हे प्रेम आहे की काय?... भाग 35 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
........
........
वाचकांचे खूप खूप आभार, खूप प्रेम दिल तुम्ही
........
........
सकाळी मोना रिया शॉपिंग साठी गेल्या..
पिंकी चा फोन आला,.. "वहिनी आई आणि मी येतो तिकडे, आपण शॉपिंग ला जावू, तुझ्या साठी रिसेप्शन साठी लेहंगा आणि पूजेसाठी साडी घ्यायची आहे",
"मी आणि माझी मैत्रीण मार्केटमध्ये आहोत, तुम्ही येताय का दोघी इकडे?",..रिया
"हो आम्ही येतो अर्ध्या तासात ",..पिंकी
" तुम्ही आले की फोन करा, तोपर्यंत आम्ही खरेदी करतो",.रिया
" कोण होतं रिया ",.. मोना
" माझ्या सासूबाई आणि नणंद इथे येत आहेत, रिसेप्शन साठी लेहेंगा घ्यायचा आहे",.. रिया
खूप छान छान ड्रेस घेतले रिया आणि मोनाने, त्या जरावेळ तिथे हॉटेलमध्ये ज्यूस घेत होत्या, शारदाताई पिंकी आल्या, रियाने मोनाशी ओळख करून दिली,.. "थांबते ना तू मोना
माझ्यासोबत",
माझ्यासोबत",
हो रिया..
सगळे साड्यांच्या दुकानात गेल्या, खूप सुंदर सुंदर साड्या दाखवत होते, पूजेसाठी एक साडी पसंत केली, अजून नेहमीसाठी साड्या दाखवा, खूप सुंदर नेव्ही ब्लू साडी घेतली गुलाबी साडी घेतली आणि एक लाल साडी घेतली, अजून बरीच झाली खरेदी, पिंकी ने ही एक दोन साड्या घेतल्या
" लेहंगा दाखवा आता हिच्यासाठी ",.. सगळे दुकानाच्या पहिल्या मजल्यावर गेले, अतिशय सुंदर डिझाईनचे लेहेंगा दाखवले जात होते,
"कोणत्या रंगाचा लेहंगा हवा तुला रिया",.. शारदा ताई
" मला मोती कलर चा हवा आणि खूप हेवी नको थोडा सिम्पल म्हणजे इतर वेळी सुद्धा घालता येईल असा हवा",.. रिया
" हो बरोबर आहे वहिनी",..पिंकी
खूप छान लेहेंगा पसंत केला, मस्त झाली होती खरेदी, शारदाताई पिंकीने रिया मोना ला घरी सोडलं,
" आत चला ना आई",.. रिया
"नको उशीर होत आहे तुझे अण्णा येतील ना आता ऑफिसमधून, प्रोग्रामच्या आदल्या दिवशी मेहंदी काढा",.. शारदा ताई
" ठीक आहे आई",.. रिया
रिया मोना घरी आल्या, सगळे विचारत होते काय काय खरेदी केली, ड्रेस दाखवले, साड्या आई तिकडे घेऊन गेल्या, तिकडेच ब्लाऊज शिवणार आहेत, रिया आत निघून गेली, बराच वेळ ती फोनवर रोहितशी बोलत होती, काय काय घेतलं ते सांगत होती,
" अहो मी काय म्हणते आहे आपल्यालाही रियाला साड्या आणि दागिने घ्यावे लागतील",.. सुरेखा ताई
" घेऊन टाकू मग",.. शरद राव
" आपण जाऊ या खरेदीला नेकलेस आणि बांगड्या घेउ",.. सुरेखा ताई
चालेल..
" तुला टिना ला आईला साड्या घे",.. शरदराव
आता बरीच शी कार्यक्रमाची तयारी झाली होती, आज रिजल्ट होता, रिया मोना चांगल्या मार्काने पास झाली, लगेच पुढची अॅडमिशन घेतली, पंधरा दिवसात कॉलेज सुरू होणार होत, रिया ने रोहित ला फोन केला
"पेढे कुठे रियु, हुशार आहेस तू",.. रोहित
" Thank you, पण मी आपल्या घरातून कशी जाणार कॉलेज ला रोहित",.. रिया
"कारने ड्रायवर असेल, किती लांब आहे तिथून कॉलेज" ,.. रोहित
अर्धा तास..
