मागील भागात आपण पाहिलं कि अनुश्री आईच्या काळजीने फडावर जाते, जे तिच्या आईला अजिबात आवडत नाही. त्यात सुरेश राव दारू पिऊन त्यांना धमकावतात. आता पाहूया पुढे....,
तिचा हात पकडून राधा जिथे बैल गाड्या बांधल्या होत्या त्या दिशेला गेली ...तस तिथे अजून दुसऱ्या उभ्या असलेल्या तिच्या सोबत नाचणाऱ्या देखील आल्या ...
"आक्के ...कधी बोलली न्हाय ते ...तुजी एवढी सुंदर लेक हाय ते ..."
त्यातली एक जण अनुश्री कडे खालून वर बघत म्हणाली...
"हो ना ...समदे येडे व्हतील ....हिला का नाही फडावर आणलस तू ...एवढ्याला समद शिकली असती ..."
दुसरी एक म्हणाली तस राधा च्या काळजाचा ठोकाच चुकला ..एवढे दिवस तिने तिच्या लेकीला जपलं होत ..पण आता कधीपर्यंत जपेल ?
"आक्के सांग कि ग का लपवलंस एवढे दिस हे रतन आमच्यापासून ..."
आता सगळ्यांनी तिला घेरा घातला होता ..ती काहीच बोलत नाही हे पाहून तिसरीने विचारलं...
"ते ..तिला शिकायचं आहें ..म्हणून कधी आणली न्हाय हिकडं ..आता मला जाऊ दे...वैद्य बुआ आला असल..."
राधा कशी तरी म्हणाली.. समोरच्याच्या बायांची रिऍकशन कशी असेल ते तिला ठाऊक होत.. म्हणून ती संवाद टाळत होती... पण त्या बाया अजूनच तिला डिवचत होत्या...
"अगो बया हे काय ऐकून राहिलो आमी...कधी नाचणारीची मुलगी शाला शिकते का ?ती बी तुज्यासारखीच नाचेल , पण एवरी झाक दिसते तर पैका बी जाम मिळलं कि तुला तरी बी हे अस्सल रतन दाबून ठिवल्य तू , मग कुणा सावकाराशी बोलून ठिवलंय का ?"
त्यातली एक आगाऊ स्त्री तोंड वाकडे तिकडे करत अनुश्री कडे बघून बोलली....ते ऐकून सगळ्याच हसायला लागल्या....
त्यांचं हे असं बोलणे तिला सहन झालं नाही म्हणून तिने तुयाना काही उत्तर देण्यापेक्षा तिने त्या बैलगाडी वाल्याला सांगितलं ....,
"दादा मला बर वाटत न्हाय तू लवकर हाक गाडी .."
तस त्याने बैलाला चाबूक मारला आणि बैल थरथरले ..गाडी थोडी पुढे गेली,तस त्या बाया बाजूला झाल्या पण फार कुजबुज करत होता ..अनुश्री ला आता कुठे आई अशी का वागली असेल ह्याची जाणीव होत होती....आणि त्यांना जाताना पाहून झाडाच्या पाठीमागून कोण तरी फेटेवाला माणूस मनातच काहीतरी योजना आखत होता.....
त्या माणसाने बैलगाडी हाकायला सुरुवात केली ..पाऊस पडून गेल्यामुळे चिखलातून ती बैलगाडी हळू हळू जात होती ..इकडे एवढा वेळ कशी तरी आणलेली ताकत राधा बाई ला आता मात्र जड पडली आणि तिने गाडीतच अनुश्री च्या मांडीवर डोकं टेकवलं ..अनुश्री ने हात लावून पाहिलं तर तिच्या आईच अंग अजूनच तापल होत ..आणि हवेत पसरलेल्या गारव्या मुळे तिला अजूनच थंडी लागत होती ..तीच अंग थरथरत होत ..तस अनुश्री ने बाजूला असलेली घोंगडी तिच्या अंगावर टाकली आणि आपल्या आईच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली ....
राधा ला जरी झोप लागली असली तरी तिच्या डोक्यात मात्र अनुश्री ची काळजीच होती ..जेव्हा अनुश्री दहा वर्षाची झाली तेव्हाच त्यांच्या परंपरेनुसार तिला सुद्धा नाचायला तयार करण्यासाठी तिचा नवरा तगादा लावत होता पण राधा तिच्या निर्णयावर ठाम होती तिला तिच्यासारखा आयुष्य अनुश्री ला द्यायचं नव्हतं .त्यावरून तिचा आणि सुरेशरावांचा खूपच वाद झालेला ..त्यांनी फक्त त्याच आयुष्य आपल्या बायकोच्या जीवावर आयुष्य काढलं होत ..त्या माणसाला फक्त दारू माची मतं कोंबडी ह्याशिवाय काहीही दिसत नसे ..आणि ह्यासाठी तो माणूस आपल्या बायको ला दुसऱ्या कुणाजवळ पाठवायला सुद्धा कमी करत नसे .... त्याने उभ्या जन्मात काहीच काम केल नव्हतं. राधा अडाणी असली तरी हुशार होती पुढचा धोका तिने आधीच ओळखला होता त्यामुळे इतर बायकांसारखं तिने खूप मूल जन्माला घातली नाही .तिला दोन मूल झाली ..दुसरा मुलगा असल्यामुळे तिला टेन्शन नव्हतं ..पण तो सुद्धा त्याच्या बापासारखा वागू नये ह्याची तिने काळजी घेतली होती ..त्यात अनुश्री वर कुणाची नजर पडू नये म्हणून तिने तिला तिकडे कधीच फिरकू दिल नाही आपली दोन्ही मूल शिकून मोठी व्हावीत हे एवढंच स्वप्न तिने त्या वेळेस आपल्या उराशी बांधलं होत ..आणि त्यासाठी तिला खूप संकटाचा सामना करायला लागला होता...
पहिला मोठा अडथळा तर तिच्या नवऱ्याचाच होता , तो बाप असून देखील आपल्या मुलीला नाचायला फडावर पाठवणे ह्यात त्याला काहीच चुकीचं वाटत नव्हतं ..आता लवकरच अनुश्री ला मुंबई ला पाठवून द्यावं कारण आज किती लोकांची तिच्या वर नजर पडली असेल , ह्याची तिला कल्पना होती ..आणि बाई म्हणजे ह्या लोकांना खेळणेच वाटत ..
घर जवळ आलं तस बाजूच्या बाईच्या मदतीने अनुश्री ने राधा ला घरत नेलं ..ताप काही केल्या कमी होत नव्हता तिने आधी तीच अंग पुसून काढलं. त्यानंतर काढा बनवून तो आधी तिने राधाला प्यायला दिला व नंतर मऊसूत गरम गरम खिचडी तिला खाऊ घातली ..
राधा आपल्या लेकीची धावपळ पाहत होती ..हीच जन्म नाचण्यासाठी झाला नाही ह्याची तिला पूर्ण खात्री होती ..माझी पोर चांगली डाक्टर व्हईल ...हो ..मला तिला डाक्टर च झालेले पाहायचं आहे , आणि ह्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल ..
ती विचारातच असताना अनुश्री ने आवाज दिला ...,
"आई , कसल्या विचारता आहेस कधीपासून मी तुला पाहत आहे , कधी हसतेस , तर काही वेळात तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन येतंय ..."
"अनु , हिकडं ये बाळ ...."
मनाशी काहीतरी ठरवून तिने तिला आवाज दिला..
तशी ती राधाच्या जवळ गेली ....तस तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिची माया मोडली व म्हणाली ...
"अनु ...काय बी झालं तरी तू हे असं माज्यासारखं नाचायचं न्हाय बघ ..."
बोलताना तिला धाप लागत होती..
"पण आई ह्यात वाईट काय आहे हि सुद्धा एक कला आहे ना ..."
एक मोठा श्वास घेऊन राधा बाई म्हणाल्या ...,
"हाय ..ना ...हाय हि कला च ..अन ती सादर करणारे आम्ही कलावंत ..पण लोकांची नजर लय घाण... ह्या समाजात अमास्नी मान न्हाय....पर पोटा पाण्यासाठी हे समदं मला करायला लागलं ...तुज्या बा ला तर बगतेस .दारू पिऊन पडून राहतो...त्याने काय बी पर्याय नाय ठेवला माज्या समोर....पर माजी इच्छा हाय तू एक चांगली डाक्टर व्हावी ..बग आता तुज्या काड्या ने मला किती फरक पडलाय .ते...."
राधा कौतुकाने आपल्या लेकीला म्हणाली...
"आई एक विचारू का ग..?? "
अनुश्री ने राधा ला विचारलं...
"अग बाई... इचार कि.... "
राधा हसून म्हणाली....
"आई , तू बाबांबरोबर कस काय आयुष्य काढलस ग ?”
तिच्या मनातील खंत तिने विचारली...
"अनु बाळा ..भलेही तो तुझा बाप दारू पितो , मारतो पण त्याच्या मुळे तिथे तरी कुणी बी माज्यावर हात टाकत न्हय , लोकांना वाटतंय आम्हा नाचणारीना इज्जत न्हय तवा कुणी बी इवून कस बी वागतय... माज्या सोबतच्या ज्या हायेत त्यांच्या मुलांना बापाचं नाव बी लावता येत न्हाय.. ह्यो कारण हाय कि म्या त्याच ऐकते... न्ह्यातर कधीच मुरडा बसवला असता मेल्याचा..."
असं म्हणून ती हसायला लागली आणि इकडे अनुश्री विचारात पडली....
Kramash
Kramash
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा