Login

तिचं अस्तित्व भाग -15

नाचणारीच्या मुलीची कथा

. *तिचं अस्तित्व * भाग -15


मागील भागात आपण पाहिलं कि, अनुश्री ला सई नावाची गोड मुलगी दिसते पण तिला बघून आधी आई म्हणून ती पळून जाते, नंतर तिची ओळख राणूक्का सोबत होते. आता पाहूया पुढे..,



खरं तर त्या दोघीच नाही तर पूर्ण वाडाच एका गूढ विवंचनेत असल्यासारखा वाटत होता .... त्याला कारण देखील तसेच होते ना!

त्यावर काही उपाय म्हणून एकदा अनुश्रीशी काहीतरी बोलाव हा विचार करून त्यांनी तिला माहित असून देखील विचारलं...,

"बाळ ... अनुश्री ना तुझ नाव.... "

"हो..... "

भाकरीचा तुकडा तोंडात टाकत ती राणूक्काला म्हणाली.....,

            "आणि तू म्हणे दहावीची परीक्षा दिलेस, तुमच्या तिथे तुझ्याशिवाय कोणच एवढं शिकलेले नाही म्हणजे तुला शिक्षणाची आवड आहे तर? "

तस तिने होकारात मान डोलावली.


"म्हणजे तुला लिहिता वाचता येत तर हे एक खूप मस्त झालं बर का वाहिनी साहेब..... म्हणजे कस घरातलं हिशोबपाणी करायला घरातलेच कुणी माणूस असेल तर फारच उत्तम....! म्हणजे कुणी काही गोंधळ घालण्याचा प्रश्नच नाही. अश्या वेळेस अपराथापार कमी होते."


कमला बाई कडे पाहत राधाक्का हसून म्हणाल्या.

अनुश्री फक्त त्यांचं बोलणेच ऐकत होती आणि काही विचारलंच तर एका वाक्यात उत्तर देत होती.


तेवढ्यात कमला बाई संधी साधून बोलल्या..,


            "हाव तर वन्स ते एकदम ठीक हाय.... पण त्यास्नी हे तरी इचरा त्या इथं कुणाच्या नावाचं मंगळसूत्र घालणार हायेता......म्हणजे ह्यांचा चिरा कोण उतरवणार हायेत ?? "

तस अनुश्रीच्या हातातला घास हातातच राहिला आणि ती दचकून म्हणाली,


"म्हणजे...पाटीलच ना???"


"हाव त पाटीलच वं पण मोठ पाटील की धाकल पाटील ?? "


             आता मात्र कमला बाईंच्या या प्रश्नाने अनुश्री चांगलीच घाबरली. ती विचार करत होती, आपला चिरा पाटील उतरवणार इतकेच बाबा म्हणाले होते, पण कोण?? मोठे की छोटे ?? बापरे.....! आपण तर असा विचारच नव्हता केलेला.


            आणि बाबा पण काही नाही म्हणाले, त्यात काल रात्रीपासून तिचे वडिलांच्या सोबत देखील काही बोलणे  झाले नव्हते, त्यामुळे या प्रश्नाने ती चांगलीच गोंधळून गेली होती. तिला घाम फुटला होता. हात पाय थरथर करू लागले. ती काही बोलणार कि तेवढ्यात रुतू तिथे आली आणि तिच्या जवळ बसत म्हणाली,


"सांग ना.. तुला ठाव असल ना तुजा चिरा कोण उतरवणार हाय ते.."


ती अनुश्री पेक्षा जास्त घाबरली होती, तिची अवस्था अनुश्री सोडून सध्या तरी सगळ्यांना समजत होती. तर अनुश्री दुसऱ्या विचाराने व्यथित होती. कारण सामान्य लोकांन सारखं हे लग्न ठरलं नव्हतं, पहिल्या पत्नीचा दर्जा तसही मिळणार नव्हताच ; पण मोठ्या पाटलांची पत्नी हयात असताना त्यांनी दुसरं लग्न करावे हा विचार त्या तिघीना करवत देखील नव्हता. कारण हे लग्न जर वंश वाढीसाठी झालं तर काही अंशी त्या स्त्री च जगणं सुकर होत असे, पण आधीच वंश व्यवस्था नीट असेल तर ती स्त्री रखेल म्हणूनच असे... आणि अश्या स्त्रीच जीवन नरकापेक्षा वाईट नसे.


                असे लग्न गावदेवीच्या साक्षीने.. सर्व प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत ने मुलीला त्या घरातील स्त्रिया  मणी मंगळसुत्र देऊन तिची खण नारळाची ओटी भरून तिचा आम्ही घरातल्या वंश वृद्धी साठी स्विकार करत आहोत, तिला काहीही त्रास देणार नाहीत, असे देवास  स्मरून व सगळ्यांसमोर वचन देतात.

            तसेच घरातील इतर सुनांच्या प्रमाणेच तिलाही हा मान मिळेल याची शास्वती  देऊन एक प्रकारे त्या मुलीची आयुष्य भराची सुरक्षितता निश्चित करण्यात आल्याचे आश्वासन तिला व तिच्या घरच्या लोकांना मिळत असे.

              त्यामुळेच कोण तिचा नवरा होईल  हा मुद्दा त्या मुलीसाठी  महत्वाचा असला तरी इतरांच्या दृष्टीने त्याचे फारसे महत्व नव्हते. पण रुतू बाई आता पस्तीशीच्या घरात आणि चाळीशी पार केलेले अमोलराव आणि आता या वयात आपल्याला सवत यावी म्हणजे, ती सुद्धा एवढ्या कमी वयाची....हा विचारच गेले काही दिवस रुतू बाईना सहन होत नव्हता, त्यात त्यांना फक्त दोन मुली जर अनुश्री ला पाहिला मुलगा झाला तर रुतू बाई सोबत त्या दोन चिमुकल्या मुलींचं आयुष्य देखील पणाला लागणार होत. त्यांची अवस्था कुत्र्यापेक्षा वाईट होईल ह्याची जाणीव त्यांना होती त्यामुळे ही खंत त्यांनी कमळाबाईंकडे व्यक्त केली. आपल्याच सख्या भावाची मुलगी असल्यामुळे कमळाबाईंना रुतू अतिशय प्रिय होती. तिची होणारी दयनीय अवस्था त्यांना बघवली जाणार नव्हती म्हणून त्यांनी राणूक्का बोलावलं होत, जेणेकरून त्यांचं तरी अमोलराव ऐकतील.


कमला बाईंच्या पुढे त्यांचा पूर्ण जीवनकाल उभा राहिला.... त्यांनी खूप कठोर मनाने सावकारांसोबत संसार केला होता ; त्यांचे पाऊल ठिकाणावर राहावे म्हणून त्यांनी खूप गोष्टी केल्या होत्या. सावकार तसे थोडेफार रंगीनच होते, पण जे काही होत कमला बाईंमुळे त्यांनी ते बाहेरच ठेवलं होत. पण कधीतरी ते कुणा तरी बाईला घरी घेऊन यायचे तेव्हा पूर्ण रात्रभर कमळाबाई दालनाच्या बाहेर बसून अश्रू ढाळत असत. आता या उतार वयात आपल्या सोबत जे झालं ते रुतू सोबत होऊन हे सगळं बघायला लागायला नको हाच विचार त्यांना नको होता. त्यांचं कुटुंब तस बघायला गेलं तर भरलेलं होत, त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी होती. म्हणजे वंश वाढीच ही कारण नव्हतं कारण घरात तीन मुली तर होत्या, फक्त मुलगा तेवढा नव्हता. राहील शरीराचे चोचले पुरवायला रखेल ठेवायला तर बाहेर त्यांची लफडी होतीच. ती त्या वेळेस सगळ्याच सावकार आणि पाटलाची होती. मग त्या पोरीला घरात आणून चिरा उतरवण्याचं काय प्रयोजन असावं? हे काही केल्या त्यांना समजत नव्हतं. सगळ्यात जास्त त्रास त्यांना नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा पण तसंच वागतो कि काय ह्याचा होत होता.


               मुलगी लावण्या तर बाहेर च्या शहरात शिकत होती, आपल्या नावाप्रमाणेच ती एक लावण्यवती होती आणि अभ्यासात सुद्धा बऱ्यापैकी होती.




  सावकारांचं सुद्धा खूप नाव होत. त्यांचा हा एक अवगुण सोडता, माणूस म्हणून ते खूप चांगले होते. सगळ्या गरीब दुबल्यांची मदत करायचे. आणि त्यांचा तो अवगुण आपल्या मुलांनी घेऊ नये ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण आता तेच हातातून निसटत असेल तर त्याचा विचार करून त्या अजून अस्वस्थ झाल्या होत्या.


         हणमंत पाटील होते तेव्हा त्याचा मोठा मुलगा म्हणजे मोठे पाटील अमोलराव इथली शेतीवाडी -दूध दुबती सगळं पाहायचे. त्याची बायको रुतू घरच सगळं सांभाळत होती. त्याला सुद्धा दोन गोड मुलं होती. सगळं कस आलबेल होत. मग काय असावं कारण......????? कमला बाईंना काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यावेळेस शांत असलेला अमोल अचानक काही महिन्यापासून का बिथरला असावं ह्याचा विचार दोघी सासू सून करत बसायच्या.





                धाकटा मुलगा राजन..... (आपल्या कथेचा नायक बर का.......)तर त्यांचा अभिमान होता. अतिशय हुशार, देखणे,कर्तबगार आणि खूप मेहनती..... त्यांना समाजकार्यांची आवड असलेले आणि ती जपली सुद्धा होती. ते ह्या सगळ्यापासून कोसो दूर होते. त्यांना रंगीलपणा आवडत नव्हता. तो त्याच शहरात एका मोठया व्यवसायात नावारूपाला आलेला होता.




            काही वर्षा आधीच त्यांचं लग्न झालं होत, पण दुर्दैवाने एकच वर्ष ते संसार करू शकले, त्याच कारण म्हणजे त्यांच्या पत्नी निलम ..जेव्हा त्या गरोदर राहिल्या, तेव्हा वैद्य बुवांनी सांगितलं होत. हे गरोदर पण त्यांना झेपणार नाही. आई होण्यासाठी त्यांच शरीर सक्षम नाही आहे, पण छोटे पाटील आपल्यापासून दूर जातील ह्या भीतीने त्यांनी हट्टाने ते बाळ राहू दिल, बाळ तर जगल पण त्या मात्र कायमच्या अंथरुणाला खिळाल्या.... ते छोटं बाळ म्हणजे सई.....


           
हळू हळू सगळ्यांची ओळख होईलच...
क्रमश

🎭 Series Post

View all