माधुरी आणि गौरी रात्री २. ३० वाजता बेंगलोर ला पोहोचल्या.. नचिकेत ला फोन केला होता , त्यामुळे तो त्या दोघीना न्यायला आला होता. घरी यायला त्यांना ३. ३० झाले. तिघे झोपायला गेले. सकाळी ७ वाजेपर्यंत नचिकेत आणि बाबा उठले होते. माधुरी आणि गौरी प्रवासामुळे दमल्या होत्या . त्या अजून उठल्या न्हवत्या . नचिकेत आणि बाबा फ्रेश होऊन बसले होते या दोघी कधी उठतात याची वाट बघत .
थोड्या वेळाने या दोघी उठल्या. फ्रेश होऊन बाहेर येताच नचिकेत ने चहा दिला. सगळ्यांनी एकत्र चहा घेतला. बाबाना माधुरीला बघून खूप बर वाटलं होत. लग्नानंतर त्यांना तिला भेटायला जायला जमाल न्हवत. पाठीचा त्रास खूप वाढला होता त्यामुळे प्रवास करण अवघड झालं होत. बाबाना एकटं ठेवून नचिकेत हि जाऊ शकत न्हवता. त्यामुळे तिला बघून दोघांना भरून आलं.
माधुरी- " बाबा कसे आहात? नचू तू कसा आहेस.?मला फार आठवण यायची तुमची?"
बाबा- " बाळा, आमचंपण तसेच होत. खूप वाटायचं जाऊन भेटावं तुला . पण हल्ली पाठदुखी खूप त्रास देते. प्रवास झेपत नाही एव्हडा. "
नचिकेत- " आम्ही ठीक आहोत ग दीदी, तू सांग कशी आहेस? आणि जीजू का आले नाहीत तुझ्याबरोबर? ते नंतर येणार आहेत का ?"
बाबा- " अरे तिला जरा मोकळा श्वास घेऊन दे. आणि हि गौरी का ग ?"
माधुरी- " हो बाबा, हि गौरी . मी आता हिच्याच कंपनी मध्ये नोकरी करते. "
गौरीने बाबाना नमस्कार केला.
बाबा- " सुखी राहा बाळा. "
थोडीफार बोलणी झाली. आता माधुरीला प्रश्न पडला बाबाना कस सांगायचं सगळं. त्यांना काय वाटेल.? नचु ला काय वाटेल. ?
पण काही झालं तरी सांगावं तर लागेल. आणि या सगळ्यात आपली काही चूक नाही. जे नशिबात होत ते झालं. त्यात मी करायचा तेव्हडा प्रयत्न केला पण शेवटी जे नियतीच्या हातात होत तेच झालं. शेवटी खूप बळ एकवटून तिने बोलायचं ठरवलं आणि बाबाना हाक मारली .
माधुरी- " बाबा, बोलायचं होत "
इतक्यात बाहेरून कारचा हॉर्न ऐकू आला.
बाबा- " अरे नचू, छोटू आला वाटत. त्याला सांग मी आज नाही येत. "
नचिकेत- " नाही बाबा, जाऊन या दोन तासाचा तर प्रश्न आहे. कशाला चुकवता. दीदी आहेच कि इथं "
नचू समोर बाबांचा नाईलाज झाला.
बाबा- " माधुरी, मी जाऊन येतो. मग आपण निवांत बोलू. "असे म्हणून बाबा गेले.
माधुरी- " नचु , कोण हा छोटू,? बाबा कुठे गेले?"
नचिकेत- "अग दीदी, तो छोटू बाबाना दररोज न्यायला येतो. १० मिनिटावर एक थेरॅपिस्ट आहेत. बाबांचा पाठीचा त्रास खूप वाढला आहे. ते थेरपिस्ट त्यांना ट्रेंटमेन्ट देतात. २ तास आठवड्यातून ५ दिवस जातात बाबा. "
माधुरी- " अच्छा. "
नचिकेत तिला हि आज सुट्टी होती. माधुरी आणि गौरीने आवरून घेतलं. माधुरीने आज स्वतः स्वयंपाक केला. जे जे नचिकेत आणि बाबाना आवडत ते सर्व केलं. खूप दिवसांनी तिन तीच जून आयुष्य अनुभवलं. गौरीही थोडीफार मदत करत होती. बाबा २ तासांनी आले. दुपारची जेवण आवरून चोघे बसले होते.
बाबा- " आहेस ना तू अजून चार पाच दिवस?"
माधुरी -" नाही बाबा आज रात्री किंवा उद्या सकाळी निघेन "
नचिकेत- " काय हे दीदी? आत्ताच तर आलीस . लगेच काय चाललीस? जीजू राहत नाहीत वाटत तुझ्याशिवाय ?" नचु चिडवायच्या स्वरात बोलला.
माधुरीला भरून आल. वाईट वाटलं ,ह्यांना काय वाटत आणि सत्य परिस्थिती काय आहे याची त्यांना जरा सुद्धा कल्पना नाही.
बाबा- " ग काय झाला? रडतेस का?"
माधुरी- " बाबा काय सांगू? तुम्ही समाजता तसा माझा संसार चालू नाही आहे. "
नचिकेत- " म्हणजे?"
माधुरीने हिम्मत करून सर्व घटना त्या दोघांना सांगितली. दोघांना खूप वाईट वाटलं आणि सतीश चा राग हि खूप आला.
माधुरी- " म्हणून बाबा मी काल ते घर सोडून गौरी कडे आले. आता मला त्या घरात परत जायचं नाही आहे. तिथे माझं म्हणावं असं कोणीच नाही. मी वेगळं होण्याचा विचार करते. "
बाबाना फार वाईट वाटलं.
बाबा- " माफ कर पोरी, कुठला स्थळ तुला दिल मी. "
नचिकेत- " बाबा , यात आपली चूक नाही. चूक त्या लोकांची आहे, त्यांनी आपली फसवणूक केली. दीदी, आपण त्यांच्या वर केस करून त्यांना चांगलीच शिक्ष देऊ. "
नचिकेत खूप चिडला होता. दीदींच्या बाबतीत कोणी काही बोललेलं त्याला लहानपणापासूनच सहन व्हायचं नाही. इथे तर त्यांनी तिला अशी वागणूक दिली होती ते त्याला सहनच होत न्हवत.
बाबा- " मी त्यांना जाब विचारणार आहे यासगळ्यांना. मला त्यांनी खात्री दिलेली तुला मुलीसारखं वागवतील , मग त्यांनी तुझ्यावर हात उगारालाच कसा?"
असे म्हणत बाबानी वीणाताईंना आणि सतीशला फोन केला.. २-३ दा फोन केला पण कोणीच उचलला नाही.
वीणाताईंना वाटलं ती सासरी जाऊन आपलं वागणं त्यांना सांगेल म्हणून त्यांनी मुद्धाम फोनच उचलला नाही. सतीशने तर त्यांच्याशी कधी संभंधच ठेवला न्हवता.
माधुरी- " बाबा, झालं ते झालं. मला आता त्यांच्या शी काही संभंध ठेव्याचा नाही कि काही केस करायची नाही. असेही त्यांना मोकळं व्हायचं होत या नात्यातून मी त्यांना मोकळं करेन पण "
नचिकेत- " पण काय दीदी त्यांना शिक्षा नको. "
माधुरी- " नाही नचु , शिक्षा त्यांना वेळ देईल. मला त्यांच्यात आता कोणतीच भावना गुंतवयाची नाही. ना प्रेमाची ना सुडाची . मी त्यांना डिवोर्स देणार पण त्यांनी मला माझं जे दागिने सासू बाईंनी ठेवून घेतलेत ते आणि आपण लग्नात जो खर्च केला ती रक्कम परत द्यावी. . आपण आपला साठवलेला पैसा घातला त्या लग्नात , तो तर आपल्याला मिळायलाच पहिजे. "
गौरी- "तू त्याच्या कडून चांगली मोठी पोटगी घेऊ शकतेस"
माधुरी- " नाही मला त्यांचं १ पैसाही नको. मला फक्त माझे दागिने आणि लग्नच जो खर्च झाला तो . एवढंच हवं मला. "
बाबाना आणि नचिकेतचला खूप वाईट वाट होत. या परीस्थित आपण तिच्या बरोबर हवे होतो असे त्यांना सारखा वाटत होत.
नचिकेत- " दीदी तू इथे ये राहायला. "
माधुरी- " अरे नको . माझा तिकडं जॉब आहे. मी राहीन. "
बाबा- " एकटी कशी राहशील. मी येतो तुझ्याबरोबर , आपण आपल्या घरी राहू. "
माधुरी- " नाही बाबा, तुम्हाला पाठीचा त्रास आहे खूप. आणि इथे तुमची ट्रीटमेंट चालू आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. "
गौरी- " बाबा , तुम्ही तिची काळजी करू नका. मी तिला एकटं पडू देणार आंही. ती माझ्या बरोबर राहील "
बाबाना तिला असं एकटं सोडायचं न्हवत. पण यांची परिस्थिती हि तशी होती. त्यांना एव्हडा लांब जण जमणार न्हवता.
बाबा- " पोरी, काही झालं तरी आम्ही आहोंत तुझ्या पाठी. "
नाहीएत- " हो दीदी "
माधुरी- " बाबा मला माहिती आहे. म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. इतका मोठा निर्णय मी तुमच्या शिवाय घेऊ शकले नसते . "
संध्याकाळचे जेवण करून माधुरीने थोडा वेळ बाबा , नचिकेत बरोबर घालवला. रात्रीच्या गाडीने दोघी परत निघाल्या. बाबाना आणि नचिकेत ला भरून आलं. बाबानी ओल्या डोळ्यांनी तिला निरोप दिला. नचिकेत त्या दोघीना स्टॅन्ड वरून सोडून आला.
२ दिवस माधुरी घरी नाही हे बघून सतीशने किंवा वीणाताईंनी एक फोन करून तिची चौकशी केली नाही हे बघून तिला आता खात्री झाली आपण करत आहोत ते योग्यच आहे.
आता तीचा वेगळा प्रवास सुरु झाला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा