संध्याकाळ झाली होती, कसं बस प्रियाला ट्रेन पकडून घरी सात च्या आत पोहचायचं होतं.
ट्रेन ची वाट पाहत ति स्टेशनवर उभी होती, सारखी ति हातावरच्या घड्याळात पाहत होती. घड्याळातला वेळ तिच्या आधी पळत होता.
शेवटी एकदाची ट्रेन आली आणि गर्दीने तुडुंब भरलेल्या त्या ट्रेनच्या डब्ब्यात तिने कसा बसा प्रवेश केला.
चेहऱ्यावरून घामाच्या धारा ओघळत होत्या, पण तिच्या डोक्यात मात्र घरी वेळेत पोहचायचं हाच विचार होता.
आज घरी पोहचायला उशीर झाला, तर काही खरं नाही आपलं.
"पुन्हा सासु बाईंचा संताप होईल, पण त्या का नाही समजत की जॉब ला जातो त्यामुळे होतो उशीर.. " प्रियाची मनात तगमग चालु होती.

एकदाची ट्रेन स्टेशन वर येऊन थांबली, प्रिया घाई घाईत उतरते आणि रिक्षा पकडून घरी येते.
घरात सासु बाई टीव्ही च्या सामोरं मालिका लावुन बसल्या होत्या.
घरात सासु बाई टीव्ही च्या सामोरं मालिका लावुन बसल्या होत्या.
" कधी तरी लवकर येतं जां, वाजले बघ किती." सासु बाईंचा सुर वाढलेला होता.
प्रिया घड्याळात पाहते, घड्याळात आठ वाजलेले असतात. ति पटापट फ्रेश होते आणि कंबर खोचून कामाला लागते.
सकाळचा डब्बा, भांडी, आल्यावर पुन्हा जेवण ह्यात प्रियाची तगमग होतं होती. पण बोलणार कोणाशी तिचं आपलं असं त्या घरात कोणी नव्हतं जे तिचं ऐकुन घेईल.
नवरा होता पण तोही, तसाच त्याच्या आई सारखा. जेवणात साधं मीठ जरी कमी पडलं तरी पुर्ण घर डोक्यावर घ्यायचा.
बोलणार तर बोलणार कोणाशी..? बरं रविवारची तर गोष्टचं वेगळी होती, सकाळ उजाडत नाही तर कामाचा तगादा लागलाचं असतो.

आठवड्या भराचे सगळे कपडे सासु धुवायला काढत, भांडी कुंडी जेवणं. त्यात तिला स्वतः साठी असा वेळच नव्हता , चार मैत्रीनीं होत्या पण त्यांना भेटायला तिच्या जवळ थोडासा सुद्धा वेळ नव्हता. दिवसभर काम आणि काम, वर सासु चं बोलणं होतं ते वेगळं.
नविन लग्न झालेलं असताना शेपूच्या भाजीवरून घरात मोठं रामायन घडलं, शेपूच्या भाजीचा साधा वास जरी आला तरी प्रियाच्या नवऱ्याच्या डोक्याला आट्या पडीत.
त्यावेळी तर त्याने प्रियाला धारेवरच धरलं.
पण सासु ने मुद्दाम ह्याच्या आवडी निवडी प्रिया पासुन लपवुन ठेवल्या.
त्यावेळी तर त्याने प्रियाला धारेवरच धरलं.
पण सासु ने मुद्दाम ह्याच्या आवडी निवडी प्रिया पासुन लपवुन ठेवल्या.
प्रियाचा नवरा कामावरून येतो, घरात आल्या आल्या त्याचा पहिला प्रश्न, " मग आज काय बनवलं जेवायला..? "
" चवळीची आमटी आणि भात. " हे ऐकताच तिचा नवरा खुश होतो. तिच्या लग्नाला आठ वर्षे झाली तरी सुद्धा तिला नवऱ्या पासुन ते सासु पर्यँत सगळ्यांच्या आवडी निवडी नीट काळजी पूर्वक जपाव्या लागत होत्या.
सासु शुगर पेशंट तिचं पथ्य पाणी तिला नीट डोळे उघडुन पहावं लागत होतं, तिचे ब्लड टेस्ट, तिच्या गोळ्या सारं काही तिला पाहावं लागायचं नाही तर आहेच सासु डोक्यावर बसलेली.
" माझी मेथीची भाजी केली आहेस ना..? " सासु विचारते.
" हो तर, तुमच्या पुढ्यातच साफ केलेली काल. " प्रिया बोलते.
रात्रीचं जेवणं उरकून प्रिया सोसायटीच्या आवारात फेर फटका मारत असते..
तेवढ्यात तिला, सीमा काकु भेटतात त्या तिला आवाज देतात, " काय गं सीमा आहेस कुठे ? तुझ्या सासुला पण विचारलं.. "
" नाही काकु काय करणार वेळच नव्हता." प्रिया बोलते.
" ह्म्म्म खुप दगदग होतं असेल ना तुझी..? " सीमा काकु विचारतात.
" हो काकु, पण चालायचंच. बरं मि फेरफटका मारते, खुप दिवसांनी असा स्वतः साठी वेळ मिळाला आहे.. " प्रिया बोलते.
" मार मार बाई, जॉब आणि घर दोन्ही सांभाळताना फरफट होतं असेल.. बरं बाई चल मि जाते.. " आणि काकु निघुन जातात..
प्रिया बराच वेळ फेरफटका मारून घरी येते, तिचा नवरा पोट भर जेवुन पलंगावर आडवा झालेला असतो.
प्रिया फार थकलेली असते, तीही एक बाजु पाहुन आडवी होते..
दिवसभराच्या थकव्याने तिला साधी झोप ही लागत नसते, ति कसं बस डोळे झाकण्याचा प्रयत्न करते.
दिवसभराच्या थकव्याने तिला साधी झोप ही लागत नसते, ति कसं बस डोळे झाकण्याचा प्रयत्न करते.
तिला दिवस भराच सारं काही आठवतं, त्यात तिला फक्त स्वतःची झालेली दगदग आठवते..
क्रमश....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा