[ काही तांत्रिक कारणामुळे हा भाग (भाग १२ )सगळ्यांना दिसत न्हवता म्हणून आत्ता पुन्हा पोस्ट करत आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला सांगल्याना भाग १३ आधी दिसेल आणि भाग १२ नंतर ]
भाग १२---
डिवोर्सची कारवाई चालू झाली होती. काही दिवस मध्ये असेच निघून गेले. आज त्या दोघांना डोईवोर्स मिळणार होता. दोघेही समोरासमोर उभे असतात .
सतीशने पैसे तिच्या अकाउंटला ट्रान्सफर केले होते. आणि आत्ता दागिनेही घेऊन आला होता.
सतीशने दागिने तिला दिले. दागिने माधुरीने बघून घेतले.
दोघांनी डिवोर्स पेपर वर सह्या केल्या. आता ते ऑफिसिअली वेगेळे झाले होते. दोघे बाहेर पडले.
जाताना सतीश माधुरीला हाक मारून बोलतो.
सतीश- " माधुरी, तुझ्या भविष्यासाठी शुभेछा "असे म्हणून त्याने हात पुढे केला शेकहॅण्ड करायला.
माधुरी- " तुम्हला हि" म्हणून तिने हि शेकहॅण्ड केला.
जसा हात सुटला तस माधुरीने मनाला सांगितलं.," या हाताबरोबर आजपर्यंतची माझी सगळे दुःख, माझ्या यातना, मला झेललेला त्रास हि सुटला. आणि प्रेमावरचा विश्वास हि उडाला. आता पुन्हा या मार्गे जाणे नाही. "
माधुरी सोने घेऊन लगेच बँकेत गेली आणि सोने लॉकर मध्ये ठेवले. आज तिने सुट्टी घेतली होती. सगळ्या प्रकारचं जरा शिण आला होता.
घरी आली. मावशी टीव्ही बघत होती.
मावशी- " झालं का तुझं काम? ठीक आहेस ना तू ?"
माधुरी- " हो मावशी. मी ठीक आहे. "
माधुरीला फ्रेश वाटत न्हवत.
माधुरी- " मावशी मी चहा करती आहे . तू घेणार का?"
मावशी -" चालेल. अर्धा कप "
माधुरीने चहा केला. दोघींसाठी चहा घेऊन ती बाहेर आली.
माधुरी- " मावशी , आज जरा आपण संद्याकाळी बाहेर जाऊन येऊया का? मंदिरात ?"
मावशी -" हो चालेल कि? का ग ?"
माधुरी- " जरा मन शांत होईल. म्हणून "
मावशी- " ठीक आहे . संद्याकाळी गौरी आली कि आपण तिघी जाऊया. "
नंतर माधुरी वरती खोलीत गेली. बाबाना फोन केला. सगळं सांगितलं. त्यानंतर थोडा वेळ पडून राहिली.
संद्याकाळी गौरी आ ली आणि तिघी मंदिरात जाऊन आल्या.
येऊन जेवण वगरे आवरून झोपायला गेल्या.
हळू हळू माधुरी मगच सगळं विसरू लागली. त्या गोष्टीतून बाहेर पडू लागली. पण एक गोष्ट मात्र तिच्या मनात पक्की बसली, या पुढे प्रेम वैगरे च्या प्रकारात पडायचाच नाही. आपण एकटेच बरे.
असच महिना निघून गेला. तिघींचं मस्त रुटीन बसलं . तिघी अगदी मैत्रिणीसारख्या राहत होत्या. मध्ये २ दिवसासाठी माधुरी बेंगलोर ला जाऊन आली.
बाबांची तबियत पण हळू हळू उदरात होती.
असच एक दिवस माधुरीचा डोकं खूप दुखत होत म्हणून तिने हाफ डे घेऊन घरी आली. घरी आली आणि बेल वाजवणारच होती पण विचार केला कि मावशी झोपली असेल म्हणून तिने तिच्याकडच्या किल्लीने दरवाजा उघडला .
डोक्याला हात धरूनच ती आत आली. तर बघते काय?
मावशी सोफ्यावर तळमळत होती. छातीवर हात ठेवून विव्हळत होती. तिच्या तोंडून आवाज पण फुटत न्हवता. माधुरीला घामच फुटला ते बघून. पण तिने पटकन परिस्थिती हातात घेतली. लगेच ऍम्ब्युलन्स ला फोने करून जवळच्या हॉस्पिटल मध्ये तिला नेलं. तिथं ऍडमिट केलं. मावशीला ऑक्सिजन लावला होता.
माधुरीने गौरीला फोन केला.
माधुरी- " हॅलो, गौरी "
गौरी- " ग काय झालं ? तुझा आवाज का असा? रडत का आहेस?"
माधुरी- " गौरी तू लवकर आपल्या इथल्या मोहिते हॉस्पिटल मध्ये ये. मावशीला मी इथे ऍडमिट केलं आहे. तिच्या छातीत दुखत होत. "
गौरी- " काय सांगतेस काय? आलेच . मी पोहोचतेच. "
म्हणून ती फोन ठेवला . तोपर्यन्त माधुरीला एक नर्स ने बोलावले
माधुरी- " हा बोला "
नर्स- " तुम्ही डिपॉझिट जमा करा बिलिंग कॉउंटरला "
माधुरीने बिलिंग काउंटर ला जाऊन डिपॉझिट जमा केले. . थोड्या वेळात गौरीही आली .
डॉक्टर येताना बघून माधुरी म्हणाली .
माधुरी- "चल गौरी ,डॉक्टर आलेत बघ बाहेर त्यांना विचारूया काय झालं ते"
दोघी डॉक्टरनाच्या कडे गेल्या
माधुरी- " डॉक्टर काय झालं आहे मावशीला?"
डॉक्टर- " त्यांना माईल्ड हार्ट अटॅक येऊन गेला. लवकर आणलात ते बर झालं. त्यांच्यावर उपचार चालू आहेत . "
गौरी- " आम्ही भेटू शकतो का?"
डॉक्टर- " आत्ता लगेच नाही. आता त्यांना आय सी यू मध्ये ठेवलं आहे. थोड्यावेळाने भेटू शकता. "
असे सांगून डॉक्टर गेले .
गौरी- " खरंच माधुरी देवासारखी वेळेत पोहोचलीस बघ. नाहीतर काय होऊन बसलं असत "असं म्हणून रडू लागली. .
माधुरी- " रडू नकोस गौरी, काही होणार नाही आपल्या मावशीला . " असं म्हणत तिला समजावल आणि शांत केलं . .
गौरी घरी फोने करून आई बाबाना हे सगळं सांगितलं . आई बाबा इकडे यायला निघाले. गौरीने विनयला फोन केला .
विनयला सगळं ऐकून' धक्काच बसला .
विनय- " गौरी, आई कशी आहे?मला खूप काळजी वाटतंय "
गौरी- " आता स्टेबल आहे म्हणतात डॉक्टर. तू काळजी करू नकोस आम्ही आहोत इथे . उद्या सकाळपर्यंत माझे आई बाबा पण येतील "
विनय- " मी पण यायचं बघतो. पण मला ४-५ दिवस तरी लागतील . "
गौरी- " चालेल. काळजी करू नकोस . आम्ही आहोत. "
असं म्हणून फोन ठेवला . तिकडे विनय हि भारतात यायची तयारी करू लागला
दोघी दुपारपासून तश्याच न खाता पिता तिथं रात्रभर थांबलया होत्या. . माधुरी स्वतः साठी आणि गौरी साठी चहा घेऊन आली .
दोघीनि चहा पिऊन रात्र काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीचे आई वडील आले. .
आई बाबाना बघून गौरी आईला मिठी मारून रडू लागली .
आई तिला शांत करत म्हणली " रडू नको पिल्लू, काही होत नाही बघ मावशीला. अशी बरी होईल ती. "
गौरीने आईला आणि बाबाना माधुरीची ओळख करून दीली आणि सांगितलं कि हिनेच वेळीच मावशीला इथे आणले म्हणून बर झालं. गौरीचीच्या आईने माधुरीच्या डोक्यावर हात फिरवला .
आईबाबा त्या दोघीना म्हणले , " तुम्ही घरी जावा आणि फ्रेश व्हा. आम्ही आहोत इथे "
दोघीही हो म्हणून गेल्या
गौरीची आई- " काही तरी खाऊन पण घ्या. काल पासून उपाशी आहेत " असं म्हणते.
दोघी मानेने हो म्हणून निघलय'या. घरी फ्रेश होऊन नाश्ता करून घेतला . आणि आईबाबांचा नाश्ता करून ठेवून हॉस्पिटल मध्ये आल्या .
गौरी- " आई आम्ही नाश्ता करून ठेवला आहे. आता तुम्ही दोघे घरी जावा . आम्ही थांबतो. "
गौरीची आई- " ठीक आहे मी दुपारी दाब घेऊन येते. "
असाच ४दिवस चालू असतं . ५ व्या दिवशी डॉक्टर म्हणतात, " आता त्या ठीक आहेत. त्यांना डिस्चार्गे देतो. पण त्यांनी औषधे मात्र वेळोवेळी घेतली पाहिजेत. "
माधुरी मावशीच्या औषधांची जबाबदारी स्वतः वर घेते.
संद्याकाळी दोघी मावशीला घेऊन घरी येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी विनय घरी येणार असतो.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा