Login

तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास ( भाग- १६)

Madhury tries to understand her feelings for Vinay

 भाग- १६-

माधुरी सकाळी उठली तेच गौरीच्या गूड मॉर्निंग ने. रात्री खूप उशिरा झोप लागली त्यामुळे तिला आज लवकर जाग आली नाही.

गौरी - " उठा मॅडम, ७ वाजून गेलेत"

माधुरी - " काय सांगतेस काय ? चक्क एक तास उशिरा उठले मी "

गौरी - " ग होय. म्हणूनच उठवायला आले. तशी आज सुट्टीच आहे सोड पण मी आणि मावशी आज जरा एका कार्यक्रमाला जातोय. लवकर एकत्र नाश्ता करू म्हणून उठवल. नाहीतर झोपू दिलं असतं "

माधुरी - " तुम्ही दोघीच जातंय का ?"

गौरी - " ग खर तर मावशीला जायचं आहे तिच्या नातेवाईक कडे. विनयच्या मागे लागली होती खूप. पण तो कसला तयार होतो. मग काय मावशी मला चल म्हणली. त्यामुळे आता मला जावं लागतय."

माधुरी - " किती वाजेपर्यंत येणार तुम्ही परत ?"

गौरी - " येऊ ७ वाजेपर्यंत. आणि तू काळजी कशाला करतेस , विनय आहे तुझ्या सोबतीला."

माधुरी - "ह्म्म्म  "

( " तीच तर मोठी काळजी आहे. काल पण पिक्चर ला आम्ही दोघेच होतो आणि आज पण दिवसभर दोघेच.

कालच आठवल तरी काय करावं काळात नाही. कसं बोलायचं त्याच्याशी. एक मन नको म्हणत दुसरं मन चांगलं आहे म्हणत. कळतच नाही काय चाललय ते.)

अस मनात बोलत होती.

दोघी आवरून खाली आल्या. चौघे नाश्ता करत होते. नाश्ता झाला. विनय माधुरीला मदत करत होता.

 गौरी आणि मावशी तयार होऊन निघाल्या.

जाताना मावशी म्हणाली.

मावशी - " दोघेच आहात. कंटाळा आला तर बाहेर फिरून या"

असे म्हणून गेली.

आता काय करायचं. अख्खं दिवस कसा घालवायचा.असा विचार माधुरी करू लागली.आपण रूम मधेच जाऊन बसू. जेवण बनवायला आणि करायलाच बाहेर येऊ. मग काहीच प्रोब्लेम नाही. तिला तिची आयडिया आवडली. हसत जिना वर चडू लागली तोच विनय ने हाक मारली.

विनय - " माधुरी "

माधुरी - " हा "

विनय -" वर काही काम आहे का?"

माधुरी - ( एकदमच त्याने विचारल्यावर) नाही म्हणली

विनय - " मग थांब इथेच. जरा गप्पा मारू. मला कंटाळा आलाय"

आता काय नाइलाज झालं तिचा.

ती पण सोफ्यावर येऊन बसली.

दोघे थोडावेळ बोलले. आणि विनय उठला आणि म्हणाला

विनय - " थांब मी मस्त चहा करतो. तू घेशील ना?"

माधुरी - " हो चालेल. पण तुला येतो का ? नाहीतर मी करते "

विनय - " म्हणजे काय? मला येतो करता चहा. तू बस"

अस म्हणून तो चहा करण्यासाठी आता गेला. माधुरी हळू हळू बोलकी होत होती. तिला सुध्दा आता ते जाणवू लागलं होत. ती विनय बद्दल विचार करत होती.

किती बोलतो हा आणि भरीत भर म्हणजे मलाही बोलायला लावतो अस म्हणत हसली.

विनय चहा घेऊन आला.

माधुरीने चहा घेतला. खूपच छान झालं होता चहा.

माधुरी - " कौतुक तर केलं पाहिजे तुझ, छान झाला आहे चहा."

विनय - " धन्यवाद, धन्यवाद . काय ग तुला खरंच अस वाटत माझ्याकडे बघून की मला काही कुकिंग मधाल येत नसेल. साधा चहा ही जमत नसेल."

माधुरी - " अगदीच तस नाही काही"

विनय - " म्हणजे थोड वाटत होत. हरकत नाही. दुपारी बघ मी कसं जेवण बनवतो ते "

माधुरी - " नको नको, आज  चहा पुरत ठीक. जेवणाचे आपण परत कधी तरी बघू."

विनय - " नाही नाही. आजच. हवं तर एकच पदार्थ करतो पण आज मी माझ्या पाकाकलेच कौशल्य दाखवणारच" अस म्हणून हसू लागला.

माधुरीला पण हसू आल.

दोघानी खूप गप्पा मारल्या. तो तीला त्याच्या लहानपणीच्या गमती सांगत होता ,ती ही त्याला ती आणि नचू कसे लहानपणी मज्जा करायचे ते सांगत होती. दोघं एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागले.

माधुरीला जाणवलं एवढ्या गप्पा, एवढ हसू तर आपण लग्नानंतर कधी अनुभवला न्हवात. खूप दिवसांनी तिने मनभरून गप्पा मारल्या होत्या.

आता जेवणाची वेळ झाली होती. तशी माधुरी जेवण बनवायला उठली.

विनय -" मी पण येत आहे"

माधुरी - " अरे राहुदे, मी करते,"

विनय - " मी मघाशी म्हणलो ना,बघ मी आता मस्त मुगाच्या डाळीची खिचडी बनवतो. पापड तळतो. कसं वाटला मेनू. कढी पण बनवली असती पण मला अजुन जमत नाही."

माधुरी - " मी बनवते"

दोघे मिळून स्वयंपाक करू लागले. एकमेकांना बरोबर चांगला वेळ घालवत होते. तो मधेच तिला काही काही गमती जमती सांगून हसवत होता.

दोघे जेवायला बसले. खरंच त्याने खिचडी छान बनवली होती.

माधुरी मनात म्हणली, कुठ आपण रूम मध्ये जाऊन गप्प बसायचा विचार करत होतो आणि याने आपल्याला थांबून घेऊन किती मस्त वेळ घालवला आपला.

  जेवण झालं , नंतर चहाही झाला तरी दोघे बोलत बसले होते. छान मैत्री तयार झाली त्यांच्यात.

७ वाजता मावशी आणि गौरी पण आल्या.

आता जेवणाची तयारी करायची म्हणून माधुरी आणि गौरी कामाला लागू लागल्या तोच विनय म्हणाला "आज बाहेर न जेवण मागवू.  बसा ना सगळे इथं , एकत्र गप्पा मारू"

यावर गौरी म्हणाली, " हे याच लहानपणापासूनच आहे, सगळयांना गोळा करून बोलण्यात गुंतवून ठेवतो."

मावशी - " असाच आहे माझा विनय, सगळ्यांना गुंतवून ठेवतो. "

एवढ एक वाक्य ऐकल आणि माधुरी मनात म्हणली.( खर आहे. मला पण त्याने दिवसभर गुंतवून ठेवलं त्याच्या बोलण्यात. मी गुंतत तर नाहीय ना त्यांच्यात ) असा विचार करू लागली.

एक मन म्हणाल , काय वाईट आहे मग गुंताण्यात. कोणीही त्यांच्यात गुंतावे असाच आहे तो. आणि यात वाईट काहीच नाही.

तर दुसरं मन म्हणाल, फक्त तू गुंतून काय उपयोग. तो ही गुंतला असेल का तुझ्यात. नाहीतर सगळं अधिसारख होईल. पुन्हा तोच त्रास. नको नको. गुंतू नको.

तिला काय करावं कळेना.

 इतक्यात पार्सल आल. सगळे जेवले. आता झोपायला जाणार तर चक्क आज माधुरीच्या तोंडून तिच्याही नकळत विनय ला गूड नाईट असे बाहेर पडलं.

विनय ला ते ऐकुन खूप आनंद झाला. तो ही एक छान स्माईल देत गूड नाईट म्हणाला.

असेच दिवस भराभर संपले. आता त्याची परत  अमेरिकेत जायची वेळ जवळ आली.

माधुरीला दुपारी ऑफिस मध्ये गौरीकडून कळलं की रात्री विनयची फ्लाईट आहे.

तिला थोड वाईट वाटलं की त्याने स्वतःहून का नाही सांगितलं की तो आज जात आहे म्हणून. असो म्हणत तिने सोडून दिलं.

संध्याकाळी लवकर जेवण झाली.

विनय ने माधुरीला हाक मारून बोलावलं.

विनय -" माधुरी , तुझा नंबर देतेस."

माधुरी  -" माझा नंबर?"

विनय - " सहजच, कधी तरी बोलायला "

माधुरीने ठीक आहे म्हणत नंबर दिला.

आता त्याची जायची घाई चालली होती. विनय विचार करत होता आता आपण इथे नसलो तर कदाचित तिला आपली आठवण येईल, कदाचित ती आपल्याला जाणून घेईल. ईकड माधुरी तर गुंतली होती त्यांच्यात. पण मन सांगत होत गुंत पण मित्र म्हणून. पण प्रेमात पडू नकोस.

तिलाही वाटत होत की आपण मित्र म्हणून त्यांच्यात गुंतालो आहोत. पण तिला जाणीव ही न्हवती की मैत्रीच्या पुढे जाऊन हे गुंतन आता प्रेमात बदललं होत.

सगळे त्याला बाय करायला बाहेर आले. आता तो परत कधी लवकर येणार होता ते कोणालाच माहीत न्हवत.

माधुरीला वाटल परत कधी भेट होईल काय माहीत.

सगळयांना बाय करून तो निघाला.

बाकी कोणाला माहीत नसलं तरी त्याला माहित होत तो परत कधी येणार ते.

 फक्त २ आठवड्याचा प्रश्न होता. त्याने ट्रान्स्फर मागितली होती भारतात. आणि कंपनी तयार ही झाली होती. पण त्याला २ आठवडे अमेरिकेत जाऊन थोड त्याचा काम पूर्ण करायचं होत .

हे खर तर सगळ्यांसाठी गोड सरप्राइज होत.

त्याने मुद्दाम कोणाला सांगितलं न्हवत.

आई आणि गौरीला जेव्हां कळेल की मी कायमच भारतात येत आहे तेव्हा त्यांना खूप आनंद होईल आणि तो त्याला बघायचं होता.

शिवाय दोन आठवडे आपण दूर गेल्यावर माधुरीला आपल्याबद्दल काय वाटतं हे  ही कळेल असा त्यांन विचार केला.


कधी कधी दुरावा दोन प्रेम करणाऱ्या माणसांना जवळ आणतो असं म्हणतात.  आता यातील विनय तर प्रेमात होताच पण माधुरीला ते प्रेम उमगण्याची गरज होती.  विनय चा विचार बरोबर  होता, मी तर हिच्या प्रेमात पडलो आहे पण तिला अजून त्याची जाणीव  नाही.  बघू, जर मी आता काही दिवस लांब गेलो तर ती मला मिस करते का? जर मिस करत असेल तर समजायचं हि पण आपल्यावर प्रेम करते. नाहीतर हा विषय इथेच थांबवलेला बरा . 

विनय अमेरिकेला निघून गेला.  घर फार रिकामं वाटत होत.  मावशी आणि गौरीला तर त्याची कमी वाटतच होती कारण त्यांचं  तर  त्याच्याशि नातं होत.

पण चक्क  माधुरीला पण त्याची  कमी जाणवू लागली. तो गेला त्या रात्री तर तिला झोपचआली नाही.  विनयच्या गुड  नाईट  ची तिला सवय झाली होती. 


दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले आणि आपापल्या  कामाला  लागले. 

माधुरीचा आज कशातच लक्ष न्हवत.  चहात साखर  जास्त तर पोह्यात मीठ  कमी घातले होते.  आणि तिला हे खाताना सुद्धा जाणवलं नाही . 

मावशी- " गौरी, ग चहात साखर जास्त झालीय? "

गौरी-  " ग चहा मी नाही केला.  आज मॅडमनी सगळं केलाय. पण लक्ष कुठं आहे काळात  नाही. पोह्यात पण मीठ खूप कमी पडलाय. "

मावशी मग माधुरीला म्हणली. 

मावशी - " माधुरी काय झालं? आज तुला बर वाटत नाही आहे का? "

माधुरी- " नाही ग असं काही नाही . का? काय झालं?"

गौरी - " अग  तुझा चेहरा पण पडला आहे. झोप नाही झाली का नीट "

माधुरी -  " हा  झोप नाही झाली बघ . पण असं का विचारात आहात ?"

गौरी- " कारण मॅडम तुम्ही पोह्यात मीठ कमी आणि चहात साखर जास्त घातली आहे. "

इतका वेळ तीच खाण्यात लक्ष न्हवत. आता गौरी म्हणली म्हणून तिने पुन्हा एक घास खाऊन बघितला. 

माधुरी-  " अग  खरच  कि, सॉरी सॉरी ,  मी पुन्हा करते सगळं. "

मावशी - " ग असुदे ग. झालं सुद्धा खाऊन. फक्त तुझी काळजी वाटली म्हणून विचारलं आम्ही कि तुला बर वाटत  नाही का असं.  "

माधुरी- " सॉरी , काय माहित काल  पासून कशात  लक्ष च लागत नाही आहे. "

असे म्हणून वरती ऑफिस साठी तयार व्हायला गेली. 

इकडं  मावशी आणि गौरीने हसू आवरेना . त्यांना काय कळायचं ते कळलं . विनय नाही म्हणून तिची अशी अवस्था झाली आहे.  

गौरीने विनय ला झाला प्रकार मेसेंग करून सांगितलं.  त्याला सुद्धा ते वाचून हसू आलं आणि छान  पण वाटलं. 
तो मनात म्हणाला, " कधी कधी जी गोष्ट जवळीकीने साध्य होत नाही ,ती थोड्याश्या गोड  दुराव्याने साध्य  होते असं दिसतंय "

त्यांनी गौरीला  मेसेंग करून सांगितले कि मी संध्याकळी तुम्हाला फोन करतो , सगळे एकत्र बसा. 

क्रमशः