Login

तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग १८ )

Vinay meets Madhuri's father and brother.

भाग- १७  https://www.irablogging.com/blog/her-journey-towards-true-love-chapter-17_3486

भाग- १८ 

विनय दुपारी बेंगलोरला जाण्यासाठी निघाला. गौरी कडून त्याने माधुरीच्या भावाचा नंबर आणि पत्ता घेतला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी विनय बेंगलोर ला पोहोचला. मित्राकडे थांबला. फ्रेश झाला आणि संध्याकाळी  नचिकेत ला फोन केला.

विनय - " हॅलो, नचिकेत ?"

नचिकेत -" हो बोलतोय, आपण ?"

विनय - " मी विनय, गौरीचा भाऊ. "

नचिकेत - " हा बरोबर, गौरी ताई बोलली होती सकाळी की तुम्ही याल भेटायला म्हणून "

विनय - " हा त्याच साठी फोन केला. बाबा आणि तू घरी आहात का ? मी एक अर्ध्या तासात येऊ?"

नचिकेत - " हो या ना. पण म्हणजे तुम्ही आता आहात कुठ? तुम्ही इकडचं राहायला यायचं ना"

विनय - " थँक्यू, पण मी आत्ता मित्र कडे थांबलोय"

नचिकेत - " ओह, बर मग जेवायला तरी तुम्ही थांबल पाहिजे"

विनय - " बर ठीक आहे, मी पोहोचतो एक अर्ध्या तासात"

असे म्हणून विनय ने फोन ठेवला. व्यवस्थित आवरून तो निघाला.  ७-८ वाजता नचिकेत च्या घरी पोहोचला 

नचिकेत आणि बाबांनी त्याच स्वागत केलं.
थोडा वेळ गप्पा मारल्या. 

विनय - " बाबा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होत."

बाबा - " हो बोलू, आधी जेवूयात मग निवांत बोलू"

विनय - " ठीक आहे "

तिघे जेवले. आता तिघे बाहेर निवांत बसले होते. 

नचिकेत आणि बाबांना प्रश्न पडला हे काय बोलायला इथं आले असतील.

तर तिकडे विनय मनाची तयारी करत होता की  सगळं कसं सांगता येईल.

इतक्या वेळेची शांतता भंग करत बाबांनी विचारले.

बाबा - " बोला विनय काय म्हणत होता तुम्ही?"

विनय - " हो बोलतो, पण तुम्ही मला अहो जावो करू नका"

बाबा जरा हसले आणि म्हणाले ," बर बर"

विनय - " मी आता जे सांगतोय त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल मला माहित नाही. पण तुमच्याशी याबद्दल बोलावं आणि तुमचं मत घ्याव अस मला वाटलं म्हणून मी इथं आलो ".

नचिकेत आणि बाबा एकमेकांकडे बघितले. त्यांना काय कळेना.

बाबा - " बोल, काय झालंय "

विनय ने सारी शक्ती एकवटली आणि तो म्हणाला.

विनय -" बाबा, माझं तुमच्या मुलीवर, माधुरी वर खूप मनापासून प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे."

बाबांना काय उत्तर द्यावे कळेना.

बाबा - " हे सगळं माधुरीला माहिती आहे ?"

विनय - " नाही.  बाबा, मी तिला विचारणार आहे पण त्या आधी तुमच्याशी बोलावं म्हणून मी इथं आलो, मला तिचा भूतकाळ माहिती आहे, आणि अजुन ही ती तिने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहे. बाबा, माझं खरंच तिच्यावर खुप प्रेम आहे, मी तिला खूप जपेन, तिच्यावर कोणतही संकट येऊ देणार नाही, तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही, "

बाबा आणि नचिकेत एकमेकांकडे बघितले. काय उत्तर द्यावे कळेना. आधीचां  एक अनुभव बघता आता काय करावं कळेना.

माधुरीने पुन्हा लग्न करून सुखी व्हावं अस त्यांना पण वाटत होत पण विनय ने  समोर येऊन अचानक  अशी लग्नाची मागणी घातल्या मुळे काय करावं ते कळेना.

बाबा - " अरे पण…"

विनय - " बाबा, मी तुमची आवस्था समजू शकतो, आधीचा एक अनुभव असा मिळालाय त्यामुळे कदाचित आता विश्वास ठेवताना भीती वाटू शकते, पण खरंच मी तिला खूप चांगल्या पद्धतीने संभाळेन. तुम्हाला कुठे तक्रारीची जागा उरणार नाही. "

बाबा - " पण तू तुझ्या घरी बोलावलं आहेस का? गौरी, मावशी यांचं काय मत आहे?"

विनय - " हो मी त्यांच्याशी बोललो आहे. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मी तुम्हाला इथे विचारायला आलो. आई आणि गौरीला माधुरी या घराची सून म्हणून पसंत आहे. आईचा तर जीव आहे माधुरी वर. त्या दोघींनी मला या बद्दल पाठिंबा दिला आहे. "

बाबा सगळ ऐकुन घेत होते. अजुन ते शांत होते.
विनयच आता बोलून झाल होत, आता तो निघणार होता. जाता जाता विनय म्हणाला.

विनय - " बाबा, असे निर्णय पटकन घेता येत नाहीत हे माहिती मला. तुम्ही आज रात्रभर विचार करा. मी उद्या दुपारी परत जात आहे. जाताना भेटायला येईन. तेव्हा तुम्ही मला तुमचा निर्णय सांगा. जर तुमचं उत्तर नाही असे असेल तर मी माधुरीला पुढे विचारणार ही नाही. हे सगळं इथेच थांबवेन."

असे म्हणून तो बाबांना नमस्कार करून निघून गेला.

बाबा आणि नचिकेत आता विचारत पडले.

नचिकेत - " बाबा, विनय तर चांगला वाटला. "

बाबा - " हो, मुलगा चांगला आहे, पण त्याने असे अचानक सगळ सांगितल्याने काय करावं कळत नाही. तुला काय वाटतं ?"

नचिकेत - " बाबा, मला तर वाटतं हा त्याच्या शब्दाला जागणार,त्याच्या बोलाण्यातच जाणवत होत की तो दिदिवर प्रेम करतो ते, आणि तशी त्याने कबुलीही दिली,
सतीश आठवतो ना, त्याने कधी असे सांगितले न्हवते"

बाबा - " बरोबर आहे तुझ"

नचिकेत - " सतीश ने तर आपल्याला कधी आपलं समजले न्हवते, आपल्याला काय, दिदीला ही त्याने कधी आपलं समजल नाही. पण हा बघा, दीदी वर त्याच इतकं प्रेम आहे तरी तो आधी तुमची परवानगी घ्यायला आला. वर त्याने हे ही सांगितलं की आपण जर नाही म्हणाल तर तो हा विचार पुढे करणार ही नाही. "

बाबा - " हो, विचार तर याचे खूपच चांगले आहेत, सतीश सारखा हा नाही. "

नचिकेत - " हो , मग काय ठरवल तुम्ही बाबा "

बाबा - " बघू, उद्या सांगतो. आजुन विचार संपत नाहीं. चल झोपू आता."

असे म्हणून दोघे झोपायला गेले.

बाबांना झोप लागत नव्हती .

 ते विचार करत होते, विनय तसा चांगला मुलगा वाटला, शिवाय त्याने आपल्या समोर प्रेमाची कबुली दिली. त्याला माधुरीच्या भूतकाळाची पण जाणीव आहे. त्याबाबतीत त्याने तिला खूप छान प्रकारे समजून घेतले आहे. 

मावशी आणि गौरीचा पण पाठिंबा आहे. गौरी, ती तर माधुरीची साथ केव्हा पासून देत आहे. आपल्याला माहीत ही न्हवत तेव्हा पासून ती माधुरीच्या पाठी खंबीर पणे उभी आहे. मावशींनी ही माधुरीला चांगली साथ दिली तिच्या वाईट वेळेत. जर त्या इतकी तिची काळजी घेतात  तर त्या तिच्यासाठी काही चुकीचं करू शकत नाहीत. 
जर त्या विनयच्या पाठीशी आहेत म्हणजे खरंच तो तेव्हढ प्रेम करत असणार नाही तर या दोघींना माहिती आहे माधुरी कशातून गेली आहे तस पुन्हा होणार नाही याची त्यांनी काळजी घेतलीच असेल.

शेवटी बाबांना एक निर्णय घेतला आणि शांतपणे झोपी गेले.

सकाळी विनय आला.

बाबा - " ये विनय, नाश्ता कर "

तिघांनी नाश्ता केला.

विनय - " बाबा तुम्ही विचार केलात का? काय आहे तुमचं उत्तर?"

विनय प्राण कानात आणून ऐकत होता.

बाबा - " विनय मी खूप विचार केला, आम्हाला तुझ म्हणणं पटतंय . आमच्या माधुरी साठी तू योग्य आहेस. आणि शिवाय मावशी आणि गौरी या निर्णयात तुझ्याबरोबर   आहेत हे कळल्यावर तर आम्हाला खात्री पटली आहे की तू तिला छान संभालाशिल. त्या दोघी मधूरीच नेहमी भल व्हावं असाच विचार करतील. त्यामुळे तू आम्हाला पसंत आहेस."

विनयला हे ऐकुन खूप आनंद झाला.

बाबा - " पण …"

विनय - " पण काय बाबा? "

बाबा - " पण जर माधुरीला हे पसंत नसेल तर .."

विनय - " बाबा मी तुम्हाला म्हणाल ना, तिच्या मनाविरुद्ध काही होणार नाही. ती जर नाही म्हणली तर मी तिच्या आयुष्यातून दूर होईन. पण मला आतून अस वाटत आहे की माधुरी पण मला पसंत करते "

बाबा - " तसे असेल तर उत्तमच.. आम्ही आहोत तुझ्या बरोबर "

विनय ने बाबांना नमस्कार केला. बाबांनी त्याला उठवलं आणि मिठी मारली. नचिकेत ही विनयला मिठी मारली.

नचिकेत - " पण तू दिदिला विचारणार कधी? "

विनय - " माझ्या वाढदिवसाला. ३ दिवसांनी माझा वाढदिवस आहे. त्याच दिवशी मी विचारणार. हा पण तोपर्यंत मी इथं आलो होतो , आपल बोलणं झाल हे माधुरीला काळतां कामा नये. "

नचिकेत - " चालेल. "

तिघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

विनय त्यांचा निरोप घेऊन निघाला.

आता शेवटचा टप्पा गाठायचा होता.

आता सगळेच या नात्यासाठी तयार होते. फक्त माधुरी च मत घेणे बाकी होते.

विनयला कुठ तरी खात्री होती की माधुरी हो च म्हणेल पण कुठ तरी एक भीती होती. नाही म्हणाल तरी माधुरी भरपूर अवघड परिस्थितीतून गेली होती. 

एका वाईट अनुभवाने तिची स्वप्ने , आशा सगळं तोडल होत. 

प्रेमा वरचा विश्वास उडवला होता.

 त्यामुळे पुन्हा लग्न करण्यातही ती तयार होईल का नाही ही शंका होती.

विनय घरी आला. मावशी आणि गौरी देवळात गेले होते. 

माधुरी पण बाहेर जाणार होती तेवढ्यात विनय आला.

विचाराने आणि प्रवासाने विनय दमाला होता. त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत. माधुरी ने ते ओळखलं.

तीन विनय ला हाक मारली आणि म्हणली.

माधुरी - " दमला आहेस का?"

विनय - " हो थोड"

माधुरी - " बर एक काम कर, फ्रेश हो, मी चहा करते "

विनय हो म्हणून फ्रेश होण्यासाठी गेला.

थोड्यावेळात फ्रेश होऊन खाली आला. तोपर्यंत माधुरीने चहा आणि पोहे केले आणि घेऊन आली.

ते बघून त्याला आश्चर्य वाटलं, हिला कसं कळलं मला भूक पण लागली होती ते.

त्याने तिला विचारल ,

विनय - " तुला कसं कळलं , मला भूक लागली आहे ते ?"

माधुरी हसली आणि म्हणली, " अरे चेहऱ्यावरचं लीहल आहे तुझ्या "

विनय ही हसला आणि मनात म्हणाला, ( चांगलच ओळखू लागली की ही मला. माझी एवढी काळजी करते, माझ्यावर प्रेम ही करत असेल)

माधुरी - " झालं का तुझ काम, बेंगलोर ला गेला होतास ते "

विनय - ( मनात हसत ) " हो, उत्तम प्रकारे झालं तिथलं काम , आता फक्त इथलं काम झालं की झालं."

माधुरीला काही कळेना तो काय बोलत आहे ते.

विनय मनात वाढदिवसाला काय आणि कसं सगळं करायचं याचं प्लॅनिंग करत होता. हा वाढदिवस त्याच्यासाठी खूप महत्वाचा होता.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all