Login

तीच अस्तित्व भाग -2

नाचऱ्याच्या मुलीची कथा
मागील भागात आपण पाहिलं कि, अनुश्री ला तिच्या आईला ताप भरला असूनसुद्धा नाचाव लागतंय, हे ऐकून ती मुसळधार पावसात धावत सुटली. आता पाहूया पुढे...,


समोर बोर्डाच नाव दिसत होत, पण आता मात्र पुढे जावं कि नाही ह्या विवंचने मध्ये अनुश्री अडकली होती. तरी सुद्धा आईच्या काळजीने ती पुढे गेलीच आणि समोर तिच्या आईला नाचताना पाहून ती सुद्धा क्षणभर  कश्यासाठी आपण येथे आलो आहोत हे देखील विसरली...


तिच्या कानावर जसे स्वर पडत होते ..तस तशी ती आईच्या ओढीने पुढे जात होती ..तिच्या अंगावर असलेले कपडे पावसात भिजल्यामुळे जागोजागी चिपकले होते. त्याच ही भान तिला राहील नाही आणि ती समोर पाहतच राहिली, आपल्या आईसाठी एवढी लोक का वेडे आहेत हे तिला आता समजलं. तिच्या आईला ह्या रूपात तिने पहिल्यांदाच पाहिलं होत,


तिच्या आईने मस्त चापून चोपून तिने शालू नेसली होती ..केसांचा मस्त असा अंबाडा बांधला होता .. अंबाड्याभोवती गजरे माळले होते ..आणि भांगात कुंकू भरलं होत वरुन गालाला थोडी पावडर लावली होती..मुळात ती गोरी होती, त्यामुळे अजूनच सुंदर दिसत होती ती.पायात असलेले चाल तिची सुंदरता अजूनच वाढवत होते ..ती जशी नाचत होती तश्या शिट्या आणि टाळ्यांचा आवाज येत होता. इकडे अनुश्री तिच्या आईची लावणी बघण्यात एवढी गुंग झाली कि तिचे सुद्धा पाय त्या चाली बरोबर थिरकायला लागले होते ..तिच्या आईला हे कधीच आवडणार नाही ह्याची जाणीव असताना ही ती त्याच्या बरोबर वाहवत गेली. इथे त्यांची लावणी एकदम रंगात आली होती.  दुसऱ्या कलावंती सुद्धा तिच्या भोवती पिंगा धरून नाचत होत्या ..पण तापामुळे राधा ला आता नाचणे जड जात होत ..अशक्तपणा मुळे ती तशी च स्टेज वर कोसळली ..त्याबरोबर तिथे असलेले आजूबाजूचे लोक तिच्या भोवती जमले आणि प्रेक्षक  लोकांमध्ये ही खूपच कल्लोळ निर्माण झाला ...


"पडली....पडली राधा बाई पडली .."

लोक जोर जोरात ओरडू लागले, तस अनुश्री ला भान आलं आणि ती तशीच धावत सुटली त्या मंचाच्या दिशेने.  तिथे पोहचताच आधी तिने तिच्या आसपासच्या लोकांना बाजूला सारून तिच्या आईच डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि ती तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली ..तिच्या तोंडावर थापड मारत होती ..पण राधा अति-ताणामुळे बेशुद्ध झाली होती ..तशी ती घाबरून ओरडली ...


"आई उठ ना ग ...अरे...कुणीतरी पाणी आणा ना ..."


तस बघ्या पैकी एकाने तिला पाणी आणून दिले आणि तिने ते तिच्या चेहऱ्यावर दोन तीन वेळा शिंपडले ..तशी राधा ने हालचाल केली... ते पाहून अनुश्री आणि आजूबाजूच्या लोकांच्या जीवात जीव आला...


राधा बाई ने डोळ्यांची फडफड केली, तस समोर तिला घाबरलेली अनुश्री दिसली. तिच्या डोळ्यांवर आलेली झापडे सुद्धा एका क्षणात दूर झाली.


" तू.... तू.. इथ काय करतेस... पहले तू इथून निघून जा.... किती.... किती येळा सांगल होत तुला कि ह्याच्या आसपास पण भटकायचं न्हाय.... "


राधा बाई स्वतःचा त्रास विसरून आपल्या मुलीला अनुश्री ला रागावत म्हणाली...


"आई , अग तुला ताप आला आहे तरी तू इथे नाचत आहेस.  त्यात एवढा पाऊस आहे ..मला काळजी वाटली म्हणून .."


तस अनुश्री कडे सगळेच बघू लागले ..हे पाहून राधा बाई ना जणू पुढच्या धोक्याची जाणीव झालीय  व अंगात त्राण नसून सुद्धा त्या तश्याच उठल्या आणि त्यांनी तिचे हात पकडून तिला खेचत खेचत फडाच्या  मागे घेऊन गेल्या ..जाताना तिच्या सोबतच्या एकीला सांगितलं ...

"आजचा कार्यक्रम संपला म्हणून सांग सम्द्यास्नी ..."

तस तिने होकार दिला आणि राधा चा निरोप घेऊन ती मंचावर गेली ...तिने जोराने ओरडून सांगितलं ...

"राधा बाई ची तबीयेत काय ठीक न्हाय आज ..तवा आजचा प्रोग्रॅम इथंच संपला बगा ..माफी असावी पर समद्यानी आता घरी जावा ..."

तस कुजबुज करत पब्लिक बाजूला पांगली ....

इकडे राधा च अंग पूर्ण तापल होत.. खेचत घेऊन जात असताना तिला त्याचा चटका जाणवला.. तस आई ला ती घाबरून म्हणाली.....,

"आई अग काय हे ..किती अंग तापलंय तुझं ... तरी सुद्धा तुला नाचायचं आहे... अग एक दिवस आराम कर ना .... चल आधी घरी...."


"आने, मी बजावलं व्हतं तुला ..इकडं फिरकायचं नय तरीबी तू इथं का आलीस  ...?"

राधा तिच्या हाताला अजूनच जोराने पकडून कस बस बळ एकवटून म्हणाली...

"अग तुला ताप आहे त्यात तू नाचतेस, हे समजलं म्हणून आली ना ..ते हि तुझ्या काळजीने .."


अनुश्री आता मात्र तिच्या आईचा राग पाहून घाबरली...


"मी मेली तरी बी हिकडं न्हाय यायचं तू हे किती दा सांगायच तुला ..कस तुज्या टकुऱ्यात बसत न्हाय ..कुणाची नजर तुज्यावर पडली तर वाटुळ व्हईल तुज्या आयुष्यच समजत कस न्हाय तुला  .."

राधा आपल्या डोक्याला जोराने हाताने मारत म्हणाली ...तिला तस करताना पाहून अनुश्री ने तिचा हात पकडला ...

"आई , अग ...तुझी पण मला काळजी आहे ना ....बर ठीक आहे ..मी नाही येणार ह्यापुढे ..पण तू आता घरी चल मी काडा करून देते तुला .कालच शिकले मी बाजूच्या वैद्य मावशी कडून ..."

अनुश्री आनंदात म्हणाली ...

"अनु.....गुणांची ग माजी बाय ती .."

राधा तिच्या वरून माया मोडत म्हणाली ..तिला अजिबात आवडलं नव्हतं अनुश्री ने इथे आलेले पण सध्या ती तिला जास्त बोलू शकत नव्हती म्हणून शांत राहिली पण आता तिला दुसरी कडे पाठवणे गरजेचे आहे ह्याची तिला जाणीव झाली ..तिने खूप आधीपासून अनुश्री ला मुंबई ला शिकायला पाठवायचं ठरवलं होत ..आता तिची दहावी होणार होती मग पुढचं सगळं सगळं शिक्षण तीच शहरात होईल आणि ह्या नरकात तीच आयुष्य खितपत पडणार नाही ह्याची तिने आता पर्यंत काळजी घेतली होती .....

"साली ...पोरीला बी नाचाया धाडत न्हाय आणि सवता बी अशी नाटका करते ....चल चल ..आताच्या आता बोर्ड व जा ..न नाच....."

राधा चा नवरा अनुश्री चा बाप दारू पिऊन झोकांड्या देत त्यांच्याकडे येऊन राधाचा हात हात धरून तिला स्टेज च्या दिशेने ओढत नेत म्हणाला ...,

"बाबा , काय करत आहेत हे ...आई आजारी आहे ...असं असताना सुद्धा तुम्ही तिला नाचायला सांगता ..?"

ती आपल्या कडे राधा बाई ला खेचत म्हणाली ...

"हे शाने ,,,तू मदी मदी बोलू नागोस...एक तर तुला हिच्या मुळे अजून ह्या बोर्डावर नाचल्या लागलं न्हाय ...तू काम करत नाहीस अन वरून मला शिकवून राहिलीस ..चल हट बाजूला ...न्हायतर तुला नाचवेन ...."

सुरेश ला अनुश्री च्या वडिलांना नीट उभं पण राहता येत  नव्हतं तरी सुद्धा तो असेल नसेल तेवढी ताकत लावून तिला खेचत होता ....पण त्याने अनुश्री ला नाचायला लावायचा विषय काढला तस राधा बाई भडकली,

"हे ..बग...म्या तुला पोसते ..तू आम्हास्नी पोसत न्हाय तवा माज्यावर न माज्या पोरीवर रुबाब करायचा न्हाय सांगून ठिवते ...आणि अजून एक ध्यानात ठिव माजी पोर त्या फडावर कधीच नाचणार न्हाय ...आजची लावणी झाली हाय ...समदे घराला गेलेत ..तू बी जा ...."

असं म्हणून तिने अनुश्री चा हात त्याच्या तावडीतून सोडवून घेतला ..एवढ्यात तिला खूप दम देखील लागला होता ..तिने त्याला जोराचा हिसका दिला ..तस आधीच त्याचा जात असलेला तोल अजूनच गेला आणि तो खाली पडला ...

"साली ...******, मला शिकवते बगुन घेईन ..."

असं बडबडत तो तिथेच कोसळला ....

"चल आधी आपण घरला जाऊ ...."

असं म्हणून तिचा हात पकडून राधा जिथे बैल गाड्या बांधल्या होत्या त्या दिशेला गेली ...तस तिथे अजून दुसऱ्या उभ्या असलेल्या तिच्या सोबत नाचणाऱ्या देखील आल्या ...

क्रमश

🎭 Series Post

View all