत, तिला राग आला आहे

" काय सुरु आहे रियु?, भेटली का आजी ",... रोहित

रिया बोलली नाही काही

"काय झालं रियु?",.. रोहित

"काही नाही ठीक आहे मी, आता का बोलताय",.. रिया

"काय झाल रियु? , राग आला का?, तुला माझ्या सोबत रहायच होत का? मी बाहेर बोलत होतो म्हणून राग आला का?, बोल ना",.. रोहित

"नाही मला एकटीला रहायला खूप छान वाटत, माझ्याशी बोलू नका अजिबात",.. रिया