ही नाजूक नात्यांची वीण - भाग ३
कथेचा पूर्वार्ध -
राधा नेहमीच शांत राहायची; पण ह्यावेळेस आई वडिलांचा अपमान सहन झाला नाही म्हणून ती मंदाला स्पष्टपणे बोलली. मंदाला राग आला. ती निघून गेली.
आता पाहू पुढे.
राधा नेहमीच शांत राहायची; पण ह्यावेळेस आई वडिलांचा अपमान सहन झाला नाही म्हणून ती मंदाला स्पष्टपणे बोलली. मंदाला राग आला. ती निघून गेली.
आता पाहू पुढे.
मुलीचं बारसं होतं, राधा किती खुश होती पण मंदाने असं बोलून तिला दुखावलं होतं.
"राज, ही मंदा का निघून गेली." सरला म्हणाली.
"आई, वहिनीला एसी हॉल हवा होता."
सरलाला देखील तिचा स्वभाव माहीत होता. किती जरी बोललं तरी ती काही ऐकायची नाही.
खरंतर महेश देखील तिच्या वागण्याला वैतागला होता, पण लग्नाची बायको होती. तो समजवायला गेला की भांडायची.
खरंतर महेश देखील तिच्या वागण्याला वैतागला होता, पण लग्नाची बायको होती. तो समजवायला गेला की भांडायची.
राज राधाकडे गेला.
"राधा, तू जे देखील बोलली ते योग्य केलं. कुठेतरी हे थांबवायला हवं होतं."
"पण का? हे असं मन दुखावून काय मिळतं त्यांना? मी तर एका शब्दानेही काही बोलत नाही, नेहमीच माझा पाण उतारा का करतात?"
"स्वभावाला औषध असतं?" महेश राधाच्या मागे उभा होता.
राधा शांत बसली.
"राधा, मला माहित आहे तिचा स्वभाव. मलाच समजेना काय करू? तिच्यातर्फे मी माफी मागतो." महेश म्हणाला.
"तुम्ही नका माफी मागू भाऊजी." राधा म्हणाली.
________________________
मंदाने अबोला धरला. ती तापट स्वभावाची होती.
महेश सगळं बघत होता.
एक दिवस तो सरलाला म्हणाला,
"आई, मला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. मला जावं लागेल. ही संधी सोडू शकत नाही."
"आई, मला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. मला जावं लागेल. ही संधी सोडू शकत नाही."
"ठीक आहे, महेश जा तू. सुखाने संसार करा." हे बोलत असतांना सरलाचा कंठ दाटून आला.
राजला कळलं तेव्हा त्यालाही वाईट वाटलं. दोन्ही भावांमध्ये सलोखा होता. महेशने हे पाऊल विचारपूर्वक उचलले होते.
"आई, तू देखील माझ्यासोबत चल." महेश म्हणाला.
"महेश, ह्या घरात तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत. ह्या घरापासून दूर होणं म्हणजे त्यांच्या आठवणीपासून दूर होणं. मी चार दिवस येत जाईन."
"ठीक आहे आई." महेश आईच्या भावना समजत होता.
मंदा मात्र खुश होती. वेगळा राजा राणीचा संसार मांडणार होती.
---------------------------------
राधाला महेशमध्ये मोठ्या भावाची सावली दिसत होती.
महेश नेहमी तिचं कौतुक करायचा. ती होतीच कौतुक करण्यासारखी. राधा खूप छान स्वयंपाक बनवायची. सर्वांचा आदर करायची. प्रत्येकाला जीव लावायची. सरला देखील तिच्यावर खुश होती, कारण तिने गोड स्वभावाने सर्वांचं मन जिंकलं होतं.

जेव्हापासून तिला कळलं होतं की महेशची नोकरी गेली आहे तेव्हा पासून तिला अस्वस्थ वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी ती ऑफिसवरून घरी आली. तिला महत्वाचे काही तरी सांगायचे होते.
राज आणि सरलाला महत्वाचं बोलायचं आहे असे सांगितले.
क्रमशः
अश्विनी ओगले.
पुढचा आणि शेवटचा भाग अजिबात मिस करू नका.
अश्विनी ओगले.
पुढचा आणि शेवटचा भाग अजिबात मिस करू नका.