हे प्रेम आहे की काय?... भाग 32
©️®️शिल्पा सुतार
........
........
रोहित जरा वेळ आराम करत होता , रिया उठली रोहितला एवढ्या जवळ झोपलेल बघून ति पटकन उठून बसली, पण बर झालं हा आला , तिने आवरून घेतल, काय करू जावू का किचन मधे, नको रोहित नाही बोलाल, उठला तर ओरडेन तो, मी आता कुठे जाणार नाही,
रोहित उठला किती वाजले ते बघितल, रिया समोर बसली होती,.. "चहा नाश्ता करून घे रिया आटोप लवकर",
"जावू का किचन मधे",.. रिया
हो..
रिया रोहितने नाश्ता केला
रिया रोहित रूम मध्ये आले, रोहित तयार होत होता,
" कुठे गेला होता तुम्ही रात्रभर रोहित? या पुढे मला अस एकटीला सोडून जावू नका ,मला भिती वाटत होती, घरी गेले होते का तुम्ही? " ,.. रिया
रोहित काही बोलला नाही,
रिया त्याच्या जवळ आली,.. "रोहित मी काय म्हणते आहे? , काही झालं आहे का? " ,
" काही नाही रिया, आजीच्या रूम मध्ये देव आहेत ना? ",.. रोहित
हो..
चल तिकडे..
रोहित रियाने देवाला नमस्कार केला,
रोहितने रियाला जवळ घेतल, तो तिच्या कडे बघत होता,
"काय झालं रोहित? , तुमच्या डोळ्यात पाणी आहे का? , रोहित... बोला ना ",.. रिया
काय सांगणार हिला, इंस्पेक्टर साहेब बोलले जास्त सांगू नका, तिकडे जाण्याआधी गोंधळ होईल, पिंकी ला ते लोक अस सोडणार नाही, त्या आधी त्यांच्या वर हल्ला केला तर काय होईल पिंकीच माहिती नाही, रियाला दिल तर पिंकी बाहेर येईल, तीच हवी त्यांना जरा ते लोक जरा शांत होतील मग बघता येईल त्यांच्या कडे, नको सांगायला काही रियाला,
रोहितने तिचा हात धरला,.. "चल रियु आपण बाहेर जातो आहोत",
"कुठे रोहित? पण तुम्ही मला या घरा बाहेर जावू देत नाही ना? मग आता कुठे जायच? ",.. रिया
" रियु, अजिबात प्रश्न विचारू नकोस" ,.. रोहित
रिया रोहित निघाले, शेत छान आहे हे, त्या दिवशी मी या झाडा पर्यंत आली होती पळून, बरच लांब आहे गेट, बरेच लोक काम करतात इथे, रिया सगळीकडे बघत होती, बर्याच दिवसांनी ती बाहेर आली होती, पण कुठे जातो आहोत आपण? ......
"बाहेर किती छान वाटत ना रोहित, काही सरप्राईज आहे का? या साठी गेले होते का काल तुम्ही बाहेर, काय झालं रोहित सांगा ना? तुम्ही का नाही बोलत माझ्याशी?",... रिया
रोहित गप्प होता, टेंशन मध्ये होता
" तुम्ही गाॅगल का घातला आहे आज? सांगा ना? छान दिसतो तुम्हाला ",.. रिया
रोहित गप्प गाडी चालवत होता,
" आज ड्रायवर नाही सोबत, मी किती दिवसांनी आज बाहेर येते आहे, खूप छान वाटत बाहेर",.. रिया
गार वार्याने रियाचे केस उडत होते, ते उडून तिच्या चेहर्यावर येत होते, ती उगीच ते मागे करत होती, खूप सुंदर दिसत होती ती, रोहित तिच्या कडे बघत होता
"केस नीट बांध रियु, ओढणी नीट घे जरा, आजुबाजूला काय होतय तिकडे लक्ष देत चल, अलर्ट रहा ",... रोहित
"काय झालं रोहित? सांगा ना? काही झालं का , तुम्ही चिडले का? ",.. रिया
रोहित उत्तर देत नव्हता
गाडी एका जुन्या फॅक्टरी जवळ आली, किती दाट झाडी आहे इथे बापरे, इथे काय काम असेल रोहितच? , विशाल तर नसेल ना इथे?
गेट वरून सिक्युरिटी गार्डने आत फोन केला, त्याने गेट उघडल
"काय आहे हे रोहित? कुठे आलो आपण? मला भिती वाटते इथे? आपण घरी जावू वापस प्लीज नको ना इथे",.. रिया
गाडी आत गेली एका बिल्डिंग जवळ थांबली,.. "उतर रियु आत जा",
रिया आश्चर्याने रोहित कडे बघत होती,.. "काय आहे हे? कुठे आलो आपण? रोहित तुम्ही येणार का सोबत? ",.
"रिया आत जा विशाल आहे आत",.. रोहित
" मला नाही जायच आत, रोहित मला तुमच्या सोबत राहायच आहे , तुम्ही मला इथे का सोडता आहात? ",.. रिया
" प्लीज रिया जा आत",.. रोहित
"नको ना अस रोहित, मी तुमच्या जवळ राहते, मी काही त्रास देणार नाही, तुम्ही म्हणाल ते ऐकेन, आई बाबा कडे जायचा हट्ट धरणार नाही, मला नाही जायच विशाल कडे, मला घरी जायच आहे, तुम्ही काय बोलले होते तुम्ही मला अस इकडे विशाल जवळ सोडणार नाही, मला काहीही होवु देणार नाही, आता का अस करताय? , जरा माझा विचार करा, जो जस वाटेल तस वागतोय माझ्याशी, मी जाणार नाही",... रिया
" रिया खाली उतर", ... रोहित गाडीतून उतरला त्याने रियाच दार उघडल, तिला हाताला धरून खाली उतरवल, रिया उतरत नव्हती , ती रडवेली झाली होती, तिने रोहित ला मिठी मारली,.." नका अस करु, प्लीज मी नाही जाणार" ,... " तुम्ही प्रेम नाही करत का माझ्या वर? का अस इकडे घेवून आले? , काय प्रॉब्लेम आहे, काय झालं रोहित? प्लीज सांगा मला महिती आहे तुम्ही हे मनाविरुद्ध करता आहात",.. रिया
"कस काय सांगू हिला समजत नाही , त्यांनी पिंकीला किडनॅप केल रियु, तुला दिल की ते पिंकीला वापस करतील, त्यांनी तशी अट घातली आहे, आत जा रियु, पिंकी येईल आता बाहेर, मी तुला काही होवू देणार नाही रियू, पण थोड्या वेळा साठी आत जाव लागेल ",.. रोहित
रिया एकदम गप्प झाली, बापरे पिंकी आहे या लोकांच्या ताब्यात, तिला काही झाल तर .. " ठीक आहे मी आत जाते, काळजी करू नका",...
" रोहित आत कोण आहे मला माहिती नाही, पुढे काय होईल काही माहिती नाही , मला परत चान्स मिळेल की नाही माहिती नाही, आता सांगते माझ तुमच्या वर खूप प्रेम आहे, मला तुमच्या सोबत रहायच आहे ",.. रिया
रिया गाडीतून उतरली ,.. येते मी रोहित,
" काळजी घे रियु मी आहे इथे बाहेर",..रोहितने पुढे होवुन तिला मिठी मारली, रोहित सोडत नव्हता तिला, कसतरी ती बाजूला झाली, दोघांच्या डोळ्यात पाणी होत, रिया आत निघून गेली, मोठ गेट उघडल, पाच मिनिटांनी एका बाजूने पिंकी बाहेर आली, रोहित बाहेर उभा होता, पिंकीला बघून त्याला बर वाटल , पिंकी गाडीत बस,
सॉरी दादा..
" तू ठीक आहेस ना पिंकी, काही केल तर नाही ना या लोकांनी तुला? ",.. रोहित
"नाही मी एकदम ठीक आहे दादा, दादा मला माफ कर मी तुझ ऐकायला हव होत, दादा तू रडतो आहेस का? , मला कस काय सोडले या लोकांनी दादा? ",... पिंकी
"दादा वहिनी कुठे आहे दादा? बोल" ,...
" रिया ला देवून तुला सोडवल" ,.. रोहित
पिंकी रडत होती,.." दादा गाडी थांबव, दादा मी जाते आत वाहिनीला अस नको करू",
"पिंकी तू घरी जा आता जे होईल ते, मी सोडवून आणेन रियुला, पण तरी काळजी वाटते आहे मला" ,.. रोहित
"हो तस होतच, खूप डेंजर लोक आहेत हे ",.. पिंकी
गाडी फॅक्टरी बाहेर आली, थोड दूर गेल्यावर एक कंपाऊंड मध्ये गाडी शिरली,
" पिंकी या पोलिस ताई सोबत घरी जा मी येतोच, रियू आत आहे, घरी गेली की फोन कर",... रोहित
" मी थांबते इथे",.. पिंकी
" नाही इथे धोका आहे जा तू, आई अण्णा काळजीत आहेत ",.. रोहित
पिंकी गेली, रोहित ने अण्णा ना फोन करून सांगितल
" रिया कडे लक्ष दे रोहित, ती बाहेर आली की घरी या लगेच",.. अण्णा
"ठीक आहे अण्णा, असच होवू दे अण्णा, रिया लगेच सापडू दे ",.. रोहित
"इंस्पेक्टर साहेब ऑल सेट?",..
हो..
"आटपा माझी बायको आहे आत",.. रोहित काळजीत होता, या लोकांचा काटा काढायचा आहे मला, त्रास नको परत
रिया आत गेली, मोठा हॉल होता तिथे ती उभी होती, नंतर तिला आत बसायला सांगितल, ती बराच वेळ रडत होती
रिया विचार करत होती काय हे? मला अस व्हाव का? , रोहित आवडतो मला, याला सोडून जायच म्हणजे काय? काही वेळेस ही शेवटच भेट नसेल ना आमची, अस नाही होणार, उगीच काहीही विचार करते मी, रोहित नक्की बाहेर असतिल, काय होईल पुढे?
थोड्या दिवसा पुर्वी मला विशाल सोबत रहायच होत म्हणुन रोहित पासून पळत होती मी, आज मला रोहित हवे आहेत, खूप छान आहेत ते, होईल का सगळ नीट,
जरा वेळाने दार वाजल विशाल आत आला, तो हसून रिया कडे बघत होता,.." आपण जिंकलो रिया, आज तू माझ्या सोबत आहे, तो रोहित हरला ",..
रिया गप्प होती, किती मूर्ख होती मी आधी याच्या सोबत होती, किती घाण आहे हा,... "शट अप विशाल किती घाण कामं करतो तू, तुला काय वाटल मला काही माहिती नाही का, बोलू नको माझ्याशी, मला इथे एक मिनिट थांबायचा नाही, मला घरी जायच आहे ",.
" या ठिकाणी यायचा रस्ता आहे रिया, जायचा नाही, कुठे जाणार आहेस तू? तुझे आई बाबा बोलत नाही तुझ्याशी, नवर्याने स्वतः तुला इथे आणून सोडलं माझ्याकडे , तो गेला ही, एवढ त्याच प्रेम तुझ्यावर ",
" रोहित विषयी काहीही बोलायच नाही मी आधीच सांगते, त्यांच किती प्रेम आहे माझ्या वर हे मला माहिती आहे ",.. रिया
" अहो बोलते का रोहित ला, छान, अरे वा गळ्यात मंगळसूत्र, लग्न केल का तू रिया? त्या रोहित ने जबरदस्ती केल असेल तुझ्याशी लग्न, माहिती आहे तो कसा आहे डेंजर ",.. विशाल रिया कडे बघत होता
रियाने त्याचा कडे रागाने बघितल, ओढणी नीट केली
" ये बस इकडे आरामात रिया, टेंशन घेवू नको, छान दिसते तू आधी सारखी ",.. विशाल
" मी कोणाची तरी बायको आहे विशाल, अस बोलू नको",.. रिया
" किती बोर करते तू यार रहा आरामात ",.. विशाल
" मला जावू दे विशाल, तूम्हा लोकांमुळे किती त्रास झाला आम्हाला ",.. रिया
"तुला जावू देण्यासाठी इथे बोलवलं का? तुझ्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आम्ही, अस थोडी जावू देणार, तूझ्या साठी मंगेश भाई पागल झाला आहे ",.. विशाल
" किती घाण घाण बोलतो तु विशाल, कोण मंगेश? ",.. रिया
" त्याला तू हवी आहे, तुझ्या वर प्रेम करतो तो, काहीही करायला तयार आहे तो तुझ्या साठी ",.. विशाल
म्हणजे?
" मला अजिबात तुझ्यात इंट्रेस्ट नाही रिया, आधी नव्हता , मंगेश भाईला तू हवी आहे म्हणून इतकी रिस्क घेतली , एकदा त्या मंगेश भाई कडे तुला दिल की झाल काम माझ, मग काहीही करा तुम्ही, ते मंगळसूत्र काढून दे इकडे जरा",.. विशाल
" नाही अजिबात नाही माझ्या जवळ यायच नाही विशाल मला हात लावायचा नाही, किती घाण मुलगा आहेस तू, किती मोठी चूक झाली माझी, मी जाणार आहे इथून",... रिया निघाली,
विशालने तिला अडवल, हात धरला, कोण आहे तिकडे, हा दरवाजा लावा, रिया हात सोडवून घेत होती, शेवटी तिने त्याला जोरात नख मारला, विशालने तिला मारायला हात पुढे केला, मंगेश ने तो हात वरती धरला,.." काय चाललय विशाल? तुझी हिम्मत कशी झाली रियाला मारायची, नीघ इथून" ,
विशालने तिचा हात सोडला, तो आत गेला, मंगेश रिया कडे बघत होता, फोटो पेक्षा जास्त सुंदर आहे ही, काय छान दिसते आहे, तिला हा ड्रेस शोभतो आहे, केस लांब डोळे बोलके, पण रडली आहे खूप ही,.. "सॉरी रिया विशालच्या वतीने मी माफी मागतो, ये इकडे बस",
" मला घरी जायच आहे तुम्ही कोण?" ,... रिया
"मी मंगेश आज पासून तू माझ्या सोबत राहणार आहे",..
रिया घाबरली
"घाबरायचं नाही रिया, मी काहीही करणार नाही तुला, फक्त मी बोलेल ते तू शांत पणे ऐकायच, तुझ लग्न झाल का? ",.. मंगेश
हो...
कधी?
" आता थोड्या दिवसा पुर्वी",... रिया
" ते मंगळसूत्र काढ",... मंगेश
" नाही,.. का अस सांगताय? ",.. रिया
" बर ठीक राहू दे",.. मंगेश
"मला घरी जायचं माझ्या ",.. रिया
" हो जावू, तू जेवली का जेवून घे ",.. मंगेश
" नाही मला काही नको मी जाते",.. रिया उठली रूमच दार बाहेरून बंद होत, रिया दार वाजवत होती, प्लीज मला जावू द्या
" रिया इकडे ये काही उपयोग नाही, त्रास करून घेवू नको, कोणी नाही येणार तुझ्या मदतीला, मीच आहे इथे, मला सांग मी ऐकेन तुझ ",.. मंगेश
" मला घरी जायच ",.. रिया
" ते शक्य नाही रिया तू माझ्या सोबत राहशील का बघ एकदा माझ्या कडे मी आवडतो का तुला" ,... मंगेश
"काहीही काय बोलताय तुम्ही",.. रिया
मंगेश उठला रिया जवळ आला, रिया घाबरली, लांब थांबायच माझ्या पासून आधीच सांगते, हेल्प मी, कोणी आहे का? ....
" मला आवडते तू, माझ प्रेम आहे तुझ्या वर, तू म्हणशील ते करेन मी, राणी बनवून ठेवेल, इकडे ये , इथे नाही फाॅरेनला राहू आपण, हे बघ मी काय आणल तुझ्या साठी रिया" ,... मंगेश
"ज्वेलरी बॉक्स होता त्यात डायमंडचा नेकलेस होता हे मंगळसूत्र काढ हा हार घाल ",.. मंगेश
" नाही माझ्या जवळ यायच नाही, माझ लग्न झाल आहे, मी बायको आहे कोणाची तरी, मला जावू द्या ",.. रिया
" मला काही प्रॉब्लेम नाही लग्न झालं असल तरी, मला तुझ्या सोबत रहायच रिया , तुझा फोटो बघितल मी प्रेमात पडलो तुझ्या ",.. मंगेश
रिया खूप घाबरली होती, काय हे? मला रोहित कडे जायच आहे, काय करू? , कोण आहे हा?
" रिया इथून तुझी सुटका होणार नाही, माझ्या सोबत रहायची आहे तुला",.. मंगेशने पुढे होवुन रियाचा हात धरला
खूप नाजूक आहेस तू, बापरे बाहुली सारखी, रिया त्याला मारत होती, चिडू नको एवढी, रिया शांत हो,
दार वाजल, मंगेश चिडला,.. "काय आहे मी सांगितल होत मला डिस्टर्ब करू नका",
तो माणूस काहीतरी सांगत होता, मंगेश त्याच्या सोबत निघून गेला, थोड्या वेळ रिया एकटी होती, काय आहे हे? , इथून बाहेर पडायला हव, रोहित आहेत बाहेर की गेले असतिल, नाही ते करतील काहीतरी, पिंकी ला सोडल असेल का यांनी? काय होईल? पिंकी इथे आहे का कुठे? काही समजत नाही, काय करू? कोण आहे हा माणूस? तो का मला अस करतोय, मी नाही राहणार याच्या सोबत, दार बंद होत, बाहेर निघायला हवं इथून
मंगेश बाहेर आला,.. "काय झाल विशाल?",
"एकाने आता बाहेर पोलिस बघितले" ,.. विशाल
"टेरेस वर जावुन बघा",.. मंगेश
"एक माणूस जावून आला",..
"वरती आपल एक माणूस पडलेला आहे",..
कसा काय?
"हल्ला झाला असेल त्याच्या वर",..
"म्हणजे काय? कोणी आत शिरल का इथे",.. मंगेश
"मला वाटतय भाई तुम्ही इथून निघा, मी बघतो इथे थांबतो" ,.. विशाल
" ठीक आहे",.. मंगेश रियाच्या रूम मध्ये, आला त्याने तिचा हात धरला, तिला ओढत गाडी कडे नेल,
विशाल पळत आला, पुढच्या गेट वर पोलिस आले,
" कुठे आपले लोक ",.. मंगेश
" माहिती नाही एक एक करून खूप लोक संपवले आपले या लोकांनी, मागच्या गेट ने निघा तुम्ही भाई, हिला सोडा इथे, ही सापडली तर पोलिस काही करणार नाही, हिच्या डोक्यावर बंदूक ठेवली तर गप्प होतील सगळे " ,.. विशाल
"नाही अस नाही करायच, मला रिया हवी" ,.. मंगेश
"भाई जीव महत्वाचा आपला , द्या तिला इकडे, नाहीतर पुढच्या गेट ने पाठवून द्या हिला, तुम्ही मागून निघा",.. विशाल
"नाही रियाला अस करणार नाही मी " ,.. मंगेश
"भाई धोका आहे तुम्हाला" ,... विशाल
" हिच्या सोबत राहायच आहे मला, चल तू बस गाडीत जावू निघून आपण, मंगेशने विशाल ला बंदूक दाखवली, आटोप विशाल गाडी काढ ",.. मंगेश
रिया घाबरली होती काय हे बंदूक वगैरे, लागल तर कोणाला, नक्की रोहित पोलिसां सोबत असतिल, माझी होईल सुटका,
गाडीत मंगेश बसला, रिया मध्ये, विशाल गाडी चालवत होता, गाडी मागच्या गेट कडे निघाली, सरळ रस्ता होता, आजुबाजूने खूप झाड होते, कुठे जायला जागा नव्हती, समोर गेट बंद होत, मागे पोलीस येत होती,
रिया अलर्ट होती, काय काय बघाव लागणार अजून? , रोहित कुठे आहे? , कुठे नेतात मला, माझा हात हा मंगेश का सोडत नाही, खरच पळण्यात यशस्वी झालो तर आम्ही,
समोर गेट उघडायला कोण जाईल या वरून मंगेश विशालच भांडण झाल
"भाई गेट उघडा मी आधी बोललो होतो रियाच्या नादी लागु नका, धोका आहे आपल्याला, काय होईल आता?, आपले किती कमी माणस जिवंत आहेत , सपोर्ट ला कोणी नाही, उघडा गेट लवकर",.. विशाल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा