ही नाजूक नात्यांची वीण भाग २
कथेचा पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की, राधाच्या दिराची नोकरी जाते.
घरात सगळे टेंशनमध्ये असतात. अनेक गोष्टी तिला आठवत होत्या.
आता पाहू पुढे.
गेल्या भागात आपण पाहिले की, राधाच्या दिराची नोकरी जाते.
घरात सगळे टेंशनमध्ये असतात. अनेक गोष्टी तिला आठवत होत्या.
आता पाहू पुढे.
महेश आणि मंदा महिन्यातून एकदा तरी यायचे; पण नंतर हळूहळू येणं कमी झालं. इथे राज आणि राधा दोघांनी जबाबदारी घेतली.
राधाची मुलगी तेजल थोडी मोठी झाली आणि राधा कामाला जाऊ लागली.
राधाची मुलगी तेजल थोडी मोठी झाली आणि राधा कामाला जाऊ लागली.
सरला घराकडे आणि तेजलकडे लक्ष द्यायची. तिलाही महेशची आठवण यायची, पण काय करणार?
आता सवय करून घ्यावी लागणार होती.
असे अनेक घाव होते जे मंदाने दिले होते. ते विसरणे शक्य नव्हते.
मंदाच्या माहेरी श्रीमंती, याऊलट राधाचं होतं. परिस्थिती जेमतेम.
राज आणि राधा कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि लग्न असा त्यांचा प्रवास.
तिच्या माहेरी परिस्थिती जेमतेम असली तरीदेखील आई बाबांनी शिक्षणात कसर सोडली नव्हती. वेळ प्रसंगी कर्ज काढून मुलीला शिकवलं. राधा हुशार होतीच, पण हळवी देखील होती. स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करणारी. तिचा हा स्वभाव तिला त्रास द्यायचा.
राधाची लग्नानंतर पहिली दिवाळी होती. माहेरी चार दिवस राहिली आणि सासरी आली.
मंदाने विषय काढला.
"काय गं राधा पहिली दिवाळी कशी गेली?"
"हो ताई खूप छान. आईकडे खूप बरं वाटलं." राधा म्हणाली.
"आईने काय दिलं?"
"साडी दिली आणि ह्यांना कपडे."
"बस इतकंच?"
राधाला तिच्या बोलण्याचा उद्देश समजला नाही असं नाही, पण ती शांतच बसली.
"अगं माझ्या आई बाबांनी मला तर छान नेकलेस दिला होता आणि नवऱ्याला एक तोळ्याची अंगठी."
ती स्वतःच्या माहेरचं कौतुक करत सांगू लागली.
मंदा नेहमी स्वतःचा मोठेपणा दाखवत.
तेजलचा जन्म झाला आणि आई बाबांनी बारसं ठेवलं होतं, तेव्हा देखील मंदा पटकन म्हणाली, "जरा बऱ्यापैकी हॉल बघायचा होता, इथे तर एसी देखील नाही."
ह्यावेळेस तिला रहावलं नाही ती पटकन म्हणाली,
"माझ्या आई बाबांची परिस्थिती जशी आहे तसं त्यांनी केलं. मला माहित असतं तुम्हाला एसीशिवाय जमणार नाही, तर मी तुम्हाला बोलावंलच नसतं आणि ताई प्रत्येकवेळी तुम्ही माझी आणि स्वतःची बरोबरी करता. तुमचं माहेर श्रीमंत आहे, चांगली गोष्ट आहे; पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला, माझ्या आई वडिलांना घालून पाडून बोलाल. पुन्हा बोलतांना विचार करून बोला."

तिला प्रचंड राग आला. राधा नेहमी शांतच राहायची. काहीही बोललं तर उत्तर द्यायची नाही. मंदाला तिचा झालेला अपमान सहन झाला नाही. ती तडक निघून गेली.
पाहुण्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
क्रमशः
अश्विनी ओगले.
पुढचा भाग जरूर वाचा
अश्विनी ओगले.
पुढचा भाग जरूर वाचा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा