Login

तिचं अस्तित्व भाग -20

नाचणारीच्या मुलीची संघर्षगाथा


.             * तिचं अस्तित्व * भाग -20



मागील भागात आपण पाहिलं कि, अमोल राव राजन ला धमकावतात कि तुम्ही लग्नासाठी तयार नाही झालात तर आम्ही लग्न करू..... पण राजन च मन निलम मध्ये गुंतल असल्यामुळे त्यांची परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली होती. ते भूतकाळात अडकले होते, ते अनुश्री सोबत लग्न करतील का.... आता पाहूया पुढे.....,


जेवता जेवता परत एकदा अमोल पाटलांनी तोच विषय छेडला.....,

"बगा आपल्या राणूक्का सुद्धा आल्या हायेत.... इथ काही दिवस राहायला.... समद्यासाठी नवीन कापडं घेतली... मानपान झालाय.... त्या पोरीला चुडा, मेहंदी, हळद समद्या विधी झाल्यात.... काय बी बाकी न्हाय......"

राजन राव एक एक घास खात फक्त ऐकत होते....त्यांच्या डोक्यात नको ते विचार चालू होते आणि बाकीचे अमोल राव काय बोलतील हे कान देऊन ऐकत होते. सगळेच निर्णय होत नाही तोपर्यंत टेन्शन मध्ये होते.



ते काहीच बोलत नाहीत हे पाहून शेवटी न राहवून पाटलांनी त्यांना विचारलेच...,

"तर मग काय ठरलं तुमचं.... हायेत ना तयार तुमी तिला स्वीकारायला.... ते काय हाय.... मंगळसूत बांधताना नाव घ्यावे लागेल तिथं चिरा उतरवताना.... ते कोणाच्या नावाचे.... ते सांगावं लागेल.... पण तुमचा निर्णय महत्वाचा...... तवा तुमी सांगा.... आमच्याकडून तुमचं च नाव हाय..... पण एकदा तुमास्नी विचारलेलं बर......"

अमोल रावांचे हे बोलणे ऐकून रेणुका आणि कमला बाईंनी एक सुटकेचा निश्वास सोडला. रुतू बाई तर नाचायांच्या बाकी होत्या. त्या राजनसाठी खूप खुश झाल्या..... पण तो काही बोलत नाही हे पाहून राणूक्का पटकन पुढे आल्या आणि म्हणाल्या....,

"राजन...... जास्त विचार करू नका.... सईला सुद्धा आई मिळेल.... मी भेटले तिला..... मुलगी सर्वार्थाने उत्तम आहे.. तुम्हाला साजेशी आहे. संसार सुद्धा छानच करेल.... शिकलेली आहे....."

त्यांचं बोलणे मधेच तोडत कमला बाई सुद्धा म्हणाल्या....,

"व्हय.... बराबर बोलतात वन्स...सई देखील तितक्याच मायेने मोठी होईल घरात.. पण हे समदं होण्यासाठी तुमी पुढाकार घ्यावा.... निलम असत्या तर ही येळ अली नसती. पर आता समद्यांचा इचार करणे गरजच हाय.."

"हो राजन आईसाहेब बरोबर बोलतात बघ... माज्यासाठी ऋतू हायेत.... पण तुमचं काय.... गरज असते बग जोडीदाराची..... आणि आपल्या घराण्याला तूच कुलदीपक देऊ शकतोस बग.... तवा...... आलेल्या मुलीचा योग्य रीतीने प्रेमाने स्विकार कर अन तिच्याशी संबंध जोड.... मनापासून....  सईची काळजी म्हणून हे समदं करणे आहे बग...."

अमोल राजनच्या हातावर हात ठेवून समजावत म्हणाले.... एवढ्या दिवसात हरवलेला दादा त्यांना दिसला.

"आणि नाहीच तयार झालात... तर तुमास्नी चांगलं ठाऊक हाय.... म्या काय करेन....."

पाटा वरून उठत अमोल राव म्हणाले..... पुन्हा ते त्याच स्वभावात आले. ते ऐकून सगळ्यांचे चेहरे पडले.....

पण परत एकदा मागे वळून ते म्हणाले ,

            "राजन तुम्ही काही बोलत नाही याचा अर्थ आम्ही तुमास्नी समदं  मान्य  आहे असा पकडतो ! तेच समद्या साठी ठीक असल..... तवा सकाळी आठ वाजता  मंदिरात जायचं हाय ... बायका मागाहून येतील त्या पोरीला घीऊन.. त्या आधी तुमी तयार रहा! "


असे म्हणत अमोलराव दालनातून बाहेर पडले. तेव्हा सगळेच राजन रावांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. पण त्यांनी आपल जेवण काहीही न बोलता पटापट आवरलं आणि ते सुद्धा हात धुवून बाहेर पडले.



***********************************



अनुश्री तिला दिलेल्या  तिच्या दालनात जेवण करून परत आली , तेव्हा तिच्या मागोमाग शेवंता देखील आली येताना तिच्या हातात एक ताट होत. त्या ताटात एक लाल रंगाची साडी, त्यावर घालायला दागिने , हिरे मोत्यांचा हार..., कमरपट्टा, सोन्याचे पैंजण व चांदीचे फेडवे, तसेच सोन्याच्या बांगड्या, बुगडी, सोन्याची नथ, सोन्याचे कानातले, गजरे, कुंकू आणि सर्वच सौभाग्याच वाण होत.


ते बघूनच खूप सुंदर वाटत होत आणि हे सगळं उद्या आपल्याला घालायचे आहे हा विचार करूनच ती खूप खुश झाली. पण एवढं किमती वस्तू पाहून तिला दडपण सुद्धा आलं होत.... ती त्या वस्तू कडे पाहतच राहिली.


शेवंता तिची ही गोंधळलेली अवस्था पाहून हसून म्हणाली....,


"अहो बाईसाहेब ! नशीब काढलेत बघा तुमी...समदं तुमचं हाय.... ठिवा उद्या हेच घालून तयार व्ह्याच हाय.......झाक दिसाल बगा... .."



असे म्हणत तिने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि बोटे मायेने मोडली.

"हो पण एवढं.....मी कधी पाहिलं सुद्धा नाही आहे...."


ते बघून दबकून अनुश्री इकडे तिकडे बघत म्हणाली.

"हाव तर मग....सावकारांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे .. एवढं असणारच ना.... तुमी फक्त उद्याचा इचार करा.... "

हसत शेवंता तिला म्हणाली.

"ठीक आहे, ठेव तिकडे...ते सगळं.... "

असं असं म्हणून अनुश्रीने एका टेबलाकडे बोट दाखवलं तिथे ते साहित्य ठेवून शेवंता तिथून निघून गेली. तस उद्याचा विचार करत अनुश्री झोपून गेली.

इकडे रात्री उशिरा राणूक्का  तिच्या खोलीत आल्या..!

खरेतर त्यांना तिच्याशी बोलायचे होते,तिला काही गोष्टींची कल्पना द्यायची होती..... पण अनुश्री  त्या येई पर्यंत गाढ झोपी गेली होती .. वयाने लहान होती पोर! दिवसभर मानसिक, शारीरिक तणाव राहिल्याने मेंदू थकून आणि ही जागा नवीन, माणसे नवीन ह्यात . तिला झोप लागली होती..! तिच्या अंगावर गोधडी टाकून त्या त्यांच्या दालनात निघून गेल्या.


पण जाताना शेवंताकडे जाऊन सकाळी लवकरच अनुश्री ला उठवायचा सूचना दिल्या त्यांनी..... शिवाय सकाळी पाच सुवासिनी ना बोलावून आणायला सांगितलं होत..... त्याच त्या  तिला अंघोळ घालून ... तेव्हा ह्या सगळ्यांची कल्पना तिला द्या असं सांगून राणूक्का सुद्धा झोपायला निघून गेल्या.

-------------------------------------------------


पहाटे बरोबर पाच च्या वाजता राजन ला जाग आली..... रात्री ते निलम च्या खोलीत काही वेळ होते. तिथे स्वतःला शांत करून ते सईच्या खोली मध्ये गेले. ती सुद्धा झोपली होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ते विचार करत राहिले......


नवी जबाबदारी, नवे संबंध कसे काय स्वीकारावेत... ह्याची विवंचना त्यांना होती. खरं तर त्यांच्यात आणि अनुश्री मध्ये तब्बल दहा वर्षांचे अंतर होते..! बाबांनी मृत्यूपत्रामध्ये तस लिहायची काय गरज होती. हे त्यांना काळात नव्हतं. पण आता वंशवृद्धी तसेच सईसाठी त्यांना हा पर्याय,  हे संबंध मान्य करायचे त्यांनी ठरवले.

ते विचारातच होते कि त्या दालनामध्ये आई साहेब म्हणजे कमला बाई आल्या आणि म्हणाल्या ,


"झोपल्या का सई.... अन तुमी नाही झोपलात अजून.......... "


"नाही.... आई साहेब या ना..जरा वेळ सई जवळ बसावे म्हणून आलो .. "


कमळाबाईंनी आवाज दिला तस ते विचारातून बाहेर आले.


"राजन..... म्या आई हाय तुमची..... समजू शकते आता तुमची काय मनःस्थिती असेल ती. तुमी कधी निलम बाई सोडून इतर कुणाचा इचार नाय केला.,... पण हे किती दिवस चालणार ना ..! कधी ना कधी इचार करावा लागेलच "


थोडं थांबून त्या परत म्हणाल्या.....,


        "आणि तसंबी तुमी तयार नाही झालात तर तुमचे मोठे बंधू तयार आहेतच..... गुढघ्याला बाशिंग बांधून......शेवटी पुरुष हा पुरुषच काहीही झालं तरी वासना काय  जाता जात न्हाय.....!"


आई साहेबांच्या मनातली भीती त्यांच्या प्रत्येक शब्दात सामावली होती. जे त्यांच्यासोबत झालं ते कदाचित रुतू सोबत होऊ नये म्हणून त्यांची धडपड चालू असावी अस राजनला वाटल.


        

राजन तयार होतील का?
भूतकाळातील बंध त्याला तोडता येतील का??
अनुश्री च आयुष्य तो सावरले का आणि पर्यायाने स्वतःच देखील.....