Login

तिचा खऱ्या प्रेमा पर्यंतचा प्रवास (भाग २१)

Vinay weds Madhuri

भाग -२०

https://www.irablogging.com/blog/her-story-towards-true-love--chapter--20_3569

भाग - २१

विनय आणि माधुरी घरी आले.

सगळ्यांनी आईसक्रीम खाल्ले. सगळे आपापल्या खोलीत जात असतात .

विनय माधुरीचा हात धरून तिला थांबवून गूड नाईट म्हणतो.

माधुरी पण लाजून गूड नाईट म्हणून हात सोडवून पळत वरती जाते.

विनय स्वतःशी हसतो. आजचा दिवस कायम लक्षात राहील असे मनात म्हणतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करत असतात.

गौरी आणि मावाशीच काही तरी बोलणं चालू असते.

नंतर सगळे आपल्या कामाला जातात.

संध्याकाळी सगळे भेटतात. जेवायला बसतात तेव्हा मावशी म्हणते.

मावशी -" माधुरी, मी उद्या तुझ्या बाबांना फोन करेन"

माधुरीला एकदम कळत नाही.

माधुरी - " का? काय झालं ?"

मावशी - " अग का काय, आता तुम्ही दोघं एकमेकांना पसंत करता, दोन्ही कुटुंबांना पण हे पसंत आहे तर मग लग्नाची बोलणी करायला नको का? तारीख बघायला हवी, साखरपुडा कधी करायचं ते ठरवायला हवं"

विनय गलात हसून माधुरी कडे बघतो.

माधुरी - " हा " एवडच बोलते.

लग्नाचं विषय निघताच ती एकदम शांत होते. 

मावशी आणि गौरी च्या ते लक्षात येत नाही त्या लग्नाच्या विचारात गुंग असतात पण विनय, विनयचा लक्ष मधूरिकडे असत.

ती विषय निघताच शांत झाली हे त्याच्या नजरेतून सुटत नाही. 

सगळे जेवतात. माधुरी आणि गौरी आवरत असतात. विनय आधीच रूम मध्ये जातो. 

माधुरी आणि गौरी ही आपल्या रूम मध्ये जातात.

माधुरीच्या ध्यानात पण येत नाही की विनय आज गूड नाईट न म्हणता गेला ते. ती वेगळ्याच विचारात असते.

रूम मध्ये येतात. गौरी लगेच झोपी जाते. माधुरी मात्र जागी असते. इतक्यात तिच्या मोबाईल वर मेसेज येतो.

विनय तिला गच्ची मध्ये ये म्हणतो.

माधुरी त्याला म्हणते, आता? या वेळी ?

विनय म्हणतो , हो महत्वाचं बोलायचं आहे.

माधुरी ठीक म्हणते.

ती रूम मधून बाहेर पडते आणि गच्चीवर जाते. 

विनय तेथे आधीच पोहोचला असतो.

माधुरी - " काय झालं?"

 अस विचारते खर पण त्याच्या उत्तराकडे तीच लक्ष नसत. ती वेगलीकडेच नजर लावून विचारात गुंग असते.

विनय ही काही बोलत नाही. खूप वेळ तिच्याकडे शांतपणे बघत बसतो.

थोड्यावेळाने माधुरीची तंद्री तुटते आणि ती परत विचारते.

माधुरी - " सॉरी, काय म्हणालास काय झालं?"

विनय - " तेच मी पण विचारत आहे. काय झालं ?"

माधुरी - " कुठ काय ? काही नाही"

विनय - " मी जेवणापासून बघत आहे. लग्नाचं विषय निघताच तू शांत झालीय. आज मी गूड नाईट म्हणलो नाही हे ही तुझ्या लक्षात नाही."

माधुरी नजर चोरत, " अस काही नाही " म्हणत खाली जाऊ लागते.

विनय तिचा हात धरून तिला आपल्याकडं ओढून थांबवून ठेवतो.

विनय - " नाही माधुरी, काही तरी आहे. त्याशिवाय तू इतकी शांत राहणार नाही ".

माधुरी - " अरे कसं सांगू मलाच कळत नाही आहे. खर तर मी खुश आहे मला माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती मिळाली म्हणून. पण लग्नाचं नाव ऐकताच खूप भीती वाटते रे. लग्नानंतर सगळं आपल्यात ठीक असेल ना? आपल्यात कधी अंतर तर येणार नाही ना? असे विचार मला भंडावून सोडतात. एक वाईट अनुभव मला पुढे जाण्यापासून रोखत आहे अस वाटत आहे. मला कळतच नाही, का मला इतकी भीती वाटत आहे."

असे म्हणून रडू लागते.

विनय तिच्या डोक्यावरून हात फिरवत तील जवळ घेतो.

विनय - " माधुरी, मान्य आहे तुझ्या आधीच्या लग्नात तुला खूप त्रास झाला आहे. पण त्यामुळे तू पुढे आयुष्य जगणारच नाहीस का? आणि मी तुला खात्री देतो , कितीही वाईट परिस्थिती आली , काही झालं तरी आपल्यात कधी अंतर येणार नाही. मी कधी तुझ्या पासून लांब जाणार नाही की तुला कधी माझ्यापासून दूर जावू देणार नाही."

असे म्हणून तो तिला जवळ घेऊन मिठी मारतो.

त्या मिठीत माधुरीच्या सगळया शंका दूर होतात.

विनय - " आता हस बघू, आणि लग्नाची तयारी पण अशीच हसत करायची. मी आहे ना तुझ्याबरोबर . मग कशाची काळजी ?"

माधुरी ही हसत हसत हो म्हणत डोळे पुसते.

माधुरी - " थँक्यु, मला समजून घेतल्या बद्दल. "

विनय -" त्यात थँक्यु काय? " 

असे म्हणत तो तिला रूम मध्ये सोडून गूड नाईट म्हणून जातो.

माधुरीची सगळी काळजी विनय शी बोलल्याने मिटते.

आता तिला शांत झोप लागते.

दुसऱ्या दिवशी मावशी माधुरीच्या बाबांना फोन करून लग्नाची बोलणी करतात.

१ महिन्यांनी लग्न करायचं अस ठरत. तशी तारीख निघते.

विनय आणि माधुरी खूप खुश असतात.

त्याच दरम्यान विनय गाडी घेतो. चौघे एकत्र प्रवास करू शकतील म्हणून.

आता विनय त्याच्या गाडीतून माधुरी आणि गौरीला ऑफिस साठी सोडून पुढे जात असतो आणि येताना पण तिघे एकत्र येत असतात.

माधुरीच्या येण्याने विनय च आयुष्य मार्गी लागत अस होत. 

दोघे ही प्रगती करत असतात. दोघंही प्रमोशन मिळत.

हळू हळू लग्नाचा दिवस जवळ येऊ लागतो.

घरात सगळ्या तयारी चालू असतात.

विनय आणि माधुरीने घरगुती पद्घतीने लग्न करायचे आणि फक्त जवळची लोक बोलवायची अस ठरवतात.

जो खर्च वाचेल तो अनाथाश्रम आणि वृधश्रमात मदत म्हणून द्यायचा अस ठरवतात.

लग्नाच्या १ आठवडा आधी बाबा आणि नचिकेत ही एकडे येतात.

अंगठी खरेदी, कपडे खरेदी, दागिने खरेदी करायला सगळे एकत्र जात असतात. दिवस पटापटा संपत असतात.

लग्नाचं दिवस उजाडतो.

साखरपुडा , लग्न एकाच दिवशी होत.

घरी पूजा होते. दोघे मनोभावे पूजा करतात.

बाबा आणि नचिकेत परत जायला निघतात.

जाताना एक पाकीट बाबा माधुरी आणि विनयच्या हतात ठेवतात.

माधुरी आणि विनय - " हे काय बाबा, याची काय गरज "

बाबा - " आमच्याकडून गिफ्ट समजा"

 असे म्हणून दोघे निघतात.

बाबा आणि नचिकेत गेल्यावर माधुरीला जरा रडू येत पण मावशी, गौरी तिला सांभाळतात.

सगळा दिवस घाईगडबडीत जातो. सगळे दामले असतात. विनय ला वाटत आज तर पूजा झाली म्हणजे माधुरी आजपासून आपल्या रूम मध्ये राहायला येणार त्यामुळे तो खुश असतो.

मावशी आणि गौरी रूम मध्ये जाऊ लागतात.

गौरी - " माधुरी,आज तू माझ्या बरोबर झोप ना. आता काय पहिल्यासारखी तू माझ्या रूम मध्ये येणार नाही. सो आज रात्र तू आपल्याच खोलीत झोप."

असे सांगून जाऊ लागते तोच विनय म्हणतो,

" का? अग झालं तीच लग्न. आणि आज पूजा पण झाली ना?"

गौरी हसू लागते, माधुरीला पण हसू येत.

गौरी - " अरे हो, आता काय ती आयुष्यावर तुझ्याच रूम मध्ये असणार आहे ना. आजच एक दिवस कर की अडजस्ट"

असे म्हणून वर निघून जाते.

खर तर गौरीला ही माहीत असतं पण आज घाईगडबडी मुळे त्यांना विनयची रूम सजवण्याचा वेळ मिळाला नसतो म्हणून मावशी आणि गौरी ठरवतात की आपण उद्या त्यांची रूम सजवून त्यांना छान सरप्रियाज करूया. त्यासाठी त्यांनी आज माधुरीला विनयच्या रूम मध्ये पाठवत नाही 

विनय माधुरीला बघत म्हणतो, " ही चीटिंग आहे"

माधुरी हसत म्हणते ," असू दे रे. उद्यापासून आहेच की मी तुझ्याबरोबर "

असे म्हणत ती बाबांनी दिलेले पाकीट उघडते.

आता मध्ये त्यांच्या दोघांची केरळची ट्रीप ची तिकीट असतात. बाबांनी आणि नचिकेत ने त्याच्यासाठी केरळची ट्रीप आयोजित केली असते. ३ दिवसानंतर ची तारीख असते.

 त्यात एक चीठी सुध्दा असते.

नचिकेत ने लीहाले असते, " दीदी, एन्जॉय यूर हनिमून"

माधुरीला ती चिठी आणि तिकीट बघून लाजयाला होत.

विनय तिच्याकडे बघत विचारतो, " काय झालं? लाजत का आहेस"

ती ते पाकीट विनयच्या हातात देते.

विनय ते बघतो आणि त्याला कळतं ती का लाजत होती ते.

विनय - " चला मॅडम, तयारी करायला घ्या , हनिमून ची"

माधुरीला आणखीच लाज वाटते ती " चल, काहीतरीच तुझ" असे म्हणून पळत वर जाते.

विनय ला तिची ही अवस्था बघून हसू येत. 

विनय तिला हाक मारून , " गूड नाईट" असे म्हणतो.

ती पण वरती पोहोचल्यावर गूड नाईट म्हणून पटकन रूम मध्ये जाते.