मागील भागात आपण पाहिलं की, थोडे रिलॅक्स झाल्यावर राजन अनुश्रीला भेटायला जातात, पण मध्येच त्यांची भेट राणूक्कासोबत होते, पण त्यांच्याकडून अनुश्रीचं कौतुक ऐकून ते भारावून जातात आणि ते तिला बघायला व भेटायला उतावळे होतात. आता पाहूया पुढे......
पण राणूक्काचं हे असे चिडवणे राजन रावांना चांगलेच रोमांचित करून गेले होते. त्यांना तिच्याबद्दल अजूनच ओढ निर्माण झाली....
त्याच विचारात ते अनुश्रीच्या खोलीत गेले! ती तिच्या वाचनात मग्न झाली होती आणि ते एकदम तिच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले, अन तिच्याकडे पाहतच राहिले.......
तिचे गोरेपान... नाजुक सौंदर्य पाहताना भान हरपले होते त्यांचे... तिचे गुलाबी ओठ, लांब सडक केस, सुटसुटीत बांधा, अडकवून ठेवणारी नजर पाहून ते एकदम घायाळ झाले.... तिच्यापुढे निलम काहीच नव्हती..... त्यांच्याही नकळत त्यांनी निलम आणि अनुश्रीची तुलना केली. पण भानावर येताच त्यांनी मनातच ठरवले काहीही झाले तरी दोघींमध्ये तुलना होऊ द्यायची नाही! दोघीही एकमेकींच्या जागी बरोबर आहेत. निलमकडून त्यांना ऐन उमेदीच्या काळातली सोन्यासारखी दोन वर्षे अनुभवता आली होती. त्यांना... खूप समजून घेतलं होत तिने त्यांना.... महत्वाचं म्हणजे एक छानशी गोड मुलगी दिली होती... शिवाय त्यांचं वय आणि विचार ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केल्यास निलम त्यांच्यासाठी बरोबरीची होती.
ते त्यांच्या तंद्रीतच होते... पण कुणा एका अनोळखी पुरुषाला असे अचानक तिथे पाहून अनुश्रीला चांगलाच घाम फुटला. तिला काय करावे तेही सुचेना.... ही व्यक्ती कोण आहे ह्याचे तिला कोडे पडले.
"पाटील??"
घाबरत घाबरत तिने विचारले.....
तिचे असे घाबरून आणि चेहऱ्यावर प्रश्न घेऊन विचारल्यावर राजनला समजलं हिने आपल्याला ओळखलं नाही आहे.
"अम्म. मी राजन.. तशी ही. आपली पहिलीच भेट....! क्षमा असावी काही दिवसांपासून सईसोबत असल्याने... चिरा उतरवून म्हणजे लग्नाची विधी होऊनही भेट होऊ शकली नाही आपली... की मला तुमच्याशी बोलता आलं नाही... आज वेळ मिळाला म्हणून लगेचच इकडे आलो...."
तेही सर्व बोलत असताना अनुश्री लक्षात आले की.. ज्यांचे आपण झालो आहोत, जे आपले पती आहेत ते हेच.... ती त्यांच्याकडे एक क्षण पाहतच राहिली, नंतर भानावर येऊन तिने वाकून नमस्कार केला त्यांना! आणि मनात खूप जास्त आनंदली! तिने वडिलांचे आणि देवाचे आभार मानत मनापासून त्यांनाही मनातल्या मनात नमस्कार केलाच!
राजनराव पहिल्या नजरेत आवडले तिला....
"तुमचं नाव... माफ करा घाई गडबडीमध्ये कुणाला विचारताच नाही आलं..."
राजनने एकदम अदबीने विचारलं...
"अनु.. अनुश्री..."
ती पटकन उत्तरली.
ते पुढे काही बोलणार तेवढ्यात शेवंता तिच्या दालनात आली.
राजनला तिथे बघून ती सुद्धा आश्चर्यचकित झाली, पण तसे न दाखवता ती म्हणाली...
"ते निरोप घिऊन आलती म्या... मोठ्या बाईसाहेबांनी खाली जेवायला बोलावले होते..., तवा येताय ना...?"
तिच्या अशा विचारण्यावर त्या दोघांनी मानेनेच होकार दिला... राजन अनुश्रीकडे निघून गेले तशी अनुश्री लाजत शेवंता सोबत खाली निघून गेली...... आणि त्या जाणाऱ्या अनुश्रीकडे राजन पाहतच राहिले, आजही त्यांचं बोलणे झालंच नाही पण ओळख झाली हे खूप झालं.
सकाळीच वाड्यात पूजा ठेवली होती, त्यामुळे गोंधळ चालू होता म्हणून पहाटेच शेवंताकरवी कमलाबाईंनी अनुश्रीसाठी ठेवणीतल पातळ पाठवून दिल होत... एकीकडे जेवणाची तयारी चालू होती तर दुसरीकडे पूजेची... सौभाग्य लेणे अंगावर आल्यामुळे अनुश्री नववारीमध्ये खूप सुंदर दिसत होती, राजनला आपल्या नशिबाचा तिच्याकडे पाहून हेवा वाटला. काही वेळानंतर... राजन आणि अनुश्रीच्या हातून पूजा संपन्न झाली.
झाल्या प्रकारामुळे जास्त कुणाला आमंत्रण दिले नव्हते. जवळचेच काही लोक होते. तरीसुद्धा जवळपास शंभर लोक जमलीच होती, घरची पूजा असल्यामुळे सगळा दिवस गडबडीचा गेला. पूजा झाल्यामुळे अनुश्री आणि राजनला एकत्र येण्यास काहीही हरकत नव्हती... म्हणून पूजेनंतर दुपारपासून रघु आणि शेवंता अमोल रावांच्या आज्ञेनुसार अनुश्रीची रूम सजवत होते. त्यांनी पूर्ण पलंगावर गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या आणि फुलांच्या माळांनी पूर्ण रूम सजवली... सुंगंधी अत्तरे शिंपडली.... आणि कमला बाईंना अनुश्रीला तयार करण्यास सांगितले... म्हणूनच संध्याकाळ झाली तस कमलाबाई आणि ऋतूबाई अनुश्रीच्या खोलीत आल्या... तिला तयार करण्यासाठी!
आज तिची आणि राजन रावांची एकत्र येण्याची पहिली रात्र होती..! पोर वयाने लहान होती आणि काही गोष्टींसाठी नवीसुद्धा... तिला काही गोष्टींची कल्पना सुद्धा नसणार होती; तेव्हा तिला चार गोष्टी समजावून सांगणे गरजेचे होते. तिच्या मनाची तयारी देखील करावी लागणार होती... म्हणून तिची तयारी झाल्यावर ऋतू खाली गेल्या आणि कमला बाई तिथेच तिच्या सोबत एकट्या थांबल्या... पण त्यांना तिच्याशी काय, कसा आणि कुठून संवाद साधावा हेच कळत नव्हते...!
पण काहीही झालं तरी बोलावे तर लागणारच होते. शब्दांची जुळवाजुळव त्या करतच होत्या की शेवंता अत्तर आणि गजरे घेऊन आली. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळून उठला होता.
तिने तिचे लांब सडक केस विंचरले...... दोन बाजूने बटवेणी घालून छान मोकळे सोडले.. त्यावर छानसा मोगऱ्याचा गजरा माळला... कमलाबाई तिच्याकडे पाहतच राहिल्या.
कानात, गळ्यात अगदी मोजकेच दागिने घातले होते तिच्या. डोळ्यात काजळ घालून कपाळावर चंद्र कोर लावली... ज्यामुळे ती खूपच सुरेख दिसू लागली. अंगात ब्लाउजसुद्धा नक्षीदार आणि घट्ट घातले..... आणि त्यावर जांभळ्या रंगाचा शालू... खास राजन पाटलांच्या पसंतीचा... नक्षत्रासारखी दिसत होती ती......! कुणीही पुरुष तिच्याकडे पाहून घायाळ नसता झाला तर नवलच...
त्यांच्या पलंगावर पांढरी चादर अंथरली होती, बाजूला दोन लोड-उशा... आणि राजनचे काही कपडे होते...... कारण आजपासून पाटील रोज याच खोलीत त्यांचा मुक्काम असणार होता.
सगळं आवरलं म्हणून कमला बाईंनी शेवंता ला देखील खाली पाठवून दिल; आता तिथे फक्त त्या दोघीच होत्या तिथे.
त्या पुन्हा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागल्या..!
"तुमास्नी आजच्या रातीच महत्व ठाव हाय ना?"
तिने हुंकार भरला....
"माहित असेल तरी बी ऐका....., थोडा त्रास होतो पाहिल्या येळी ...! पण ओरडू नका, सहन करा.... बाईच्या जातीने सोसायला हवे थोडे ! जे काही पती करेल, करायला लावेल ते ते समद करून घ्या व करून द्या..... त्यातच हित आहे.. तुमचे आणि त्यांचेही.....! आणि हा...... हा जो काही त्रास आहे तो आजच होईल.... त्यानंतर तुम्ही सतत त्या साठी तयारीत असाल.. वाट पहाल त्या सुखाची.. आणि त्यांच्या प्रेमाची... वंगाळ वाटल तुमास्नी ऐकाया.. पर हे समदं ठाव असणं गरजेचं हाय......"
एक श्वास घेऊन त्या परत म्हणाल्या....
"एकतर आम्ही तुमच्या सासू आहोत, मैत्रीण नाही, मर्यादा आहेत आम्हाला इथे बोलताना, तेव्हा समजून घ्या! आमास्नी काय सांगावायचे आहे ते.....! आजपासून आमचे चिरंजीव आता तुमचे झाले आहेत. ते कर्तुत्ववान आहेत, हुशार आहेत, तेव्हा त्यांची जोडीदार म्हणून तुमच्या कडून देखील या वाड्याच्या अपेक्षा हायेत . तुम्ही ते सारे सांभाळून घ्यावे..! हीच अपेक्षा.....! आम्ही आहोत गरज लागली तर.. पण सार आता तुमास्नी निभावून घ्यायचं हाय.. हे फकस्त ध्यानात ठिवा...'
त्या बोलत होत्या आणि अनुश्री कानात तेल ओतून ऐकत होती... काही तिला समजत होतं तर काही डोक्यावरून जात होतं... खरंतर पहिल्या भेटीला ती सुद्धा अधीर झालीच होती... पण तिच्या मनात अनेक शंका होत्या.. त्यात.. पहिली वेळ आणि वय लहान होत......
पण शरीरात सुटलेला कंप काहीच नीट व्यक्त होऊ देत नव्हता..! असेच काहीसे अजून बोलून कमलाबाई तिथून बाहेर पडल्या.. आज वरच्या खोल्यांमध्ये सर्वत्र सामसूम होती..! कुणीच तिथे वास्तव्य करणार नव्हतं....
आज कमलाबाई आणि राणूक्का सईसोबत तिच्याच खोलीत झोपणार होत्या आणि बाकीचे इतर दालनात. रात्री सगळ्याच नोकर मंडळीना सुट्टी देण्यात आली होती. आणि हे सगळे अतिशय शांतपणे कुणाला समजणार नाही, अशा पद्धतीने चालू होते.
कशी असेल राजन आणि अनुश्रीची पहिली रात्र....???
त्यासाठी वाचत राहा.....
क्रमश
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा