भाग -१
पार्थ आज बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर उभा होता. कठड्याच्या कडेला तो सरकला आणि खाली पाहिलं. उंचावरून दिसणारा तो खालचा मार्ग त्याला धूसर वाटू लागला. "बस्स, आता सगळं संपवायचं," तो स्वतःशीच बोलत होता.
"काय मिळालं प्रेमात?" त्याने स्वतःलाच प्रश्न केला. "नुसता त्रास, नुसतं दुःख. ती माझीच होती, तरीही भगवंता तू तिला माझ्यापासून वेगळं केलं .. का केलं असं ? कधीच माझ्या पाठीशी उभा नाही राहिलात स्वामी तुम्ही .. आज पहिल्यांदा मला तुमची सोबत हवी आहे,इतक्या उंचीवरून जीव देताना थोडी भीती वाटतेय पण स्वामी मला तुम्ही साथ द्या." पार्थचा आवाज कंप पावत होता.
"निशा... तुझ्यावर मी किती प्रेम केलं... सगळं विसरून... माझ्या आयुष्याचं ध्येयच तू होतीस. पण तू... तू मला सोडून गेलीस." त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने डोळे मिटले आणि निशाची आठवण त्याच्या मनात उभी राहिली
आजचा दिवस निशा आणि पार्थच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता. दोघांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू होती. सकाळपासूनच लग्नाच्या विधी सुरू झाले होते. मांडवात पारंपारिक सजावट, फुलांचे तोरण, आणि शुभमंगल फलकांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले होते.
विवाह विधी सुरू झाल्यावर, सर्व पाहुण्यांचे लक्ष केंद्रित झाले होते. बाभूळची फांदी, हल्दी कुमकुम, आणि सप्तपदी सारख्या प्रत्येक विधीत दोघेही पूर्ण तन्मयतेने सहभागी झाले होते. निशाने पिवळ्या रंगाची चोळी आणि लाल पाटांची साडी नेसली होती, तर पार्थने पांढरा शेरवानी आणि सोनेरी पगडी घातली होती. ते दोघे एकमेकांकडे बघत होते आणि त्यांच्या डोळ्यात एक नवा स्वप्नांच्या रंगांची झलक होती.
विवाहाच्या वेळेच्या अगोदर, निशा आणि पार्थ एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत होते. "आजचा दिवस आपल्या जीवनातील नवीन पर्वाची सुरुवात आहे," पार्थने हसत म्हणाला.
"हो, आणि हे प्रेमपर्व, आदर आणि आपुलकीने भरलेले असेल," निशा उत्तरली.
विवाहाच्या मुख्य विधीमध्ये, सप्तपदी घेताना त्यांनी एकमेकांना जडवलेल्या वचनांचा आदर केला. प्रत्येक पावलाला त्यांनी एक नवीन वचन दिले - एकमेकांना आदर देण्याचे, एकमेकांचे दुःख आणि आनंद वाटून घेण्याचे, आणि एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करण्याचे.
विवाहाच्या विधी संपल्यावर, सर्वजण पार्थ आणि निशाला घेऊन त्यांच्या घराच्या दारात आले. नवविवाहितांच्या स्वागतासाठी उखाणा घेण्याचा कार्यक्रम ठेवला गेला होता. सासूबाई आणि सासरेबुवा यांनी एकमेकांच्या नावे उखाणे घेण्यास सांगितले.
निशा लाजत उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावर हलकी हसू होती. "निशा, तू उखाणा घे पाहू," सासूबाईने प्रेमाने म्हटले.
निशा हसत म्हणाली, "उंबरठ्याशी उभी आहे ,ओलांडतेय मी माप, सोडून आलेय सारा परिवार..पार्थच नाव एवढाच माझा आधार"
सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि हसत उखाण्याचे कौतुक केले. आता पार्थच्या उखाण्याची वेळ होती. तो निशाच्या डोळ्यात बघत म्हणाला, "अंगणात शिंपडला सडा, किनकीनला हिरवा चुडा...अंगणात शिंपडला सडा, कीनकीनला हिरवा चुडा.. निशाच नाव ऐकताच माझ्या मनी वाजे सनई चौघडा .."
या उखाण्यांमुळे वातावरणात आनंदाचे लहरी पसरल्या. सगळ्यांनी आनंदाने हसत हसत उखाण्यांचे कौतुक केले आणि नवविवाहित दांपत्यांना शुभेच्छा दिल्या.
लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यावर, रात्री दोघेही त्यांच्या नव्या घरात प्रवेशले. सजवलेल्या खोलीत फुलांचे सुगंध आणि मंद प्रकाशाने वातावरण रोमँटिक झाले होते. निशा आणि पार्थ त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक होते.
निशा हळुवारपणे म्हणाली, "पार्थ, आजच्या दिवसाची सुरुवात किती सुंदर झाली ना? पण मला वाटतं की आपण आधी चांगले मित्र होऊया."
पार्थने तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, "हो, निशा. आपण आधी चांगले मित्र होऊ, एकमेकांना समजू, आणि मग नवरा-बायकोसारखे वागूया...माझ्याही मनात हेच विचार सुरू होते"
" मला वाटायचं माझा कोणीतरी प्रियकर असावा, माझा छान बेस्ट फ्रेंड आणि त्याच्याशीच लग्न व्हावं... पण मला लव मॅरेज पटत सुद्धा नव्हतं.. म्हणून विचार केला की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला मित्र बनवणार आधी मग प्रियकर आणि मग नवरा " निशा पार्थला म्हणाली...
" आयला.. इतकं कसं गं सेम ? अगं माझंही कधी लव मॅरेजवर विश्वास नाहीये पण वाटायचं की आपल्या बायकोला आपण मैत्रीण बनवू मग तिच्याशी बायको सारखं वागू " पार्थने निशाला त्याच्या मनातील सांगितलं...
" अरे वा ,ग्रेट" निशा बोलली..
" चल मग मैत्रीण उद्यापासून आपला खोटा संसार सुरू करूया आणि धम्माल करूया "पार्थ बोलला..
दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितले आणि एकमेकांच्या जवळ आले. त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेतला आणि त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात केली. त्या रात्री त्यांनी खूप गोष्टी बोलल्या - त्यांची स्वप्ने, अपेक्षा, आणि भविष्याचे नियोजन. अशा प्रकारे त्यांची पहिली रात्र मित्रत्वाच्या नात्यातून सुरू झाली आणि त्यांनी एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करण्याचे वचन दिले...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा