Login

तिचा खऱ्या प्रेमा पर्यंतचा प्रवास (भाग २०)

Vinay prapose Madhuri

भाग - १९ https://www.irablogging.com/blog/her-story-towards-true-love--chapter--19_3531

भाग - २०

विनय गिफ्ट बघून खुश झाला. 

मावशी आणि गौरी आल्या का हे बघायला माधुरी दरवाजा कडे जाऊ लागली.

विनय ने माधुरीला हाक मारून थांबवलं.

विनय - " माधुरी तुझ्याशी बोलायचं आहे. "

माधुरी - " हा बोल ना "

विनय आतून गुलाब घेऊन आला आणि तिच्यासमोर उभा राहिला.

माधुरीला काय कळेना. तिने एकदा गुलाबकडे बघितले आणि एकदा विनय कडे बघितलं.

विनय - " माधुरी, आय लव्ह यू, माझ्याशी लग्न करशील?"

माधुरीला काय बोलावं कळेना. दोन मिनिट तर तिला हे सत्य आहे की भास हेच कळायला लागले.

माधुरीच्या डोळ्यातून पाणी आले.

विनय घाबरला. आपण चुकीचं काही बोललो का अशी त्याला भीती वाटू लागली.

त्याने माधुरीला सोफ्यावर बसवले आणि म्हणाला,

" माधुरी, माझ्या बोलण्याने तू हार्ट झालीय का? तुला नाही आवडत का मी?"

माधुरी ने डोळे पुसले,

माधुरी - " तस नाही विनय, हे आनंदाश्रु आहेत, मलाही तू आवडतोस, पण.. "

माधुरी लाजून बोलली खरी पण तिच्या पण या शब्दाने त्याच्या काळजाचा ठोका चुकला. 

विनय - " पण काय माधुरी?"

माधुरी - " विनय, मी मान्य करते की हो तू मला आवडतोस, कदाचित मी ही तुझ्या प्रेमात आहे,तुझ्या आसण्याने, नसण्याने, बोलण्याने ,शांत बसण्याने मला फरक पडतो पण लग्न बद्दल मी तुला सांगू शकत नाही "

विनय - " म्हणजे? तुझ पण प्रेम आहे तर लग्नाबद्दल काय प्रोब्लेम आहे "

माधुरी - " विनय, लग्नाआधी तुला माझा भूतकाळ माहीत असणं गरजेचं आहे"

विनय - " माधुरी, मला तुझा भूतकाळ माहीत आहे, मला त्याच्याशी काही लेण देणं नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. "

माधुरीला आश्चर्य वाटलं ,ह्याला आपला भूतकाळ माहीत कसा? माहीत असून ही हा आपल्यावर प्रेम करतो.

हे तर झालं त्याच आणि माझं. पण मावशी ,गौरी, बाबा, नचिकेत यानाचा काय? ते काय म्हणतील.? अस तीला वाटू लागलं.

ती शांत उभी आहे म्हणून विनय ने माधुरीला विचारल,

" काय झालं ? कसला एवढा विचार करते आहेस "

माधुरी - " विनय आपण म्हणलो की आपलं प्रेम आहे एकमेकांवर, पण बाबा, नचिकेत ,मावशी, गौरी यांचं काय?

 मावशी आणि गौरीने तुझ्या लग्नासाठी किती स्वप्न बघितली असतील. आणि जर त्यांना हे कळलं तर. जर आपल्या नात्यांमुले माझं त्यांच्याशी नात तुटत असेल तर मला हे नात जोडायच नाही. त्या दोघींनी माझ्या वाईट वेळेत मला खूप साथ दिली. त्या माझ्यापासून दूर गेलेली मला सहन व्हायचं नाही"

असे म्हणत तिने डोळे पुसले.

विनय ला माधुरी कौतुक वाटल. ह्या मुलीसाठी नाती, माणसं किती महत्वाची आहेत. ते लोक दुरावले जाऊ नयेत म्हणून ती स्वतःच प्रेम ही बाजूला करायला तयार आहे. त्याला आता माधुरी चा अभिमान वाटला.

तिची हे बोलणे मावशी आणि गौरी मावशीच्या रूम मधून ऐकत होत्या. खर तर त्या कुठे बाहेर गेल्याच न्हवता. 

माधुरीला विनय ने आपल्यासमोर विचारले तर तिला अवघडल्यासारखे होईल म्हणून त्यांनी बाहेर जायचे नाटक केले होते.

तिचा बोलणं ऐकुन मावशी आणि गौरीच्या डोळ्यात पाणी आले. किती विचार करते ती आपला अस त्यांना वाटलं.

त्या बाहेर आल्या. 

मावशी म्हणाली ," आणि आम्हा दोघींना ही तू या घराची सून व्हावी असे वाटत असेल तर.."

माधुरीने मागे वळून बघितले. मावशी आणि गौरी उभ्या होत्या.

मावशी असे म्हणताच तिला डोळ्यातील पाणी थांबवता आले नाही. तिने पटकन जाऊन मावशी आणि गौरीला मिठी मारली.

मावशीने तीच्य डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली ,

"हो आम्हाला तू पसंत आहेस, खूप आधीपासून च फक्त एक अट आहे"

विनय आणि माधुरी मावशी च बोलणं कान देऊन ऐकत होते.

मावशी - " लग्नानंतर पण आपण अस मित्रिनी सारख राहायचं. सासू सूने सारख नाही." 

अस मावशी म्हणताच सगळे हसू लागले.

विनय ने आईला मिठी मारली.

गौरी - " आणि राहता राहिला प्रश्न बाबा आणि नचिकेत चा तर आत्ताच त्यांना फोन कर आणि विचार "

अस म्हणत तीने माधुरीच्या फोन वरून नचिकेत ला फोन लावून माधुरीच्या हातात दिला.

पुढे काय होणार ते विनय, गौरी आणि मावशीला माहीत होत सो ते निवांतपणे मधूरीकडे बघत उभे होते.

माधुरीला मात्र घाम फुटला, अस अचानक विनय आपल्याला लग्नाची मागणी घालतो काय, आपण त्याचा प्रेमाची कबुली देतो काय आणि आता बाबांना लग्नासाठी विचारतो काय.

तिला खूप भीती वाटतं होती.

नचिकेत ने फोन उचलला.

नचिकेत - " बोल दीदी , काय म्हणतेस?"

माधुरी - " जरा बाबांना फोन दे "

नचिकेत बाबांना फोन देतो. 

बाबा -" बोल माधुरी बाळा "

माधुरीला घाम फुटतो. कुठून सुरवात करावी कळत नाही. घाम पुसत ती जरा लांब जाते.

बाबा - " ग बोल ना"

बाबांना विनय ने कल्पना दिली असते त्यामुळे बाबांना माहीत असते माधुरी काय विचारणार ते. ते पण तिची मस्करी करत असतात.

माधुरी - " बाबा, ते विनय … विनय बद्दल… "

बाबा - " विनय ना, पसंत आहेत आम्हाला जावई म्हणून "

माधुरीला काही कळत नाही. बाबा एकदम जावई कसे म्हणले. विनय ला त्यांनी न बघताच जावई कसे बनवले 

माधुरी - " बाबा, तुम्हाला कसं माहीत मी काय विचारणार होते ते? विनय कसा माहीत? त्याला न बघता तुम्ही त्याला जावई कसं काय म्हणाला?"

बाबा - " पोरी, नशीब काढलं बघ तू, विनय खूप चांगला मुलगा आहे. तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला लग्नाची मागणी घालण्याआधी तो इथं आला होता. त्याने अमचेसमोर प्रेमाची कबुली दिली. आमची परवानगी मागितली. तुला माहिती का ,जर आम्ही नाही म्हणलो असतो तर त्याने शब्द दिला होता की तो तुझ्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही म्हणून. त्याच्या डोळ्यात खरेपणा दिसत होता. आम्ही आमची पसंती आहे अस सांगितल्यावर त्याने आम्हाला सांगितलं होत की तो तुला त्याचा वाढदिवसाला लग्नासाठी विचारणार. तो विचारला की तू आम्हाला फोन करून विचारणार हे माहीत होत म्हणून मी आधीच तुला सांगितलं."

बाबा हे सगळं सांगत असताना माधुरी च सगळं लक्ष विनय कडे होत. आता तिला कळलं हा बेंगलोर ला का गेला होता ते.

तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर अजुन वाढला. जेव्हा आपल्यावर प्रेम करणारा मुलगा आपल्या कुटुंबाच मत विचारात घेतो तेव्हा प्रत्येक मुलीला आनंद होतो. किती चांगल्या मनाचा आहे हा.अस ती विचार करू लागली.

आपलयाला मागणी घालण्याआधी त्याने सगळी तयारी करून ठेवली होती. सगळ्यांचे होकार घेतले होते आणि मगच त्याने आपल्याला मागणी घातली. तो चांगलाच ओळखून आहे आपलयाला.

बाबांनी फोन ठेवला. माधुरीला खूप आनंद झाला. खूप दिवसांनी तिच्या आयुष्यात आनंद आला होता.

पण आपल्या माघारी याने एवढ सगळ केलं ते ही आपल्याला कळू न देता , आणि आपली मज्जा बघत राहिला. आता आपण पण याची मज्जा करायची अस म्हणून ती आली.

जरा चेहरा पाडला.

ती येताच गौरीने विचारले.

गौरी - " काय झालं ? तयार आहेत ना बाबा आणि नचिकेत या लग्नासाठी "

माधुरी ने चेहरा पडून सांगितले ,

" नाही, बाबा नाही म्हणाले "

विनयच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अस कस काय झालं असां विचार करू लागला.

गौरी - " विनय काय रे हे, तू तर म्हनला होतास की ते तयार आहेत म्हणून. मग अस कसं काय?"

विनय - " ग हो खरंच ते तयार होते, अचानक कसे नाही म्हणले, थांब मी फोन वर बोलून बघतो, काय झालं ते तरी कळेल."

त्याची ही अवस्था बघून माधुरीला आता हसू आवरेना.

ती आता हसू लागली.

मावशी आणि गौरीलाही कळाल की माधुरी गम्मत करत आहे ते..

विनय ने माधुरी कडे बघितले. ती हसत आहे म्हणजे तिने मस्करी केली आणि आता मज्जा घेत आहे बघून तो आता माधुरीच्या दिशेने तीला पकडायला येऊ लागला.

विनय - " माधुरी, थांब आता तुला बघतोच "

माधुरी पटकन मावशी च्या मागे पळू लागली. विनय ही मावशी कडे येऊ लागला तशी माधुरी पळत जिन्याकडे गेली आणि जिने चडू लागली.विनय हे तिच्या मागे जिने चडू लागला. मावशी आणि गौरी त्याना बघुन हसू लागले.

जिने चढत शेवटी माधुरी गच्चीवर पोहोचली. विनय हे गच्ची मध्ये आला आणि त्याने गच्ची चे दार आतून लावून घेतले.

विनय - " आता सापडली, आता कुट पळणार?"

माधुरी ला आता पळलायला जागाच न्हवती. 

माधुरी - " अरे सॉरी, मस्करी केली रे. त्यात काय इतकं."

विनय जसा जवळ येऊ लागला तस मधुरच्या पोटात गोळा येऊ लागला. एक गोड भीती जाणवू लागली.

शेवटी तो तिच्या जवळ आला. माधुरीची धड धड वाढू लागली. ती तिचा पदर धरून मान खाली घालून उभी राहिली.

विनय आला आणि त्याने तिची नजर स्वतः कडे वळवली.

विनय - " माधुरी, पुन्हा अशी मस्करी करू नकोस, किती जीवघेणी होती माहीत आहे का?."

माधुरीने त्याच्या नजरेत बघितल. आपण त्याच्यापासून दूर जातो की काय अशी भीती त्याच्या डोळ्यात दिसत होती.

तीन स्वतः चे कान धरले आणि म्हणली,

" सॉरी विनय, पुन्हा नाही करणार "

विनय ने तिचे हात कानावरून कडले आणि म्हणाला,

" तुझ्याशिवाय राहण्याचा मी विचार ही करू शकत नाही "

असे म्हणून त्याने एकदम तिला मिठीत मारली.

  पहिली मिठी. माधुरीला एकदम वेगेळ फिलिंग झालं. किती आपुलकी, जिव्हाळा होता त्या मिठीत .

मिठीत जादू च असल्यासारखं वाटलं. तिने ही त्याला मिठी मारली.

माधुरी - " थँक्यु विनय, तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल."

मिठी सोडत विनय बोलला.

" उलट मीच तुला थँक्यु म्हणाल पाहिजे, आजच्या दिवशी तू लग्नाला हो म्हणून मला बेस्ट गिफ्ट दिलं आहेस. "

माधुरी लाजून खाली बघू लागली.

एकट्यात गौरीने गच्चीचा दरवाजा वाजवला.

गौरी - " अरे खाली या, केक कापायच आहे की नाही?"

विनय - " हो आलो"

मग दोघे खाली गेले.

केक कापला. सगळया नी एकमेकांना भरवला.

सगळे जेवायला बसले. विनय चे लक्ष माधुरी कडे गेले की तो हळूच कोणाला न कळू देता तिला डोळा मारायचा.

माधुरीला मात्र भीती वाटायची , हा अस करतोय ,कोणी बघितल तर म्हणून ती त्याची नजर चुकवत असायची.

मग तो काही ना काहीं तरी मागवून तिला आपल्याकडे बघण्यास मजबूर करायचा.

गौरी आणि मावशी दाखवत न्हवता पण त्यांनाही कळायचं. त्या ही मनात हसत.

जेवण झाल्यावर मावशी विनय ला मुद्दाम म्हणाली,

मावशी - " विनय , कोपऱ्यावरून आईसक्रीम घेऊन ये रे.जाताना माधुरीला पण घेऊन जा."

माधुरी ला मात्र लाज वाटतं होती. ती म्हणाली.

," अग मावशी, मला हे आवरायचं आहे. "

मावशी - " ते आम्ही दोघी अवरू , तू जा "

आता काय , माधुरीने विनय कडे बघितल.

विनय ने हातानेच इशारा केला, चला आता .

दोघे बाहेर पडले. चालत चालत.

तसे दोघे आधी पण एकत्र फिरले होते पण तेव्हा आणि आज यात फरक होता.

जाता जाता विनय ने माधुरीचा हात धरला.

त्याच्या स्पर्शाने ती शहारून गेली.

तो तिच्याकडे पाहत होता आणि तो पाहत आहे हे कळत असल्यामुळे ती लाजून नजर चोरत होती.

आज दोघे न बोलता एकमेकांना जाणून घेत होते.