Login

*तीच अस्तित्व * भाग -8

नाचणारीच्या मुलीची कथा
मागील भागात आपण पाहिलं कि सुरेश राधाला मारहाण करतो , ज्यात ती पाट्यावर पडून तिच्या डोक्यातून रक्त यायला लागत जे पाहून तो घाबरतो आणि ती चक्कर येऊन पडली असं तो सगळ्या सांगतो ..अनुश्री दिसत नसल्यामुळे गानू तिला शोधायला बाहेर पडतो आणि ती त्याला बस स्टॉप वर सापडते आता पाहूया पुढे ...,


काही वेळातच तो तिथे पोहचला ..तिथे बस ची वाट बघत असलेली अनुश्री त्याला दिसली. तस त्याने तिच्याकडे धाव घेतली आणि तिला बिलगून तो हमसून हमसून रडू लागला ..इकडे तो काय रडतोय हे न समजून अनुश्री देखील भांबावून गेली होती ..


"गणू ...अरे ..काय झालं तू एवढा घाबरला का आहेस आणि तू इथे कसा काय आलास..? आई नी पाठवलं का??...."

त्याला शांत करत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिने विचारलं ....


"ताई ...ती आपली आई ..चक्कर येऊन पडली ..तिच्या डोसक्याला खूप लागलं हाय अन रगत बी आलय तू चल ना ..मला लय घाबरायला झालंय..."


ते ऐकून अनुश्री देखील घाबरली आणि गानू चा हात धरून काही न बोलता ती आपलं गाठोडं घेऊन कस तरी धावत सुटली ..ते दोघे ही घर येईपर्यंत न थांबता धावत होते ...अनुश्री च्या मनात अनेक शंका कुशंका येत होत्या ..ती देखील खूप जास्त घाबरली होती ...ते दोघे तिथे पोहचेपर्यत राधा ची प्राणज्योत मावळली होती ....आजूबाजूचे सगळेच त्यांच्या घराजवळ जमले होते ...ते दोघे सगळ्यांमधून वाट काढत काढत आत मध्ये पोहचले ...

एका बाजूला सुरेश रडत होता तर चटई वर राधा चा देह ठेवलेला होता ..वैद्य मावशी सुद्धा तिथेच बसल्या होत्या .....आजुबाजुकला कुजबुज आणि हळहळ व्यक्त होत होती ...अनुश्री ला कल्पना अली तशी ती आई च्या जवळ गेली आणि तिने जोरात  किंकाळी फोडली


..आई  SSSSS  "

जी ऐकून तिथल्या सगळ्यांच्या काळजाच पाणी पाणी झालं ..सगळ्यांना खूप वाईट होत.अनुश्री गणू ला जवळ घेऊन खूप रडत होती .. वंदना मावशी तिला जवळ घेऊन शांत करत होती .....

सुरेश देखील आपल्या लेकी जवळ गेला आणि खोटे अश्रू ढाळत तो तिला व गणू ला जवळ घेऊन रडू लागला ....


"आने बग ..काय झालं राधा ला.... कूट व्हतीस तू ....ती चक्कर येऊन पडली अन व्ह्यातच नव्हतं झालं ..."

ते ऐकून अनुश्री ला अजूनच भरून आलं .कदाचित मी असती तर आई उठली नसती न हे झालं नसत हे देखील तिचं मनात येऊन गेलं ...ती आजारी असल्या मुळे कुणी सुरेश वर संशय देखील घेतला नाही आणि तो म्हणतो तेच खर ह्याची सगळ्या खात्री पटली ...


यथावकाश सगळ्यानी राधाचे सगळे क्रिया कर्म करून घेतले ...अनुश्री ने जरा देखील गणू ला आपल्या पासून दूर केले नव्हते ..त्याच्या शिवाय तिला कोणच जवळच वाटत नव्हतं ..बाप असून नसल्या सारखा होता ...


बिचाऱ्या दोन्ही मुलांचे रडून रडून अश्रू सुकले होते ...घरी आल्यावर वंदना मावशी ने बळजबरीने त्या दोघांना जेवायला लावले पण गणू ला भरवून अनुश्री मात्र जेवली नाही पण तिथे येऊन तीच जेवण मात्र सुरेश निर्लज्ज पणे जेवला ...अनुश्री ला अचानक आपली आई गेल्या मुळे खूपच मोठा धक्का बसला होता ..तीच मन ती गोष्ट स्वीकारायलाच तयार नव्हतं ....बाजूचे तिचे सांत्वन करून जायचे.. पण तिचे डोळे पुसायला आता तिची माऊली येणार नव्हती....


आता निदान पुढचे पंधरा दिवस तरी सुरेश ला शांत बसणे गरजेचे होते ..पण त्या दरम्यान आता अनुश्री तुलाच सगळं बघायचं आहे हे मात्र तो तिला कृतीमधून दाखवून देत होता ..अनुश्री ला स्वतः सोबतच गणू ला सुद्धा बघावं लागत होत ..बिचार दहा वर्षाचं पोर आई शिवाय खूप ऐकट पडलं होत. तस तर त्याच सगळं अनुश्री ने च केलं होत पण कुठे तरी आई आहे ती सगळं बघेल ह्या मुळे दोघे हि निर्धास्त असायचे पण आता तीच नसणे त्या दोघाना खायला उठायचं ...


सुरेश ने तीन दिवस दारू पिली नाही पण चवथ्या दिवसा पासून तो रोज दारू पिऊन यायचा आणि उगाच खोटे अश्रू ढाळत बसायचा ..अनुश्री ला त्याची दया यायची ती त्याला शान्त करायची कारण काहीही झालं तरी तो तिचा बाप होता आणि हे सत्य कुणी बदलवू शकत नव्हते ..पण त्याच्याकडे दारू साठी पैसे कुठून येत असावेत हा प्रश्न. मात्र तिच्यासमोर होता कारण एव्हाना घरातलं सामान देखील संपल होत आणि सुरेश ला त्याच काहीच पडलं नव्हतं .तो मिळत असलेले खात होता ..आपल्या बायको नंतर आता दोन्ही मुलांना आपण बघावं एवढी समज त्याच्यात नव्हती.


त्याने फक्त आता रडगाणे सुरु केले होते ..अनुश्री ला कस आपल्या जाळ्यात अडकवता येईल ह्याच विचारात तो होता .....

अश्यातच आता त्याला दारू साठी पैसे मिळत नव्हते ..कारण त्या माणसाने अनुश्री चा चिरा उतरवल्याशिवाय आता काहीच देणार नाही असं सांगून काढता पाय घेतला होता. त्यामुळे मासा जसा पाण्यावाचून तडफडतो तशी अवस्था सुरेश ची दारू शिवाय झाली होती...


आणि त्यात त्या माणसाने काम लवकरात लवकर कर म्हणून तगादा लावला होता ..एकतर काम कर नाहीतर माझे पैसे परत दे ...हे दोन पर्याय त्यांनी सुरेश पुढे ठेवले होते ..आणि काहीही करून सुरेश ला अनुश्री ला तयार करायचे होते ..ह्याच मुळे त्याने त्याच्या बायकोला गमावले होते ....तरी सुद्धा त्याच डोकं ठिकाणावर काही आलं नव्हतं......


एक दिवस संध्याकाळी असच अनुश्री एकटीच रडत बसली असताना नेमकी सुरेश तिथे येतो .....,

"आने ...अशी का ग बसली हाय ...जा दिवाबत्ती कर अंधार पडलाय ...सांच्याला असं रडत न्हाय बसायचं......"

तो तिच्या जवळ बसत म्हणाला..

तस आपल्या विचारातून बाहेर येत उठत ...,

"हा बाबा ..करते दिवा बत्ती ......"

असं म्हणून ती उठली आणि दिवाबत्ती करायला बत्ती मध्ये रॉकेल टाकायला गेली तर रॉकेल संपले होते ..तिला आता सुचत नव्हतं काय करावं ...कारण आत रात्र भर अंधारात राहावे लागणार होते ..घरात जेवायला देखील काही नव्हते ..थोडेसे तांदूळ होते त्यात बटाटा टाकून तिने खिचडी बनवली होती ..ती रात्री त्या दोघांना देईन असा विचार तिने केला आणि ती बाहेर आली...

"काय ग काय झालं ....बत्ती कुठं हाये ..."

सुरेश ने परत तिला विचारलं ...

"काही नाही बाबा ते रॉकेल संपलय ..मी वंदना मावशी कडून आणते ..."

ती नाराजीच्या स्वरात म्हणाली ..आता तिला हातपाय चालवणे गरजेचे होते म्हणून ती मावशींना कामा बद्दल पण विचारणार होती ..ती तिकडे जायला निघाली. तस हीच संधी आहे असं ओळखून तो रडून म्हणाला ...


"तुमची आई व्हती ...तर मला काय बी टेन्शन नव्हतं ..न आता काय करावं समजत न्हाय ...म्या सवताला दारूची सवय लावून घेतली हाय ...ती घेतली न्हाय तर माजे हात पाय थरथरत करत्यात अश्यात मला कोण काम बी देणार न्हाय ...मला माफ कर पोरी ..म्या तुमा दोघांना कस सांभाळू .."


असं म्हणून तो रडू लागला ..ते पाहून अनुश्री ला अजूनच वाईट वाटल ..ती त्याच्या जवळ गेली आणि त्यांना म्हणाली ..,


"बाबा ..काळजी नका करू मी मावशींना विचारते माझ्या साठी काही काम भेटेल का ..मग होईल सगळं नीट ..."


ती कामाला गेली तर कदाचित माझे मनोरथ बिघडेल हे मनात आल्यामुळे तो थोडा घाबरलाच....



सुरेश अनुश्री ला बाहेर काम करून देईल का?
तो तिचा चिरा उतरवण्यास यशस्वी होईल का???


🎭 Series Post

View all