ही कथा स्वलिखित असुन इतरत्र कुठेही प्रकाशित केलेली नाही.तसेच ही कथा काल्पनिक आहे.नाव,ठिकाण,जिवीत किंवा मृत गोष्टी त्यात काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे,असे समजावा.
तिचा स्वतःचा वेळ !
आज तिला ऑफिसला जायला उशीर झाला आणि तिची नेहमीची ट्रेन सुटली.ती धावून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होती,म्हणून ट्रेन प्लॅटफॉर्म सोडल्यानंतरही तिचा हृदयाच्या ठोक्यानी उर वर खाली होत होता.स्वतःला शांत करण्यासाठी तिने छातीवर हात ठेवला.
अचानक पुढची ट्रेन पकडण्यासाठी तिला स्वतःभोवती महिलांची गर्दी दिसली,पण आता ती नकळत त्या गर्दीतून बाजूला होऊन,एका खुर्चीवर बसली होती,जी तिला खरेतर तेथे गर्दी असूनही आश्चर्यानेच आज मिळाली होती.
दोन-तीन गाड्या एकामागून एक गेल्या,परंतु ती त्यातून गेली नाही आणि तिथेच शांतपणे बसून होती.एका तासानंतर फोनचे नोटिफिकेशन आले आणि तिला तिच्या ऑफिसला जायला उशीर झाल्याची जाणीव झाली.
"विद्या….अग कधी येणार आहे ऑफिसला?"तिच्या सहकाऱ्याने तिला मॅसेजद्वारे विचारले.
"विद्या मॅडम आज तातडीने ही फाईल हवी आहे."
ऑफिसचे एक एक करून ग्रुप मॅसेज येऊ लागले.
ऑफिसचे एक एक करून ग्रुप मॅसेज येऊ लागले.
"माफ करा,मी आजारी असल्याने आज येऊ शकत नाही."
ती ग्रुपमध्ये मेसेज पाठवते आणि त्यांचे पुढचे मेसेज न पाहता तिने तिचे इंटरनेट बंद केले.
ती ग्रुपमध्ये मेसेज पाठवते आणि त्यांचे पुढचे मेसेज न पाहता तिने तिचे इंटरनेट बंद केले.
आता पुढे काय करणार,ती विचार करत होती.तिला अनेक दिवसांपासून जायचे होते,त्यामुळे ती जवळच्या मंदिरात गेली.ते गणपती मंदिर होते.तिला तिथे गेल्यानंतर सकारात्मक आणि प्रसन्न वाटले.मग तिला भिकार्यांच्या शेवटच्या ओळीत एक आई,तिच्या लहान बाळासोबत खाली बसलेली दिसली.म्हणून तिने,तिला तिचा टिफिन दिला,
कारण तिला भूक लागली आहे,हे तिच्या अवस्थेवरून दिसून आले.त्यामुळे तिने पैशाऐवजी तिचा टिफिन बॉक्स दिला,जो तिने सकाळी लवकर उठून बनवला होता.त्या तरुण आईने हसून हात जोडून कृतज्ञता दाखवली.तिला मदत करून विद्यालाही मनास समाधान वाटले.
कारण तिला भूक लागली आहे,हे तिच्या अवस्थेवरून दिसून आले.त्यामुळे तिने पैशाऐवजी तिचा टिफिन बॉक्स दिला,जो तिने सकाळी लवकर उठून बनवला होता.त्या तरुण आईने हसून हात जोडून कृतज्ञता दाखवली.तिला मदत करून विद्यालाही मनास समाधान वाटले.
मग ती एका हॉटेलमध्ये गेली,कारण ती सकाळी नाश्ता करायला विसरली.म्हणून तिच्या पोटात भुकेने कावळे ओरडत होते.प्रत्येकवेळी ती हॉटेलमध्ये तिचे पती सर्वेश आणि तिची दोन मुले शाश्वती आणि वरद यांच्यासोबत जात असे,पण आज ती एकटीच गेली.तिला वेगळं वाटत होतं,सर्व विचार झटकून,आता ती आज स्वतःचाच विचार करत होती.
वेटर आला आणि नाश्त्याची वेळ संपली,म्हणून त्याने जेवणाची ऑर्डर मागितली.प्रत्येकवेळी तिच्या नवऱ्याने आणि मुलांनी ठरवले,कारण ती काहीही खाऊ शकते,गृहीत धरलेले म्हणून तिच्याकडेही जास्त पर्याय नव्हता.मुलेही पूर्ण जेवत नाहीत,म्हणून उरलेले ती आणि तिचा नवरा त्यांच्या ताटातून खात होते.तिला खूप दिवसांपासून आवडलेली गोष्ट ती,आज कशी विसरली हे तिला जाणवलं.
तिने अतिरिक्त दोन बटर पाव असलेली पावभाजी ऑर्डर केली.जेवताना ती कोणाचाही मध्ये व्यत्यय न येता शांतपणे जेवत होती.अचानक तिला तिच्या लग्नापूर्वीच्या दिवसाची आठवण झाली.
तिचे वडील रात्री जेवायला तिची वाट पाहत असत,ते दोघे बाजूला बसून एकत्र जेवत असायचे.घरात कोणतीही वेगळी वस्तू बनवली की,सर्वप्रथम ज्याची चव चाखेल ती म्हणजे घरची लाडकी मुलगी विद्याच,परंतु लग्नानंतर समीकरण बदलतेच,अपरिपक्व मुलगीही वैवाहिक जीवनात प्रवेश केल्यानंतर परिपक्व होते.तसेच काहीसे तिचंही झालं होत.
ती तिशीच्या उत्तरार्धात होती.आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या होत्या.तिचे वजन थोडे वाढले होते.या महागाईच्या जीवनात ती आपल्या पतीला काम करून मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करत होती.
तस सर्वेश हा काही वाईट नव्हता,नवरा म्हणून.. पण ऑफिस आणि घर तिने दोन्ही सांभाळावं,असं त्याला वाटत होतं.त्यामुळे कधी कधी त्यांच्यात भांडणे व्हायची.
सासू सासरे अधुन मधुन नातवंडांसाठी त्यांच्या घरी भेटायला येत होते,पण त्यांना गावातच राहायला आवडते,म्हणून त्यांना गाव सोडून यायला आवडत नव्हते.
तिचे आई-वडीलही यायचे,ते सुध्दा दोन दिवसांपेक्षा जास्त राहिले नाहीत,कारण ते त्यांच्या जावयाचे घर होते,त्यामुळे ते चांगले दिसत नाही,असे त्यांना वाटले.
त्यांचे पहिले अपत्य,शाश्वतीच्या जन्मानंतर तिने प्रसूती रजा घेतली होती.त्यावेळी तिची आई आणि सासूने तिची छान काळजी घेतली होती.दुस-या गरोदरपणात तिच्या आई-वडिलांनी बाळ,पाच महिन्यांचे होईपर्यंत तिला घरी नेले होते.तिच्या कमकुवत शरीरामुळे डॉक्टरांनी दोन्ही वेळा तिची काळजी घेण्याचे सांगितलेले.सर्वेशनेही कामातून वेळ काढला होता आणि तिला त्यावेळी भेटायला जायचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा