कथेचे शीर्षक - ही नाजूक नात्यांची वीण भाग १
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
"तुला काय करायचं आहे राधा? जाऊ दे असेही तिने तुला त्रासच दिला आहे. लग्न झाल्यापासून एक दिवस सुखाचा जाऊ दिला नाही हे तूच मला सांगत होती. किती मानसिक त्रासात होती? सगळं विसरली का? शेवटी कर्म वाट्याला आल्याशिवाय रहातात का? जाऊ दे, तू तुझा संसार कर. त्यांचं ते बघून घेतील." राधाची मैत्रीण स्मिता राधाला म्हणाली.
"स्मिता, माझ्याशी कोणी कसेही वागले, तरी मी कोणालाही दुःखात पाहू शकत नाही गं. माझा स्वभाव तसा नाही."
"हाच स्वभाव बदल राणी. जशास तसे वागण्याचा जमाना आहे.
इतकं भावनिक होऊन जगलीस ना तर झालं कल्याण." स्मिता डोळ्यावर गॉगल चढवत म्हणाली.
इतकं भावनिक होऊन जगलीस ना तर झालं कल्याण." स्मिता डोळ्यावर गॉगल चढवत म्हणाली.
राधा आणि स्मिता एकाच ऑफिसमध्ये काम करायच्या. मैत्री झाली आणि घरातील सुख दुःख एकमेकींना सांगू लागल्या.
राधा आणि राज ह्यांचे छोटेसे कुटुंब होते. एक मुलगी आणि सासुबाई असा परिवार.
आज अनेक गोष्टी आठवत होत्या त्याचे कारणही तसेच होते.
ऑफिसवरून घरी गेली तेव्हा राज आणि तिची सासू सरला दोघेही गंभीर चेहरा करून बसले होते.
'काय झालं असेल?' ती मनातल्या मनात विचार करू लागली.
नक्कीच काहीतरी घडल्यासारखं वाटत होतं.
रात्रीचं जेवण झालं. राज बेडरूममध्ये बसला होता.
त्याचाही चेहरा उतरला होता.
"राज, काही झालं आहे का? मी ऑफिसवरून आल्यापासून बघते आहे तू आणि आई चेहरा पाडूनच बसला आहात."
"राधा, महेश दादाची नोकरी गेली आहे. त्याच्या डोक्यावर इतकं लोन आहे. घरखर्च आहे आणि अशी परिस्थिती आहे की लगेच कुठे नोकरी देखील मिळणं अवघड आहे."
तिला ऐकून फार वाईट वाटलं.
"अहो कुठे ना कुठे नोकरी मिळेलच. तुम्ही त्यांना धीर द्यायचा सोडून असं गर्भगळीत झाला तर कसं होणार?"
"राधा, विचार तर करावाच लागतो गं. सगळं सोंग करता येतं; पण पैश्याचे नाही. निखिलची क्लासेसची फीस, शाळेची फीस, बाकीचा खर्च. माझ्याकडेही इतके पैसे नाही.
शेवटी इथेही आपला खर्च आहेच. खरंच माझं डोकं काम करत नाही."
महेश आणि मंदा वेगळे राहायला गेले होते.
तो चांगल्या कंपनीत कामाला होता. वाटलं देखील नव्हतं की असं काही होईल.
आता काही तरी मार्ग काढावा लागणारच होता.
मंदा राधाशी कधीच नीट वागली नव्हती. सतत तिला घालून पाडून बोलणं. तिची बेज्जती करणं. तिच्याविषयी नको त्या गोष्टी पसरवणे.
राधा तर वैतागून गेली होती. मानसिकरित्या खचून गेली होती.
तिचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला होता.
एक दिवस महेशने घरी सांगितले की, तो वेगळं राहायला जाणार आहे. सरलाला आणि राजला देखील वाईट वाटले. राधाला वाईट वाटले ते निखिलसाठी, कारण निखिलला तिचा खूप लळा लागला होता.
शेवटी तो दिवस आला. महेश आणि मंदा दुसरीकडे रहायला गेले.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
राधा काय करणार होती? पुढचा भाग जरूर वाचा.
१५/०९/२०२५
१५/०९/२०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा