मागील भागात आपण पाहिलं कि , अनुश्री आपल्या आई ची काळजी घेते आपण तिला खूप प्रश्न पडतात आपली आईच्या वागण्याचे , त्या बद्दल राधा तिला जमेल त्याप्रकारे तिला मार्गदर्शन करते .. आता पाहूया पुढे ...,
तिला विचारात पडलेले पाहून राधा ने विचारलं ..,
"आता तू ना कसल्या इचारत हायेस ग ?”
“म्हणजे आई बघ ना .., एक स्त्री बाळाला जन्म देते पण ती त्या बाळाला आपल नाव देऊ शकत नाही , दिल तर किती विचित्र नजरेने लोक त्या बाळा कडे पाहतात , तिचा पण हक्क असतो ना ..आता तूच बघ ना त्यांच नाव लागावं आमच्या मागे म्हणून किती त्रास करून घेत आहेस ?”
शिक्षणामुळे अनुश्री चे विचार बदलले होते आणि तिला त्या बद्दल प्रश्न पडायला लागले होते...
"अग जगाची रीतच हाय अशी.... आपण पडलो साधी माणसे... जसं जग चालतंय तस चालत राहायचं......"
राधा आपल्या परीने तिच्या शंकेचे निरसन करू पाहत होती......
"अशी काय ग रीत जिच्यामुळे आपण जग बघतो तिलाच झिडकरायचं...तिच्याशीच अशी वागणूक करायची...."
अनुश्री ने आपली नाराजी व्यक्त केली....
"म्हणून म्या तुला बोलते ना शिकून फार म्योठी हो ..कुणाच्या पुढं माज्यासारखं तुला नाचाया लागलं न्हाय पाहिजे एवढं फकस्त ध्यानात ठिव तू...."
एवढं बोलताना सुद्धा राधा ला धाप लागली तस अनुश्री ने पटकन पुढे होत तिला म्हणतील ..,
"आई मी काढा नाहीतर लेप आणते करून तू आता झोपून घे .."
असं म्हणून तिने तिला झोपवलं व तिच्या पायाला,हाताला व डोक्याला तेल लावून तिला शांत झोपायला सांगून ती बाजूच्या वैद्य मावशींकडे गेली ...
अनुश्री ज्या शेजारच्या मावशीकडे गेली ..त्या मावशीचे यजमान देखील वैद्य होते ..त्यांना बाहेरून खूप बोलावणे यायचे ..ते तिकडे जायचे ..अनुश्री च्या ही घरात कोण नसायचं त्यामुळे ह्या वंदना मावशीच आणि अनुश्री च छान जमायचं ..त्यात मावशींना स्वतःच मूळ बाळ नव्हतं त्यामुळे तिच्या वर त्यांचा भारीच जीव होता ...
"मावशी ..मावशी ..कुठे आहेस.."
"अनु ..,.बाळ आता ह्या वेळेला तू इथे ..सगळं काही ठीक आहे ना ...."
दिवा बत्ती करून बाहेर येत मावशी म्हणाल्या ...
"नाही मावशी .., ते आई ला खूप ताप आलाय आणि तिला थंडी पण लागते तू मला दुसरा कोणता तरी काढा करायला शिकव ना .."
अनु वंदना मावशी जवळ जात म्हणाली ..
"अनु बाळा ..आग आता मला हवी ती वनस्पती आणली नाही आणि आत तर खूप अंधार पडला आहे ..तू असं कर लेप घेऊन जा आणि आईच्या पायाला लाव जेणेकरून अंगात थंडावा पडेल आणि ताप वाढू देऊ नकोस नाहीतर डोक्यात जाईल ..."
तस लेप बनवायला ती मावशीला मदत करू लागली ..तिने लेप बनवून झाला तस तडक घराकडे धाव घेतली
***********************************
वर्तमानात
टेबलावरच्या फोन च्या रिंग ने अनुश्री भानावर आली......,
"मॅडम, एक emergency आली आहे.... तुम्ही येता का.....???? "
पलीकडून हॉस्पिटल मधली एक नर्स म्हणाली.
"हो मी निघतेच, पण तू तोपर्यंत डॉक्टर निशांत ना ही केस पाहायला सांग..... मी निघतेच.......! "
एवढं बोलून डॉक्टर अनुश्री तिथून डायरेक्ट त्यांच्या हॉस्पिटल मध्ये गेल्या, तिथे गेल्यावर त्यांना समजलं कि, एका गर्भवती महिलेला कळा सुरु झाल्या होत्या आणि तिचं बाळ उलट फिरलं होत, त्यामुळे त्याच्या माने भोवती नाळ गुंडाळली गेली होती. त्यामुळे क्रिटिकल सिटूएशन झाली होती. डॉक्टर अनुश्री पटकन हॉस्पिटल मध्ये पोहचल्या आणि त्यांनी डॉक्टर निशांत ला सोबत घेऊन ती केस हॅन्डल करायला सुरुवात केली. गरोदर असलेली ती स्त्री येणाऱ्या कलांमुळे मुळे खूपच हतबल झाली होती. ती स्त्री बेशुद्ध होत चालली होती. पण तस होणे धोकादायक होते, म्हणून अनुश्री तिच्याशी सतत बोलत होती..... तेव्हा ती स्त्री तिचा हात पकडून अत्यंत वेदनेने तिला म्हणाली,
"अनुमा, माझ्या बाळाला वाचवा....मला काहीही झालं तरी चालेल....."
तिला धीर देत.....आणि डॉक्टर निशांत ला सूचना देत... त्यांनी तिचं c-section अत्यंत हुशारीने व धिटाईने पार पाडलं.......7 तासांच्या दीर्घ श्रमानंतर , त्या स्त्री ने एका गोंडस मुलाला जन्म दिला......त्या मुलाला क्षणभर त्या बघत च राहिल्या.....
तिला दिलरेखी खाली ठेऊन अनुश्री फ्रेश होण्यासाठी निघून गेली. फ्रेश झाल्यावर तिने कॉपी पिण्यासाठी घेतली.
ती त्या घटनेचा विचार करत असताना तिच्या लक्षात आलं...., ही मुलगी मला अनुमा म्हणाली का...... तिने थोडा डोक्यावर जोर दिला.... आणि मनातच म्हणाली,
"हो.... हो..... ती मला अनुमा च म्हणाली...., पण how's possible.... मला तर अनुमा एकच व्यक्ती म्हणत होती..... माझी सई........ "
सईच्या आठवणीने त्यांना खूप गलबळून आलं..... कशी असेल ती....कशी दिसत असेल.......मी...... मी......आठवत असेन का तिला........??? तिला सुद्धा आता बाळ झालं असेल का.......?????ते बाळ माझ्या सई च आहे??? त्या मुलीचा स्पर्श तसाच वाटत होता...... सई चा स्पर्श मी कस विसरणार..... पण ती इथे का येईल..... जाऊन पाहावं का तिला....? ती माझी सई असेल तर????
आणि त्याच विचारात परत त्या एकदा भूतकाळात गेल्या...... ज्या आठवणी जेवढ्या हव्या होत्या.... तेवढ्याच वेदनादायक होत्या.......
***********************************
इकडे सुरेश मातीत तसाच लोळत पडला होता, त्याला त्याची बायको आजारी असल्याचं देखील काहीच वाटत नव्हतं .., आता देखील त्याच्या चेहऱ्यावर कुणीतरी पाणी मारलं तस तो शुद्धीत आला ...
"कोणाचे दिवस भरलं र ..जो माज्या अंगावर पाणी वतला..... माज्या समोर या... मंग बघतो म्या एका एका ला .."
तो चुळबुळत डोळे मोठे करत इकडे तिकडे पाहू लागला ..... आणि स्वतःचा जाणारा तोल सांभाळून उभा राहिला.....तोच त्याच्या नाकात दारू चा वास भरला न तो त्याच्या कडे अजूनच ओढला गेला ..आणि त्या वासा सरशी तो झटकन बाजूला वळला आणि बडबडू लागला ..,
"ये कोण हाये रे ********** , ती बाटली माजी हाये .ती मला दे आता च्या आता...."
"हि समदी बाटली न खूप सारा पैका बी तुला मिळालं पर त्याबदल्यात तू माज एक काम केलस तरच ..""
ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने सुरेश पळाला त्याने बाटली हातात घ्यायचा प्रयत्न केला पण त्या माणसाने ती काही त्याच्या हातात लागून दिली नाही ..,
"म्या तुज समदं काम करीन पण एक डाव मला ती बाटली दे ..मजा घसा पार सुकलाय..दे... दे.... लवकर दे......."
सुरेश त्या दारूच्या बाटली कडे पाहत बडबडू लागला....
तस त्या माणसाने दारूचे दोन तीन थेम्ब त्याच्या तोंडात टाकले.....
"तुमी म्हणाल ते करीन म्या... फकस्त मला ती बाटली द्या......"
तो थरथरत हात जोडून म्हणाला तस त्या व्यक्तींनी त्याच्या हातात बाटली दिली .त्या सरशी सुरेश ने एका झटक्यात ती बाटली रिकामी केली ...
तस त्या व्यक्ती ने त्याच्या डोक्यातली योजना त्याला सांगितली आणि त्यावर सुरेश ने लगेचच त्या माणसाला होकार देखील देऊन टाकला ते ही मागचा पुढचा काहीही विचार न करता..... पण त्याचे परिणाम मात्र दुसऱ्याच कुणाला तरी भोगावे लागणार होते...
कोण असेल ती व्यक्ती?
आणि काय असेल त्याची योजना?
सुरेश काय करेल?
राधाला अनुश्री बरी करेल ना?
Kramash
आणि काय असेल त्याची योजना?
सुरेश काय करेल?
राधाला अनुश्री बरी करेल ना?
Kramash
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा