मागील भागात आपण पाहिलं की, अनुश्री तिचा चिरा उतरवण्यासाठी पाटलांच्या घरी वडिलांसोबत जाते . आता पाहूया पुढे ,
एव्हाना अनुश्री च्या लक्षात आले, आपण काल रात्रीपासून कुठे आहोत. तस झटकन तिकडे जाऊन तिने ती आवरायला सुरुवात केली.
ती आंघोळ उरकून बाहेर आली. शेवंताने तिला एक छानशी लाल रंगाची साडी दिली होती. तो रंग तिच्या वर खूप खुलून दिसत होता. साधा ब्लॉऊस पण तिचं रूप खिलवत होत. त्यात तिने केस फक्त गुंडाळले होते, त्यामुळे ती मोहक वाटत होती.

ती जशी बाहेर आली तशी एक छोटी सावली सतत तिच्या मागे असल्याचे तिला जाणवत होते, पण ती जेव्हा मागे वळून पाहत होती तेव्हा कोण नसायचं......
ती अजून पुढे आली मागून तिला कुणीतरी बिलगलं.....
.,
ती अजून पुढे आली मागून तिला कुणीतरी बिलगलं.....
.,
ती फिरणार तेवढ्यात तिला आवाज आला,
"आई..... आई.....,"
आणि ती छोटी मिठी अजूनच घट्ट झाली.
क्षण भर तिला काहीच सुचले नाही. पण उत्सुकता निर्माण होऊन तिने मागे वळून पाहिले तर खरंच एक छोटी मुलगी तिला बिलगून उभी होती.म्हणजे ती सावली तिची होती तर...???
पण अनुश्री चा चेहरा पाहून ती मुलगी एकदम घाबरली. आणि निरखून तिला पाहू लागली. ती एकदम गोड, चुलबुळी, गोबऱ्या गालाची साधारण तीन चार वर्षाची मुलगी पाहून अनुश्री ला तिला उचलून घ्यायची इच्छा झाली.

(Pic साठी थँक्स गूगल )
तस अनुश्री ने तिच्या दिशेने हात पुढे केले, पण हाय रे...! ती छोटी मुलगी तर पळून गेली...... अनुश्री तिच्या मागे धावत गेली पण त्या आधीची ती समोरच्या दिशेला नाहीशी झाली. ती तिच्या मागे जाणार तेवढ्यात गणू ने तिला आवाज दिला तस ती मागे फिरली.
"ताये, तिकडं काय करतेस ?"
तो डोळे चोळत तिला विचारत होता .
"गणू , ऐक ना तू आवरून घे. ते बघ पाठीमागे न्हाणीघर आहे , मी आलीच हा ."
असं म्हणून तिने गणूला अंघोळीसाठी पाठवून दिल आणि ती बाहेर पुन्हा त्या छोट्या मुलीच्या मागे मागे गेली. तेव्हा ती मुलगी थांबून तिच्याच कडे बघत होती.
तस अनुश्री ने तिच्या दिशेने हात पुढे केले, पण ती छोटी मुलगी तिला तस करताना पाहून पळून गेली. अनुश्री तिच्या मागे धावत गेली पण त्या आधीची ती तिच्या डोळ्यासमोरून नाहीशी झाली.
तस ती छोटी मुलगी ज्या दिशेने धावत गेली, त्याच दिशेने अनुश्री सुद्धा धावली, ती मुलगी एकदा पुढे तर एकदा मागे वळून अनुश्री बघत असल्यामुळे तिच्या समोरून येणाऱ्या एका आजीला ती धडकली.
"अगो बय्यो सईताई, का पळून जासा तुमी ...! थांबा की जरा .. अन हे दूध घ्या बर .... "
असे म्हणुन तिच्या हातात दुधाचा ग्लास देऊन तिला थांबवत त्या आजी म्हणाल्या.
"तर ह्या चिमुरडीच नाव सई आहे तर......! खूपच गोड आहे ही...."
आपल्याच मनाशी हसत अनुश्री म्हणाली.
तिला तशी मध्येच उभी राहिलेली पाहून शेवंता तिथे आली आणि म्हणाली,
" बाई साहेब, आवरलं ना तुमचं? "
तस तिने होकारात मान हलवली.
"मग तुमास्नी मालकीणबाईनी न्याहारीसाठी स्वयंपाक घरात बोलावले होते... तवा चला बिगी बिगी माज्या संग."
असे म्हणत...तिचा हात धरून शेवंता तिला स्वयंपाक घराच्या दिशेने घेऊन निघाली. तस तिला थांबवत अनुश्री बोलली,
" पण गणू आत मध्ये आहे तो घाबरेल. "
"काळजी नगा करुस, म्या तुमास्नी सोडून त्यास्नी घ्यायला येईन. "
तस तिला होकार देऊन ती शेवंता सोबत गेली. तिने स्वयंपाक घरात प्रवेश केला आणि ती पाहतच राहिली. ते स्वयंपाक घर खूप मोठे होते. एका बाजूला छान सारवलेल्या चौथऱ्यावर दोन चुली होत्या, तसच त्या दोन्ही चुलीच्या बाजूला वेगवेगळी भांडी होती. तर दोन्ही चुलीजवळ बसायला दोन लाकडाचे मजबूत पाट होते. त्या स्वयंपाक घरातलं सामान पाहून तिला प्रश्न पडला कि,
" बापरे...! किती लोकांच जेवण शिजत असेल....इथे...?'
पण तिची नजर हटत नव्हती, ती अजूनच त्या सगळ्याच निरीक्षण करू लागली. तिथे बरीचशी भांडी पितळेची आणि तांब्याचीच होती. ती सुद्धा घासून स्वच्छ होती व ती सगळी भांडी एकदम छान पद्धतीने ठेवली होती. कदाचित उद्देश हाच असावा की स्वयंपाक करायला बसलेल्या स्त्रीला काहीही मागायला लागु नये, तिला ती वस्तू सहज नजरेला दिसावी आणि लगेचच सापडावी.
तिथेच एका कोपऱ्यात रवी ताक घुसळण्याच आणि लोणी बनवण्याचं सगळं साहित्य ठेवलं होत. एका बाजूला पापड, खारवड्या, कुरड्या आणि वेगवेगळी लोणची ठेवली होती. तिला ती रचना खूप आवडली. म्हणजे त्या स्वयंपाक घरात एकदम प्रवेश करणाऱ्या कुणालाही प्रसन्न वाटेल असच होत ते आणि मुख्य म्हणजे तिथे हवा खेळती होती. बाजूलाच बाग असावी असा अंदाज तिने लावला कारण फुलांचा मस्त सुगंध येत होता. हे सगळंच तिला खूप जास्त आवडत होत.
तिला अजून तिथे आवडलेली गोष्ट म्हणजे बाथरूम मध्ये अंघोळीच्या पाण्यात टाकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ..! अंघोळ करताना मस्त वाटत होत.
अनुश्री हे सगळं आपल्या नजरेत सामावून घेत होती. तिला तस पाहून राणूबाई साहेब.....मोठया बाईसाहेबांच्या नणंद म्हणजेच मोठ्या पाटलांच्या आत्या चालत आल्या आणि तिला म्हणाल्या.....,
"अनुश्री, ये बाळा... झाली ना झोप..."
असे विचारत समोर बसायला पाट दिला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
पण ती तशीच तिथे उभी राहिली, तिला तस गोंधळेल पाहून शेवंता पुढे आली आणि म्हणाली,
"बाई साहेब , ह्या पाटावर बसा की..."
तिच्या कडे तिने पाहिलं तस तिने नजरेने तिला पाटावर बसायचं खुणावलं तस पडत्या फळाची आज्ञा पाळून अनुश्री पटकन त्या पाटावर बसली....... तिची आई असती तर कदाचित अश्या वेळी कस वागायचं हे तिला समजलं असत.... अजून तिला ह्या जगाच्या रीत समजायच्या बाकी होत्या. असो......!
ती बसली तस शेवंताने तिच्या ताटात पिठलं भाकरी वाढल. ते आयेत जेवण पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तस राधा अक्काने शेवंता ला तिला लोणी द्यायला सांगितलं आणि तिच्याकडे खूप कौतुकाने पाहू लागल्या.
राणूक्का आणि कमळाबाई ह्या दोघी लहानपणापासून मैत्रिणी.... कुणी त्यांच्याकडे पाहून त्या दोघी नणंद भावजय आहेत हे देखील सांगणार नाही, एवढी दोघींमध्ये आपुलकी होती. दोघींचं एकमेकींशिवाय पान हलत नसे. राणूबाई एका मोठ्या तालेवर, जमीनदार घराण्यात सून म्हणून दिलेल्या, पण भावाच्या घरचे कार्य त्यांच्या मर्जीशिवाय संपन्न कधीच झाले नाही.
कारण राणूक्का वर सगळ्यांचाच भारी जीव होता. आणि का नसणार त्या होत्याच तेवढ्या प्रेमळ....हणमंत राव म्हणजे त्या वाड्याचे मोठे सावकार मागच्या वर्षीच ते हे जग सोडून गेले, तस वाड्याचा सगळा कारभार त्यांच्या मोठ्या मुलाने अमोल रावांनी हातात घेतला. वाड्यात अन गावात त्यांना सगळे दबकून होते पण राणूक्काचा अन आपल्या आईचा शब्द त्यांनी कधीच टाळला नाही कारण आई व आत्या वर भारी जीव होता त्यांचा !
आणि म्हणूनच कमलाबाईंनी आज त्यांना बोलावून घेतलं होत. कारण त्यांना माहित होत, काहीही झालं तरी पाटील त्यांच ऐकतील. कमला बाईंनी त्यांना इथे बोलावण्याचं कारण सांगितल्यापासून त्या दोघी वेगळ्याच टेन्शन मध्ये होत्या.
खरं तर त्या दोघीच नाही तर पूर्ण वाडाच एका गूढ विवंचनेत असल्यासारख वाटत होता .. त्याला कारण देखील तसेच होते ना!
काय असेल ते कारण?
का बोलावलं असेल राणूक्काला कमळाबाईंनी?
राणूक्काच ऐकतील का अमोलराव??
काय असेल अनुश्री च भविष्य....???
आणि कोण असेल ती छोटी मुलगी...?
आणि ती अनु ला पाहून अशी पळून का गेली...?
ह्या वाड्यात अजून काही रहस्य दडली आहेत का ?
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा