भाग -२१
https://www.irablogging.com/blog/her-story-towards-true-love--chapter--21_3595
भाग -२२
दोघांनी ही लग्नासाठी सुट्टी काढली होती.
दुसऱ्या दिवशी सगळे निवांत उटले.
पाहुणे मंडळी जे लग्नासाठी आली होती ते गेल्यामुळे सगळे आज निवांत आवरत होते. ४-५ दिवस खूप दग दग झाली होती.
संध्याकाळी मावशी आणि गौरीने विनय आणि माधुरीला बाहेर शॉपिंग साठी पाठवले. २ दिवसात त्यानं केरळ ला जायचे होते.
ते दोघे जाताच, मावशी आणि गौरी विनयच्या रूम ची सजावट करू लागल्या. दोघी सगळी रूम सजवून खाली आल्या.
हे दोघे ही शॉपिंग करून घरी आले. विनय आपल्या रूम मध्ये जाणार इतक्यात मावशी ने त्याला थांबवलं.
मावशी - " तू वर कशाला जात आहेस, इथं फ्रेश हो माझ्या खोलीत. जेवू मग लगेच. भूक लागली आहे खूप "
विनय मग मावशीच्या खोलीत जाऊन फ्रेश झाला.
माधुरी वरुन फ्रेश होऊन आली.
सगळे जेवले. नंतर विनय आणि माधुरीने दोघींना थोडी शॉपिंग दाखवली.
सगळं झाल्यावर मावशीने विनयला खोलीत बोलावून घेतल.
मावशी - " आज पासून तुमचा संसार सुरू होत आहे. माधुरी आता तुझी जबाबदारी आहे. तिला समजून घेणं तुझ कर्तव्य. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले, काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. एकमेकांवर कधी अविश्वास दाखवायचा नाही. एकावेळी दोघांनी चीडायच नाही. एक चिडला तर पुढच्याने शांत राहायचं. वादाने वाद वाढत जातो. नात दोघांनी जपायच. एकमेकांपासून कधी दूर जायचं नाही. कळलं का ?"
विनय - " हो आईं, मी हे लक्षात ठेवेन. तुझ्या सुनेला त्रास नाही देणार हा"
अस म्हणून वातावरण हलकं केला.
मावशी - " देऊन तर बघ. मग मी आहेच इथं"
अस म्हणून मावशी पण हसली.
तिने त्याला लगेच वर खोलीत पाठवल.
खोलीत जाताच विनयला आश्चर्य चा धक्का बसला.
खोली खूप सुदंर सजवली होती.
आता त्याला कळलं आईने मघाशी आपल्याला इथं का येऊ दिलं नाही ते.
नंतर मावशीने माधुरीला पण बोलावलं.
तिलाही तेच समजावलं आणि म्हणली, " जा तुमच्या खोलीत, विनय वाट बघत असेल."
माधुरी लाजून रूम मधून बाहेर पडली.
मावशीला सून आणि मुलाला आनंदी बघून छान वाटत होत.
माधुरी थोडी लाजत ,थोडी घाबरत जिना चठू लागली.
रूम मध्ये आली. सगळा अंधार.
विनय ला हाक मारत ती आत आली.
आता येताच विनय ने दरवाजा बंद केला आणि लाइट्स चालू केले.
पंख्यावर त्याने गुलाब पाकळ्या ठेवल्या होत्या.
पंखा चालू करताच माधुरीच्या अंगावर पाकळ्या पडू लागल्या.
तिला मस्त वाटत होत. मग विनय ही तिच्या जवळ आला.
विनय - " कसं वाटलं?"
माधुरी - " मस्त, हे सगळं तू केलं?"
विनय - " नाही ,फक्त पाकळ्या मी ठेवल्या बाकी सगळं आईं आणि गौरीने केलं"
माधुरी - " अच्छा म्हणून त्यांनी आपल्याला बाहेर पाठवल होय"
माधुरी सजावट बघत होती आणि विनय माधुरी कडे.
माधुरीच्या डोळ्यात थोड पाणी आलं, हा दिवस, हा आनंद तिच्या आयुष्यात येईल अस तिला कधी वाटलेच नव्हते.
आपल्यावर कोणी इतकं प्रेम करेल अस तिला वाटलंही न्हवत.
म्हणतात ना कधी कधी जेव्हा आपण एकद्या गोष्टीची अपेक्षा ही ठेवत नाही तेव्हा ती गोष्ट देव योग्य वेळी स्वतःहून आपल्या ओंजळीत घालतो.
तसच काहीस आज माधुरीच झालं होत.
विनय ने जवळ येऊन तिचे डोळे पुसले.
दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. एकमेकांत सामावून गेले.
सकाळी जाग आली ते गौरीच्या हाकेने.
माधुरी ने बघितले तर ८ वाजले होते.
बापरे इतका वेळ आपण कसे काय झोपलो अस विचार करत असतानाच कालची रात्र आठवली आणि ती मोहरुन गेली. लाजून हसू लागली.
बाजूला बघीलत तर विनय अजुन उठला नव्हता.
माधुरी पटकन उठली. सगळं सावरून दरवाज्यापाशी आली. पण दार उघडायची हिम्मत होईना. काय म्हणेल गौरी या विचाराने तिला लाज वाटू लागली. शेवटी तिने दार उघडले.
गौरी - " उठायला उशीर होईल हे माहीत होत.. पण इतका उशीर होईल वाटल न्हवत."
अस म्हणून माधुरीची मज्जा घेऊ लागली.
माधुरी - " काय ग गौरी, आधीच कसं तरी वाटत आहे आणि त्यात तू अजुन लाजवू नकोस ना"
माधुरीचा चेहरा बघून गौरीला मज्जा येऊ लागली.
गौरी - " असू दे ग. बाकी काही नाही. नाश्त्याला एकत्र बसू म्हणून बोलवायला आले. ऑफिस ला पण जायचं आहे ना. माझी सुट्टी संपली."
माधुरी - " अग पण लवकर का जात आहेस?"
गौरी -" अग खूप काम पडली असतील. म्हणून जरा आज लवकर जात आहे. "
मग गौरी खाली गेली. माधुरी पण आवरून खाली गेली आणि जाताना विनय ला उठवून गेली.
सगळयांनी एकत्र नाश्ता केला..
माधुरीला मात्र अजुन सगळ्यांशी नजर मिळवताना वेगळं वाटतं असतं. त्यातल्या त्यात विनय बरोबर तर जास्तच. त्याची नजर तिच्या काळजाचा ठाव घेत होती.
असेच दोन दिवस गेले .
आता ते केरळ साठी निघणार होते.
सगळं पॅकिंग झालं होत आणि मावशीला नमस्कार करून, गौरीला बाय करून दोघे प्रवासासाठी निघाले.
पहिल्यांदाच माधुरीने असा कोणाबरोबर तरी एवढा लांबचा प्रवास केला होता.
या प्रवासात दोघे पूर्णपणे एकमेकांचे होऊन गेले.
तिथं मस्त फिरले. एकमेकांना जाणून घेतले. एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम घालवला.
मावशी ,गौरी, नचिकेत, बाबा यांच्यासाठी थोडी शॉपिंग करून परत येऊ लागले.
येताना दोन दिवस नचिकेत आणि बाबांकडे जाऊन त्यांना भेटू म्हणून तिकडे गेले..
माधुरीने बाबा आणि नचिकेतला गिफ्ट दिलं जे तिने केरळ वरुन आणले होते.
माधुरीला खऱ्या अर्थाने सुखी बघून बाबांचं मन भरून आलं. नचिकेत ला पण दीदी साठी आनंद झाला.
माधुरी आणि विनय आता तिथे निघत होते तेव्हा बाबा म्हणले
बाबा - " विनायराव, तुम्ही तुमचा शब्द जपत आहात हे बघून खूप आनंद होत आहे. अशीच एकमेकांना साथ द्या आयुष्यभर"
विनय - " हो बाबा. तुम्हाला कुठेही तक्रारीची जागा उरणार नाही इतकं जपेंन माधुरीला "
दोघे बाबांना नमस्कार करून निघाले.
इकड घरी पोहोचल्यावर मावशी ओवाळून त्यांना आत घेतल.
दोघे फ्रेश होऊन जेवले . मग मावशी आणि गौरीला त्यांच्यासाठी आणलेलं गिफ्ट दिलं.
मावशीला दोघांना सुखी बघून छान वाटलं.
दुसऱ्या दिवसापासून त्यांचं रूटीन चालू झालं ऑफिस च.
असेच दिवस जात असतात, महिना होऊन जातो लग्नाला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा