तिचा स्वतः चा वेळ! भाग २
त्यांचे पहिले अपत्य,शाश्वतीच्या जन्मानंतर विद्याने प्रसूती रजा घेतली होती.त्यावेळी तिची आई आणि सासूने तिची छान काळजी घेतली होती.दुस-या गरोदरपणात तिच्या आई-वडिलांनी बाळ,पाच महिन्यांचे होईपर्यंत तिला घरी नेले होते.तिच्या कमकुवत शरीरामुळे डॉक्टरांनी दोन्ही वेळा तिची काळजी घेण्याचे सांगितलेले.सर्वेशनेही कामातून वेळ काढला होता आणि तिला त्यावेळी भेटायला जायचा.
आज एखाद्या चित्रपटातील दृश्यांप्रमाणे सर्व काही तिच्या डोळ्यांसमोर निघून गेले आणि तिला वाटले की,त्या प्रक्रियेत ती स्वतःलाच हरवलेली आहे.
तिला मागच्या आठवड्याची गोष्ट आठवली.हात भाजलेला असतानाही,ती तिचं काम करत होती.लग्न झाल्याच्या सुरुवातीला तिची काळजी घेणार्या व्यक्तीने आता तिला विचारण्याची तसदी घेतली नाही आणि ते हलक्यातच घेतलं.ती त्या भाजलेल्या जखमेकडे पाहत होती,जी जवळजवळ भरत आली होती.तरीही तिची छाप खुणेने तिथेच सोडलेली होती.
काहीतरी ठरवून ती घरी गेली.मुलं त्यांच्या शाळेत होती, म्हणून त्यांना आणि ऑफिसमध्ये असलेल्या नवऱ्याला घरी परतण्यासाठी अवकाश होता.तिने दोन-तीन कागदावर काहीतरी लिहायला सुरुवात केली.
मग मुलं आली आणि तिचा नवराही घरी आला.तिने त्यांना चहा आणि खायला दिले,पण काहीच बोलली नाही.ती त्यांना काहीच का बोलली नाही,असा विचार करत तिघेजण त्यांचे रात्रीचे जेवण करत होते.नंतर तिने भांडी न धुता ती टीव्ही बंद करायला गेली,जे तिघे पाहत होते.
"तू टीव्ही का बंद केलास विद्या?"थोडासा आवाज वाढवत तिचा नवरा म्हणाला.
"हो आई,मला पण बघायचं होतं." तिचा मुलगा म्हणाला.
तिने सपशेल त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
एक खुर्ची घेऊन,ती त्यांच्या समोर बसली.आता त्यांनाही कळले की,ती काहीतरी गंभीरपणे बोलणार आहे.तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांना एक कागद दाखवला.
"कुठे जात आहेस?" त्यांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.
त्यापूर्वी,ती तिच्या कुटुंबाशिवाय कुठेही केव्हाही कधी गेली नव्हती.
"मी बाहेर जात आहे.तुम्हा तिघांना इंग्रजी वाचता येते ना?"
ती सहज म्हणाली.
ती सहज म्हणाली.
ती अशी आधी कधीच वागली नाही,म्हणून त्यांनाही आज तिची वेगळी बाजू दिसली.
"पण आम्ही आमचं सगळं कसं सांभाळणार आणि तेही तू एका दिवसासाठी नाही,तर तीन दिवसांसाठी जात आहेस." आता नवऱ्याच्या आवाजात राग दिसत होता.
"दुसरा कागद,वाचा तुम्हाला कळेल की,माझ्याशिवाय तुम्ही कसे सर्व व्यवस्थित सांभाळणार." विद्या त्यांना म्हणाली.
घरात आल्यावर दुपारी ती,तेच लिहित होती.
एक एक गोष्टी वाचून,त्यांचे डोळे मोठे झाले.
"नाही.. आम्ही हे करू शकत नाही."तिघे लगेच म्हणाले.
"करा किंवा करू नका,ही तुमची समस्या आहे."ती बेफिकिरीने म्हणाली आणि खोलीत जाऊन झोपी गेली.
तिने त्यांना त्यांची सर्व कामे स्वतः कशी करायची,असं तिनं त्या कागदामध्ये म्हटलं होतं.ज्यात त्यांच्या रोजच्या कामाचे वेळापत्रक लिहिले होते.
दुसर्या दिवशी ती लवकर उठली,त्यांना एक नजर पाहून घरातून निघून गेली.
तीन दिवसांच्या सहलीसाठी एकटी लोणावळ्याला गेली होती.ती ट्रेन आणि बसने प्रवास करून शेवटी तिथे येऊन ठेपली.तिने तिच्या पतीला मॅसेज पाठवला की,ती पोहोचली,
पण नेमके ठिकाण सांगितले नव्हते.तिला कोणी फोन करू नये किंवा त्रास देऊ नये,त्यामुळे एअरप्लेन मोडवर मोबाईल ठेवला.
पण नेमके ठिकाण सांगितले नव्हते.तिला कोणी फोन करू नये किंवा त्रास देऊ नये,त्यामुळे एअरप्लेन मोडवर मोबाईल ठेवला.
तिच्या मॅसेजच्या नोटिफिकेशनद्वारे सर्वेशची झोप चाळवली.
त्याने डोळे उघडले आणि ते उघडलेच राहिले.त्याला वाटले की,ती मस्करी करत आहे.त्यामुळे त्याने घरभर तिचा शोध घेतला.
त्याने डोळे उघडले आणि ते उघडलेच राहिले.त्याला वाटले की,ती मस्करी करत आहे.त्यामुळे त्याने घरभर तिचा शोध घेतला.
"बाबा मला शाळेसाठी उशीर होतोय."त्याची दोन्ही मुले त्याला म्हणाली.
त्याने त्यांना तयार होण्यास कशीतरी मदत केली आणि तो सुद्धा त्यांच्या ऑफिससाठी तयार होत होता आणि मनोमन त्याला पत्नीची आठवण येत होती.
नाश्त्यात त्याने जॅम बटर दिले आणि त्याचप्रमाणे तीन टिफिनमध्येही तेच भरले.
मग शाळेची बसही आली.घाईघाईने त्यांना आत बसमध्ये घेतले आणि तो घामाघूम होऊन घरी परतला.
"विद्या.... तू हे रोज कसे केलेस ग?" तो स्वतःशीच म्हणाला.
सकाळ कशीबशी त्याने सांभाळली,पण रात्री आणि उद्याच्या जेवणाचे काय,ऑफिसमध्ये बसून तो विचार करत होता.
तिथे विद्या,रिसॉर्टमध्ये बसून चहा पिण्याचा आनंद घेत होती आणि तिला जे आवडते ते खात होती.सोबत अनेक वर्षांपासून वाचण्याची इच्छा असलेले पुस्तक देखील वाचत होती.
सर्व एकटी करत असताना थोडी घाबरली आणि आपल्या लोकांची आठवणही येत होती.पण आता तिने एकट्याने मज्जा करायचं ठरवलंच आहे आणि त्यांनी काय गृहीत पकडलंय याची जाणीव करून द्यायची,म्हणून मन घट्ट करून तिने ते केलं.
इथे संध्याकाळी सर्वेश आणि मुलं घरी आल्यावर त्यांचा चेहरा उदास झाला होता.
©️®️ विद्या कुंभार
कथा आवडली असल्यास तुम्ही तुमचे विचार कॉमेंट करू शकता आणि मला फॉलो सुद्धा करू शकता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा