Login

तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग १७)

Vinay gives surprise to everyone.

भाग-१६   https://www.irablogging.com/blog/her-journey-towards-true-love-chapter-16_3465

भाग- १७- 

जसं  विनय म्हणाला होता तस त्याने संध्याकाळी फोन केला आईला. मावशी, गौरी, माधुरी एकत्रच बसल्या होता.

विनय चा फोन आला कळताच माधुरीला खूप आनंद झाला. विनय आईशी बोलला थोडावेळ मग गौरी शी बोलत होता

माधुरीला वाटत होत आपल्याशी ही त्याने बोलावं, पण तिला वाटल तो का बोलेल आपल्याशी. आपलं नातच काय त्याचशी?

तो आपल्याशी बोलणार नाही अस वाटून ती वरती रूम मध्ये निघून गेली.

तिचा मुडच निघुन गेला होता.

खर तर विनय तिच्याशी ही  बोलणार होता पण तिलाच उगीच शंका होती.

गौरीने विनय ल सांगितले की माधुरी रुममध्ये निघून गेली म्हणून.

माधुरी रूम मध्ये जाऊन उशी घेऊन बसली. तिला एक मन सांगत होत की ," ग ठीक आहे , तो का बोलेल तुझ्याशी ? "

दुसरं मन मात्र म्हणत होत की तो बोलेल. विश्वास ठेव.

तिच्या डोक्यात विचारांचे द्वंद्व चालू होत इतक्यात तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबर वरून फोन आला.

तिने फोन उचलला नाही. परत फोन वाजला. परत फोन आला म्हणून तिने फोन उचलला.

एकतर ती रडायचा घाईला आली होती विचार करून, तसच तिने फोन उचलला होता त्यामुळे तिचा आवाज जरा खालचा लागत होता.

माधुरी - " हॅलो, कोण?"

विनय - " माधुरी , मी बोलतोय विनय "

माधुरीला काही सुचेना. तिला इतकं छान वाटलं. जिच्या डोळ्यात थोड्या वेळापूर्वी अश्रू येत होते ते आता आनंदाचे अश्रू झाले होते.

माधुरी - " विनय, तू?"

विनय - " अग हो मीच, आणि काय हे तू लगेच वरती निघून गेलीस, मी तुझ्याशी बोलणार होतो."

माधुरीला आता कसतरी वाटलं ,आपण काय विचार केला याचा.

माधुरी - " सॉरी, मला वाटलं ……"

 आणि माधुरी काही बोललीच नाही पुढे.

विनय - " काय वाटलं की मी तुझ्याशी बोलणार नाही"

माधुरी - " नाही म्हणजे .."

विनय - " ग तू पण मला महत्वाची आहेस, तुझ्याशी पण मी बोलणारच ना"

माधुरी - " सॉरी" अस म्हणत तीने खरच स्वतःच एक कान पकडला.

विनय - " अरे सॉरी काय त्यात, पण पुढे लक्षात ठेव तु ही तितकीच महत्वाची आहेस मला"

माधुरीला हे ऐकुन खूप छान वाटलं. कोण तरी आपल्याला त्याच्या आयुष्यात महत्वाचं समजत. आपल्याशी बोलण्यासाठी आसुसत.

माधुरी - " हो"

विनय - " बाकी सांग, कशी आहेस तू? "

माधुरी - " मी ठीक आहे पण तू गेल्या पासून घर रिकामं वाटत आहे "

माधुरी तिच्या नकळत हे बोलून गेली.

विनय - " कोणाला? तुला ?"

माधुरी - " म्हणजे आम्हा सगळ्यांनाच "

माधुरीने सावरत घेत म्हणाल.

विनय ला तीच अस पटकन सावरून घेणं बघून हसू आल.

विनय - " बर हा माझा इकडचं नंबर आहे,  सेव करून ठेव, पुन्हा कधी तरी फोन करेन, चालेल ना,?"

माधुरी - " हो चालेल की"

विनय - " गूड नाईट, स्वीट ड्रीम "

माधुरी - " गूड नाईट, स्वीट ड्रीम "

म्हणत तिने फोन ठेवला.लगेच नम्बर सेवं पण केला.

तिला एकदम हलकं वाटत होत. मनावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटत होत. फोन कड बघून ती हसत होती.

आज विनय ने गूड नाईट म्हणाला होता ना तर मग तिला छान झोप लागणार होती. आणि तसाच झालं.

विनयचा फोन काय झाला माधुरीची अडकलेली गाडी सुरू झाली होती.

सकाळी उठली . आज मस्त नाश्ता केला होता तिने .

आज कशात काही कमी जास्त न्हवत. सगळं एकदम परफेक्ट होत.

मावशी आणि गौरी मनात म्हणल्या , " विनयच्या फोन तर जादूच केली."

दोघी आवरून ऑफिस ला जात होत्या तोच तिच्या मोबाईलवर मेसेज आला.

बघते तर काय , विनय ने गूड मॉर्निंग चा मेसेज केला होतं. तिला त्याचा मेसेज बघून मस्त वाटल. तिने ही त्याला मेसेज केला.

तिच्याही नकळत ती मनाने विनयच्या जवळ जात होती.

आता हे दररोज च झालं होतं. कधी मेसेज तर कधी फोन.

आता विनयला ही पटू लागलं की माधुरीला आपण आवडतो.

माधुरीला ही जाणवत होत की आपण विनायकडे मनाने ओढले जातोय. पण तिला वाटायचं हे एकतर्फी तर नाही ना? आपण प्रेम समजतो आहे पण तो मैत्री समजत नसेल ना ?

आणि हे जर प्रेमच असेल दोघांकडून तर मावशी आणि गौरीचा काय? त्या काय विचार करतील माझ्याबद्दल?.

त्यांनी मला वाईट वेळेत इतकी साथ दिली आणि मी विनय वर प्रेम करून बसले .

मावशी , गौरी दोघींनी विनयच्या लग्नाची काही स्वप्न बघितली असतील , आणि मी विनय वर प्रेम करते हे कळल्यावर मी त्याचा भावनांचा फायदा घेतला अस तर नाही ना वाटणार.

आणि माझा भूतकाळ, विनय ला माझा भूतकाळ माहीत असेल का,? आणि नसेल तर कळल्यावर तो काय विचार करेल?

असे अनेक प्रश्न तिला सतावत होते.

खूप विचार करून तिने ठरवल आपण सध्या हे सगळं मैत्री म्हणूनच घेऊ आणि तसाच दाखवू.

अस विचार करत असताना विनयचा फोन आला.

विनय - " माधुरी, माझं एक काम होत , करशील का?"

माधुरी - " हो सांग"

विनय - " परवा संध्याकाळी माझं एक पार्सल येणार

आहे घरी, ते तेवढे घेशील का?"

माधुरी - " हो. परवा कधी येणार आहे? दुपारी येणार असेल तर मावशी  घेईल."

विनय - " नाही , संध्याकाळी येणार आहे. आणि आईला पण सांग . आता मला वेळ नाही. दोन दिवस मेसेज आणि फोन करू शकत नाही , काम आहे खूप महत्वाचं "

माधुरी - " ठीक आहे "

विनय - " आठवणीने घे पार्सल, गूड नाईट "

माधुरी - " हो, गूड नाईट"

माधुरीला काही कळेना. आत्ता कसलं पार्सल.

झालं आता दोन दिवस काहीच कॉन्टॅक्ट होणार नाही म्हणून मधुरीच मन नाराज झालं पण लगेच तिने मनाला समजावलं दोन दिवसाचा तर प्रश्न आहे.

पण खर तर हे समजावलं तिने स्वतला पण प्रत्यक्षात जरा जड जाणार होत.

इकद विनंय ने तयारी चालू केली. तो खोटं बोलला होता. कोणत पार्सल वैगरे येणार नव्हतं तर हा स्वतः तेथे जाऊन सगळयांना सरप्राइज देणार होता.

झालं तो दिवस आला.

संध्याकाळी बेल वाजली, माधुरी दरवाजा उघडायला गेली.

दरवाजा उघडला, आणि समोर विनय.

ती तशीच त्याच्याकडे  अा करून बघत राहील. हे खर आहे की स्वप्न तेच कळेना.

विनय आता आला आणि त्याने हाताने तीच तोंड बंद केलं आणि म्हणाला,

" हो , मीच आहे" आणि हसत आता आला.

माधुरीला मात्र लाज वाटली काय हे ,आपण असे त्याच्याकडे बघत बसलो.

तो आत आल्यावर मावशी आणि गौरीला पण आश्चर्य वाटलं.

मावशी - " अरे तू तर तुझ पार्सल येणार म्हणाल होतास ना मग तू कसं काय आलास?"

गौरी - " अरे हो तू इथे कसा?"

विनय - " हो सांगतो सांगतो. बसू तर द्या "

इतक्यात माधुरी पण आता आली.

विनय - " हा तर तुम्हाला सरप्राइज द्यायचं होत म्हणून आलो."

मावशी, गौरी आणि माधुरी कान देऊन ऐकत होत्या.

विनय - " आईं, मी भारतात बदली करून घेतली आहे. आणि आता मी इथच राहणार. कायमच "

बापरे, सगळयांना इतका आनंद झाला.

मावशीच्या डोळ्यात तर पाणीच आल. विनय ने लगेच आईला मिठी मारली आणि म्हणाला.

विनय - " खुश ना ?"

मावशी - " खूप म्हणजे खूप " अस म्हणून मावशीने मायेने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला.

 मावशी देवा समोर साखर ठेवायला गेली.

गौरीला पण खूप आनंद झाला.

विनय आणि तिने एकमेकांना टाळी दिली.

गौरी पण आत किचन मध्ये गेली.

माधुरीला पण खूप आनंद झाला होता पण तिने जास्त चेहऱ्यावर दाखवलं नाही. ती पण आता जायला लागली तो विनय ने तिची वाट अडवली.

एकदम विनय समोर आल्याने माधुरी दोन पावले मागं गेली.

विनय - " माधुरी , तुला नाही का झाला आनंद ?"

माधुरी - " झाला ना? अस का विचारलं?"

विनय - " तू काही बोलली नाहीस म्हणून विचारल "

माधुरीला प्रश्न पडला आता काय उत्तर द्यायचं. (मला तर किती आनंद झालंय तुला इथं बघून पण सांगू ही शकत नाही.)असा मनात विचार करत होती तोच मावशीने हाक दिली.

विनयला आता तिला मार्ग द्यावा लागला. तो बाजूला झालं आणि ती पटकन आत गेली.

विनय ला खर तर माहीत होत तिला ही आनंद झालाय ते ,ज्या प्रकारे तो दरवाज्यात त्याच्याकडे बघत बसली होती त्या नजरेत त्याला कळलं होत. पण उगाच तिची मज्जा घ्यायला तो बोलला.

माधुरी ला  मात्र आता लाज वाटतं होती. आता ती विनयच्या नजरेला नजर मिळवायची म्हणल तरी तिला धड धड होत होती.

सगळे जेवायला बसले. जेवताना सुध्दा विनय आणि माधुरीची नजरानजर झाली तरी विनय ची नजर तिच्या आरपार जात होती. ती लगेच नजर बदलयची.

तिलाच कळत नव्हत की ती का नजर चुकवत आहे पण तीच धाडसच होत न्हवत. आणि या सगळ्याची मज्जा विनय घेत होता.

जेवण झाली,  माधुरी आणि गौरी अवरत होत्या. गौरी आवरून वर गेली.  माधुरी जाणार इतक्यात विनय समोर आला. 

विनय - "  माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तू?"

माधुरी - " कोणत्या प्रश्नाचे ?" त्याची नजर चुकवत म्हणाली.

विनय - " हेच की मी इथं आलो तर तुला आनंद झालं की नाही "

माधुरी - " हो झाला "  खाली बघूनच म्हणली.

आता तिला फार पिडायाला  नको म्हणून विनय बाजूला होऊन तिला वाट देत म्हणाला ,

" गूड नाईट माधुरी "

आता माधुरी  ने त्याच्याकडे बागितल आणि छान हास्य देत " गूड नाईट " म्हणत ती वरती गेली.

विनय मावशीच्या रूम मध्ये जाऊन तिच्याबरोबर थोडावेळ घालवून तो ही त्याच्या रूम मध्ये गेला.

पुढचा एक दिवस असाच निघून गेला. विनयला आता खात्री पडली की माधुरीला आपण आवडतो ते. माधुरी कितीही लपावयच प्रयत्न करत असली तरी तिच्याही नकळत तिच्या वागणुकीतून ते दिसून यायचं.

आता ही खात्री पडल्याने त्याने आता पुढचं पाऊल उचलायच ठरवल.

विनय आता बेंगलोर ला जाणार होता. त्याने या तिघींना सांगितले की मी दोन दिवसासाठी बेंगलोर ल जात आहे. काही काम आहे.

माधुरीला वाटल ऑफिस च काही काम असेल पण मावशी आणि गौरी ला माहीत होत की तो बेंगलोर ला कोणत्या कामासाठी जातोय.