Login

तिचा खऱ्या प्रेमा पर्यंतचा प्रवास (भाग ११)

Madhuri meets satish. She explains her demand against divorce.

माधुरीला सतीश चा फोन येतों. ती फोन घेते.

सतीश - " हॅलो, माधुरी. "

माधुरी - " बोला"

सतीश - " आपण संध्याकाळी भेटू शकतो का?"

 माधुरी -" कशासाठी ? "

सतीश - " डिव्होर्स च्या संदर्भात बोलायचं होत. मी येतो हवं तर तुझ्या ऑफिसच्या इथं संध्याकाळी. ६.३० वाजता "

माधुरी - "ठीक आहे"

 एवढ बोलणं होत आणि दोघे फोन ठेवतात.

माधुरी गौरीला हे सांगते. गौरी पण म्हणते घे भेटून. मी थांबते तुझ्यासाठी .. बोलणं झालं की आपण एकत्रच जाऊ.

माधुरीला वाईट वाटत थोड. ती विचार करते. इतके दिवस हे कधी मला भेटायला आले नाहीत की कधी मला फोन केले नाहीत. आणि आता जेव्हा डिव्होर्स ची बोलणी चालू आहेत तेव्हा एकदम फोन ,भेटणे चालू आहे. शेवटी त्यांना जे हवंय ते मिळत आहे म्हणून हे सगळं चालू आहे.

सतीश संध्याकाळी ऑफिस पाशी येतो. माधुरीला फोन करून सांगतो. गौरी ऑफिस मधेच थांबते. माधुरी खाली येते.

सतीश तिला बघुन हाक मारतो. माधुरी बघते आणि तिथे जाते.

सतीश - " हाय"

माधुरी -"बोला"

सतीश - " मला सकाळी वकिलांचा फोन आला तेव्हा कळलं तू डिव्होर्स चा विचार करत आहेस ते. तू मला आधी का सांगितलं नाहीस.?"

माधुरीला जरा राग येतो. 

माधुरी - " सांगायला आधी तुम्ही फोन तर उचलायला हवा."

 सतीश गप्प बसतो. कारण चूक त्याचीच होती , तिने त्याला फोन केला होता.

विषय बदलत म्हणतो " बाकी तू योग्य निर्णय घेतला. उशिरा का होईना पण तू या नात्यातून स्वतः ला आणि मला मोकळं करत आहेस."

माधुरी ला त्याच्या अस बोलण्याचा खूप त्रास होत होता.

पण आता परत त्या भावनेत गुंतून स्वतः ला त्रास करून नाही घ्यायचं अस ती  ठरवते.

माधुरी - " हो , खरंच मी पण माझा बराच वेळ फुकट घालवला "

 सतीश थोडावेळ काही बोलत नाही. 

सतीश - " आपण लवकर डिव्होर्स घेऊ. असाही दोघेही तयार आहोत या साठी. सामंजस्याने हे नात संपवू "

माधुरी - " हो. पण माझी काही मागणी आहे "

सतीश - " काय ?"

माधुरी - " मला माझे दागिने जे तुमच्या आईनी ठेवून घेतलेत ते आणि पाच लाख जो लग्नाचा खर्च झाला ते मला हवेत."

५ लाख ऐकुन सतीश जरा विचारात पडला.

सतीश - " तुझे सोने ठीक आहे पण पाच लाख खूप होत आहेत."

माधुरी आता खंबीर होऊन म्हणते.

माधुरी -" पाच लाख देणे जड जातंय ना? म्हणजे आपले सेविंग केलेले पैसे देणं जरा जडच वाटतंय ना?"

सतीश - "हो"

माधुरी -" मग विचार करा त्या आईवडिलांना काय वाटतं असेल जेव्हा त्यांचा काळजाचा तुकडा ते तुम्हाला देतात शिवाय आयुष्यभराची पुंजी तुमच्या समाधानासाठी लग्नात खर्च करतात. आणि त्यांना जेव्हा हे कळत की त्या लोकांना आपल्या मुलीला नंदावयाचच नाही आहे."

सतीश मन खाली घालून तीच ऐकुन घेतो.

माधुरी -" चूक तुमची आहे. तुम्हाला लग्न करायचं नाही हे तुम्ही आधी सांगायला हवं होत. लग्नात इतका खर्च झाला त्यातून आम्हाला मिळाल काय?. माझे आयुष्यातील किती दिवस खराब झाले. ते तर मी सोसलेच पण माझ्या बाबांच्या आधाराची पुजी जी त्यांनीं लग्नात घातली त्याची भरपाई तुम्ही केलीच पाहिजे. तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का म्हणून भोगायची."

शेवटी तीच मुद्दा बरोबर होता. लग्न आपण निभावलं नाही. तिची आणि  तिच्या घरच्यची काय चूक होती. त्याला तीच म्हणणं पटत होता.

माधुरी - " जर आपण कायदा प्रामाणे जायचं म्हणाला तर कदाचित तुम्म्हाला मला अजुन रक्कम द्यावी लागेल.पण मला फक्त माझ्या हक्काचे जे आहे ते हवे. शिवाय जे पैसे तुमच्या आईनी घेतले ते तर मी मागत ही नाहीय."

सतीश विचारात पडला.

सतीश - " कोणते पैसे?"

माधुरी -. " मी जॉब करत असताना माझा सगळा पगार सासूबाई घ्यायच्या. मला खर्चाला फकत २ हजार रुपये द्यायच्या. ते तर मी मागितले नाही आहेत अजुन."

सतीश ला आश्चर्य वाटले. विनाताई  कधी हे बोलल्या न्हवता.

सतीश - " ठीक आहे. माधुरी, मी जमवतो पैसे."

माधुरी - " ठीक आहे. लवकरात लवकर करा म्हणजे तुम्ही ही मोकळे आणि मी ही "

 एवढ बोलून माधुरी परत वरती आली. ती येताच गौरी आपलं काम संपवून निघायची तयारी करू लागली.

दोघी निघाल्या.जाताना माधुरीने गौरीला काय झालं ते सांगितलं.

माधुरी - " खूप त्रास होतोय ग मला या सगळ्याचा "

गौरी -" होणारच आहे . साहजिक आहे ते. पण लक्षात ठेव आयुष्यभर त्रास सोसण्यापेक्षा एकदाच सोडून मोकळं झालेलं बर."

माधुरी - " बरोबर आहे. आधीच खूप वेळ वाया घालवला मी. थँक्यू गौरी. माझा आधार बनून राहिल्या बद्दल."

गौरी -" ग अभार काय मनातेस. मी आहे काही झालं तरी तुझ्याबरोबर"

दोघी घरी पोहोचल्या. मावशी जेवण बनवत होती. दोघी फ्रेश होऊन मावशीला मदत करू लागल्या. माधुरीने मावशीला सगळं सांगितलं. जेवून झाल्यावर माधुरीने बाबांना फोन करून ही कळवल.

आता उद्या वकीलांच्याकडे दोघे भेटणार होते.

आता काही झालं तरी आपण खंबीर  राहायचं अस निर्णय करून माधुरी झोपली.

दुसऱ्या दिवशी दोघे वाकिलांकडे भेटले.

 वकिलांनी त्यांना सर्व काही समजावलं आणि पुन्हा एकदा विचार करा म्हणून सांगितलं.

पण यावर दोघांनी , आमचा निर्णय झालं आहे आणि आम्ही सामंजस्याने वेगळे व्यायच या विचारावर ठाम आहोत असे सांगितले.

वकिलांनी त्यांना १५ दिवसानंतर ची तारीख दिली.

आणि ते दोघे निघाले.

माधुरी - " १५ दिवसात सर्व काही जमा करा."

सतीश - " हो "

एवढ बोलून दोघे आपापल्या मार्गाला निघाले.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all