Login

तिचं अस्तित्व भाग -23

नाचणारीच्या मुलीची संघर्षकथा
            *तिचं अस्तित्व* भाग - तेविसावा

मागील भागात आपण पाहिलं की, अनुश्रीचा चिरा पाटलांनी उतरवला होता, पण नक्की कोणत्या पाटलांनी हा प्रश्न काही केल्या सुटला नव्हता. आता पाहूया पुढे........,


सगळे कार्य, विधी पूर्ण झाले तसे पुन्हा एकदा देवाचे दर्शन घेऊन अनुश्री आणि सावकार बाकीच्या लोकांसोबत वाड्याकडे निघाले. तिच्या मनात खूप शंका दाटून येत होत्या.

वाजत गाजत सनई चौघाड्यांच्या आवाजात वरात वाड्याच्या दारात पोहोचली. तस कमलाबाईंनी रुतुबाईंना पुढे करून पटकन आरती ओवाळून आणि तांदळाचं माप ठेऊन नव्या नवरीचा पाटलांसह वाड्यात गृहप्रवेश करवला. त्यानंतर त्या दोघांना देवघरात नेऊन तिची ओटी भरून तिला सोन्याचा एक दागिना देऊन सगळ्यांनी त्या आशीर्वाद दिला. ह्या सगळ्यामुळे दुपार उलटून गेली होती. सगळ्यांच्या पोटात भूकेचा डोंब उसळला होता.

वाड्यात सकाळपासूनच जेवणाची तयारी करून ठेवली होती. पूर्ण गावाला आज पाटलांच्या वाड्यात जेवायला मिळणार होतं. मस्त गुलाबजाम आणि पुरणपोळीचा बेत केला होता. त्यामुळेच प्रत्येकाने आवर्जून तिथे उपस्थिती लावली होती.

त्यात कमलाबाई, अमोलराव, रुतुबाई, राणूक्का सगळ्यांची आवर्जून चौकशी करून आग्रहाने जेवण वाढत होते आणि पोटभर जेवायला सांगत सगळ्या पंगतभर फिरताना दिसत होते. अमोलराव आणि रुतूबाई तर सगळ्यांना स्वतःच्या हाताने वाढत होते.

एकूणच आजचा पूर्ण दिवस अगदीच गडबडीचा गेला. त्यामुळे रात्री सगळेच दमले असल्याने पडल्या पडल्या झोपी गेले. ... इकडे अनुश्री देखील तिच्या दालनात आता पुढे काय होणार याचा विचार करून पुरती घाबरली होती. एकतर तिला आई नव्हती त्यामुळे लग्नानंतर काय असत हे सांगणार तिला कुणीच भेटलं नाही.


मुळात राधाबाईने तिला लहानपणापासून फक्त शिकून मोठं व्हायचं एवढंच शिकवलं होतं, तिने चुकूनही कधी लग्नाचा विषय काढला नव्हता त्यात सुरेशराव आणि गणू सुद्धा तिला न भेटता परस्पर निघून गेले होते. त्यांची आठवण येताच तिला रडायला आलं पण ती विचारातच होती की तिला बाहेर कसली तरी गडबड व आरडाओरडा ऐकू आला. सगळेच बाहेरच्या अंगणात धावले..! इकडे अनुश्रीला बाहेर जाऊ की तिथेच थांबू समजत नव्हतं. पण काही वेळ तसाच घालवून न राहून ती बाहेर गेली.......

**--------**------*-----***†***************


इकडे सई काय माहित कशी पण खेळता खेळता पडली, डोक्यावर पडल्यामुळे खोप पडून खूप रक्त गेले आणि त्यामुळे ती बेशुद्ध पडली म्हणून घाबरून तिला सांभाळणारी जी बाई होती ती ओरडत बाहेर मदत मागत होती, तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सगळेच जिथून आवाज येत होता त्या दिशेने धावले होते.

अमोलरावांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ गावच्या वैद्य बुवांना निरोप पाठवला. निरोप भेटल्याबरोबर ते वैद्यबुवा लगबगीने आले, सध्या तेच वैद्य बुवा तिच्यावर उपचार करत होते.... त्यांनी तिला तपासलं आणि ते राजनकडे पाहत म्हणाले.....

"पाटील, पोरगी अचानक पडल्यामुळे थोडी धास्तावली आहे. वय लहान असल्यामुळे जरा जास्त घाबरली हाय, धसका बसला हाय तिला अन खोप बी मोठी पडली हाय, जास्त रगत जाईल तवा आता माझ्याकडून काहीही होणार न्हाय..... तुमी त्यांना ताबडतोब तालुक्याला नेऊन दवापाणी करा...!"

त्यावर राजनरावांनी ताबडतोब होकार भरला आणि लगेच तालुक्याला जाण्याची व्यवस्था केली. सईला लगेच टांग्यात टाकलं. ते खूप घाबरले होते तिला असं पाहून म्हणून त्यांच्यासोबत आत्याबाई, कमळाबाई आणि दुसऱ्या टांग्यात राजन आणि अमोल राव गेले. सोबतीला रघुला सुद्धा घेतलं.

अनुश्री तिथे येईपर्यंत सईला टांग्यात टाकून घेऊन गेले होते. तिने तिथेच उभ्या असलेल्या शेवंता ला विचारलं......,

"काय झालं.... एवढा गोंधळ का..... आणि सगळे कुठे गेले अचानक .....???"

'आव ताईसाहेब....., खेळता खेळता सईताई पडल्या बगा.. त्यास्नी फार लागलं हाय .. तवा त्यांना तालुक्याच्या दवाखान्यात भरती करायला नेलंय बगा.... तुमी जाऊन झोपा.... मी पण येते...."

असं म्हणून शेवंता तिथून निघून गेली. पण ही साई कोण हा प्रश्न मात्र अनुश्रीला तिला विचारता आला नाही. ती तिच्या दालनात आली. त्यानंतर काही वेळात तिला आठवलं की,

हि तीच छोटी मुलगी आहे का? अरे देवा..! तीच असेल तर तिला लवकरच बरी कर अशी तिने मनोमन देवाला प्रार्थना केली अन आज काही कुणी येणार नाही. त्यामुळे जास्त काही विचार न करता भीती न बाळगता ती झोपून गेली.......


********************************

इकडे रात्रभर सगळेच हॉस्पिटल सईसोबतच होते.. उपचारानंतर सकाळी तिला थोडे बरे वाटले.... त्यामुळे मोठे पाटील, राणूक्का आणि कमळाबाई वाड्यावर परत आले. त्यांच्याकडून सगळ्यांना समजलं की आता सईची प्रकृती ठीक आहे आणि दोन तीन दिवसात ती ठीक होऊन ठीक घरी परत येईल .. त्यामुळे सगळ्यांनाच हायसे वाटल होत. नाही म्हंटल तरी तिच्यामुळे पूर्ण वाड्याला काळजी लागली होतीच ती आता जरा तरी कमी झाली.

यादरम्यान दोन्हीही पाटलांचं तालुक्याला ये जा चालू असल्याने अनुश्री मात्र पूर्ण वाड्यात आत्मविश्वासाने वावरत होती. तिच्यावर कुठल्याही प्रकारचे दडपण नव्हते. तिच्याशी सगळेच प्रेमाने वागत होते; फक्त सईच्या देखरेखीला ठेवलेली आजी सोडून.......


खरेतर दुसऱ्या दिवशी वाड्यात पूजा ठेवली होती..... पण सईच्या अचानक पडल्यामुळे कमळाबाई आणि राणूक्काने लगोलग निर्णय घेत ती पुढे ढकलली..! त्यामुळे घरातले सगळे देखील थोडे शांत झाले होते.... आणि साईची परिस्थिती सुधारत असल्यामुळे थोडेफार निवांत झाले होते.....!

