Login

तुझी ती भेट भाग -12

Alina takes shower after hurting of heart.

      तेवढयात मागून अलिना कोल्डड्रिंकची बॉटल घेऊन आली होती . पण याना बघून ती तिथेच थांबली . तिच्या हृदयात हलकीशी कळ आली होती . अश्रू तिच्या गालावरून खाली वाहत होते . तशीच ती मागे फिरली आणि हॉटेलकडे धावू लागली . 

         इकडे हे दोघेही एकमेकांच्या सहवासात मग्न होते . कार्तिकच्या खांद्यावर डोकं ठेवून त्या तळ्याच्या पाण्याच्या आवाजाने स्नेहा अगदी हरवून गेली होती . कार्तिकही त्या  तळ्याच्या आवाजात हरवून गेला होता . 

         हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये अलिना धावत रूमकडे जात होती . हातातील बाटल्या कधीची खाली पडून गेली होती . तिच्या डोळ्यातून अश्रू खाली कोसळत होते . दार उघडून ती थेट वॉशरूममध्ये गेली . शॉवर चालू करून त्याच्याखाली उभी झाली आणि मोठ्याने रडू लागली . तिच्या रडण्याचा आवाज त्या शॉवरच्या आवाजात मिसळू लागली . 

       कित्येक वेळानंतर स्नेहाला लक्षात आलं कि अलिना अजून आलेली नाही .

स्नेहा -" अलिना अजून नाही आली ?"

असं म्हणतच कार्तिकही मागे पाहू लागला . 

कार्तिक -" होय ग ... खरच ... हि कुठं राहिली ?"

      उभे होताच नीट पाहिल्यावर हॉटेलच्या बाहेरही ती दिसत नव्हती . 

स्नेहा -" चल जाऊन बघूयात ."

कार्तिक -" हो चल .."

       अजूनही थोडेफार ओली अंग घेऊन , हे दोघे हॉटेलच्या दिशेनी जाऊ लागले . हॉटेल तशी मोकळीच होती . जास्त कोणी लोक नव्हते . हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये जाताच कार्तिकला कोल्डड्रिंकच्या बाटल्या पडलेल्या भेटल्या . 

कार्तिक -" कोल्डड्रिंकच्या बाटल्या तर इथे आहेत . मग अलिना कुठे गेली ?"

        हे बघताच दोघांचे रूमकडे जाण्याची वेग वाढल . रूमच्या बाहेर येताच त्यांना कळलं कि रूमचा दरवाजा उघडाच होता . कार्तिक हळूच दार उघडला . स्नेहाही कार्तिकच्या मागोमाग आत येऊ लागली . रूममध्ये कंडिशनर आणि शॅम्पूचा वास घुमत होता . आतमध्ये जाताच दोघेही पाहिले कि बेडवर अलिना झोपलेली होती . त्या दोघांकडे तीच पाठ होत . अशी वाटत होती कि ती शॉवर घेऊन झोपली होती .कारण ती शॉवर सूट मधेच बेडवर झोपली होती . 

कार्तिक -" हि तर झोपलीये ."

स्नेहा -" इतक्या लवकर ?"

कार्तिक -" थकली असेल ती .."

स्नेहा -" पण आपण अजून जेवलो हि नाही ."

कार्तिक -" आपण दुपारी उशिरा जेवलो होतो . त्यामुळे भूक लागली नसेल तिला ."

स्नेहा -" तरीही तिला जागी करूया . रात्री जागी होईल बेचारी .."

कार्तिक -" हो ."

       स्नेहा हाक मारू लागली . पण तिच्याकडून ती काहीही उत्तर मिळत नव्हता . अशे दोन तीनवेळा हाक मारल्यावरही ती उत्तर देत नव्हती .

कार्तिक -" अग झोपू दे तिला ... चल आपण डिनर करून घेऊयात . "

        गाढ झोपली असेल अस विचार करून तीहि होकार दिली . स्नेहा तिच्यावर ब्लॅंकेट ओढली .दोघेही हळूच , दबक्या पावलाने बाहेर जाऊ लागले . दार बंद करून ते दोघे डिनर करायला गेले . दरवाजा बंद होताच अलिनाचे डोळे उघडले . ती बेडवर बसली आणि रडू लागली . तिला आतून तुटल्यासारखं वाटत होत . रडून तिचे डोळे थोडे सुजलेले वाटत होते . 

------------------------------------------------------------

      रात्रीच्या  जेवणाची वाट हे दोघे पाहत होते . दोघेही व्हेज जेवणाचे ऑर्डर दिले होते . 

स्नेहा -" आज अलिना किती खुश होती ना ?"

कार्तिक -" हो ... आज खूप खुशीत होती . आजचा दिवस ती खूप एन्जॉय केलं असणार ."

स्नेहा -" हो ... बर झालं , नाहीतर किती डिप्रेस्ड होती ती ..."

कार्तिक -" वेगळं वातावरण आहे , त्यामुळे फ्रेश झाली असणार ती .."

     तेवढ्यात त्यांचं ऑर्डर केलेलं डिनर आल . तसे ते त्यावर  तुटून पडले . अशेच गप्पा मारत ते जेवले . जेवण झाल्यावर ते शतपाउलांसाठी बाहेर फिरू लागले . तळेच्या कडेला हॉटेल असल्याने थंडीही होती. 

स्नेहा -" तुला एक विचारू ?"

कार्तिक -" हा विचार .."

स्नेहा -"तू जीला तळ्याच्या ठिकाणी मिस करत होतास . ती तुझी पहिली प्रेम होती का ?"

कार्तिक -" सांगू शकत नाही ."

स्नेहा -" म्हणजे ... मला नाही कळाल ."

कार्तिक -" त्या लहान वयात कस कळेल कुणाला कि प्रेम काय असत ते ?"

स्नेहा -" हो ... पण आताही तू तिची आठवण काढतोस ."

कार्तिक -" हो ... पण तळ्याला बघून मला आठवण आली ."

स्नेहा -" ह्म ..."

     त्या शतपाउलांमध्ये कित्येक वेळ तिला कार्तिकच्या हाताचा स्पर्श होत होता . काही वेळानंतर आकाशात चंद्राच दर्शन झालं . त्या चंद्राच्या उजेडात ते तळ अगदी काचे सारखा वाटत होता . या रम्य अश्या रात्रीच्या निसर्गाच दर्शन स्नेहा करत होती . त्या चंद्राकडे बघत ती अगदी मंत्रमुग्ध झालेली होती . 

      

       कार्तिकही त्या दृश्याचं आनंद घेत होता . अचानक त्याच लक्ष स्नेहाच्या चेहऱ्यावर गेलं . तिच्या डोळ्यात चंद्राच प्रतिबिंब दिसू लागलं होत . त्या उजेडयात ती अजून सुंदर दिसत होती . तिच्या त्या मोठ्या डोळ्यात तो हरवून गेला . तिचंही लक्ष कार्तिककडे गेलं . त्याला बघून ती काय म्हणून मान हलवली , तो सुद्धा नकार दर्शवत मान हलवला . पण त्याच्या चेहर्यावर न कळत एक स्माईल झळकत होती .

कार्तिक -" आता जायचं ?"

स्नेहा -" ह ..."

असं म्हणत ती कार्तिककडे बघितली .

कार्तिक -" म्हणल जायचं का ?... तिथे अलिना एकटी झोपलीय आणि उद्याही लवकर दुसऱ्या स्पॉटवर जायच आहे ."

स्नेहा -" हो .."

      दोघेही परत रूमकडे येऊ लागले . रूमजवळ येताच अगदी हळू आवाजात दार उघडले . अलिनाचा डोळा लागला होता . हे दोघेही वेळ न घालवता लगेच झोपी गेले . रोजच्या मज्जा मस्तीमुळे दोघे थकले होते म्हणून बेडवर पडताच त्यांना झोप लागली . 

       सकाळच्या त्या कोवळी ऊन खिडकीतून आतमध्ये येत होती . ती ऊन स्नेहाच्या चेहऱ्यावर पडत होती . त्या उन्हाच्या त्रासेने तिला जाग आली . उठून ती हात एकमेकांना घासली आणि चेहऱ्यावर हात पुसली . मग डोळे उघडली . ती बघते कि अलिना रूममध्ये नाहीये . लगेच उठून ती बाथरूम चेक केली , तर ती तिथेही नव्हती . तिला कळत नव्हतं कि काय करावं . ती वेळ न घालवता कार्तिकला उठवली . 

स्नेहा -" अरे कार्तिक उठ .. अलिना  कुठेही दिसत नाहीये ."

कार्तिक झोपेत म्हणाला .

कार्तिक -" झोपू दे कि ."

स्नेहा अजून जोरात कार्तिकला  हलवत म्हणाली.

स्नेहा -" अरे  अलिना कुठे दिसत नाहीये ."

कार्तिक -" काय ?"

असं म्हणत तोही जागला .

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

हा भाग थोडा लहान झाली आहे . पुढच्या वेळी नक्कीच मोठी भाग येणार आहे ... हा आवडल्यास नक्की कळवा आणि नक्कीच प्रोत्साहन द्या .... धन्यवाद ...