मागील भागात आपण पाहिलं कि, अनुश्री ची आई तिच्या वडिलांच्या धमकीला घाबरून तिला तालुक्याला पाठवून नंतर मुंबई ला पाठवायचा प्लॅन करते ..अनुश्री तयार नसताना सुद्धा ती तिला जबरदस्ती ने आवरायला पाठवते .. आता पाहूया पुढे .......,
सगळं आवरल्यावर अनु जड अंत:करणाने आपल्या आई च्या जवळ जाते ...आणि तिच्या पायाशी वाकते ..,
"आई स्वतःची आणि गणू ची काळजी घे ..जप स्वतःला ...ताप वाढून देऊ नकोस "
तस राधा आपल्या मुलीला आपल्या कवेत घेते तिची माया मोडते आणि तिच्या हातात काही पैसे देते ...
"
"
"बाय माजे सध्या एवढंच पैके हायेत माज्या कड ..पण म्या लवकरच तुला भेटाया येईन ...तू आता निघ ...."
तस अनुश्री तिला होकार देऊन झोपलेल्या गणू च्या डोक्यावरून हात फिरवून बस स्टॅन्ड च्या दिशेने जाते .....आणि राधा ती नीट पोहचावी आणि तिच्यावर लक्ष ठेव म्हणून देवा कडे प्रार्थना करते ...
***********************************
इकडे सुरेश ला कुठून खबर लागली कुणास ठाऊक कधी ही दुपार शिवाय न उठणारा तो रात्रीची दारू पूर्णपणे न उतरल्यामुळे तो झोकांड्या देतच तिथे आला ...नुकतंच उजाडू लागलं होत ..अनु गेल्यामुळे आता गणू आणि तिच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते म्हणून राधा चुलीजवळ बसली होती . तिथे हा गेला आणि तिच्या केसांना पकडून ओरडला ...,
" ********, साली तुजी हिंमत कशी झाली माज्या पोरीला इथून पाठवायची ....कुठं हाय आनी सांग लवकर .."
"असल हितचं न्हायतर परसाला गेली असल ...अन तू सकाळी सकाळी तरी काय ढोसून यायची ..."
राधा म्हणाली खर पण तीच्या मनात जरा धाकधूकच होती ..अनुश्री तालुक्याला पोहचेपर्यंत तरी सुरेश ला समजायला नको होत ..तिला समजतच नव्हतं दुपारी उठणारा माणूस आज सकाळी कसा काय उठला आणि ते पण अनुश्री बद्द्दल विचारतोय ..
"खोट बोलू नगोस ...मला ठाव हाय तू तिला कुठंतरी धाडलं हाय ...तवा गपगुमान तिला बोलवून घे .."
असं म्हणून त्याने तिच्या केसांवरची पकड अजूनच घट्ट केली आणि त्यावर राधा विव्हळली ...आता तिच्यात अशक्तपणा होता म्हणून नाहीतर तिने कधीच त्याला तुडवला असता ...
"आ..आ...आधी माजी केस सोड ..आणि तिला साद दे ...असल हितचं कुठंतरी ..."
तस त्याने अनुश्री एक दोन आवाज दिले पण तिची वो काही आली नाही तस तो बिथरला. आयते मिळत असलेले पैसे आणि जमीन त्याला हातची घालवायची नव्हती
"रांड ....कुत्री,******* सांग कूट धाडल तू तिला ..."
असं म्हणून त्याने बेसावध असलेल्या राधाच्या कमरेत लाथ मारली तशी ती जोरात किंचाळली ..तस त्याने खाली बसून तिचा तोंड दाबला ...
"वरडू नगोस ..म्या आताच अनुश्री ला गवसेन अन हिकडं न अंत तिकडचं घेऊन जाऊन तीच चिरा उतरवेन ..तुला समजणार बी न्हाय तुजी पोर कुठं हाय ते ..."
ते ऐकून राधा ला अजूनच चीड आली आणि ती त्याच्या वर कण्हत असून देखील थुंकली...
"माजी पोर तुला कवा बी गावणार न्हाय ..म्या तिला लांब पाठवली हाय ..."
तस ते ऐकून सुरेश च्या डोक्यात एक सनक गेली आणि त्याने पुन्हा एकदा राधा ला लात मारली ...आता मात्र तो घाव तिच्या वर्मी बसला आणि तिला तोल जाऊन ती दगडाच्या पाट्यावर कोसळली .., ज्यामुळे तिच्या डोक्याला मार बसला आणि ती बेशुद्ध झाली ....मागून रक्त सुद्धा वाहू लागलं होत ...पण सुरेश ला काही ही समजत नव्हतं तो तसाच तिच्या जवळ गेला आणि अजून एक लाथ तिच्या पोटात घातली ...
"म्या आताच तिला हुडकून आणेन अन तुज्या समोर हे समद करेन .बगतोच काय करतेस ते????.."
पण राधाचा, श्वास आता मंद होत चालला होता ..आणि तिच्या डोक्या खाली वाहणारे रक्ताचे ओहळ आता त्याच्या पायाला लागले ..पायाशी काय ओल लागतंय हे जाणवून तो पायापाशी वाकला. तस ते येणारे रक्त पाहून त्याची उरली सुरली सगळी नशा उतरली ..तो तिच्या गालावर चापटी देऊन उठवता होता. पण तिच्या कडून काहीच प्रतिसाद त्याला मिळाला नाही ...एवढ्यात त्याला मागून गणु चा आवाज आला जो परसातून परत येत होता ..हे सगळं त्याच्या वर येईल हे पाहून तो घाबरला आणि जोर जोरात ओरडायला लागला ...,
"राधे ...राधे ...अग उठ कि ग ...अशी कशी दगडावर पडलीस ..."
आणि जोर जोरात ओरडून रडायला लागला तस गणु हातामधलं टमरेल तिथेच टाकून पटकन तिच्या जवळ धावत गेला ...
"बा ...काय जाल आयेला?"
घाबरलेल्या गणू राधा च्या जवळ गेला ...
"आर तिचा तोल जाऊन ह्या पाट्यावर पडली ती ..बग ना उठत बी न्हाय...जा पटकन बाजूच्या वैद्य बुवांना बोलाव अन तुज्या ताईला बी हुडकून आण ...जा धाव "
सुरेश घाबरून ओरडला तस काहीच न सुचून रडत रडत पळत गणु बाजूच्या वैद्य मावशींकडे गेला ...आणि घाबरत घाबरत त्याने घडलेलं सांगितलं. तस त्या दोघांनी पटकन त्यांच्या घराकडे धाव घेतली ...इकडे गणु पण त्यांच्या मागे पळत गेला ...
त्या दोघांनी सुरेश च्या मदतीने राधाला चटई वर झोपवलं आणि रक्त थांबण्यासाठी वैद्य बुआ आपल्या घरातून लेप घेऊन आले......
घाबरलेला गणु इकडे तिकडे बघत आपल्या ताईला शोधत होता पण ती दिसत नाही हे पाहून त्याने घराच्या बाहेर धाव ठोकली ....आणि ताई ताई असा आवाज देऊ लागला ...
******************************
इकडे अनुश्री बस स्टॅन्ड च्या दिशेने जात असताना तिला उगाच एका माणसाने अडवले ...,
"हे बाय ...ते पोलीस पाटलाचं घर कुठं हाय जरा दाखवशील ?"
"काका इथून पुढे गेलात कि डाव्या हातालाच त्यांच घर आहे ..माझी बस आहे मला वेळ होईल तुम्ही पुढे कुणाला ही विचारलं तरी कुणी ही तुम्हाला त्यांचं घर दाखवतील ."
असं म्हणून ती पुढे जात होतीच कि त्याने परत अडवलं ...,
"तस नव्ह बाय ..पर म्या पडलो दुसऱ्या गावाचा ..तुमच्या गावच मला काय ठाव ना ..त्यात एवढया पहाटे कोण बी भेटणार न्हाय मला म्हणून म्हणाल......पण राहू दे .जाईन माझा मी .."
असं म्हणून तो चालायला लागला तर हिला त्याची दया आली म्हणून ती त्याच्या जवळ गेली......
"चला काका, मी त्या कोपऱ्यावर सोडते तुम्हाला .."
त्यावर त्याने मान डोलावली आणि अनुश्री च्या पाठी जाऊ लागला ..पण तो एवढा सावकाश चालत होता होता कि अनुश्री ला थांबून वाट पाहावी लागत होती ..कधी एकदा तो कोपरा येतो असं झालं होत तिला ....एकदाच तिने त्याला तिकडे सोडलं आणि तिने बस स्टॉप च्या दिशेने आपली धाव घेतली
पण ती तिथे पोहचे पर्यंत तालुक्याची बस निघून गेली होती ..तिने चौकशी केली असता आता पुन्हा दोन तासाने बस होती ..म्हणून ती तिथेच बसून राहिली ..इकडे गणु तिला शोधत शोधत पूर्ण गावभर फिरला होता पण त्याला अनु काही भेटली नाही ..एवढ्यात तोच माणूस त्याच्या पुढे उभा राहिला ...
"काय रे पोरा ..कुणाला हुडकतोस ?"
घाबरलेल्या गणू ला तो आपल्या गावचा नाही आहे हे देखील लक्षात नाही आलं आणि तो बोलला.....
"माझ्या ताईला हुडकतोय...... तुमी पाहिली का?????.."
"आर ..ती तर आताच बस स्टॉप ला गेली ..जा लवकर पळ ..."
ते ऐकताच ताई बस स्टॅन्ड ला का गेली ह्या विचारताच गणु ने स्टॅन्ड च्या दिशेने धाव घेतली .काही वेळातच तो तिथे पोहचला ..तिथे बस ची वाट बघत असलेली अनुश्री त्याला दिसली. तस त्याने तिच्याकडे धाव घेतली आणि तिला बिलगून तो हमसून हमसून रडू लागला ..इकडे तो काय रडतोय हे न समजून अनुश्री देखील भांबावून गेली होती ..
राधा वाचेल का????
अनुश्री ला सत्य समजेल का??
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा