Login

तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग १५)

Gouri, Mavashi & Vinay are in one team.

भाग १५ -

आता गौरी, मावशी आणि विनय एका टीम मध्ये होते.

विनय माधुरीच्या प्रेमात पडला होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होत. पण माधुरी च काय मत आहे हे कळणे गरजेचं होत. आणि माधुरीच विनय बद्दल मत काय हे कळण्यासाठी माधुरीने आपल्या बरोबर वेळ घालवायला हवा अस मत विनयच होत.

दोघांना एकत्र वेळ मिळाला तर ती त्याला जणू शकेल, तर ती कदाचित त्याच्या प्रेमात पडू शकेल, तर ती पुन्हा लग्नाचा निर्णय घेऊ शकेल अस आता या तिघांना वाटू लागलं. पण एकत्र वेळ मिळवून द्यायचा कसा? हा मोठा प्रश्न होता.

गौरीने एक आयडिया केली. सुट्टीच्या दिवशी तिने सगळ्यांनी मिळून पिक्चर ला जायचं प्लॅन बनवला.

माधुरी आधी तयार न्हवती पण मावशीला बर वाटेल सगळे बाहेर गेलो तर अस गौरीने सांगितल्यावर तयार झाली.

 झालं, संध्याकाळी ६-९ चा शो होता. ५.३० वाजता माधुरी तयार होऊन खाली आली. विनय तयार होऊन बसला होता.

 विनय त्यांच्या प्लॅन मध्ये ठरल्याप्रमाणे माधुरीला विचारला.

विनय - " आवरलं? आई आणि गौरी कुठ आहेत"

माधुरी - " मावशीच्या खोलीत असतील ना?"

विनय  -" नाही, खाली कोणीच नाहीय. मला वाटलं तुम्ही तिघी वरती आहात"

माधुरी -" कमाल आहे, कुठ गेल्या ह्या मग " असे म्हणत गौरीला फोन करते.

गौरी फोन उचलते.

माधुरी -" कुठ आहात तुम्ही? जायचं आहे ना आपल्याला "

गौरी - " ग मावशीच्च काम होत म्हणून बाहेर आलोय. तुम्ही निघा दोघे. आम्ही तिथेच येतो आता "

माधुरी - " बर "

विनय - ( जणू काही माहीत नसल्याचा आव आणत म्हणला) " कुठ आहेत त्या?"

माधुरी -. " काही काम होत म्हणून बाहेर गेल्यात. डायरेक्ट टॉकीज ला येत आहेत त्या "

विनय - " बर मग आपण निघुया"

माधुरी - " हो"

दोघे घराबाहेर पडले. विनय गलातल्यागलात हसत होता. कारण त्याला माहीत होत त्यादोघी पिक्चर ला येणार नाहीत ते. हा सगळा गौरीचा प्लॅन होता त्यांना एकत्र पाठवण्यासाठी.

विनय ने बाईक चालू केली आणि माधुरीला बस म्हणाला.

माधुरीला काही कळेना, तिला वाटलं रिक्षा ने जाऊ पण याने तर बाईक घेतली.

आता नाईलाज म्हणून ती बसली.

विनय -" धर मला. नाहीतर पडशील"

माधुरी - " हमम,, पण जरा हळू चालव"

विनय -"हो"

त्याला खूप छान वाटत होत. मधेच खड्डा आल्यावर माधुरी त्याच्या खांद्यावर हात ठेवत होती . परत नंतर हात बाजूला घेत होती. अस करत दोघे तिथे पोहोचले. पण अजुन या दोघींचा पत्ता न्हवाता.

माधुरीला काही कळेना. कुठ अडकल्या या.

माधुरी -" अजुन कशा आल्या नाहीत"

विनय -" येतील." अस म्हणाला.

एकत्यात शो साठी दरवाजे उघडले आणि एकदम सगळी गर्दी आता जाऊ लागली.

गर्दीत हरवू नये म्हणून विनय ने एकदम माधुरीच्या हात धरला आणि गर्दी बरोबर ते आता आले. विनय ला सिट नंबर माहीत होता सो तिथं पोहोचल्यावर त्याने तिचा हात सोडला. आणि त्याच्या लक्षात आलं की आपण तीच हात धरून इथं आलो तस तो म्हणला

विनय -" सॉरी माधुरी, मी असा तुझा हात धरून घेऊन आलो. गर्दी होती ना खूप, चुकामूक होऊ नये म्हणून हात धरला."

माधुरी -" अरे असुदे, मी समजू शकते . पण या दोघी कधी येणार" असे विचारत असते . 

इतक्यात मधुरीचा फोन वाजला. गौरीचा मेसेज आला होता. त्या कुठ तरी अडकल्यात त्यामुळे त्या येऊ शकत नाहीत.घरीच जात आहेत.

माधुरीने विनयला सांगितले. विनयला आधीच माहीत होत.

विनय " आता आपण आलोच आहोत तर पिक्चर बघून जाऊ"

माधुरी -" बर"

माधुरीला काही  कळत नव्हते. पहीलेंदाच ती कोणत्या मुलाबरोबर पिक्चर बघायला अशी एकटी आली होती.

पण तिला विनय बरोबर भीती अजिबात वाटली नाही. उलट त्याच्याबरोबर आपण सुरक्षित आहोत असे वाटले.

पिक्चर सुरू झाला पण माधुरी लक्ष न्हवत. तिला अजुन मघाशी विनय ज्या प्रकारे तिचा हात धरून तिला गर्दीतून वाचवत घेऊन आला तेच आठवत होत.

त्याच्या स्पर्शात कोणतेही वाईट विचार जाणवत न्हवते. उलट आपुलकी, काळजी जाणवली.

बाबा, नचु, मावशी आणि गौरी नंतर दुसरं कोणीतरी काळजी करणार तिला भेटल होत. तिला त्याच अप्रूप वाटलं. तो स्पर्श चांगला वाटला. ती विचार करता करता त्याच्याकडे बघू लागली. त्याला जाणवलं.

तो म्हणाला.

विनय -" काय झालं ?"

 माधुरी - " काही नाही"  म्हणात परत पिक्चर बघू लागली.

इंतर्वल मध्ये त्याने पॉपकॉर्न आणले. एकच मोठा बॉक्स

घेऊन आला. आता एका बॉक्स मधून खाताना त्याचे हात एकमेकांना लागत होते. पण कोणीच काही बोलत न्हवत.

पिक्चर संपला.दोघे गाडीवरून घरी आले.

मावशी आणि गोरी जेवणासाठी वाट बघत होत्या.

ते दोघे येताच गौरीने विचारलं.

गौरी -" कसा होता पिक्चर?"

माधुरी - " हा ठीक होता" म्हणत वरती फ्रेश होण्यासाठी गेली.

मग गौरीने मोर्चा विनय कडे वळवला.

गौरी -" काय मग कसा होत पिक्चर?" हसत तिने विचारल.

विनय - " खूपच सुंदर " अस म्हणत तोही हसत बोलला

म्हणजे आपला प्लॅन सक्सेस झाला तर अस म्हणात् गौरीने स्वतः  स्वतचीच पाठ थोपटली.

नंतर सगळे एकत्र जेवले. रात्री परत विनयने हाक मारून माधुरीला गूड नाईट म्हणले.

माधुरीने ही आज हसून गूड नाईट असे उत्तर दिले.

विनयला खूपच आनंद झाला. आता ती आपल्याला जाणून घ्यायचं प्रयत्न करेल अस वाटू लागलं.

इकड माधुरीची अवस्था पण तशीच होती. तो स्पर्श, त्या स्पर्शातून जाणवणारी काळजी, माया, आपुलकी, अधिकार तिला आठवू लागले.तिला ते खूप छान वाटलं.

पण तीच एक मन मात्र तिला बजावत होत. अडकु नको परत अस सांगत होत. तिला काय करावं कळेना.

पण तिला ते हवंहवसं वाटत होत.  त्याच विचारात ती कधी झोपी गेली तिलाच कळलं नाही.

क्रमशः