\"ठीक आहे, मोनाने घेतली का अॅडमिशन? ",.. रोहित
हो..
" तुम्ही दोघी सोबत असणार चला ठीक आहे, मी खूप खुश आहे छान मार्क मिळाले तुला, पार्टी दे आता ",.. रोहित
हो...
"मी येतो आज संध्याकाळी, आपण बाहेर जावू जेवायला, टिना ला घे सोबत, तुझ्या मैत्रीणीला घे ",.. रोहित
ठीक आहे
संध्याकाळी पिंकी रोहित सौरभ मनीषा रिया टिना मोना सगळे बाहेर जेवायला गेले होते, खूप मजा आली, रोहित रिया सोबत होती म्हणून एकदम एन्जॉय करत होता,
" चांगले आहेत जिजु रिया ",.. मोना
सकाळी मोना आली ,
"पार्लर मध्ये जावे लागेल आपल्याला मोना टिना" ,.. रिया
"तुला काय गरज आहे रिया पार्लर मध्ये जायची,अशी तु सुंदर आहेस, लग्न झाल्यापासून तू खूप छान दिसते आहे, हो ना टिना",... मोना
" हो ताई तू छान दिसते",..
उद्या प्रोग्राम होता, रिया टीना मोना पार्लरला गेल्या, संध्याकाळी मेहंदी काढणारी बाई येणार होती,
तिकडेही रोहित कडे जोरात तयारी सुरू होती बऱ्याचशा पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं कार्यक्रमाच्या दिवशी तयारी करायला पार्लरवाली ठरली होती
रोहित दोन-तीन दिवस फार्महाऊसवर राहून आला , तिथून त्याला ऑफिसला जायला जवळ पडत होत
" राधा कुठे आहे रोहित",.. रिया
"ती घरी गेली",.. रोहित
"परत येणार आहे का ती",.. रिया
"हो येणार आहे आपल्या रिसेप्शन साठी डायरेक्ट हॉटेलवर",.. रोहित
"तिचा फोन नंबर द्या ना मला बोलायचं आहे तिच्याशी",.. रिया
" काय केलं आज दिवसभर आज",.. रोहित
"मी पार्लरला गेली होती",.. रिया
" कशाला पैसे वेस्ट करायचे",.. रोहित
रिया खूप हसत होती
" रियु मला अजिबात करमत नाही तुझ्या शिवाय, लवकर ये माझ्या जवळ, आता काय प्रोग्राम आहे",.. रोहित
"मेहंदी लावणार आहे",.. रिया
"मला फोटो पाठवणार का तुझे ",.. रोहित
हो.
"उद्या सकाळी येणार मग घरी",.. रोहित
हो..
"मी वाट बघतो आहे तुझी",.. रोहित
मेहंदी वाली ताई आली, छान मेहंदी काढली रियाने, त्याचे भरपूर फोटो काढून पिंकी रोहितला पाठवून दिले, आईचा स्वयंपाक झाला होता, आईने तिला जेवण भरवलं,
"आई बाबा आमच्याकडे या आता तुम्ही, छान आहे तिकडचं घर, शेत आहे आजूबाजूला, खूप शांतता आहे",.. रिया
" नक्की येऊ आम्ही तू छान रहा रोहित रावांसोबत, काही प्रॉब्लेम नाही ना आता",.. बाबा
"नाही बाबा मी खुश आहे ",.. रिया
रात्री रियाला झोपच येत नव्हती, उद्या मी रोहित सोबत असु, खूप छान वाटत होतं
सकाळी सगळे लवकर उठले, रात्रीच तिकडे काय काय न्यायच त्याची बॅग भरून ठेवली होती, सकाळी देवाला नमस्कार करून सगळे रोहित च्या घरी जायला निघाले, मोना होती सोबत, रियाने साधी साडी नेसली होती
सगळे घरी पोहोचले, पिंकीने रियाला लगेच रूम मध्ये नेलं, पूजेसाठी तिची तयारी केली, खूप छान हिरव्या रंगाची साडी रिया नेसली होती, पार्लर वाल्या ताई ने तिची छान वेणी घालून दिली, गजरे लावले होते, हातात हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, खूप सुंदर दिसत होती रिया,
शारदा ताईंनी पुढे येऊन तिची नजर काढली, चला खाली गुरुजी आले आहेत, रिया पिंकी टीना मोना खाली गेल्या, सगळे खाली बसलेले होते, रोहित समोर बसलेला होता,
रिया रोहित पूजेला बसले, रोहित रिया कडेच बघत होता,.. "कोण आल आहे एवढ सुंदर? कोण आहे ही मुलगी? माझी रियु आहे का?",
गुरुजी हाका मारत होते, तुम्ही पूजे कडे लक्ष द्या रोहित, नंतर गप्पा मारा
रिया छान हसत होती,
"थांब नंतर बघतो तुझ्याकडे" ,.. रोहित
छान पूजा पार पडली, नैवेद्य प्रसाद रिया रोहित ने देवाला दाखवला, मोठ्यांचा नमस्कार केला,
आत मध्ये जेवणाच्या पंगती पूर्ण होत होत्या, सगळे धावपळीत होते, पिंकी रिया कडे लक्ष देत होती, जेवण झाल्यावर लगेच संध्याकाळची तयारी करायची होती, सहा वाजेनंतर लगेच हॉटेलवर जायचं होतं,
बाकीचे तयार झाले, रिया तयार होत होती, मोती कलर घागरा खूप छान दिसत होता तिच्यावर, सुंदर हेअर स्टाइल , लाइट मेक अप छान झाला होता , रिया बाहेर आली,
रोहित ने ही कुर्ता पायजमा घातला होता, त्यावर मोती कलरचा दुपट्टा घालून तयार होता, दोघ एकमेकांकडे बघत होते
दोघांनी देवाला नमस्कार केला,
निघू या का?
सगळे हॉटेल कडे निघाले, रोहितच्या गाडीत रोहित रिया पिंकी टिना होते, रोहित रिया जवळ आहे त्या मुळे खूप आनंदात होता, कोणाशी जास्त बोलत नव्हता तो, रियाचा हात धरून बसला होता कार मध्ये,त्याच्या डोळ्यात रिया साठी खूप खूप प्रेम होत, ड्रायवर गाडी चालवत होता, पिंकी खूप बोलत होती, टीना रिया ऐकत होत्या ,
सगळे हॉटेल वर पोहोचले, फोटोग्राफर तयार होता, खुप फोटो काढले दोघांचे, मग फॅमिली सोबत फोटो घेतले, पिंकी सौरभचे फोटो शूट झाल,
लगेच स्टेज वर उभा रहा रोहित रिया, खूप पाहुणे येता आहेत , अण्णांच्या ओळखीचे खूप लोक येत होते,
मामा मामी आले, रिया पुढे होवुन त्यांना भेटली, खुप वेळ बोलत होता मामा, खूप खुश होता,
आता जोडीने या आमच्या कडे,..
जेवायला खूप छान मेनू होता, चल आपण काहीतरी खाऊ रियु, सगळे आता मस्त गप्पा करत होते, भरपूर लोक येवून गेले होते, घरचे लोक आता बाकी होते, सगळे एन्जॉय करत होते, सगळ्यांची छान पंगत झाली,
हॉटेल मधुन मामा मामी घरी गेले, आम्ही ही निघतो आता, आई बाबा टीना मोना निघाले, रिया सगळ्यांना भेटत होती, रोहित तिच्या कडे लक्ष देवून होता,
"नीट रहा रिया",. बाबा
"हो बाबा तुम्ही काळजी करू नका",.. रिया च्या डोळ्यात पाणी होत
"मी आहे तुम्ही काळजी करू नका ",.. रोहित
घरचे लोक निघाले, अण्णा शारदा ताई आजी एका गाडीत होते, पिंकी सौरभ सोबत होती, रोहित सोबत रिया होती फक्त , रिया खूप गप्प होती , रिया थकली का आज खूप, काय झालं
काही नाही..
" मला समजत आहे, आई बाबांची आठवण येते ना, मला पिंकी सासरी जाईल या विचाराने अस होत, पण काळजी करू नकोस मी आहे ",.. रोहित
हो..
"मेहंदी खूप सुंदर रंगली तुझी, नवर्याच खूप प्रेम आहे वाटत तुझ्या वर, खूप खूप छान दिसते आहेस तु आज , , मग आज काय विचार आहे",.. रोहित
रिया हसत होती, रोहित... ड्रायवर ऐकतील
" ऐकु दे मी माझ्या बायकोशी बोलतो आहे",.. रोहित
सगळे घरी आले, खूप दमलो आज, शारदा ताई, पिंकी रिया ला आत घेवून गेल्या , तिला लाल साडी नेसायला लावली,
पिंकी आता कशाला एवढी तयारी ,
पिंकी हिला सोडून ये रोहितच्या खोलीत, शारदा ताई गेल्या
"वहिनी मी पण येते तुझ्या सोबत दादाच्या रूम मध्ये",.. पाहुणे आलेल्या दोन तीन बहिणी तिने सोबत घेतल्या
"नको पिंकी प्लीज अस करु नको, रोहित चिडतील",.. रिया
"वहिनी आम्हाला सामान हव आहे दादा कडून तू थांब आज चान्स आहे",.. पिंकी
सगळ्या आत गेल्या, अतिशय सुंदर रूम सजवली होती, रिया काॅटवर बसली, पिंकी आणि ग्रुप लपुन बसले
शारदा ताई पुढे आल्या, रोहित पुरे झाल्या गप्पा, जा आत रिया वाट बघते आहे
रोहित ला समजल, तो खूप खुश होता, माझी रियु आज माझ्या जवळ येणार, आनंदाने तो रूम मध्ये आला
रोहित आत आला अतिशय सुंदर सजवलेल्या काॅटवर रिया बसलेली होती, सुंदर अशी लाल साडी ती नेसली होती, रोहित लांबून बघत होता खूप सुंदर दिसते रियु, बापरे काय होईल माझ? किती तरी दिवस मी या क्षणाची वाट बघत होतो,
रोहितने दार लावल तो रिया जवळ येवून बसला, रिया त्याच्या कडे बघत होती, ती लाजली होती, थोडी हसत होती, केवढी सुंदर दिसते आहे तू रियु,
रोहितने तीचा हात हातात घेतला, हातावर किस केला, रिया खूण करत होती नको अस, रोहितच लक्ष नव्हत, मला खरं वाटत नाही रियु आजचा दिवस आला आहे अस, काय झालं तू कंफर्टेबल नाही का ? बोल रियु? , साडी बसतेस का? आरामशीर ड्रेस घाल,
"नाही तस नाही रोहित, मी काय म्हणते ",.. रिया
"काहीही बोलू नको आता, एकदा माझ्या मिठीत ये ना रियु, खूप दिवसा पासुन मला तुझ्या जवळ यायच होत, रियु I love you, तुला माहिती तू माझ्या स्वप्ना येत होती, मी वेडा व्हायचो तुझ्या आठवणीत" ,... रोहित तिच्या जवळ येत होता
रोहित नको.. रोहित प्लीज थांबा..
"आता काय? रियु मी काही ऐकणार नाही, त्या दिवसाची राहिलेल अर्धवट काम आज पूर्ण करू आपण, चालेल ना माझी गोड बायको",...
रोहित पिंकी,...
काय?
पिंकी आहे समोर,
रोहित पटकन बाजूला झाला, पिंकी तीन चार बहिणी सोबत समोर उभी होती, रोहित डोक्याला हात लावून बसला,
"काय सुरु आहे दादा? , वहिनी काय आहे हे? ",.. पिंकी
"पिंकी डोक आहे का तुला? काय करते आहे इथे? लहान आहे का तू? अजून सहा महिन्यात लग्न आहे तुझ, जा इथून ",.. रोहित
"दादा वहिनी आमची आहे, ती आमच्या सोबत राहीन, मी तिला घ्यायला आले आहे ",.. पिंकी
"उद्या सकाळी घेवून जा तिला, आता राहू दे माझ्या जवळ",.. रोहित
"नाही ती माझी मैत्रिण आहे, मला आता बोलायच आहे तिच्याशी",.. पिंकी
" पिंकी नको ना त्रास देवू",.. रोहित
" आम्ही इथे थांबू सकाळ पर्यंत ",.. पिंकी
"नाही पिंकी गुपचुप खाली जा आता ",.. रोहित
" नाही दादा आम्ही जाणार नाही ",.. पिंकी
"ठीक आहे काय हव सांग पटकन दोन मिनीट च्या आत",..रोहित
" आम्हाला सगळ्यांना ड्रेस ",.. पिंकी
ठीक आहे..
पार्टी...
ठीक आहे
"मला स्कूटर ",.. पिंकी
कश्याला?
"मी जाणार नाही ",.. पिंकी
ठीक आहे
" मला क्रेडिट कार्ड, फोन ",.. पिंकी
" हे अति होतय पिंकी.. नाही मिळणार",. रोहित
" पिंकी सगळ्या मुलींना घेवून कॉटवर येवून बसली, कोण आहे ही एवढी सुंदर गोड मुलगी रियु",.. पिंकी
रिया खूप हसत होता
रोहित चिडला... "पिंकी.. ऐकायला येत ना, पिंकी उठ इथून, आधी खाली जा, मी खूप चिडलो आहे ह, एका मिनिटात निघायचं ",..
"मी जाणार नाही ",.. पिंकी
" आई या पिंकीला बोलव.... आई ",.. रोहित
" कोणी ऐकणार नाही दादा, आज तुझ्या रूम कडे कोणी येणार नाही",.. पिंकी
"काय हवय तुला क्रेडिट कार्ड, ठीक आहे नीघ आता, यायच नाही इथे ",.. रोहित
पिंकी बाहेर गेली..
" दादा एक सांगायच राहील, आम्ही तुझ्या रूम मध्ये कॅमेरा फिक्स केला आहे, झोप आता आरामात",.. पिंकी
"पिंकी इकडे ये काय आहे हे? ",.. रोहित
" किती ओरडून बोलतो तू माझ्याशी",.. पिंकी
" सॉरी पिंकी कुठे आहे कॅमेरा ",.. रोहित
"दहा हजार रूपये दे",.. पिंकी
पिंकी...
" ठीक आहे मी जाते",.. पिंकी
" सॉरी पिंकी देतो उद्या , आता सांग कुठे आहे कॅमेरा",.. रोहित
"कॅमेरा नाही दादा, गुड नाइट.. लक्ष्यात ठेव जे कबूल केल ते दिल नाही तर रोज गाठ माझ्याशी आहे, वहिनी माझ ऐकते, घेवून जाईल मी तिला माझ्या खोलीत",.. पिंकी
" जा बाई इथून, अजून कोणी नाही आत",.. रोहित
नाही..
"वहिनी तुला एक सांगायच राहिल ",.. पिंकी
" आता नाही पिंकी उद्या बोल, नीघ आता, रियु माझी आहे",.. रोहित
सगळे गेले, रोहितने दार लावल, सगळ्या रूम मध्ये बघितल कोणी नाही ना, काय पोरी आहेत या,
रिया हसत होती खूप,..
" रियु काय गोड हसतेस तू, चल बघू आपण तु किती गोड आहेस" ,.. रोहित
रिया खूप हसत होती,.." रोहित काय हे? , किती उतावळे पणा ",
" किती दिवस दूर आहे मी तुझ्या पासून, ये इकडे माझ्या जवळ, किती छान शांत वाटत आता", ..दोघ एकमेकांना सोबत रमले
"रोहित मला आज खूप छान वाटत आहे, इतके दिवस तुमच्या पासून लांब करमत नव्हत ",..रिया
"मला ही रियु, आता जायचं नाही तू कुठे ",.. रोहित
नाही जाणार..
" रियु या पुढे तू जे म्हणशील तेच मी करेन प्रॉमीस ",.. रोहित
" रोहित पुरे आता कौतुक माझ" ,... रिया
"कौतुक नको तर मग काय करू या? ये माझ्या जवळ मिठीत",... रोहित
हो
" रिया हो बोल", .. रोहित
" माझ्या डोळ्यात नाही दिसत का? ",.. रिया
" प्लीज माझ्या समाधान साठी ",.. रोहित
" हो रोहित मला राहायच तुमच्या सोबत, I love you ",.. रिया
रोहितचा फोन वाजत होता
" कोण आहे आता",.. रिया
"पिंकी दुसर कोण असणार" ,.. रोहित
" काय आहे पिंकी ",..
"दादा कोणता फोन घ्यायचा मला?",.. पिंकी
उद्या बोलू..
दादा....
रोहित ने फोन स्विच ऑफ केला, रियु तुझा फोन बंद कर, मला आता कोणी डिस्टर्ब केलेल नको आहे,
रोहित काय हे?..
"मी काहीही ऐकणार नाही रियु गुपचुप माझ्या जवळ ये", ...
सकाळी रिया उठली, आवरून खाली आली, आजीं जवळ बसली, आजींनी तिला जवळ घेतल,.. "खुश ना आता बेटा, रोहित ठीक आहे ना आता तुझ्याशी",
"हो आजी",.. रिया
"किती सहन केल पोरीने",.. आजी
आई अण्णा चहा साठी आले, रियाने आतून चहा आणला,
"रोहित कुठे आहे? ",.. शारदा ताई
" झोपले ते उठवू का ",.. रिया
"नाही नको",..
"तू आराम केला असता",.. शारदा ताई
रिया काही म्हटली नाही..
पिंकी आली,.. "वहिनी दादा कुठे आहे? मला भरपूर सामान घ्यायच आहे",..
" कसल सामान? ",.. शारदा ताई
"स्कूटर फोन ड्रेस क्रेडिट कार्ड पार्टी",.. पिंकी
एवढ?..
" हो मग हे कबूल केल्यावर वहिनीला दिल दादा कडे, केवढा चिडला होता तो, आम्हाला घालवत होता तिथुन, आम्ही गेलो नाही",.. पिंकी
सगळे हसत होते, रिया लाजली,
पिंकी.. पुरे
जरा वेळाने रोहित आला खाली, पिंकी त्याच्या कडे बघत होती,.." काय झालं? ",
" दादा आटोप मला घ्यायचा ना सामान ",.. पिंकी
काय घ्यायच?..
" स्कूटर मोबाईल क्रेडिट कार्ड ड्रेस पार्टी ",.. पिंकी
" सौरभ कडे मागत जा पुढे सामान , इथे नाही लाड होणार",.. रोहित
" वहिनी माझ्या सोबत ये आज",.. पिंकी
रोहित पिंकी मागे पळाला, खूप त्रास दिला मला, आता बघतो, वहिनी वाचव पिंकी किचन मध्ये रिया मागे लपली होती, रोहित आत आला, तो रिया कडे येत होता, रिया लाजली , पिंकी आहे बाकी स्वयंपाक वाल्या बाई आहेत, हा काही करणार तर नाही ना,
" वहिनी वाचव मला",.. पिंकी
" मला वाचव तू पिंकी आता" , .. रिया
किचन ओट्या जवळ रिया उभी होती, समोर रोहित होता , पिंकीने रियाला ठकलल ती पळून गेली, रिया रोहितच्या मिठीत आली, ती पटकन बाजूला झाली,
"थोड्या वेळाने वरती ये रियु" ,.. रोहित हळूच बोलला, पिंकीला आणू नको,
रिया लाजली,
" की आता चलतेस",.. रोहित
कुठे?
" वरती रूम मध्ये",.. रोहित
"रोहित जा बर",..
"रियु नाटक नको मला, चुपचाप मी सांगतो ते कर",..
"इथे ही काय धमकी",.. रिया हसत होती
"तेच येत मला",..
" प्रेमाने बोला ना थोड ",.. रिया
"हो का प्रेमाने बोलू का",.. रोहित रिया जवळ आला,
"उद्या जातो आपण फार्म हाऊसवर रियु, मग काय करणार माझ्या ताब्यात तु 24*7",.. रोहित
"मी येणार नाही ",..रिया
"उचलून घेवून जाईल ",..रोहित
रिया लाजली होती.....
