Login

तीच अस्तित्व

तमाशागिरी च्या मुलीची कथा



त्या वर्षातला हा खूप मोठा अवॉर्ड function सोहळा आयोजित केला गेला होता आणि आता सगळे जण ज्या क्षणाची एवढ्या आतुरतेने वाट पाहत होते, तो येऊन ठेपला होता. तिथल्या निवेदकाने announcement केली.. आणि क्षणभर सगळंच थांबल्यासारखं वाटलं........द बेस्ट सर्जन ऑफ द इयर अवॉर्ड goes to  mr . श्रीराज पाठक.....आणि समोरून एक  रुबाबदार, उमदा , व्यक्तिमत्त्व असलेला देखणा मुलगा चालत आला . तिथल्या उपस्थित मुली तर त्याच्याकडे पाहतच राहिल्या. त्याच्या चालण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता . त्याचे ते निळे डोळे सगळ्यांच्या हृदयाचा ठाव घेत होते.




             त्याची एन्ट्री झाली तेव्हा पूर्ण हॉल उभा राहिला आणि टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्याच स्वागत झालं .
का नाही होणार बर........त्याला त्या वर्षाचं बेस्ट सर्जन चा अवॉर्ड मिळाला होता..... ज्याचा तो खरंच हकदार होता.......... त्याने एवढ्या कमी वयात किती तरी free सर्जरी केल्या होत्या. त्यामुळे आज त्यांच्या कामाची दखल घेऊन त्याला तो अवॉर्ड देण्यात येणार होता...एका गावात त्याने फ्री मध्ये हॉस्पिटल ओपन करून तो मोफत ते चालवत होता.


तो चालत चालत व्यास पिठाच्या मध्यावर आला तरी सुद्धा जोर - जोरात टाळया वाजतच होत्या, ह्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला ज्यांच्या हातातून अवॉर्ड हवा होता त्यांच्या कडूनच तो त्याला मिळणार होता ,त्याने खास तशी शिफारस केली होती, हा क्षण त्याच्यासाठी आणि उपस्थित लोकांसाठी सुद्धा सुवर्णक्षण होता.


               त्या व्यक्ती सुद्धा तिथे उपस्थित झाली होत्या . तर त्या होत्या त्याच्या शहरातल्या सुप्रसिद्ध सर्जन मिस अनुश्री ....एक थोर समाजसेविका आणि जिच्या हातातून आजपर्यंत एकही सर्जरी फेल गेलेली नसलेली यशस्वी डॉक्टर..... आणि आदर्श व्यक्ती .......किती तरी लोकांच्या त्या आइडिअल होत्या .... काहीच दिवसांपूर्वी त्या अमेरिकेतून भारतात परतल्या होत्या.....खास श्रीराज ला अवॉर्ड देण्यासाठी.....





            वयाची पंचेचाळीशी पार पडली असताना हि त्यांचं कर्तृत्व एखाद्या उमद्या तरुणाला लाजवेल असं होत म्हणूनच आज त्यांच्या च हातातून श्रीराज चा सत्कार व्हावा अशी खुद्द डॉक्टर श्रीराज ची इच्छा होती .... त्याने तशी मागणी केली होती, जर त्यांच्या हातून मला अवॉर्ड मिळाला तरच त्याचा मी स्वीकार करेन.......म्हणूनच आज त्याच्या सत्कारासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं होत ..... आणि त्या देखील त्या विनंतीला मान देऊन ह्या सोहळ्यास हजर झाल्या होत्या.....


                   डॉक्टर श्रीराज पाठक त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि अवॉर्ड घेण्याच्या आधी त्यांच्या चरणाजवळ वाकला . त्याला एकदम मनोभावे आशीर्वाद दिला त्यांनी  ..आणि , त्याच्या हातात अवॉर्ड देणारच कि त्यांच लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेले आणि एक सेकंड त्या बघतच बसल्या . हा तोच चेहरा होता जो कधी काळी त्यांच्या  खूप जवळचा होता, ज्याच्या शिवाय तेव्हा त्यांचं अस्तित्व सुद्धा नव्हतं. अश्याच काही वेळ तर त्या त्याच्या कडे बघतच बसल्या .पण परत एकदा त्याच नाव पुकारलं गेलं आणि टाळ्यांच्या आवाजाने त्या भानावर आल्या .


          तस पटकन त्यांनी तो अवॉर्ड त्याच्या हातात सुपूर्त करून ; त्याच कौतुक करत, त्याला अभिनंदन करत त्या तिथून बाहेर पडल्या . त्यांचं डोकं एकदम बधिर झालं होत आज किती तरी वर्ष नंतर त्यांना तो चेहरा पाहायला मिळाला होता . त्या डोकं शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या . पण भूतकाळ काही केल्या त्यांची पाठ सोडत नव्हता . . कितीही विसरण्याचा  प्रयत्न केला तरी त्यांना तो विसरला जात नव्हता . असा एकही दिवस गेला नाही कि त्यांना त्यांची आठवण आली नाही . रोज रात्री झोपल्यावर त्या देवा सोबत त्याला हि आठवत असायच्या . हा..... एक गोष्ट झाली होती......तो चेहरा वयोमानानुसार थोडा धुरकट झाला होता...... पण आज त्यांना तो चेहरा स्पष्ट दिसत होता .


            फक्त फरक एवढाच कि आज दिसलेला चेहरा त्यांच्या तरुणपणाचा होता, आता तर त्याच ही वय झालं असणार..... मग हा कोण......??? त्यांनी दुसरं लग्न केल असेल का......???? विचार करूनच त्यांच्या काळजात धसकन झालं.... तो अस करू शकतो का? हा विचार त्यांच्या मनात लागलीच डोकावला...... मन जरी नाही बोलत असले तरी बुद्धी साथ देत नव्हती.......

     

             त्यांच्या हि नकळत त्या त्यांच्या भूतकाळात शिरल्या .... आणि त्यांना तो दिवस आठवला...., जेव्हा त्यांच्या आयुष्यात तो येण्याची सुरुवात झाली होती......


----*****----*****----*****----*****----


             त्या दिवशी खूप जोरात वादळ आलं होत , मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट चालू होता.... घरातून कुणी बाहेर पडायला तयार नव्हते...... तरी अश्या
प्रचंड पावसात भिजून ओलीचिंब झालेली केवळ सतरा- अठरा  वर्षांची गावाकडे राहणारी, अत्यंत गरिबीत , हलाखीच्या परिस्तिथी मध्ये लहानाची मोठी झालेली ती  अनुश्री......ती मात्र एवढ्या मुसळधार पावसात बाहेर पडली होती.......  एवढ्या पावसासमोर त्या चिमुरडीचा निभाव लागणे शक्य नव्हतं. तरी सुद्धा ती चालली होती तिच्या आईच्या ओढीने.. कारण बाजूच्यानी येऊन तिला सांगितलं होत...


"आने.... अग ये आने...."

तशी ती घरातून बाहेर डोकावली, तर डोक्यावर इरला घेऊन बाजूची बाई त्यांची शेजारीण तिला आवाज देत होती...,


"काकी काय झालं... एवढ्या पावसात तुम्ही इथे.... या आत मध्ये.... "

शाळेत जात असल्यामुळे तिची भाषा शुद्ध होती आणि ती असावीच असाच तिचा हट्ट होता....


" आत यायला येळ न्हाय बग.... म्या सांगायला आलतू... तुज्या आय चा फड बाजूच्या गावाला पडला हाय.. पण ह्यो पाऊस बघतेस ना.. कवा पासून धो धो पडतोय.... एवढ्या पावसात पण तुजा तो दारोड्या दालिंद्री बाप तुज्या आय ला नाचायला सांगतोय... .. तिला भरलाय ताप.. अंग असा तापलाय तिचा.. पण तो माणूस ऐकून न्हाय राहिला बग.....तवा कुणाला तरी घिऊन जा न थांबावं.....मेल्याला.... "


ती बाजूची बाई हाताची बोटे मोडत पावसात आवाज जात नसल्यामुळे जोरा जोरात ओरडत होती.. आणि ते ऐकून अनुश्री ला अजूनच टेन्शन आलं...आणि ती काहीही विचार न करता दरवाजा सुद्धा लावून न घेता धावत सुटली, डोक्यावर काहीतरी घ्यावं ह्याची सुद्धा तिला शुद्ध राहिली नाही..... ती बाई मागून ओरडत होती.....,


" आने... अग कुणाला तरी घिऊन या.... ऐकली नगो जाऊस... ह्यो इरला तरी घे.... "


पण पावसाचा जोर एवढा होता कि त्याच्या पुढे तिचा आवाज अनुश्री पर्यंत पोहचलाच नाही...ती त्या पावसाची पर्वा न करता धावत च होती.. वाट दिसेल त्या दिशेने पळत होती.....


तिच्या आईचा फड बाजूच्याच गावी पडला होता ...आणि बाहेर जोरदार पाऊस चालू होता ..अनुश्री च्या आईने तिला बजावलं होत तिकडे तू फिरकायचं नाही, एवढ्या  दिवस तिने सुद्धा गपगुमान पणे तिच्या आईच ऐकलं होत पण आता तिची काळजी तिला स्वस्थ बसून देत नव्हती ..म्हणून ती आईचा विरोध असताना देखील गेली .....त्यावेळेस तिच्या डोक्यात आई ओरडेल हे सुद्धा आलं नव्हतं...


तेव्हा एवढ्या पावसात देखील लोक येऊन थांबली होती ... कारण तिची आई खूप प्रसिद्ध होती त्या भागात...आणि तिचा पडलेला तमाशा चा फड कुणीच चुकवत नसत.. कारण परत वर्षभराने ती त्या ठिकाणी येत असे.....नशिबाने अनुश्री तिथे पोहचे पर्यंत पावसाचा जोर थोडा फार का होईना कमी झाला होता ..त्यामुळे तिच्या आईची वंदना ची लावणी देखील सुरु झाली होती..
तिने समोरची पाटी वाचली..तमाशा बोर्डावर येण्याची तिची ही पहिलीच वेळ होती....


." राधाबाई तमाशा मंडळ "


तर ही आहे अनुश्री... एका कलावंतीची मुलगी... ह्या कथेची सुरुवात चोवीसावे शतकापासून असली तरी भूतकाळ मात्र सत्तराव्या दशकातला असणार आहे.. हळू हळू कथा पुढे पुढे जाईल तस तुमच्या लक्षात येईल..

क्रमश

🎭 Series Post

View all