***--------**------------***

घरात सतत काहींना काही करायची सवय असल्यामुळे अनुश्री तिच्या खोलीतून बाहेर पडून स्वयंपाक घरात येऊ लागली होती. खरंतर पूजा झाली नसल्यामुळे तिच्या हातून काही गोड पदार्थ देवाला अजून नैवेद्य दिला नव्हता, त्यामुळे त्याशिवाय तिला कामाला लावावे असे कमळाबाईना अजिबात वाटत नव्हतं. त्यात एकतर अजून हळद उतरली नव्हती तिची की एवढ्या दिवसात नवऱ्याचं दर्शन देखील झालं नव्हतं तिला...... त्यामुळे आपण तरी तिच्या वर कसा काय हक्क दाखवायचा..... ह्या दिद्धा मनस्थितीमध्ये असणाऱ्या कमळाबाईंची ही अडचण राहिलीच नाही अनुश्रीमुळे..... कारण मुळातच तिला स्वयंपाक करायची खूप आवड होती..!

आई जवळ नसल्यामुळे लहानपणापासून ती स्वयंपाक बनवत होती, त्यामुळेच की काय अनुश्री एकदम उत्तम सुगरण झाली होती. कारण तिने बनवलेले जेवण हे सगळ्यांना आवडत होत, आणि ते सुद्धा खूप चविष्ट होत. एवढ्या दिवसात तिने खूप सारे नवीन नवीन पदार्थ बनवले, पण त्यापैकी एकाचीही चव गेलेली नव्हती. ते सगळे पदार्थ ती एक दोन नाही तर तब्बल पंचवीस तीस लोकांसाठी बनवत असे.... तरी सुद्धा जेवण चवदार असे..... एके दिवशी अमोल पाटील देखील वाड्यावर आले असता .. त्यांनीही तिच्या हातची चव चाखली आणि अन्नपूर्णा प्रसन्न आहे अनुश्रीवर असे म्हणत मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला त्यांनी. इकडे अनुश्रीवर सगळेच खुश होत चालले होते.

**---------**-------*------**

इकडे आठ दिवसांनी सईला हॉस्पिटलमधून सोडले, राजनराव तिला घेऊन आले, ती दोघ दारात आली तशी शेवंता पटकन पुढे झाली..... तिने तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला.....! आजूबाजूला घरातले सगळे होते.


सईने इकडे तिकडे पाहिलं तर तिला नवीन आलेली आपली आई अनुश्री दिसली नाही. तिला अनुश्रीला भेटायचं होत, म्हणून तिने शेवंताला विचारलं,

"ती ..ती माझी नवीन आई कुठे आहे ..मला तिला भेटायचं आहे? ती का नाही आली इथे? ती कशी आहे?"

शेवंता ला काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं.... अनुश्री सध्यातरी सगळ्यांच्या समोर येऊ शकत नव्हती, त्यात तीच वय देखील कमी असल्यामुळे सईची आई होण्याएवढी तिची मानसिकता आहे की नाही हे आतातरी कुणालाच ठाऊक नव्हतं. म्हणून काहीही न बोलता ..ती तिच्याकडे पाहतच राहिली.... तिची ती अवस्था जाणून राजन पटकन म्हणाले,

"अरे हॉस्पिटल मधून तू आलीस ना.... मग तू कशी आहेस हे तुला विचारायला हव नाही का........??? तर तू दुसऱ्यांबद्दलच विचारतेस.... थोडीसी अजून बरी झालीस ना की मग भेट हा तिला."

असं हसत म्हणून ते तिला आतमध्ये घेऊन आले..

आतमध्ये आल्यावर सगळ्यांनी तिला तिच्या तब्येतीबद्दल विचारलं.. तिने मानेनेच सगळ्यांना होकार दिला... आताच आली आहे तिला आराम करू दे असं सगळ्यांना म्हणून राजनने तिला उचलून घेतलं, आणि तिच्या दालनात नेलं.....

पण आतमध्ये जाताच तिची पाऊले थबकली. काहीतरी वेगळं भासले तिला तिच्या दालनात......


सई अशी का थांबली असेल.....?
राजन स्वीकारेल का अनुश्रीला....?