©️®️शिल्पा सुतार
........
........
रोहित रिया जवळ आला,.." बोल ना काय झालं रियु?, तू नाराज आहेस का? तुला माझी आठवण येत होती का? बोलवुन घ्यायचा मला आत मग, मला वाटल तू आजी पिंकी सोबत आहेस ",...
" बाजूला सरका मला जावू द्या ",.. रिया
" आता काय प्रॉब्लेम आहे, येवू दे ना जवळ ? मी तुझ्या सोबत असलो तरी चिडतेस तू , नसलो तरी चिडतेस, काय हव आहे तुला रियु? ",.. रोहित
"काही नको मला, तुम्हाला सगळ हव, तुमच्या घरचे, तुमचे आई बाबा ,तुम्ही बाहेर जाणार मस्त राहणार, बायकोला एकदा घरात आणून कोंडल की झालं, राहते ती तिची तिची नीट, काही नको तिला, काही बोलू नका माझ्याशी",... रिया जावून झोपली
" मोठा प्रॉब्लेम दिसतोय हा, वातावरण तापलेल दिसतय, आता काय करू या, कोणी तरी खूप रुसल आहे, एक आयडिया होती माझ्या कडे, पण आता कोणाला बोलायचं नसेल माझ्याशी तर कस काय सांगणार",... रोहित
रिया ऐकत होती, ती उठून बसली,.." काय आहे आयडिया? ",..
" तू काही म्हटली का रियु? , मला वाटल झोपलीस तू ",.. रोहित
" काय आहे आयडिया? ",.. रिया
" जावू दे, तू रागावलेली आहेस ना", .. रोहित बाथरुम मध्ये चालला गेला
रिया ने परत झोपून घेतल, रोहित वापस आला त्याने बघितल रिया रडत होती
"अरे बापरे काय सुरु आहे हे रियु? काय झालं ",.. रोहित
" तुमच्या आई माझ्याशी बोलत नाही, फक्त तुमच्या साठी मला घरात घेतल, मला समजत नाही काय करू, कुठे बसु कोणाशी बोलू, त्यात तुम्ही नाही माझ्या सोबत संध्याकाळ पासून, तुम्ही काय बोलले होते मी तुझ्या सोबत राहीन, अगदी एकटी पडली मी ",.. रिया
" हो समजल ते मला, आई का अस करते काय माहिती? अग अण्णा महत्त्वाच बोलत होते, उठता आल नाही मला तिथून, जेवली का तू नीट? ",.. रोहित
" नाही मला नाही गेल जेवण, मला घरी जायच माझ्या, मला एक सांगा माझ्या आई बाबांनी माझ्याशी बोलायला नाही म्हंटल का? , ते म्हटले का अस की आम्हाला नाही भेटायच रिया ला ",.. रिया
" नाही अस काही बोलले नाही ते, काय झालं ",.. रोहित
" मला अस वाटल म्हणुन विचारल मी, कारण त्यांना माझी आठवण नाही येत का? एक ही फोन नाही, मुलगी कुठे आहे काही माहिती नाही त्यांना , बाबा तरी माझी आठवण काढत असतिल ",.. रिया परत रडत होती
" काय झालं रियु माझ्या घरचे बघून तुला तुझ्या घरच्यांची आठवण येते का ",.. रोहित
हो
"येतो मला तुझ्या बाबांचा फोन ",.. रोहित
रिया एकदम उठून बसली
" काय? बाबा काय बोलले? कसे आहेत ते? ते नाराज आहेत का माझ्या वर? ",.. रिया
" ते नाही माहिती मला, पण तुझी चौकशी करतात",.. रोहित
" त्यांना माहिती आहे का मी तुमच्या सोबत आहे, आणि आपल लग्न झाल आहे ते" ,.. रिया
" हो माहिती आहे ",.. रोहित
"कस काय",. रिया
"मी सांगितल",.. रोहित
" तुम्ही मला का नाही सांगितल मग ",.. रिया
"तू बोलत तरी होती का माझ्याशी तेव्हा ",. रोहित
" तरी सांगायच ना, मी कधी बोलणार त्यांच्याशी? प्लीज रोहित मला बोलायच आहे बाबांशी ",.. रिया
" उद्या करु आपण त्यांना फोन आता रात्र झाली",.. रोहित
" जागे असतिल ते प्लीज ",.. रिया
" नको आता रियु एवढी अधीर नको होवु थांब थोड ऐकत जा माझ ",.. रोहित
ठीक आहे, उद्या करु या
" संध्याकाळी चालेल का? मी ऑफिस हून आलो की करू फोन, त्या आधी मी बघतो जरा काय आहे परिस्तिथी मग ठरवू ",.. रोहित
"ठीक आहे, तुम्ही सांगाल तस ",.. रिया खुश होती
त्यांचे फोन टॅप केले असतिल तर अजून प्रॉब्लेम येईल, कस समजत नाही रियुला, फोन करता येणार नाही अजून,
" तुझ्या साठी आणु का काही खायला आतून ",.. रोहित
"नाही मी झोपते ",.. रिया
" टेंशन नको घेवू रियु होईल नीट, बोलतील तुझ्या घरचे आणि आता आई ने आपल्याला घरात घेतल तेच खूप आहे, बोलेल ती ही तुझ्याशी ",.. रोहित
" एक दोन दिवसांनी जातील ते, कधी बोलणार माझ्याशी, तो पर्यंत राग जाईल का त्यांचा",.. रिया
" तू बोल स्वतः हून",.. रोहित
" बोलली मी थोडस आईंशी,.. पोळी घ्या, भाजी देवू का, पण त्यांनी माझ्या कडे बघितल ही नाही, मला भिती वाटते उद्या तुम्ही ऑफिसला गेल्यावर मला त्या ओरडल्या तर",.. रिया
" नाही ओरडणार, बोलली काही तरी घाबरायचं नाही ",... रोहित
रोहित रिया जवळ येवून बसला,.." कुठे झोपणार या बाजूने की त्या बाजूने ",
" तुम्ही इथे झोपणार ",... रिया
" हो हे माझ रूम आहे, माझा बेड आहे, माझी बायको आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का ",.. रोहित
" नाही तुम्हाला भीती वाटते ना माझी? , कराटे येतात तुम्हाला ", .. रिया
" हो मग, तिकडे कुठे जागा होती, भीती वाटली मला, तू एवढी जवळ होती तिथे बापरे, म्हणून सकाळी मिठी मारली होती तुला मी ",.. रोहित
रिया खूप हसत होती,.." छान कारण सांगितल ",
" आताही भीती वाटते मला, झोप मग रियु, की येते माझ्या जवळ ",.. रोहित
रोहित.... प्लीज
" कधी देणार होकार मला ",.. रोहित
" तुम्ही झोपा ",.. रिया
" सांग ना रियु",.. रोहित
" बर सगळ ठीक असल आणि मी उद्या तुला मी फोन वर बोलू दिल तर मला काय मिळेल रियु ",... रोहित
"आहेच का तो पॉईंट अजून",.. रिया
"हो मग विचार करून ठेव उद्या सकाळी सांग मग मी ठरवतो",. रोहित
" प्लीज रोहित अस नाही ",.. रिया
"बर ठीक आता रडारड नको उद्या ठरवु" ,.. रोहित
"म्हणजे मी रडते का सारख ",... रिया
"मग कोण आहे इथे अजून?",.. रोहित
"आयडिया काय होती ती, तुम्ही काही तरी बोलत होता ना",... रिया
" हो रियु, ऐक ना, तू माझ्या सोबत डिनर डेट वर येशील का",.. रोहित
" हो कुठे ,.. रिया
"आपल्या टेरेस वर ",... रोहित
"बोर... मला वाटल खूप छान सांगताय काही तरी",.. रिया
"अरे मग हे छान आहे ना, छान तयार हो माझ्यासाठी, माझ्या सोबत वेळ घालव, मजा येईल ऐक माझ",.. रोहित
"आणि घरचे कुठे असतिल तेव्हा",.. रिया
"ते कुठे राहतात इथे, ते जातील घरी, मग आपण दोघ इथे",..रोहित रिया कडे बघत होता, रिया लाजली,
बापरे म्हणजे हे नात पुढे न्यायच अस बोलतो आहे रोहित, कोणी नसेल घरी, मी नाही बोलल डिनर डेट साठी तरी हा थोडी ऐकणार आहे , काय करू? , सांगू का याला आधी आई बाबांना भेटणार मग डिनर डेट, तो कस मला ब्लॅक मेल करतो नेहमी, अस कर मग तस होईल वगैरे.
"काय विचार करते आहेस रियु",.. रोहित
"काही नाही रोहित, मी नाही येणार डिनर डेटवर",.. रिया
"माहिती होत, घाबरली का? ",.. रोहित
नाही..
"मग काय? ",.. रोहित
"काही नाही, माझ्या मना प्रमाणे झाल तर येईल",.. रिया
"काय ते आता",.. रोहित
रिया गप्प
"बोल बाई बोल",.. रोहित
"मला आई बाबांना भेटायच",.. रिया
" ते शक्य नाही रियु, कितपत धोका आहे ते बघाव लागेल",.. रोहित
" मग मी नाही ऐकणार",.. रिया
" अस करतात का रियु? ठीक आहे मी प्रयत्न करेन, मग हो ना , तेव्हा डिनर डेट नाही होकार द्यायचा मला ",... रोहित
"ठीक आहे",.. रिया लाजली होती
" कुठे आहे तुमच दुसर घर",.. रिया
" तुझ ही घर आहे ना आता ते रियु, तिकडे तुझ्या मामाच्या गावाला ",.. रोहित
"तिकडे राहतात का घरचे",.. रिया
हो..
" अच्छा, झोपते मी ",.. रिया
" डिनर डेट वर यायच माझ्या सोबत आणि आई बाबांना फोन केला तर मला काय मिळेल? या दोन गोष्टींचा विचार करून ठेव ",.. रोहित
"मी पण एक अट टाकली आहे ते लक्ष्यात ठेवा ",.. रिया
" हो पण नाही जमलं तर नाराज व्हायच नाही ",... रोहित
"रोहित... अस नाही, तुमच्या साठी काही अश्यक नाही, जर मी नाही बोलली तर डिनर डेटला",.. रिया
"तुझ मन कस वळवायच ते मला चांगल माहिती आहे रियु, अस ही तू माझ्या जवळ माझ्या रूम मध्ये आहे, जरा सांभाळून रहा ",.. रोहित रिया कडे बघत होता, रिया लाजली, झोप आता रियु, किती बोलतेस तू,
रोहित झोपला, रियाला झोप येत नव्हती, ती विचार करत होती काय बोलणार मी आई बाबांशी, खरच रोहित करू देईल का मला फोन? , होईल का आमची भेट?, की काही प्रॉब्लेम आहे, ते सगळे ठीक असतिल ना? की आई बाबा चिडलेले असतिल माझ्यावर, काय माहिती? , आई बाबा आज खूप आठवण येत आहे, रिया रडत होती, आई बाबा मला भेटायच तुम्हाला, टिना... आजी..
सकाळी रिया उठली, पण बाहेर जायची तिची हिम्मत होत नव्हती, ती आवरून रूम मध्ये बसली होती, रोहित उठला,.. "काय झालं रियु?",
"काही नाही",.. रिया
"अशी का बसलीस इथे? ",... रोहित
"काही नाही आता आंघोळ झाली आता जाते मी बाहेर",... रिया
" हो मला लगेच जायच आहे माझा चहा नाश्ता तयार आहे का बघ ",.. रोहित
हो..
रिया बाहेर आली, कोणी नव्हत बाहेर, चला बर झाल, तिने बघितल चहा नाश्ता रेडी होता, ती किचन मधे उभी होती, बाहेर गेलो त्या आई आल्या तर, रोहित म्हणतो तू बोल आधी, काय बोलणार पण, मी बोलली तरी त्या उत्तर देत नाहीत, जावू दे असेल राग अजून मनात, होईल ठीक,
रोहित चहा साठी आला,.. "काय झालं कोणी उठल नाही का अजून",.. तो त्यांना बोलवायला गेला
सगळे, आले रिया नाश्ता घेवून आली, ते छान बोलत होते, रिया गप्प होती
चल वहिनी,
"पिंकी तू बस मी चहा घेवून येते" ,.. रिया
शारदा ताई रिया कडे बघत होत्या, रिया घाबरली बहुतेक मी पिंकी ताई बोलायला हव होत का? , मी बोलली होती आधी पिंकीला ती बोलली पिंकी बोल, आता ह्या बोलतील मला,
रिया चहा घेवून आली, सगळ्यांना चहा दिला,
"बस रिया तू",.. आजी बोलल्या,
रिया बसली, ती विशेष खात नव्हती, रोहित बघत होता,.. "रियु काय झालं, ठीक आहे ना तू? " ,
सगळे रिया कडे बघत होते,
"काय झालं वहिनी, खात का नाही? " ,... पिंकी
"ठीक आहे मी ",.. रिया
"घाबरू नको, सगळे घरचे आहेत, काही प्रॉब्लेम नाही, कोणाला, कोणी काही बोलाल का तुला? " ,... रोहित
रिया मानेने नाही बोलली,
"ठीक आहे, आता मोकळ रहा",.. रोहित
रोहित काय अस करतो? सगळ्यां समोर का अस विचारतो? बापरे याला काही सांगायला नको अस आहे
चहा घेवून झाला, आई अण्णा मी ऑफिसला जावून येतो,
ठीक आहे.. ते समोर सोफ्यावर जावून बसले
रोहित आत गेला, त्याची बॅग घेवून आला
आजी पिंकी बाय, रियु येतो मी
शारदा ताई अण्णा कडे बघत होत्या, बायको लाडकी आहे ह्याची, अण्णा हसत होते, ठीक आहे शारदा त्याची बायको आहे ती, मोकळ बोलतात राहतात आज कालची मुल
रिया रोहित कडे बघत होती, तो ऑफिसला निघून गेला
"काय झालं रिया ठीक आहेस ना तू? अशी काय घाबरून गेलीस",... आजी
"काही नाही आजी मी ठीक आहे" , ... रिया
"बोल सगळ्यांशी अशी गप्प राहू नको",.. आजी
"आजी आई बोलत नाही वहिनी शी म्हणून गप्प असेल ही",... पिंकी
नाश्ता झाला रिया आवरत होती
शारदा ताई अण्णांशी बोलत होत्या, अण्णा पेपर वाचत होते, पिंकी फोन वर बोलत होती, रिया आजी जवळ बसली होती
अण्णा गोळ्या घेत होते,.." पिंकी पाणी आण",
रियाने पाणी दिल
" चहा हवा का अण्णा? आई तुम्हाला हवा का चहा? ",.. रिया
हो... शारदा ताई पहिल्यांदा बोलल्या
"थोडा ठेव बेटा",.. अण्णा
रिया आजी कडे बघत होती, आजी खुश होत्या, रिया ने चहा करून आणला, दोघांना आजींना चहा दिला, ती तिथे उभी होती
"पुढे शिकणार आहेस का तू बेटा",.. अण्णा
"अजून रिजल्ट आला नाही, बघु रोहित काय म्हणताय, ते हो म्हटले तर घेईन अॅडमिशन",.. रिया
"शिक तू पुढे",.. अण्णा
" हो अण्णा",.. रिया
अण्णा आत गेले
रिया आजी शारदा ताई होत्या तिथे
"साड्या नाहीत का तुला रिया?",.. शारदा ताई
"नाही आई",.. रिया
" ठीक आहे आपण घेवून येवु मी घरी गेली की ब्लाऊज शिवून घेईन तुझे ",.. शारदा ताई
हो..
" टिकली लावत जा ",. शारदा ताई
"सामान नाही तिच्याकडे शारदा , रोहित बाहेर जावू देत नाही",.. आजी
"ठीक आहे मी आणून देते काय काय हव आहे ",.. शारदा ताई
" हो सांगते ",.. रिया
"दागिने सोन्याचे आहेत का तुझे मंगळसूत्र बांगड्या",.. शारदा ताई
हो..
रिया ला आता बर वाटत होत, शारदा ताई चांगल्या आहेत, पिंकी ने तिने मिळून लिस्ट तयार केली काय काय हव ते सांगितल
" वहिनी तुला एकदाही साडीत बघितलं नाही मी ",.. पिंकी
" नाहीच आहे साड्या माझ्याकडे",.. रिया
" ती एक होती ना साडी दादाने दिलेली",.. पिंकी
"अरे हो मी विसरूनच गेली होती ती खूपच पार्टी वेअर आहे, घरात घालण्या सारखी नाही",.. रिया
"जाऊदे आता आई घेऊन येईल तुला साड्या, ड्रेस साडी बाकी सामान ",.. पिंकी
" रिया इकडे ये आम्ही दोघेही उद्या शारदा सोबत घरी जात आहोत, नीट रहा ",.. आजी
" तुम्ही दोघी का जात आहात? इथे राहा ना माझ्या सोबत",. रिया
"माझा रिझल्ट आहे वहिनी, पुढची ऍडमिशन घ्यायची आहे",.. पिंकी
" मी जाते थोडे दिवस, नंतर परत येईल तुझ्याजवळ " ,..आजी
" चालेल आजी",.. रिया
" आता बराच ठीक झाला आहे रोहित चिडत नाही ना",.. आजी
"नाही आजी चांगले वागतात ते ",.. रिया
शारदा ताई आतुन आल्या त्या आत मध्ये स्वयंपाक काय करायचा ते सांगत होत्या,... "आम्ही जातो पुढे रिया, मग तुम्हाला दोघांना बोलणार आहोत, घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे करून घेऊ रिसेप्शन द्यावे लागेल बाकी लोकांसाठी ",..
रिया लाजली होती
" अरे लाजतेस काय, छान दिसतेस तू",.. आजी शारदा ताई हसत होत्या
" तेव्हा साड्याच नेसावे लागतील तुला, घरातही पाहुणे असतील ",..
"हो आई",.. रिया
"वहिनी तुला येते ना साडी नेसता",.. पिंकी
हो...
" पिंकी आणि रिया तुम्ही दोघी जरा एकमेकींना तिथे पाहुण्यांसमोर अहो जाहो करा, पिंकी तू पण आहो वहिनी म्हण आणि तू पण पिंकी ला पिंकी ताई बोल",.. शारदा ताई
" हो आई ",.. रिया
"अगं आई वहिनी मला पिंकी ताई बोलत होती मीच बोलले तिला कि मला फक्त पिंकी बोल ",.. पिंकी
" ते ठीक आहे, पण गावाकडे नाही चालत",.. शारदा ताई
" मी लक्ष ठेवेल आई",.. रिया
" तुझ्या घरचे कुठे आहेत? ",.. शारदा ताई
"माहिती नाही आई, मी इथे आल्यापासून बोलली नाही त्यांच्याशी",.. रिया
" का बरं ते चिडले आहेत का? ",.. शारदा ताई
"बहुतेक असतिल नाराज, मला काही माहिती नाही, रोहित बोलतात माझ्या आई बाबांशी, मी बोलली नाही कधीची ",.. रिया
" बोलायच का तुला फोन वर",.. शारदा ताई
"नको रोहित ओरडतील , भीती वाटते, त्यांनी नाही सांगितल, काही तरी कारण असेल म्हणून ते नाही बोलत असतिल ",.. रिया
" रोहित ओरडेल तुझ्या वर? शक्य नाही वाटत, किती चांगला आहे तो",.. शारदा ताई
चांगले तर आहेत रोहित पण मी नीट वागली तर, नाही तर बापरे किती खडूस आहे , यांना काय माहिती किती रडवल आहे मला, एकदम डेंजर आहेत ते, चूक झाली तर मला डायरेक्ट घराबाहेर काढतील, नको त्या पेक्षा त्यांना राग येईल अस मला काही नाही करायच, ह्या चालल्या जातील, रोहितच्या ताब्यात मला रहाव लागेल, फोन नको करायला जो पर्यंत रोहित हो बोलत नाही तो पर्यंत, मला चूक करायची नाही,
" आई माझी चूक झाली, मला समजल नाही काही कस वागावं , तुमच्या मनात नाही ना काही, मी यापुढे विचार करून वागेल",.. रिया
"नाही माझ्या मनात काही नाही, मला पिंकी साठी काळजी वाटत होती ",.. शारदा ताई
ठीक आहे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा